Skip to main content

वलय (कादंबरी) - प्रकरण १२

प्रकरण ९, १० आणि ११ ची लिंक:
http://www.aisiakshare.com/node/6480
---

प्रकरण 12

संध्याकाळी साडेसात वाजता दोघे बेडवर एकमेकांच्या पायात पाय अडकवून बाहुपाशात बसलेले होते.

न बोलता.
शांत. निवांत.

“मी कॉफी बनवून आणते!”, रागिणीने शांतता भंग केली.

“थांब. बैस अजून! अशीच मला चिटकून बाहुपाशात बसून रहा! तुला क्षणभरसुद्धा दूर होऊ द्यावेसे वाटत नाही!” सूरज तिला आणखी छातीशी ओढत म्हणाला.

ललित लेखनाचा प्रकार

कथांश - १

अ‍ॅसेटसची किंमत बाजारभावावरुन ठरते. अ‍ॅसेट म्हणुन जमीन विकत घेतलेली असल्यास त्या जमिनीतुन पुढे येणारे संभाव्य उत्पादन हे त्या जमीनीचा आजचा बाजारभाव ठरविण्यासाठी वापरले जाते. सामान्य लोकांना दोनच प्रकारच्या जमिनींची खरेदी विक्री माहिती आहे. एक येलो झोनमधली जमिन ज्यावर घरे बांधली जातात आणि दुसरी ग्रीन झोन मधली जमीन जिच्यात शेती केली जाते. ह्या दोन ढोबळ प्रकारांपलिकडे जमीनीची अनेक उत्पादने असु शकतात. एखाद्या प्रदेशात चांदीचे खजिने असतील तर तिथल्या जमिनीची किंमत तिच्यात असलेल्या चांदीच्या उत्पादनांवरुन ठरते.

ललित लेखनाचा प्रकार

पुण्याची मुंबई आता झाली की राव!

आजकाल आपले पुणे सुध्दा..
रात्रभर जागे राहून धडधडत असते!
कारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे..
स्वप्न जागेपणी त्याला पडत असते!

पुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून..
केविलवाणी धावत रडत असते!
मुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून..
ती सुद्धा मैत्रीला जागत असते!

मुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं..
दुःख मुंबई पचवत जगत असते!
पुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन..
गळ्यात गळा घालून रडत असते!

कशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव?
पुण्याची मुंबई आता झाली की राव!
तुमचा आमचा असतो सेम वडा पाव..
दिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव!

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?
(संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन)

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अनुसूयेचं #MeToo, ब्रह्मा विष्णू महेश संकटात

दि. माघ कृ ८, कलियुगाब्ध ५११२
चित्रकुटचे जंगल: आताच हाती आलेल्या बातमीनुसार 'मीटू' चळवळीच्या लाटेत संकटात सापडलेल्यांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचीही भरती झालेली आहे. पतिव्रता अनुसूया यांनी या तिघांवर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पतीच्या व्रतात अडकल्याचा फायदा घेऊन या तिघांनी आपल्याला नग्न होण्यास भाग पाडले असे त्यांचे म्हणणे आहे.

परदेशस्थांना आयकराबाबत सावधानतेचा इशारा

असे वाचनात आले की Common Reporting Standard Multilateral Competent Authority Agreement, or CRS MCAA नावाच्या आन्तरराष्ट्रीय करारावर भारतासह १०० देशांनी सह्या केल्या आहेत.

आयकरदाता सामान्यत: ज्या देशामध्ये राहतो आणि जेथे आयकर भरतो त्या देशाबाहेर पैसा गुंतवून मूळ देशाचा कर चुकवायचा ह्या प्रवृत्तीचा मुकाबला करणे हे ह्या कराराचे उद्दिष्ट आहे. देशादेशांना आयकरदात्यांची माहिती एकमेकास कळविणे सुकर व्हावे ह्याची व्यवस्था ह्या करारामध्ये आहे.