Skip to main content

भारत आणि ए०आय०

भारत आणि ए०आय०
===========

--राजीव उपाध्ये

आय०आय०टी० मुंबई चे सध्याचे संचालक प्रा० शिरीष केदारे आणि मी आय० आय० आय० टी० त असताना चांगले "अरे-तुरे"तील मित्र होतो. आम्ही एकाच वयाचे, पण वेगवेगळ्या शाखा आणि हॉस्टेल. संस्कृतप्रेम आणि गिर्यारोहण हा तेव्हा आमच्या मधला समान दुवा होता. आमचे कधी वाद आणि भांडणे झाली नाहीत, तसेच त्यांच्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान पण झालेले नाही. त्यामुळे माझा त्यांच्यावर वैयक्तीक राग पण अजिबात नाही. उलट आपला मित्र आय०आय०टी० सारख्या जगप्रसिद्ध संस्थेचाचा संचालक झाला हे कळले तेव्हा अंगावर मूठभर मांसच चढले होते.

धुरंधर सिनेमा: गुप्तचर कारवाईचा गौरव की सनातनी अजेंडा?

मी स्वतः पंतप्रधान कार्यालयात असताना, सर्वश्री ए. एस. दुलत आणि एम. के. नारायण साहेबांचा पी.ए. राहिलो असल्याने, गुप्तचर कारवाई म्हणजे काय आणि त्या कशा कार्य करतात याची थोडी कल्पना होती. शत्रू देशांत राहून आलेल्या काहींनी त्यांचे किस्सेही सांगितले होते. म्हणून हा सिनेमा बघितला.

कन्या सासुरासी जाये - अरुण खोपकर

कित्येक वर्षं सोबत केलेल्या पुस्तकांचा निरोप घेणं सोपं नसतं, सांगताहेत अरुण खोपकर.

नास्तिकतेची वल्कलं

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा
पेटवून इहवादाचा डंका
झालाय एकजण नवखा नास्तिक
बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक

कोणता सच्चा धार्मिक यावर
करू लागला गहन विचार
कोणती श्रद्धा कोणती अंधश्रद्धा
यातच मनस्थिती झाली द्विधा

जन्मतः असल्याने हिंदू 
जागरूकपणे प्रश्न विचारून
झिडकारल्या रुढी, प्रथा
नाकारल्या परंपरागत आस्था 

सोशिकपणे लागला वाचू
विचारवंतांची पुस्तके मिळवून 
धार्मिक समीक्षा कठोर करून 
विवेकाने निर्णय घेऊन 

नापिकीची सुगी न सरते

मृगजळाचा पूर , माझे
भग्न तारू
नापिकीची सुगी न सरते,
काय पेरू ?

उत्सवांचे ढोल ताशे
गगनभेदी
कर्णबधिरांचीच आता
रोज सद्दी ?

व्यापुनी अवघ्यास कृ बु
अतृप्त उरली
मानवी सृजनास आता
कोण वाली?

अजूनही क्षितिजावरी
अस्पष्ट तारे
अंधकाराची फिकीर मी
का करू रे ?

आज मै उपर , आसमां नीचे

करुणा... नावात काय असते म्हणा. जिथे करुणेचा पाझर फुटायला हवा तिथे नेमके हे नाव सापडत नाही आणि जिथे नको तिथे हे नाव सापडते. आमच्या शाळेच्या वर्गात दोन करुणा होत्या. खरे तर त्या वेळेस साथच होती दिपाली रुपाली सोनाली अशा नावांची. प्रत्येक काळात असते तशी .शाळेच्या वर्गात चार तरी दिपाल्या , सोनाल्या आणि रुपाल्या असायच्या. मुलांच्या बाबतीत दोन विजय चार सुनिल आणि तीन संजय नक्की सापडणार म्हणजे सापडणारच. आडनाव सारखे असणे समजू शकते.नाव आणि आडनावही सारखे निघायचे. पाटील कुलकर्णी जोशी पवार कांबळे गायकवाड हे असतातच.आमच्या सातारकडे तर काही गावे च्या गावे ठरावीक आडनावांची असतात.

मनपिशाच

हा जो पुरुष आहे तो एका परदेशी कंपनीत मॅनेजर आहे. त्याचं नाव आहे मॅनेजर. ही जी स्त्री आहे ती त्याची बायको आहे आणि तिचे नाव बायकोच आहे. ह्या क्षणी हॉस्पिटलच्या स्पेशल रूम मध्ये असहाय अगतिक स्थितीत लोळागोळा होऊन पडली आहे. मॅनेजर बायकोच्या समोर खुर्चीवर बसला आहे.
त्याच्या क्षुब्ध मनांत अनेक अर्थशून्य वादळें निर्माण झाली आहेत,दुसरें तरी काय करणार?
वेळ, रात्रीचे आठ वाजले आहेत.
आठचा राउंड करून डॉक्टर तिला तपासून गेले. तपासणी आपली नेहामिचीच. म्हणजे ब्लड प्रेशर स्तेथेस्कोप ऑक्षिजन लेवल इत्यादि. केस पेपर वर काहीतरी खरडून डॉक्टर बाहेर पडले.
तो डॉक्टरांच्या बरोबर बाहेर गेला.

जागतिक रंगभूमी दिवस : नाट्यकलेचा जागतिक उत्सव

जागतिक रंगभूमी दिवस : नाट्यकलेचा जागतिक उत्सव

दरवर्षी २७ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. नाट्यकला ही मानवाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा एक अत्यंत प्रभावी आणि जिवंत प्रकार आहे. या कलेच्या माध्यमातून समाजातील विविध भावना, संघर्ष, विचारधारा आणि वास्तव परिस्थिती रंगमंचावर साकार केली जाते. जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे या कलेचे महत्त्व अधोरेखित करणे, कलाकारांचे योगदान गौरविणे आणि नव्या पिढीला नाट्यकलेकडे आकर्षित करणे हा आहे.