कंगना आणि कानफाटेपणा

कंगना राणावत लोकसभेत मंडीमधून निवडून आली. याबद्दल फेसबुकवर 'लकडी की काठी' गाण्यातली एक ओळ वाचली.
घोडा था घमंडी, पहुंचा सब्जी मंडी ...

परवा तिला विमानतळावर एका CISF कॉन्स्टेबलनं थोबाडीत मारल्याच्या बातम्या आहेत. कुलविंदर कौर असं नाव त्या कॉन्स्टेबलचं. तिच्या घरचे शेतकरी आंदोलनात सामील झाले होते; आणि कंगना त्या काळात आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणत होती. कुलविंदरची आई आंदोलनात आली होती, आणि कंगना म्हणत होती की, १००-१०० रुपये देऊन या बायका आणल्या आहेत.

या थोबाडीत प्रकारानंतर कंगनानं या कृत्यालाही दहशतवाद म्हणलं आहे; आणि भाजप नेतृत्वानं त्याबद्दल तिला काही ढोस दिल्याचंही बातम्यांमध्ये दिसलं नाही.

भूतकाळात कंगनानं नथुराम गोडसेनं गांधीजींना मारण्याचं समर्थनही केलं आहे.

कंगना राणावत

दुसऱ्या धाग्यावर एक प्रश्न आहे - "कंगनाला लोकांनी का निवडून दिलं हे समजत नाही." मला समजतं. हा प्रश्न ज्यांना पडला आहे, राजेश१८८, त्यांनाही हे समजत असेलही. ते मान्य करणं जड जात असावं; हे मला चांगलं लक्षण वाटतं. अशा लोकांची संख्या वाढत राहो.

field_vote: 
0
No votes yet

त्या कॉन्स्टेबल आणि त्या खासदार, दोघींत काय बाचाबाची झाली हे काही स्पष्ट झालेलं नाहीय. पण कॉन्स्टेबलला थेट नोकरीवरून निलंबित करणं थोडं जास्तच होतंय असं वाटत नाही का? त्या खासदारांना निलंबित केल्याचे कुठे वाचण्यात आलेले नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉन्स्टेबलना निलंबित केले किंवा नाही ह्याची खात्री नाही. पण कोणा एका बॉलीवूड मधल्या इसमाने तिला नोकरीची गॅरेंटी दिली आहे म्हणे! कंगना ताईंना हा घरचा आहेर मिळाला आहे..हे 2014 नंतरचं स्वातंत्र म्हणावे की काय!
मात्र त्या कॉन्स्टेबलच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. कायदा हातात घेणं चूक आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र त्या कॉन्स्टेबलच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. कायदा हातात घेणं चूक आहेच.

अगदी!

कंगना राणावत आणि ती कॉन्स्टेबल यांच्यातल्या बाचाबाचीबद्दल त्यांच्यापैकी कोणाचीही बाजू घेण्यात मला रस नाही. कंगनाबाईंची वक्तव्ये बेजबाबदार (तथा कोणास अपमानकारक) असू शकतात, परंतु म्हणून त्यांना थोबाडीत मारण्याचे समर्थन होऊ शकत नाही.

लक्षात घ्या, हे म्हणताना, थोबाडीत खाल्ल्याबद्दल (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणत्याही कारणाकरिता) कंगनाबाईंबद्दल कोणतीही सहानुभूती नाही. मात्र, असे करण्यातून काही अत्यंत चुकीचे पायंडे पडू शकतात.

असे पाहा. विमानतळावर सुरक्षातपासणी करणाऱ्या या कॉन्स्टेबलने सुरक्षातपासणीचे वेळी कंगनाबाईंना थोबाडीत मारली. का, तर म्हणे पूर्वी कधीतरी केलेल्या जाहीर वक्तव्यातून कंगनाबाईंनी या कॉन्स्टेबलच्या आईकरिता अपमानास्पद ठरू शकतील असे उद्गार काढले होते. (असो. कारण महत्त्वाचे नाही.)

