काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २४: १९ डिसेंबर २०२१

झालं असं की मी जी चालवतो त्या टॅक्सीचा प्रायमरी ड्रायव्हर राजकुमार नॉर्थला आपल्या गावी गेलेला.

टॅक्सी उभी ठेवणं परवडत नाही त्यामुळे मालक दिनेश-भाईंनी दुसऱ्या एका बदली ड्रायव्हरला महिनाभर टॅक्सी चालवायला दिली होती. त्याला आपण 'राकेश' म्हणूया.

तर राकेशनी मागच्या आठवड्यात दारूच्या नशेत टॅक्सी ब्यक्कार ठोकली.

नशीबाने (टॅक्सीची) बॉडी चेपण्यावरच निभावलं.

पण गाडीचं मजबूत काम निघालं.

आता पुरुषाला गाडीचं काम निघालं की नुस्ती उलघाल उलघाल होते.इट'स अ बॉय थिंग!

सो दिनेशभाई प्रचंड स्ट्रेसमध्येच होते. त्यांना किमान मॉरल तरी सपोर्ट द्यायला मी टॅक्सीच्या हॉस्पीटलमध्ये पोचलो.

दिनेशभाईंनी महालक्ष्मीच्या "घास गल्ली"त बोलवलं.

ही आख्खी लेन टॅक्स्यांचं स्वस्त काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे मला आजच कळलं.

थोडा लवकरच पोचलो.

दिनेशभाई यायचे होते.

सो आख्ख्या गल्लीत एक राउंड मारला.

रविवार सकाळ धंद्याच्या दृष्टीने निवांत असल्याने बरेच टॅक्सीवाले इथे गाडीच्या छोट्या मोठ्या तक्रारी सॉल्व्ह करायला आलेले.

मी हे काही फोटो काढले.

gg1

gg2

gg3

आणि लाडात इकडे तिकडे फिरत राह्यलो.

हे सगळं थोडं संशयास्पदच झालं असणार.

आणि म्हणूनच एक धिप्पाड सरदारजी आला आणि मला विचारायला लागला की, "भाई (येस भाईच "पाई" नव्हे मुंबईच्या सरदारजीचा ऍक्सेंट थोडासाच पंजाबी असतो. अमृतसरच्या सरदारजीसारखा फुल्लऑन नव्हे.) कौन हो तुम? यहां क्या कर राहे हो??"

सु. शीं. च्या भाषेत "माहौलमध्ये गढूळ सुम्म ताण" वगैरे.

मग त्याला सांगितलं की मीही आधा-अधुरा का होईना टॅक्सीवालाच आहे वगैरे. बॅजही दाखवला.

मग तो थोडा निवळला.

त्याला वाटलेलं की मी आडव्या तिडव्या लावलेल्या गाड्यांचे फोटो काढून आर. टी. ओ. ला पाठवतोय की काय?

म्हणून तो मला घाबरलेला आणि मी त्याला... हीहीही.

म्हणजे नॅशनल पार्कात अवचित समोर आलेला बिबट्या आणि माणूस दोघंही एकेमकांना घाबरतात तसं काहीसं Smile

आता त्यादिवशी मी लेपर्ड प्रिंटची अंडरवेअर (आतमध्ये (आता खरं तर ती अंडरवेअर असल्याने "आतमध्ये" हे रिडंडंट आहे पण सुपरमनने सगळा गोंधळ घातलाय. आतला कंस पूर्ण) बाहेरचा कंस पूर्ण) घातली असल्याकारणाने बिबट्याचा रोल इथे मी घेऊ इच्छितो म्हणजे कोणाची हरकत नसेल तर.

माझा प्रोजेक्ट समजावून सांगितल्यावर सरदारजी एकदमच फ्री झाला.

चहा वगैरे मागवत त्यानं त्याच्या खालसा कॉलेजच्या आठवणी वगैरे सांगितल्या.

अशा रीतीने आमचा मॅन-ऍनिमल आपलं मॅन-मॅन कॉन्फ्लिक्ट सुरळीतपणे सुटला.

पण मला फेसबुकवरील अवलिया फोटोग्राफर मित्र अमित कुंभार ह्याचं कोट आठवलं:

>>>>>>>
भारतात स्ट्रीट फोटोग्राफी करण्यासाठी तुमच्याकडे खालील गुण असलेच पाहिजेत :
1. प्रचंड कोडगेपणा रोमारोमात
बाणवने / णे
2. जो आडवा येईल त्याला फाट्यावर मारणे
3. बाचा बा~ची झालीच तरं नम्रतेत स्थितप्रज्ञ् होणे
4. नडायला आलेल्याचं खडे कडे ब्रेन म्यॅपिंग करणे.
5.साळसूद पणे फोटो काढुंन मी नाय त्या गावचा असा भास निर्माण करणे
...
...
वगैरे वगैरे

>>>>>>>
तेवढ्यात दिनेशभाई आलेच आणि तो सरदारजी त्यांचा मित्रही निघाला.

मग दुपार जवळपास संपेपर्यंत आम्ही गाडीचं कामच करत राह्यलो.

माझ्या पोनी बांधलेल्या रुपेरी केसांना आणि सुखवस्तू कपड्यांना आसपासचे लोक आधी थोड्या संशयाने बघत राह्यले पण मग नंतर सरावले.

समोरच्या पत्र्यांच्या घरांतून मिश्रीचे, कालवणाचे वास येत राह्यले.

आणि घासगल्लीच्या वामकुक्षीची वेळ होईपर्यंत मीही तिकडचाच होऊन गेलो.

अशी अडनिड गल्ल्यांतून मुंबई भेटत रहाते आणि आमची इंटिमसी वाढत जाते.

प्रिय व्यक्तीच्या रँडम ऍब्सर्ड गोष्टीही प्रिय होत जाव्यात. रुपेरी केस, भरडा आवाज, वेडावाकडा दात किंवा तर्जनी जाईल एवढं भोक पडलेली पॅंटी सुद्धा.

माझं आणि मुंबईचं ही तसंच चाल्लंय...

घासगल्लीतल्या एका अफलातून घराचा हा आणखी एक फोटो.

house

दुपारनंतर दिनेशभाईंची दुसरी टॅक्सी घेऊन थोडीफार भाडी मारली.

पण ही गाडी माझ्या सवयीची नव्हती.

तिचा ब्रेक मध्येच मिस व्हायचा.

म्हणजे ब्रेक पॅडल दाबलं की मध्येच पुचकट लूज पडायचं मग थोडं पम्प करून पुन्हा मारलं की ब्रेक बसायचा. जरा डेंजरच प्रकार.

आदल्या दिवशी प्रपोज मारल्यावर निकरानी नाही म्हणलेल्या कॉलनीतल्या पोरी दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडा नेट केल्यावर अवचित हो म्हणायच्या... एका दिवसात कुठलाही पॅरामीटर अजिबात बदललेला नसताना.

तसंच काहीसं हेही.

हे कॉलनी/ प्रपोज/ पोरींवरून पंकज भोसलेचं "विश्वामित्र सिंड्रोम" आठवलं.

जरूर वाचा. टॉप पुस्तक आहे.

विश्वामित्र सिंड्रोमचे लोकसत्तातील परीक्षण

आजची कमाई:

२२० रुपये.

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २२: ७ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २३: २८ नोव्हेंबर २०२१

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet