गांधी कुणालाही माहीत नसताना!

गांधी सिनेमा १९८२ साली आला. त्याच्या पन्नास एकावन्न वर्षं आधी म्हणजे १९३२ साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाइनने ह्या जगात कुणालाच माहीत नसलेल्या आणि जगभरात ज्यांचे पुतळे आहेत अशा व्यक्तीला पत्र पाठवले होते. असे रिकामे उद्योग करायला आईनस्टाइनला वेळ होता हे म्हणजे भलतंच.

हे पत्र राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद ह्यांच्या साईटवर आहे. ते इथे वाचता येईल.

Source: Words and Expressions, Workbook in English, Class-IX, NCERT Publication
...
पत्रातील मजकूर -
Respected Mr. Gandhi,
I use the presence of your friend in our home to send you these lines. You have shown through your words, that it is possible to succeed without violence even with those who have not discarded the method of violence. We may hope that your example will spread beyond the borders of the country, and will help to establish an international authority, respected by all, that will take decisions and replace war conflicts.
With sincere admiration
Yours
(Signed, ‘A. Einstein’)
I hope that I will be able to meet you face to face someday.
Gandhi’s response
LONDON,
October 18, 1931
...

म्हणे की गांधी कुणालाही माहीत नसतानाही अमेरिकेतल्या न्यूयार्कस्थित टाईम मॅगझिनने १९३० साली गांधींचा उल्लेख 'मॅन ऑफ द इयर' असा केला होता. मॅगझिन कव्हरवर गांधीजी होते. नंतर १९३१ मध्येही गांधीजींचा मॅगझिन कव्हरवर 'सेंट अर्थात संत गांधी' असा उल्लेख व फोटो टाईमने केला. त्या काळात परमेश्वराशी संवाद वगैरे होत नसल्याकारणानं भविष्यात आपण गांधी सिनेमा बनवणार आहोत हे एटनबरो ह्यांनाही माहीत नसावे.


Time Magazine Gandhi Cover 1930

गांधी सिनेमा येण्याआधी फ्रेंच फोटोग्राफर हेनरी कार्टिअर ब्रेसों ह्यांनी गांधी चालते बोलते असतानाचे आणि त्यांच्या अंत्ययात्रेचे जे फोटो काढले त्याचा फोटो एस्से मॅग्नमवर उपलब्ध आहे.


Henri Cartier-Bresson Gandhi’s ashes being transported to the River Ganges to be scattered. Delhi, India. 1948. © Henri Cartier-Bresson | Magnum Photos

ह्यातील अंत्ययात्रेच्या फोटोंमधला हजारो लाखोंचा जनसमुदाय पाहता गांधींची लोकप्रियता दिसेल. हे फोटो १९४८ सालचे आहेत. अगेन विश्वगुरू म्हणतात त्याप्रमाणे गांधींबद्दल जगात कुणालाही माहीत नसण्याचा काळ होता तो.. ब्रेसाँसारख्या जगविख्यात फ्रेंच फोटोग्राफरला भारतात येऊन महात्मा गांधींचे फोटो काढावे वाटले तेही ते मोर बदकाला चकली चिवडा भरवत नसताना हे म्हणजे कायच्या काय आहे. असं कुठे असतं का!

केवळ ब्रेसांच नव्हे तर अनेक परदेशी छायाचित्रकारांनी गांधींचे फोटो काढलेले आहेत. त्यातील एक Margaret Bourke-White ह्या अमेरिकन वॉर फोटोग्राफर होत्या. त्यांचा जन्म १९०४ साली आणि मृत्यू १९७१ साली झाला म्हणजे गांधी सिनेमा यायच्याआधी त्यांना गांधी कसे काय माहीत झाले असतील हे एक नवलच आहे. गांधीचे फोटो काढून ते लाईफ मॅगझिन, टाईम मॅगझिनला देऊन वगैरे मार्गारेट निर्वतल्या त्याआधीच त्यांना गांधी सिनेमातले डीटेल्स कळले हा दैवी चमत्कारच म्हणायला हवा किंवा येड्याचा बाजार. त्याशिवाय का त्या तडमडत आल्या असतील भारतात गांधींना भेटायला?


Mahatma Gandhi by Margaret Bourke-White

(फोटो इथे पाहता येतील.)

देश विदेशातल्या लोकांना गांधींचे नेमके का आकर्षण वाटत होते? की गांधी व गांधी विचारांबद्दल आदर, उत्सुकता गांधी सिनेमा आल्यानंतर लोकांच्या मनात तेवू लागली हे एटनबरो किंवा बेनजी सांगू शकतील. सिनेमा बनविण्यासाठी दिग्दर्शकाने आधी गांधीजींबद्दल थोडाबहुत रिसर्च केला असेल. त्यासाठी काही पुस्तके वाचली असतील, गांधीना ज्यांनी पाहिले भेटले अशांच्या भेटी घेतल्या असतील की नाही? काही कार्य नसलेल्या आणि ज्यांच्यामुळे कुणाच्याही आयुष्यात बरा वाईट बदल - फरक पडलेला नसतो अशांबद्दल कुणी का पुस्तक लिहील? मुळात गांधी जगप्रसिद्ध नसते तर गांधी सिनेमा काढण्याचे कारणच नव्हते.

न्यूयॉर्क टाईम्सच्या ऑप-एड पानावर स्वत: कोबीजींनी १९३० मधील गांधीजींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे अर्थात दांडी यात्रेचे गुणगान केलेले आहे. तरी गांधी सिनेमा येण्याआधी ते कुणालाच माहीत नव्हते असं ते म्हणतात कमाल आहे. जग बदलणाऱ्या दहा महत्त्वाच्या आंदोलनांत ह्या सत्याग्रहाचा समावेश असल्याची नोंद टाईम मॅगझिनने घेतलेली आहे ही माहिती विकिपेडियावर आहे.

गांधीजींच्या एका ब्रॉंझ पुतळ्याचे अनावरण १९६८ मध्ये लंडनमध्ये Tavistock Square येथे झाले. बाकी जगभरात त्यांचे पुतळे स्मारकं गांधी सिनेमा येण्याआधी आणि नंतर उभारले जात होते. सिनेमामुळेच गांधी लोकांना माहीत झाले त्याआधी ते कुणालाही माहीत नव्हते असे बोलचेंडू उडताना पाहून जगभरातील गांधीजींच्या पुतळ्यांनी हातातली काठी भिंतीला टेकवून ठेवली असेल आणि टीव्हीसमोर जाऊन कोपरापासून हात जोडले असतील. पण ही ब्रेक्रिंग न्यूज उघडा डोळे झोपा नीट टाईप मिडिया दाखवणार नाहीत. अशा बातम्या येतच नसतात. ठेंगा.

गांधींचे विचार आणि गांधी कुणालाही पटोत न पटोत गांधीबाबा फेमस आहेत. कोबी समर्थक गांधींबद्दल भलंबुरं बोलतात त्यांच्या नावाने बोटं मोडतात. पण पोपट हा होतो की नेमके तेव्हाच कोबीजी गांधींचे कौतुक सुरू करतात. त्यांच्या स्मारकांना भेटी देतात फुले वाहतात. असं करण्याची काय गरज पडली ह्यांना हे भक्त त्यांना का विचारत नाहीत? कितीही शिव्या घाला गांधींसमोर झुकावेच लागते. दिखाव्यासाठी का होईना..

(लेखामागील मूळ प्रेरणास्रोत इथे.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet