संवत्सर

चैत्रात पालवे
सुजाण हळवी
मोहोर आरास
सौभाग्य मिरवी
देखणा उंबरा
तोरण दारास

ग्रीष्मात दूरस्थ
घामेजले काही
दीर्घ उच्छ्वास
संपन्न चुलीला
हुरहूर थोडी
गारव्याचा ध्यास

वीज उन्मादली
सरींचा कोसळ
आषाढात मग्न
मोरपीस गाते
श्रावणाची धून
हिरवी कृतज्ञ

शारद-चांदणे
दैवी संकेतांचे
सौहार्द-स्निग्ध
चेतली आकांक्षा
कापराच्या देही
अर्पण-सिद्ध

अनाकलनीय
शिशिराचे दान
शब्द मौनाचे
सखी प्रज्ञावती
निष्पर्ण खोडाची
कुंडली वाचे

<<< 0 >>>

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

संपूर्ण वर्षाच्या वेगवेगळ्या ऋतूंना मोजक्या प्रतिमांनी सजवणारी कविता आवडली. संपन्न चुलीला गारव्याचा ध्यास, आणि कापराच्या देहात चेतणारी अर्पणाची आकांक्षा या प्रतिमा विशेष मोहक आहेत.

बहुतांश ओळींत असलेली सहा अक्षरांची लय काही ठिकाणी पाच अक्षरांनी तुटते मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रोत्साहन आणि परीक्षणाबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम श्री.अजित यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत!

कल्पना, रुपके, प्रतिमा अतिशय आवडल्या.
बरीचशी कडवी ठराविक लयीत म्हणता येतायत हा बोनस (वर राजेश म्हणतायत तसे उर्वरीत कडव्यांवर अधिक काम केले तर उत्तमच)

पुढील लेखनास शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच सांगायचे आहे.
आशय उत्तम. शब्दांवर थोडे अधिक काम चालले असते. 'वीज उन्मादली' आवडले.
स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा!
ते नाव वाचून कविता उघडली तेव्हाच इन्ट्युइशन होतं काहीतरी ओढाळ वाचायला मिळणार. असं वाटलं का माहीत नाही.
अपेक्षा पूर्ण झाली.

शारद-चांदणे
दैवी संकेतांचे
सौहार्द-स्निग्ध
चेतली आकांक्षा
कापराच्या देही
अर्पण-सिद्ध

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0