Skip to main content

वेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक

उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात. विक्रेत्याने छापील किंमतीपेक्षा दोनचार रुपये जास्त आकारलेले असतात हे त्यांच्या लक्षातही येत नाही.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण

-------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.६ | भाग २.७
-------------------------------

दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे. श्री प्रल्हाद तिपनिया आणि बागली गावातील हस्तलिखित यांच्याशी तो शब्दशः जुळणारा नसला तरी त्याचा अर्थ मात्र तिपनीया यांच्या पाठभेदाशी जुळणारा आहे आणि मला लागलेला अर्थ देखील त्याने अजून बळकट होतो.

स्पर्धा का इतर?

इंद्रधनुष्य

पाउस पडत नसताना
किंवा पाउस पडून गेल्यावर
जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होत असेल
त्याच्या मधल्या कालावधीत
सिटी बसने मी प्रवास करत असतो
खिडकीतून बाहेर पाहत राहतो
बाहेर ओली झालेली जमीन
झाडांवरून ठिबकणार पाणी
त्यांना आता खास पाणी घालायचं काही कारण नाही
आं करून पाऊसपाणी पिल्यासारख ताज टवटवीत शहर
शहराच्या कोपर्य कोपर्यात cartoonist ला
श्रन्धाजली देणारी ग्राफिटी
कुठल्यातरी stop वर
बस चे automatic दरवाजे उघडतात
ती बस मध्ये येते
अप्रोन घालून
माझ्या बाजूला बसते
आम्ही एकमेकांना नाव न विचारता
बोलायला सुरु करतो
मानसाच डिसेक्शन करताना
कस वाटत यावर बोलतो

सांख्यिकी : प्राथमिक अभ्यास

सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स हा विषय विज्ञानाचा एक भाग आणि विज्ञान, समाजशास्त्रं अशा विषयांचा अभ्यास करण्याचं एक तंत्र आहे. शाळेत आपण सरासरी, टक्केवारी अशा संकल्पना शिकतो. म्हटलं तर कोणत्याही दोन आकड्यांची सरासरी काढता येते. तरीही आजचं तापमान २४ अंश सेल्सियस आणि आजच्या दिवसात मी सव्वा लिटर पाणी प्यायलं, यातले दोन आकडे, २४ आणि १.२५ यांची सरासरी काढली जात नाही. मुद्दा असा की वेगवेगळ्या आकड्यांचा आपसांत संबंध कसा लावायचा यासाठी निरनिराळे नियम वापरले जातात. जे आकडे गोळा केले जातात त्याबद्दल काही प्राथमिक अंदाज, माहिती असणं आवश्यक आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

खूप माज वाढलाय !

खूप माज वाढलाय !

तसा तो आधीपासूनच आहे

खूप आधीपासून

अगदी जन्मापासून.

आधी त्याला काही कळत नव्हतं

पण जसजसं कळायला लागलं

तसतसा त्याचा माज वाढतंच चाललाय.

हो खरंच ! माज वाढतंच चाललाय !

घरात आश्रित असावा तसा तो

शहरात नवीन असावा असा तो

अगदी पाहुण्यासारखा तो.

पण तरीही

पण तरीही खूप माज वाढलाय !

प्रत्येक गोष्ट स्वत:ची म्हणवतोय,

मुळात त्याचं आहे का काही ?

खरं तर काहीच नाहीये

आणि हे त्यालाही माहितीये.

पण तरी खूप माज वाढलाय !

हे माझं ते माझं

हेही माझं आणि तेही माझं.

तुमचं, तुझं असं काही नाही.

आणि आपलं असं तर काहीच नाही.

..कुणी दार माझे ठोठावले..

उगा आग्रहाने बोलावले.
किती आज तेही सोकावले.

कुठे चोर दडला अकस्मात तो?
कुणी दार माझे ठोठावले..!!!

पुन्हा झूळुकिशि सख्य सांधले
पुन्हा एक वादळ घोंघावले.

तिचे बेत होते,तिला धार्जिणे.
तिने बेत माझे धुडकावले.

चितेला म्हणालो आईच तू!
किती छान मजला जोजावले.!

थव्यामागुनि निघाले थवे
कुणी दगड आत भिरकावले?

असो देव वा तू तत्सम कुणी.
असे कोण मजला रे पावले?

किती काळ मजला झुंजावले
अता दु:ख माझे थंडावले.!

जुन्या वेदनेने लळा लावला
सुखाला नव्या मी हुसकावले!

कुणी भक्त ना पावण्या जोगता
वरी देव सारे सुस्तावले!

सुखाला म्हणालो सरक ना पुढे!
किती सभ्यतेने गुरकावले!

प्राणिसंग्रहलयांवर (zoo)बंदी आणावी का?

टोकीयोच्या प्राणी संग्रहलयामध्ये अत्यंत कमी जागेत आपले ६० वर्षांचे आयुष्य खर्ची घातलेल्या ट्राजिक हनाको या हत्तीणीचा एकाकीपणामुळे मृतु झाला आहे.
ही हत्तीण दोन वर्षांची असताना तिला थायलंड ने जपान सरकारला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ति काँक्रीटच्या एका छोट्या जागेत आपले आयुष्य व्यतीत करत होती.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जम्नठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे.
http://m.huffpost.com/us/entry/hanako-loneliest-elephant-dies_us_57475c…
आपण आज पासून ही शपथ घेऊयात की कोणत्याही प्राणी संग्रहलयाला आपण भेट देनार नाही,

रस्त्याचे ऋण ...

पूर्वी आमचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग हा फोटोत दाखवल्यासारखा असा दिसायचा. दोन्ही बाजूनी दाट झाडी अन त्या झाडांच्या अर्धवर्तुळाकार कमानी सारया रस्त्याने स्वागताला उभ्या असत. झाडांच्या या कमानी इतक्या दाटीवाटीने उभ्या असत की आपण झाडांच्या कंच हिरव्यागार पानांच्या हिरवाईतल्या गुंफातून प्रवास करतो आहोत की काय असे वाटायचे. रस्त्याच्या दुतर्फा असणारया या झाडांच्या भाऊगर्दीत प्रामुख्याने लिंब, बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, पळस, सुबाभूळ आणि निलगिरी यांची झाडे जास्त करून असत. त्यातही कडूलिंबाची मेजोरिटी मोठी होती.

ललित लेखनाचा प्रकार

"तातू, डुकऱ्या आणि बकबक"

तातू, डुकऱ्या आणि बकबक एकवीरा देवीच्या देवळाकडे चालले असताना शेजारून कुंपणातून तुपेवकिलांचा रॉनी कुत्रा त्यांच्यावर भडभडा ओरडला त्यातील अनेक शिव्या तातूला अजिबात पटल्या नाहीत तातूने भयानक गोटा उचलला जाऊ दे रे हा कुत्रा चांगला आहे मुलींवर भुंकत नाही बकबक म्हणाला अरे हा एकदम भेंचोत कुत्रा आहे भेंचोत परवा शांताक्काला चावला शांताक्का जाडी आहे रे बकबक म्हणाला अरे पुरणपोळ्या काय फसक्लास बनवते चीकण पण तातूने झापकन गोटा रॉनीला हाणला रॉनी केकाटत बाकाखाली लपला मागून तुपेवकिलांनी तातू व डुकऱ्याची मानगूट धरून फरफटत कोंडून ठेवले बकबक पळत सुटला व डुकऱ्याच्या आईला जाऊन भेटला फोन ऐकून तातूचे वडील सॉरी म्हण

फटीतूनच जाणारी जमात !

धड धड धड धड धड धड…… सलग स्पीडब्रेकर नको म्हणून रस्त्याच्या एकदम कडेच्या फटीतून, हो रस्त्याच्या फटीतूनच जाणारी जमात आमची. काय ते सुख मिळत असंल ? सगळ्यांचंच आहे हे. होय. सगळ्यांचं. पण हे असं का ? याचा कोणीच विचार करून बघत नाही. जगाच्या विरहित घाई प्रत्येकाला. जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर असेलही. पण एखादवेळेस स्पीड कमी करून, त्या स्पीडब्रेकरवरून गाडी चालवत गेलं तर काय बिघडतं ? असं मनातल्या मनात बोलत सुकाळ गाडी चालवत होता. त्याच्या मनात विचार आला, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीचं बघतोय. हरकत काहीच नाहीये. पण ही सोय किती दिवस ? त्याचा काय परिणाम होतोय ? याचं भान कधी येईल ?