आता, कंगना राणावत या खासदार आहेत. (कंगनाबाईंच्या वक्तव्यांचे समर्थन नाही, परंतु) एका खासदारालासुद्धा एखादी सुरक्षा कर्मचारी (आणि तेसुद्धा केवळ वैयक्तिक हेवेदाव्यांवरून) जर थोबाडीत मारू शकत असेल, तर (आणि विशेषेकरून तिला त्याबद्दल कोणतीही शिक्षा होत नसेल, तर) उद्या माझ्यासारख्या एखाद्याला (पक्षी: सामान्य प्रवाश्याला) सुरक्षातपासणी करणारा/री एखादा/दी कर्मचारी, केवळ माझे थोबाड आवडले नाही, या कारणास्तव थोबाडीत मारणार नाही, याची ग्यारंटी काय? (तसेही, प्रवाश्यांना थोबाडीत मारण्याचा अधिकार सुरक्षा कर्मचाऱ्यांना मला वाटते नसावा. (चूभूद्याघ्या.))

दुसरी गोष्ट म्हणजे, एका power tripला (पक्षी: एका power tripमधून केलेल्या बेजबाबदार वक्तव्याला) उत्तर म्हणून दुसरी power trip (पक्षी: दुसऱ्या power tripमधून मारलेली थोबाडीत) ही समर्थनीय कशी असू शकते?

प्रस्तुत कॉन्स्टेबलला शिक्षा होणेच इष्ट आहे. (पॅसेंजरांना थोबाडीत मारणे हे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या duties and responsibilitiesमध्ये येत नाही. (भारतातसुद्धा (अगदी मोदींच्यासुद्धा!) बहुधा येत नसावे; चूभूद्याघ्या.) किमानपक्षी, येऊ नये. निदान अधिकृतरीत्या तरी.) राणावतबाईंनी थोबाडीत खाल्ल्याचे दु:ख नाही, परंतु power (सत्ता!) सोकावते!

('आणि कंगनाबाईंसारखे सत्ताधारी बेजबाबदार वक्तव्ये करतात, त्यांचे काय? त्यांच्यावर काय कारवाई होते?' असा एक सूर दिसतो. तर त्याला उत्तर म्हणजे, एक तर अशा वक्तव्यांतून जोवर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नाही, तोवर त्यांच्यावर कारवाई नेमकी कशाच्या आधारावर नि का व्हावी? त्यापुढे, अशा वक्तव्यांतून कोणाची बदनामी जर होत असेल, तर त्याबद्दल कोर्टात दावा लावून आपले नशीब अजमावण्याचा (सनदशीर, कायदेशीर!) मार्ग संबंधित व्यक्तीस उपलब्ध आहेच. (Best of luck with that approach!) झालेच, तर अशी वक्तव्ये करणाऱ्या व्यक्तीस पुढील वेळेस निवडून न देण्याचा पर्यायही जनतेस उपलब्ध आहे. (एवढेही करून जनता जर अशाच व्यक्तींना पुन्हापुन्हा निवडून देणार असेल, तर... People deserve the government they elect (and vice versa), I guess.) परंतु, प्रस्तुत सत्ताधाऱ्यांच्या (किंवा कोणाच्याही) बेजबाबदार विधानांबद्दल कारवाई होत नाही, म्हणून त्यांना थोबाडीत मारणे हे समर्थनीय तर होत नाहीच, परंतु तो गुन्हासुद्धा आहे. आणि त्याबद्दल कारवाई होऊ शकते. नव्हे, झालीच पाहिजे.)

(बाकी, कोणा बॉलीवूडमधील इसमाने जर खरोखरीच प्रस्तुत कॉन्स्टेबलला नोकरीची ग्यारंटी दिली असेल, तर तो त्या इसमाचा खाजगी प्रश्न आहे. नि त्याचे संभाव्य बरेवाईट परिणाम त्या इसमासच लखलाभ होवोत. (पब्लिसिटी स्टंट म्हणून कायकाय करतील लोक! चालायचेच.))

----------

कायदा हातात घेणं चूक आहेच.

याला 'कायदा हातात घेणे' म्हणणे मला वाटते बरोबर ठरणार नाही. मुळात कोणालाही कशाकरिताही थोबाडीत मारण्याचा अधिकार कायदा देत नसावा, अत एव, थोबाडीत मारणे हे 'कायद्या'त येत नसावे. जे मुळात कायद्यातच नाही, ते करणे म्हणजे 'कायदा हातात घेणे' कसे?

नाही, हे 'कायदा हातात घेणे' नाही. हे त्याहूनही वाईट आहे. शुद्ध power trip आहे ही. तिला 'कायदा हातात घेणे' म्हणून sugarcoat करून तिच्या (पक्षी: त्या power tripच्या) वाईटतेची संहती कमी करणे हे निदान मला तरी योग्य वाटत नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण कॉन्स्टेबलला थेट नोकरीवरून निलंबित करणं थोडं जास्तच होतंय असं वाटत नाही का?

अजिबात नाही. किंबहुना, that is probably the least that could (and should) have been done.

(लक्षात घ्या, हे विधान करताना (याच धाग्यावरील प्रतिक्रियांत अन्यत्र म्हटल्याप्रमाणे) कंगनाबाईंबद्दल कोणत्याही प्रकारे सहानुभूती नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिमाचल प्रदेशालाही आता शेणपट्ट्यात मोजण्यात हरकत नसावी. कंगनाने जिंकावं अस काय केलंय तिने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिमाचल प्रदेशालाही आता शेणपट्ट्यात मोजण्यात हरकत नसावी. कंगनाने जिंकावं अस काय केलंय तिने?

सहमत आहे.

गणंगांना निवडून देण्याच्या प्रवाहाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने थोडाफार हातभार लावला हे बरे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याकडे लोकसभा काय किंवा विधानसभा काय कोणीही निवडणुकीत उभं राहून निवडून येऊ शकतं...

कधीकाळी अरुण गवळी विधानसभा निवडणुकीत निवडून आला होता...
आताच्या लोकसभेत अमृतपालसिंग का कोण खलिस्तान समर्थक अपक्ष म्हणून चार लाख मतं मिळवून खदूर साहिब इथून निवडून आलाय.

त्यामुळे आपल्याकडे कोणीही निवडणुकीत उभं राहून निवडून येऊ शकतो.

कंगना राणावतला मारहाण झाली त्याबद्दल थोडेसे...

ही न्यूज ज्या पद्धतीने व्हायरल (केली) झाली तिच्या मागं नेमकी कोणती अदृश्य शक्ती आहे ते बघणं गरजेचं आहे. मेडियाला रवंथ करण्यासाठी काही ना काही कुरण लागतं. निवडणुका झाल्यानंतर पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या न्यूज चालवल्या गेल्या निकालानंतर ती बातमी गेली. निकाल लागल्याच्या बातम्या आऊट साईड ला टाकून मारहाणीची बातमी तर केली नसावी?

एरवी समर्थक आणि विरोधक लोकांना ज्याचे त्याचे विषय महत्त्वाचे.

बाकी हिंसक,अहिंसक वगैरे वर मानवजाती नामशेष होईपर्यंत वादविवाद चर्चा होत राहतील.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

या निमित्ताने कंगनाताईंचं एक जुनं ट्वीट समोर आलं आहे. त्याचं निमित्त होतं ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथनं मारलेली थोबाडीत. Blum 3
Kangana Ranaut's Old Post Defending Will Smith For Smacking Chris Rock Goes Viral Amid CISF Slap Incident

Kangana said, “If some idiot used my mom or sister’s illness to make bunch of fools laugh I would slap him like @willsmith did,” Kangana wrote, adding clapping emojis. She continued, “bada** move...hope he comes to my #lockup,” and added a laughing emoji.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इस पगली ने तो रुला दिया मेरेको!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेते,नेत्यांची पोर, वाट्टेल तसे वागतात,देशाचे सर्व कायदे धाब्यावर बसवतात.
आणि मीडिया चे अँकर पण हल्ली नेत्या न सारखेच वागत आहेत
द्वेष निर्माण करणारे,हिंसेला प्रोत्साहन देणारे भाष्य खूप सर्रास आम् सभेत आणि मीडिया मध्ये करत असतात.
त्यांच्या वर कोणतीच कारवाई होत नाही.
किती तरी असे प्रसंग आपण रोज बघतो.
जनतेत त्या मुळे त्या नेत्या न विषयी राग असतो,पण सात्ते पुढें शहाणपण चालत नाही म्हणून लोक मूग गिळून गप्प बसतात.

अशा नेत्यांवर,त्यांच्या चीली पिली वर लगेच योग्य ती कायदेशीर कारवाई झाली असती तर असे प्रसंग घडणार च नाहीत.
अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे द्वेष पसरवणे नाही,हिंसेला प्रोत्साहन मिळेल असे बोलणे नाही,कोणाला विनाकारण बदनाम करने नाही.

आता त्या cisf च्या मुलीला कायद्या चे महत्व सांगायची स्पर्धा चालू आहे ,तिने कसा कायदा मोडला हे सांगितले जात आहे.
कंगना जेव्हा हिट स्पीच देत होती तेव्हा कंगना पण कायद्याच्या मजक उडवत होती.
तेव्हा मात्र सर्व गप्प होते.
तिच्या वर काहीच कारवाई सरकार नी केली नाही.
त्याचेच हे फळ आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुलीची कृती चुकीचीच आहे. संसदेत रमेश बिदूरी ज्याप्रकाची असंसदीय गलिच्छ भाषा वापरत होते तेव्हा त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांना संसदेचे सुरक्षा कवच असते, सर्वसामान्य नागरिकांना अशी सवलत नसते, त्यांच्या भावनांचा कडेलोट होतो, परिणामांचा विचार करत बसण्यापेक्षा ते कृती करून मोकळे होतात जे ह्या मुलीने केले. लोकप्रतिनिधींनी आपल्या नागरिकांचा आदर ठेवला तर त्यांनाही आदर मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच कानाखाली मारल्यामुळे मी त्या मुलीचा निषेध करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेतकरी आंदोलन दरम्यान .
कंगना सहित bjp चे मूर्ख व्हॉट्स ॲप ज्ञानी शेतकऱ्यांना आणि पंजाबी लोकांना खलिस्तानी देश द्रोही बोलत होते तेव्हाच केंद्र सरकार नी कंगना आणि बाकी मूर्ख भक्त ह्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली असती तर द्वेषाचा हा कॅन्सर समाजात पसरलाच नसता
आणि एअरपोर्ट वर जे घडले ते घडले पण नसते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंगना नालायक आहेच पण तिला कानफटात मारणे तेही ज्यांच्यावर विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनी हे योग्य नाही. त्या बाईला नौकरीवरून काढणेच योग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पूर्वी शेतकरी आंदोलनाला दल अंगाने काही विरोधी वक्तव्य केलं होतं.

पोलीस बाईचे कुटुंबीय शेतकरी आहेत.

आता आली आहे समोर तर मार थोबाडीत हे खाते चालवून घेणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखामध्ये कंगणाचा एखादा न पाहिलेला (आंंतरजालावर जास्त प्रसारीत न झालेला) फोटो असता तर बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

वर चिकटवलेला फोटो कंगनाचा असल्याचं आजवर कुठेही बघितलेलं नाही. तेव्हा हाच चालवून घ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वर चिकटवलेला फोटो विंडोज़मधून दिसत नाही. (आयफोनवरून लख्ख दिसतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजजवळ आयफोन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात नथुराम गोडश्याचे दोन फोटो आणि फाळणीच्या काळात एका झुकझुकगाडीच्या टपावरून निर्वासित इकडून तिकडे (किंवा तिकडून इकडे; चूभूद्याघ्या.) जात असतानाचा एक (प्रसिद्ध) फोटो, यांचा एक संयुक्त (काँपोझिट) फोटो (आणि त्याबरोबर कंगनाबाईचे ट्वीट) आहे.

आजवर त्याला कोणीही 'कंगना राणावतचा फोटो' म्हणून ओळखलेले नाही, हे खरेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरक्षा कर्मी व्यक्तीकडून झालेली कृती चुकीची आहे.
तिची आई अजिबात देशद्रोही नाही असे आपण समजू.
परंतु याच न्यायाने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या आणि अशा अनेक हत्या त्यांचे समर्थन करता येते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले होते.
त्यातले अनेक लोक देशप्रेमी असले तरी कितीतरी लोक देशद्रोही देखील होते.
कॅनडामध्ये श्रीमती इंदिरा गांधींचा रक्तबिंबाळ मिरवणूक काढण्यात आली होती आणि ती अत्यंत अभिमानाने दर्शवण्यात आली होती.
ते सर्व लोक शीख होते.
म्हणून शेतकरी आंदोलनाचा आणि देशद्रोह्यांचा अजिबातच काहीही संबंध असू शकत नाही असा अर्थ काढणे आणि कंगना राणावत चे अभिव्यक्तीस्वातंत्र्यहनन करणे चुकीचे आहे.
==
या दोन स्त्रियांमध्ये काय बाचाबाची झाली याबद्दल उत्कंठा असणे एक विकृतपणाचे लक्षण आहे.
आपला कंगना राणाची असलेला राजकीय विरोध हा तिला झालेल्या शारीरिक हानीने संपूर्ण झाला आहे असे वाटून घेणे हे देखील एका दुर्बुद्धीचे लक्षण आहे.
एका राष्ट्राचे संरक्षण तसेच माहिती नसताना आपल्या मातीचे केलेले चारित्र्य हनन या दोन गोष्टी दुर्दैवाने एकत्र आल्या.
असे पुन्हा पुन्हा न हो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

kailavyanastittva

कर्तव्य साधना या वेब पोर्टलवरती ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वाद्वशीवार यांनी एक लेख लिहिला आहे. तो इथे कृपया वाचावा. ते म्हणतात की:

कुलविंदर ही चंदीगडच्या विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेची पाहणी करणाऱ्या पथकाची प्रमुख आहे. त्याच जबाबदारीमुळे तिने कंगना राणावत या पडेल नटीला व चढेल खासदाराला तिचा मोबाईल त्याच्या स्क्रीनटेस्टसाठी मागितला. त्यावर "मी खासदार असताना माझा मोबाईल तपासणीसाठी मागण्याची हिंमत तू कशी केलीस" असा कमालीचा बेकायदा व उर्मट प्रश्न या कंगनाने तिला विचारला. त्यावर "ते माझे कर्तव्य आहे" असे ती म्हणाली. मग या कंगनाने तिला तिचे नाव विचारले व तिच्या ड्रेसवर अडकवलेल्या पट्टीवरील तिचे नाव वाचलेही. त्यानंतर ही कंगना तिला म्हणाली, "म्हणजे तू खलिस्तानी आहेस तर!"

आपल्याला खलिस्तानी म्हटल्याचे ऐकताच कुलविंदरने कंगनाच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. त्यामुळे कंगनाच्या तांबड्या-लाल झालेल्या गालाची छायाचित्रे काही माध्यमांनी पडद्यावर दाखविलीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

द्वादशीवारांचा लेख वाचून आश्चर्य वाटले, विषाद वाटला. तद्दन बिनडोक, म्हातारचळ लागल्यासारखा लेख!
बाकी, द्वादशीवारांची मन्वंतर आणि युगांतर ही पुस्तके अतिशय सुंदर आहेत व मजजवळ आहेत. हे असलं त्यांनी लिहायला नको होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

काय म्हातारचळ लागल्यासारखं वाटलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

तुमचा मुद्दा एका अर्थी बरोबर आहे. लेख म्हातारचळ लागल्यामुळे लिहिल्यासारखा वाटत नसून, एखाद्या भडक डोक्याच्या बिनडोक तरुणाने लिहिल्यासारखा वाटतो. द्वादशीवारांचे वय काय, याबद्दल मला कल्पना नाही, परंतु ज्याअर्थी ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचे वर्णन होते आहे, त्याअर्थी बरेच असावे. (अनुभवही कदाचित बराच असावा.) अशा व्यक्तीकडून अशा लेखाची अपेक्षा सामान्यत: नसावी; थोड्या परिपक्वतेचे मागणे अती नसावे.

(टीप: यामागे राणावतबाईंच्या वक्तव्याचे वा वर्तणुकीचे कोठल्याही प्रकारे समर्थन नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१ लाख त्या बाईला पाठवणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

A fool and his money are soon parted.

असो. त्यांचा पैसा. आपल्याला काय त्याचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित आवडत नसलेल्या विचारधारेच्या भूमिका घेणाऱ्या लोकांना जास्त फुटेज मिळाले की उगाचंच त्रास होतो. अशा लोकांना धडा मिळाला की मनोमन आनंद होतो. आता कशी जिरली, असंच पाहिजे वगैरे भावना असतात

तसंही ती कंगना काहीही बरळते. (आपल्याकडे हे काही नवीन नाही. कोणीही काहीही बरळतो. पंप्र प्रचार सभेत वाट्टेल ते बरळलेत. तिथे सर्वसामान्य माणसाचं ते काय) कंगनाला कोणी सिरियसली घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. तिला मारहाण झाली म्हणून हर्षोल्लास झालेली मंडळी कैक आहेत सोशल मीडियावर. समजा तिच्या ऐवजी कोणी पुरोगामी कंपुतील जर अभिनेत्री असती तर मारहाण झाल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या?

'तिकडच्या' लोकांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करणार असाल तर 'इकडच्या' लोकांना मारहाण झाली तर समर्थन करणारेही असतात हे लक्षात ठेवावं.

आमच्या विरोधात बोलाल तर याद राखा योग्य तो धडा शिकवू ही गुर्मी सगळीकडे आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

कंगना लां मागे मंडी की रण्डी म्हटले तो what's app वेगाने फिरत होता.
तसेच कंगना छा फोटो टाकून हीचा भाव काय आहे असे तर एका काँग्रेस क्या प्रवक्तत्याने टाकला होता. हे दोन्ही बाजुंनी होत आहे कोणीच मागे नाही यात. विशेष म्हणजे द्वेष इतका वाढलेला आहे की एरवी ची समजूतदार माणसे पण कमालीची विखारी बनत चालली आहे. बाकी सोडा माझ्या स्वतः पुरते सांगतो सोशल मीडिया चा वापर मला फार उथळ प्रतिक्रियावादी बनवत चाललेला आहे मी फार वेगाने आणि अविचाराने कधी कधी खूप घाईने व्यक्त होत आहे असे मला जाणवले.म्हणून मी बरेच दिवस सोशल मीडिया बंद केला होता. पण अजून ही सुधारणा नाहीच. बरेच एरवी चांगले संतुलित संवेनशीलतेने वागणारे लोक इतके एकांगी झालेले आहेत की बस.सर्वात मोठी भीती एकांगी होऊन balance जाण्याची आहे. असो साधना तर मरेपर्यंत करावी लागते म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंगना राणावतला ‘मंडी की रंडी’ म्हणणे, किंवा तिचा भाव काय आहे असे विचारणे, दोन्ही गोष्टी कोठल्याही प्रकारे समर्थनीय नव्हत्या.

कंगना राणावतची वक्तव्ये वा वर्तणूक कोठल्याही प्रकारे समर्थनीय नव्हती.

कंगना राणावतला मारलेली थोबाडीत कोठल्याही प्रकारे समर्थनीय नव्हती.

Two wrongs do not cancel each other out; they merely add up. Three wrongs complicate matters beyond redemption.

परंतु, चलता है, हिंदुस्तान है, हीच जेथे फिलॉसफी आहे, तेथे त्याला कोण काय करणार? येथे नक्की कोणाला पडलेली आहे?

चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात लोकांनी नियुक्त केलेले लोक लोकप्रतिनिधी हेच देशाचे मालक,राजे सर्व काही आहेत.
कायदे निर्माण करने आणि ते स्वतःच तोडणे हे फक्त हीच लोक करू शकतात
Cisf ची शिपाई नोकर आहे तिचे काही तरी कर्तव्य आहे तर लोकनियुक्त सरकार आणि लोकनियुक्त प्रतिनिधी हे तर उच्च sthanavar आहेत् फतुम्ही मान्य करा किंवा नका करू तेच देशाचे मालक आहेत असेच त्यांचे वागणे असते त्यांची कर्तव्य,जबाबदारी घटनेत सांगितली आहे पण ते पाळतात का. ,?
१) ह्या भागातील लोकांनी मत दिली नाहीत त्यांची काम करणार नाहि लोकनियुक्त प्रतिनिधी,मंत्री,अगदी मुख्यमंत्री पण जाहीर पने बोलतात ती चूक नाही अभिव्यक्ती स्वतंत्र आहे कारणं ते मालक आहेत.
ह्यांच्या स्वार्थी निर्णय विरूद्ध ,देश हिता विरूद्ध घेतलेल्या निर्णयाचा कोणी विरोध केला की देशद्रोही.
हीच देशद्रोहाचा व्याख्या आहे का?की असे बोलणारे सरकार आणि प्रतिनिधी हे गुन्हेगार आहेत असे बोलणे हे अभिव्यक्ती स्वतंत्र नाही..
ह्याचा न्याय कोण करणार
आणि एक साधी cisf ची शिपाई अपमान झाला म्हणून तिने कानाखाली मारून तो व्यक्त केला म्हणून ती गुन्हेगार.

मग मालकांनी कोणते गुन्हे केल्यावर त्यांना दोष देणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0