Skip to main content

मेदिनी

सर्व वाचकांना चवदा मार्चच्या, अर्थात 'पाय' दिनाच्या शुभेच्छा. एक कविता:

मेदिनी

व्रण हा रक्तवर्णी ज्या दक्षिणस्तनी
कृष्णमिलिंदकेंद्रबिंदू तिथे
विलसलसतो धवलासनी

पुष्कळे पुष्टरमणी चिंबनितंबवलये
अचपळमनमोहन गहनगंधप्रिये
अंगांगदंगसंभोगिनी मेदिनी

❊

" डराव डराव -"


टकमक टकमक बघत बघत
डोळे मोठे आणखी करत

येता जाता डराव डराव
का ओरडता बेडूकराव

तुमच्या उड्या टुणूक टुणूक
चपळाईची मस्त चुणूक

अंगणातल्या डबक्यात
किती करता बाहेर आत

पाण्यात जास्त भिजू नका
डराव डराव गर्जू नका

सर्दी पडसे झाल्यावर
खोकत बसता काठावर

औषध कधी घेत नाही
डराव डराव थांबत नाही

झोपू द्या ना शांत आम्हाला
नाहीतर सांगीन नांव आईला !
.

दोन किलो पुस्तकं...

Taxonomy upgrade extras

या निमित्ताने मनात आलेले विचार आणि प्रश्न.

- "पुस्तकं" ही इतर मालापेक्षा वेगळी आहेत की ती "माल"च आहेत आणि त्यामुळे बाजाराच्या नागड्या मागणी पुरवठा तत्वानेच सर्व व्हावं असं वाटतं का?

ध्यान ...एक अनुभव - ३

मन अन शरीर यांची निसर्गाने अगदी सूक्ष्म स्तरावर एकमेकात गुंफण केलेली आहे. मन विरसलेले असेल तर शरीर दुखणाईत होते. मन प्रसन्न असेल तर दुखणी दूर पळतात, हा सामान्य अनुभव आहे. इंद्रिये अन बुद्धी यांचीही मन-शरीराच्या दोऱ्यात ओवणूक झाली आहे. एकाची ओढाताण दुसऱ्यावर परिणाम करते. असे म्हटले जाते की मन हे हत्तीप्रमाणे बलशाली आहे. योग्य मार्गाने नेले तर अतिशय विधायक कार्य मन करू शकते. परंतु अंकुश नसलेला हत्ती जसा वनाचा विध्वंस करू शकतो तसे अंकुश नसलेले मन जीवनाचा विध्वंस करू शकते. मनाचे वर्णन कुणीसे अगदी चपखल केले आहे... आधीच मर्कट, तशात मद्य प्याला मग त्याला वृश्चिकदंश झाला अन त्यात भूतबाधा झाली.

पोलिस - एक छोटासा अनुभव

गोरेगाव येथील एका सिग्नलला थांबलेलो असताना एका पोलिस हवालदाराशी झालेला माझा संवाद...

मी - साहेब, एक विचारू का?
पो.ह. - बोला.
मी - तुमचं हेल्मेट कुठाय?
पो.ह. - तुमाला काय करायचा?
मी - अहो, पोलिसांनीच नियम नाही पाळले तर बाकी जनता काय करणार?
पो.ह. - तुमी तुमचं काम बघा.
मी - नाही, तरी पण सांगा ना.
पो.ह. - ए, तुला काय करायचाय? पोलिस स्टेशनवर हाय.
मी - डोकं सोबत आणलं आणि हेल्मेट पोलिस स्टेशनवर? का डोकं पण तिथेच ठेवलंय?
पो.ह. - ए *सडीच्या, माज चढलाय का?
मी - अहो, मी हेल्मेट घातलंय, तुम्ही नाही. मग सांगा माज कोणाला आहे?

जरतारी लॉन मो(अ)र

वैधानिक इशारा :
या कथेतली पात्रे पूर्णतः काल्पनिक असून कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास निव्वळ हास्ययोग समजावा.
…………………

आपल्या कथेची नायिका चिक्की जगप्रसिद्ध आहारात अज्ञ असून तिचा नवरा चिकट्राव हा फार्माशिष्ट आहे .हे पतीपत्नी प्राणपणाला लावून महान भारतीय संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करत अमेरिकेत निव्वळ देहानेच वास्तव्यास आहेत. चला सुक्काळी त्यांच्या घरात डोकावूया.

देखण्या घुबडाची निर्मम हत्या

१८ डिसेंबर २०१२ रोजी सकाळचाच सुमार होता. एकदमच कावळ्यांची काव काव ऐकू येऊ लागली. खिडकीतून पाहतो तर शेजारच्या सोसायटीत स्टिल्टमध्ये एक देखणे घुबड बसलेले. भोवती सात आठ कावळे, काव काव करत त्याची पिसे ओढत होते.

ह्या फोटो नंतर मी अनेक फोटो काढले. त्रस्त झालेले घुबड जागा बदलत उंच उडून जाण्याचा प्रयत्न करत होते. कावळे त्याची पिसे ओढत होते. अखेरीस मी व्हिडीओ शुटिंगच सुरू केले.