काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २९ (सेकंड लास्ट): २ एप्रिल २०२२:

आज सेकंड लास्ट दिवस उद्या प्रोजेक्ट संपणार म्हणून रात्रीच टॅक्सी काढली.

वार्डन रोडजवळच्या अप्सरा आईस्क्रीम जवळून चार टिपिकल नवसारीचे गुजराती मुस्लीम उचलले.

बाय द वे. हे वाळकेश्वरचं ओरिजिनल अप्सरा आईस्क्रीम!

आता त्यांच्या मुंबई पुणे आणि इतरही सगळीकडे १०० च्या वर चिक्कार ब्रॅंचेस आहेत.

पण माझ्या माहितीप्रमाणे पान-मसाला आईस्क्रीमचे जनक हेच.

मला स्वतःला हयांचं(च) पान-मसाला आईस्क्रीम भारी आवडतं.

तर नवसारीवाले पॅसेंजर्स:
सैलसर कुर्ते, पांढरे पायजमे, सुरमा, छान मेंदीवाली वगैरे दाढी, डोक्यात नक्षीदार टोप्या आणि अत्तराचा घमघमाट!

रमजानचे दिवस असल्याने उद्या पहाटेच्या खाण्याची बेगमी करायला चाललेले.

सात-रस्त्याला काही खास दुकानं आहेत तिकडे रमजानसाठी सुका मेवा, फळं वगैरे चांगली आणि स्वस्त मिळतात.

सात रस्त्यावरून चिंचपोकळी ब्रिजचं भाडं मिळालं.

आज पुन्हा हटकून जी. के. ऐनपुरेंचा "चिंचपोकळी" कथासंग्रह आठवला.

मिल्स लयाला जायच्या शेवटाची सुरुवात आणि त्याच्या थोडा आधीचा त्या ऐन भरात असतानाच काळ...

करीरोड, चिंचपोकळी, बी डी डी चाळ आणि आसपासचा एरिया...

हे सगळं त्यांच्या कांदाचिर, अधुरा (हे वाचलं नाहीये मी अजून), रिबोट, चिंचपोकळी आणि धापकीर्तन (आगामी) ह्या पंचकात वरतून, खालतून, साईडनी, पिळवटून, कुस्करून, सोलवटून, चहात टाकलेल्या भुश्यासारखं फुगून, रटमटून, गुदमरून, गांड फाडून, घशात आवंढे गिळून येत राहतं.

कॅरम, पतंग, कबड्डी, क्रिकेट, लावण्या आणि वग, रामसेचे हॉरर (एखादा "गेम"चा सीन असलेले) पिच्चर, न उतरता सायकल चालवायचे विक्रम:
सगळ्या कथा ह्यातला एखादा विषयाच्या नी पात्राच्या साधारण मुख्य फोकसवर चालू होऊन बाकी विषय आणि पात्रांत मनोहारी आणि भयकारी क्रॉसओव्हर्स मारत रहातात.

त्यांची ती पात्र: अयम्मा, साधू, मास्तर, खोलीवाली, बटल्या कबड्डी प्लेयर रमेश जाकटकर, जंपर बापू,
आणि एकशेवीस तास सायकलवर बसणारा(?) फगऱ्या.
त्यांची "जंतू" ही कथा माझ्या पहिल्या चार-पाच आवडत्या दीर्घकथांत राप्पकन येऊन बसलीय. कथासंग्रह "कांदाचिर"
(इतर काही: "परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष" व हजार वेळा शोले पाहिलेला माणूस - दोन्ही ऋषिकेश गुप्ते आणि "रवळेकरची बहीण पॉ आहे" - पंकज भोसले)

तर आज बराच वेळ ऐनपुरेंच्या लालबाग परळ युनिव्हर्समध्ये फिरत त्यांची आठवण काढत माटुंग्याला आलो.

दमलो होतो खरं तर घरी जाऊन बेडवर कधी एकदा अंग टाकतो असं झालेलं पण माटुंग्याला दोन गुज्जू पोरींनी हात केला डायरेक्ट बॉम्बे सेन्ट्रल...

तिकडून कुठले कुठले नवीन ब्रिज पार करत वांद्र्याच्या दिशेनी निघालो आणि गोष्टी थोड्या सरिअल व्हायला लागल्या.

परळ एरियातले आधी कधीच न बघितलेले ब्रिज दिसल्यासारखे वाटू लागले.

किंवा खरं तर आधी बघितलेले स्वप्नात? कदाचित? नॉट शुअर.

त्यातच एका कुटुंबाला एका मुतारीजवळ घेतलं त्यांना काळाचौकीला जायचं होतं.

मिंट कॉलनीमार्गे काळा चौकीच्या एका ब्रिजखाली त्यांना सोडलं.

पण त्यांनी सांगितलं तसं आलो मला झाट काय रस्ता कळाला नाही.

आणि ते निघून गेल्यावर अचानक त्या रात्रीच्या पिवळ्या प्रकाशात माझा स्थळाचा (जास्त रसभरीत करायला "स्थळ-काळा"चा असं बोलता येईल पण ते खोटं ठरेल) रेफरन्स नाहीसा झाला.

म्हणजे मॅप चालू होता.

पण मॅप दाखवतोय तो घरचा रस्ता आणि मला इंट्यूशननी वाटणारा घरचा रस्ता ह्यांच्यात काही मेळच लागेना.

मग सगळेच रस्ते अनोळखी वाटू लागले का कोण जाणे.

काळा चौकीतल्या एका ब्रिजखाली मग मी टॅक्सी थांबवून टाकली.

वर ब्रिजला मध्येच पायी जॉईन व्हायला टेकाडावरून चढत गेलेल्या पायऱ्या होत्या.

त्या उगीचच चढून आलो.

आजूबाजूला सामसूम.. लांबवर फक्त दोन माणसं गप्पा मारत उभी होती.

पण मला काहीच सुधरेना.

म्हणजे किमान मुंबईत आपल्याला अगदी डिटेल्ड एरिया माहिती जरी नसला साधारण डोक्यात काही रेफरन्स पॉईंट्स असतात. कुठून कुठे जाता येईल ह्याचा साधारण अंदाज असतो

ते सगळंच विरघळल्यासारखं झालं.

चकव्यासारखं झालेलं किंवा भूल पडल्यासारखं. झपुर्झा गडे झपुर्झाच एकदम च्यामारी!!!

पण गंमत म्हणजे मला काहीतरी अनैसर्गिक वाटत होतं खरं पण भीती मात्र वाटत नव्हती.

जणू जगड्व्याळ मुंबई वेगळीच मिती दाखवून माझी गंमत करतेय असं काहीतरी वाटलेलं.

पिकासोच्या क्युबिक चेहेऱ्यांसारखं काहीतरी.
Cubism

किंवा लहान बाबूला आपण वेडंवाकडं तोंड करून भेवडावतो आणि ते एकाच वेळी किंचाळत रडतं-हसतं तसं काहीतरी.

मग ट्रान्स थोडा कमी झाल्यासारखा झाला आणि मी शिस्तीत मॅप फॉलो करत गाडी चालू केली.

गूगल वॉज राईट माय इंट्यूशन वॉज रॉंग. मी घरापासून लांब लांब चाललो होतो आधी.

के ई एमच्या ब्रिजजवळ आल्यावर थोडी थोडी टोटल लागू लागली आणि मग सुसाट बांद्रा.

उद्या शेवटचा दिवस... व्रताचं उद्यापन Smile

म्हणूनच कदाचित मुंबईनी "ना जाओ सैंया" म्हणत आज रात्री हलकेच थांबवलं असेल? असेलही!!!

आजची कमाई: ३३४ रुपये

टीप: पेंटिंगची लिंक पिकासोच्या हार्लेक्वीन सिरीज मधून साभार!

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २२: ७ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २३: २८ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २४: १९ डिसेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २५ ते २७: २३ जानेवारी ते २० मार्च २०२२:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २८: २७ मार्च २०२२:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

व्रताचे उद्द्यापन कसे केले याची उत्सूकता आहे.
या सर्व प्रकारातून नक्की काय मिळवले व काय गवसले याविषयी वाचायला आवडेल.
अर्थातच टॅक्सी ड्रायव्हर किंवा चतुर्थश्रेणीतील कामे व ते करणारांविषयी इतर समाज मनात काही किंतू राखून ठेवतच असतो. तोच अनुभव तुम्हाला आलाच असणार. त्या पलिकडेही काहीतरी तुमच्या सुजाण मनाला जाणवले का?
की केवळ मुंबईची सेवा करणे हा हेतू साध्य झाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लवकरच शेवटचा भाग टाकेन त्यात तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय टॅक्सी
काय डायवर
काय लेखन
ओक्के मधी सगळं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0