Skip to main content

ओळख विकिपर्यटन प्रकल्पाची

विकिपर्यटन (अथवा विकिव्हॉयेज) हा विकिपीडियाच्या बन्धूप्रकल्पांच्या यादीतील त्यातल्या त्यात नवीन प्रकल्प. विकिपीडियातही भौगोलीक प्रदेशांची माहिती असतेच पण विकिपीडियातील संबंधीत लेखांना ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा येतात. विकिपीडियात वर्णनात्मक अलकांरीक लेखन, विशेषणे यांना टाळल जात, विकिपीडियात संदर्भांची/दुजोर्‍याची बर्‍याचदा गरज असते. त्या शिवाय प्रेक्षणीय काय ?

Candy Crush Saga...

Candy Crush Saga --- १
निक्षून नाही बजावूनही
शिवशिवणार्‍या हातांनी
स्क्रीन टच करून
कॅण्डीज् सरकवायला, जेलीज् उडवायला
सुरुवात केलीच!

न राहिले वेळाकाळाचे भान...
एकेक लेव्हल अनेकदा हरत
जात राहिले पुढे पुढे,
मन मात्र अडकले-थिजलेले
जिथल्या तिथेच !

Candy Crush Saga --- २
दिले भिंतीवर डकवून माझे आत्ताचे स्टेटस म्हणून!

फुटल्या उकळ्या
आनंदाच्या, निर्मितीच्या, उत्सर्जनाच्या...
तेवढीतरी भरपाई झालीच, हरलेल्या खेळींची!

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म


पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

फोटोत डावी कडून श्री. श्री श्री भट, शशिकांत ओक, डॉ. प.वि. वर्तक आणि धनुर्धारीचे संपादक-मालक श्री सापळे

समीक्षेचा विषय निवडा

देणे - एक कला


देणे - एक कला...

देणे - एक कला...

अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते.

देणे ही एक कला म्हणून पाहू जाता -

सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश. ती वरिष्ठांची जागीर, तो संतांची वचने, कवने, संस्कृत श्लोकातून खडाखड देता येणे ही कला.

मत्सर

परवा बॅटमॅनच्या स्वाक्षरीत "मत्सर(जेलसी) बद्दलचे विचार वाचनात आले अन काही गोष्टी आठवत गेल्या.

एका बुजगावण्याची गोष्ट !

शेतावर उभं एक बुजगावणं!! पाखरांना माणसाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! वाऱ्यावर डोलता डोलता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं १८० अन्शातुनही फिरून येत असे ह्यातच ते खुश होतं. आपल्याच विश्वात मग्न असणाऱ्या त्याला त्याच्यात आणि माणसांत असलेल्या फरकाबद्दल असलेली पूर्ण अनभिज्ञता हीच त्याच्या मुक्त मनाची ताकद होती…

वासुदेव

थंडी छान पडायला लागली होती. डिसेंबर चा दुसरा आठवडा संपत आला होता. बंद खिडक्यांच्या न दिसणाऱ्या फटीतून झिरपणाऱ्या थंडीनी मला जाग आणली होती. अंगावरून घरंगळणाऱ्या गोधडीच्या काठांना दोन्ही हातांच्या पंज्यात घट्ट पकडीत मी स्वतःला मानेपर्यंत लपेटून घेतलं. हातापायाची जुडी करून शरीराच्या जास्तीत जास्त जवळ आणत तशीच कुशीवर पडून राहिले. किलकिलत्या डोळ्यांनी घड्याळाकडे पाहिलं, त्याने उठायला अजून अर्ध्यातासाची परवानगी दिली होती. मग मी तश्शीच पडून रहिले……अगदी छान वाटत होतं.