Skip to main content

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.”
― Chris Hedges

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १९: स्वयंपाकघर

या वेळचा स्पर्धेचा विषय आहे 'स्वयंपाकघर'. स्वयंपाकघर, तिथल्या वस्तू, विविधरंगी, विविध पोत असणारे मसाले, भाज्या, शिजवलेले, सजवलेले पदार्थ, एकंदरच अन्न या मूलभूत गरजेशी संबंधित गोष्टींचे लाळ गाळू पहाणारे, फक्त डोळ्यांनाच सुखावणारे, किंवा यापेक्षा अधिक काहीतरी सुचवणारे फोटो दिसतील अशी आशा आहे.

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा.

स्पर्धा का इतर?

बैठक

लावणीची बैठक सिनेमात बघून, काही आंबट शौकिनांच्या गप्पातून आणि थोडीफार पुस्तकातून माहित होतीच. मध्यंतरी प्राध्यापक निवड समितीवरील सन्मानणीय प्राध्यापक सदस्यांनी उमेदवार निवडी बाबतची कार्यवाही यशस्वी रित्या चोख बजावल्याने, त्यांच्या बैठकीच्या ईच्छापूर्तीची अवघड जबाबदारी , यशस्वी उमेदवार आणि सदर यशामागील, प्रभावी सुत्रधार प्राध्यापक महोदयांवर येऊन आदळली.

झुक झुक गाडी -

मित्रांनो या, मैत्रिणीनो या
एकामागे एक उभे राहूया -

दंगामस्ती कमी करूया
झुकझुकगाडी खेळ खेळूया ,

दादा ड्रायव्हर पुढे नेहमी
सर्वामागे गार्ड हजर मी -

हिरवी निशाणी दाखवली
दादाने कुकशिटी वाजवली -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

धुराविना ही धावते गाडी
रुळाविना ही पळते गाडी -

जिथून निघालो तिथे जाणार
सांगा आणखी कोण येणार ?

इथेच सगळयाना फिरवीन
गोलगोल चकरा मारीन तीन -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

सिग्नल नाही- स्टेशन नाही
गाडी चकरा मारत राही -

छान छान आवाज गाडीचा
गोंगाट सगळ्यांच्या आवडीचा ,

आपल्या तीन चकरा झाल्या
सगळे तयारीत रहा.. उतराया ,

एलिझाबेथ बिशपची एक 'सेस्टीना'

न्याहारीत मिळालेला चमत्कार

सहा वाजता आम्ही कॉफीची वाट पाहात होतो
कॉफी आणि पाव
जे एका विशिष्ट बाल्कनीतून वाटले जाणार होते
एखाद्या जुन्या राजाच्या दानधर्माप्रमाणे किंवा एखादया चमत्काराप्रमाणे.
बाहेर अजून अंधारच होता आणि सुर्याचा एक पाय
नदीच्याएका दीर्घ लाटेवर स्थिराऊन राहिला होता

दिवसाची पहिली नौका कधीच नदी पार करून गेली होती
खूप गारठा होता आणि सूर्य आम्हाला ऊब देईल असे वाटत नव्हते,
आम्ही आशा करत होतो की कॉफी खूप गरम असेल
आणि प्रत्येकाला एक लोणी लावलेला पाव
मिळेल एखाद्या चमत्कारातून;

मोजमापं आणि त्रुटी - २

या लेखाचा दुसरा भाग मला चौदा मार्चला, म्हणजे पाय दिनाला प्रसिद्ध करायचा होता. इतर कामांत गुंतलेलो असल्यामुळे थोडा उशीर झाला. आता तुम्ही म्हणाल की या मोजमापांचा आणि 'पाय' चा काय संबंध? उत्तर सोपं आहे. गेल्या लेखात मी तीन आकृती दिल्या होत्या. त्यांच्यातल्या सरळ रेषेची लांबी आणि वक्राकाराची लांबी यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं होतं. या गुणोत्तरातून पाय ची किंमतच अप्रत्यक्षपणे मोजली जात होती. कशी ते सांगतो.

रविवार आज रविवार -

रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !

मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !

दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !

नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !

दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !

रविवार हो रविवार
आमचा आवडता वार
घरात आणि मैदानात
दंगामस्ती चालणार !
.