दिवाळी २०२१

पॉपकॉर्न परत आले

जन्याभाऊंना काहीतरी संशय आला असावा. त्यांनी बाजूचा एक कप उचलून कपात धार पकडली. नळ बंद केला आणि पाण्याचा घोट घेतला.
"अरे प्रभुदेसाई, हा चहा आहे,चहा, अमृततुल्य! अहाहा, देवाची करणी आणि दगडंत चहापाणी. प्या तुम्ही पण एक कप." मी घाबरत घाबरत एक कप चहा घेतला. काय छान चव होती. पुण्याच्या भाषेत बोलायचे तर 'अप्रतिम!' फुकट एक स्पेशल!

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

अव्हेन्यू

चार एकसारख्या वाटोळ्या आकाराच्या गडद लाल पाकळ्यांमध्ये एक पिवळे ठिपके ल्यालेली ऐटदार पाकळी. डिसेक्शन टेबलावर गावाकडच्या चार मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या कॉन्व्हेंटच्या लोकल पोरीसारखी. आकाशात मावळतीच्या सूर्याची अन समोर गुलमोहराची लाली काठोकाठ भरलेली. रात्री ह्या रंगाचं काय होत असेल. सूर्य दुसऱ्या गोलार्धात जाऊन आपलं काम सुरू ठेवतो तस ह्या लालीचं रात्री काय होत असेल? आपल्या उपरेपणाची जाणीव तीव्र करणाऱ्या ह्याच्या वेड्यावाकड्या फांद्या आणि काळ्या शेंगाकडे पाहिलं अन आपण उगाचच ह्या झाडाबद्दल इतके दिवस मनात अढी धरून बसलो असं वाटायला लागलं. घरातील कर्त्या पुरुषानं स्वतः खस्ता खाऊन घरातल्या इतरांना खुश ठेवण्यासाठी आयुष्यभर खपावं तसं हे वेडंवाकडं गुलमोहराचं खोड. पानाफुलांना दरवर्षी पोसता खंगून गेलेलं पण तरीही आपलं काम चोख बजावणारं.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
1
Average: 1 (1 vote)

लेखक महाशय

तसाच मी डेस्कपुढे बसलो आणि सरसर लिहायला लागलो.
कुरूकुरू चालणारं पेन आणि डोळे मिटून मंद घोरणारा मी असं साधारण दीड तास चालत राह्यलं.
मग अचानक मी पेन व्यवस्थित मिटून स्टँडवर ठेवलं,
झोपेतच चालत बेडजवळ आलो, थोडीशी 'चिल्लर' पाडली,
आणि आडवा होऊन झोपून गेलो.
हीच ती माझी अवार्ड विनर कादंबरी "छळनंग" जिच्यात पुरुषोत्तम बोरकरांचा 'मेड इन इंडिया'वाला पंजाबराव आणि नंदा खरेंच्या 'उद्या' मधला हिरो सुदीप खान्देशात एकत्र येतात आणि दडपशाहीविरुद्ध बंडाची सुरुवात करतात.
एकंदर पुन्हा फॉर्मात आलो मी.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

दागेरेओतीप: एक आगळावेगळा टाइम ट्रॅव्हल?

शाळेला जायचा (किंवा शाळेतून परत यायचा!) रस्ता, एखादा इटुकल्या पिटुकल्या वस्तूंनी भरलेला बाजार; शेतामध्ये खुरपलेल्या, सपाट काळ्या जमिनीत घट्ट उभ्या राहिलेल्या चिंचेच्या झाडाला लावलेला टायरचा झोका; लेक्चर बंक करून सिनेमा बघायला जायचो ते सिंगल स्क्रीन थेटर; पहिल्यावहिल्या प्रियकराला भेटायला जायचो ती टेकडी, असं काहीही असू शकेल. पण त्या जागा अजूनही आपल्याच शहरात असल्या, तरी त्या तशाच नसतात. डोळे बंद केले की डोळ्यासमोर दुतर्फा, आलटून पालटून असलेल्या बुचाच्या आणि गुलमोहराच्या झाडांचा रस्ता आठवतो.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

टॅक्सी ड्रायव्हर

दितुची खात्री होती की अशा प्रकारे सापडलेले पैसे नेहमी शापच ठरतात. मागे एकदा त्याला अशाच एका घटनेचा त्रास झाला होता. एक तरुण पोरगी तिची बॅग टॅक्सीमधे विसरून गेली होती - आणि ह्यांना याबद्दल फरक पडत नाही - हे पैसेवाले लोक! या असल्या सगळ्या गोष्टी आपल्याकरता नस्तर, काळ्या तापासारख्या असतात. तेव्हाच त्याच्या बायकोच्या अंगावर कोड आले होते. जेव्हा त्याच्या बायकोनं दुसऱ्या बाईची साडी आणि ब्लाउज वापरले, तेव्हापासून बरं न होणारं ते दुखणं तिच्या मागे लागलं.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

शठे शाठ्यं समाचरेत्

"नाही, नाही, न्यायाधीश महाराज, मला तसं म्हणायचं नव्हतं," सरकारी वकील गडबडीने म्हणाले. "माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आज आपल्या राज्याची लोकसंख्या आठ कोटी आहे. आजपासून आपण प्रयत्न केले तर येत्या पंधरा वर्षांत आपली लोकसंख्या सुमारे बारा कोटींवर स्थिरावेल. मग ती हळूहळू कमी व्हायला लागेल. दरम्यान आपल्या विकासाच्या योजना..."
... आणि हे पुढे भलत्याच दिशेला गेलं तर? सन्जोप राव यांची डिस्टोपिक कथा.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

आउट ऑफ कोर्स

सिनेमा पाहताना दोघींच्या डोळ्यांत घळाघळा अश्रू. तर दोघे टाेणगे कधी हसतायत, कधी चुळबुळतायत. इंटरव्हलमध्ये त्यांनी विचारलंच, 'अगं, रडताय काय दोघी अशा, तिला काय सासुरवास होतोय का?'
'गपा हं तुम्ही, तुम्हाला नाही कळणार. हो की नाही गं कात्यायनी?' अपूने दटावलं दोघांना.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

ऋणनिर्देश

#अंकाविषयी #ऋणनिर्देश #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

ऋणनिर्देश

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

यमांत

पापपुण्याचा हिशोब संगणकीय मॉडेलांनी केला तर काय होईल? झंपुराव तंबुवाले यांची ताजी विज्ञानकथा

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

कोव्हिड व आर्थिक धोरणांची बदलणारी दिशा

सढळ सरकारी खर्च, आणि पैशांच्या पुरवठ्यास प्रतिबंध? करोनाच्या जोडीनं येणारी मंदी आणि त्याबद्दल काय करता येईल, याबद्दल अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांचा लेख.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Average: 5 (1 vote)

पाने

Subscribe to RSS - दिवाळी २०२१