आरोग्य

बखर....कोरोनाची (भाग ८)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

समाज माध्यम आणि खिन्नमनस्कता

जात-पंथ-धर्म, रूढी-परंपरा, वेद-उपनिषद, आयुर्वेद – होमिओपथी, थोरा-मोठ्यांचा इतिहास, संस्कृती, देशप्रेम-देशभक्ती, प्रादेशिक-भाषिक अस्मिता, पक्ष-पक्षनेतृत्व, इत्यादीसारख्या कुठल्याही (अती) संवेदनशील विषयाबद्दल थोडीशी जरी टीका केली तरी डोके फोडून घेण्याची तयारी हवी. कारण तुमचे कुठले तरी शब्द वा वाक्य कुणाच्या भावना कसे दुखवतील याचा नेम नाही. काही प्रमाणात समाज माध्यमसुद्धा याच पंक्तीत जाऊन बसत आहे की काय असे वाटत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कोरोना लस (भाग १)

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. अर्थात, संशोधन चालू असल्यामुळे आणि रोज नवनवी माहिती उपलब्ध होत असल्यामुळे आज उपलब्ध असलेली माहिती उद्याच कालबाह्य होऊ शकते, हे लक्षात ठेवून वाचावे.

करोना विषाणू, म्युटेशन आणि आपण - डॉ. योगेश शौचे

करोना विषाणूशी लढा देण्याबरोबरच दैनंदिन आयुष्यही हळूहळू पूर्वपदावर येत असताना आता करोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा सर्वांना घाबरवून सोडले आहे. विषाणूच्या या नव्या प्रकाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अनेक गैरसमजही आहेत.

प्रशासन नावाच्या हत्तीच्या अंतरंगातून - कौस्तुभ दिवेगांवकर

उस्मानाबादेत आणि पुण्यात कोरोनाचे आव्हान कसे पेलले हे सांगताहेत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगांवकर.

कोरोना लस - mRNA तंत्रज्ञान

mRNA ह्या प्रकारची लस म्हणजे काय? ती कशी तयार करतात? ही लस अपायकारक तर नाही ना? सांगताहेत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ योगिनी लेले.

कोरोना लस - कशी तयार होते

ज्या लशीबद्दल एवढा उहापोह चाललाय ती कशी तयार करतात किंवा ती इतकी लवकर कशी तयार करता येणार आहे असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. ह्यासाठीच त्याबद्दलची माहिती थोडक्यात पाहू.

कोरोना लस - तीन विचारप्रवाह

मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. लशीविषयी काही रोचक माहिती देणारी एक लेखमाला त्या 'ऐसी अक्षरे'साठी लिहीत आहेत. त्यातील हा पहिला भाग.

कोरोना लस (भाग ३) - वाहक व प्रोटीन आधारित लशी

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. या भागात आपण विषाणू वाहक आणि प्रोटीन आधारित लशींचा परिचय करून घेऊ.

कोरोना लस (भाग २) - जनुकीय लस

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. या भागात आपण जनुकीय लशींविषयी माहिती घेऊ.

पाने

Subscribe to RSS - आरोग्य