राजकारण

प्रकरण ५: अमेरिकेची व्हिसा (परवाना पद्धत) सिस्टिम: बंधने आणि भारतीयांसमोरील पेच.

तसं बघायला गेलं तर कायदेशीर मार्गाने अमेरिकेत येण्यासाठी १८५ प्रकारचे विविध व्हिसा आहेत. परंतू त्यातील भारतीयांसाठी फारच कमी उपलब्ध आहेत. अमेरिकेचे जगाबरोबर व्यापार संबंध जसजसे विस्तारत गेले तसे विविध प्रकारचे व्हिसा अस्तित्वात आले, उदा. इ-३ व्हिसा; हा व्हिसा फक्त ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रकरण ४: अमेरिकेचे स्थलांतरण धोरण? वंशवादी की आधुनिक मूल्याधारित?

आधी म्हटल्याप्रमाणे कोलंबसाने अमेरिका शोधल्यापासून अमेरिकेत अव्याहतपणे स्थलांतर सुरूच आहे. जस जशी वस्ती वाढायला लागली तसतश्या ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश.... विविध कॉलन्या तयार झाल्या, त्यांचे त्यांच्या देशांशी व्यवहार सुरूच होते, त्या त्या देशातील कायदे पद्धती तिथे राबवली जात होतीच, सर्वप्रथम ब्रिटिश कॉलन्यांमध्ये १७४० साली पहिला, प्लांटेशन ऍक्ट लागू झाला. नागरिकत्वाशी संबंधित ज्ञात असलेल्या कायद्यांपैकी पहिला कायदा. १७४० म्हणजे अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी ३६ वर्ष हा कायदा लागू झाला होता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप

भारत आणि अमेरिका हे देश खरं तर पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आहेत. कधी कधी असं मजेत म्हटले जाते की भारताच्या बाजूने खोदायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने अमेरिकेत बाहेर पडू. भारताचा थेट संबंध आला तो मध्य-पूर्वेतील किंवा युरोपिअन देशांबरोबर. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्ध कालावधीत भारताचा कल रशियाकडेच राहिला, त्यामुळे भारतीयांचे अमेरिकन आकर्षण वाढायचे तसे काही ठोस-सबळ कारण दिसत नाही, तरी सुद्धा भारतीयांचे २०व्या शतकात अमेरिकेत स्थलांतर होतंच राहिले आणि ते आजतागायत सुरु आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था

अमेरिका... विकासाचा चर्मबिंदू!!, अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलात्मिक तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा संपुर्ण जगावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. इतर देश एखाद्या क्षेत्रातील आपला विकास किती झाला आहे हे दर्शवण्यासाठी अमेरिकेच्या प्रमाणाची फूटपट्टी वापरतात. अमेरिकेला सर्दी झाली की जगाला ताप येतो वगैरे म्हणी सहज बोलताना वापरल्या जातात, आणि जागतिक मंदीच्या काळात त्या जाणवतात देखील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रशांत भूषण, सर्वोच्च न्यायालय, कंटेम्प्ट वगैरे

Supreme but not Infallible

EMS नम्बूद्रीपाद एकदा म्हणाले की सुप्रीम कोर्टाला वर्गीय बायस आहे आणि ते शोषणाचे साधन आहे. त्यांना contempt jurisdictionमध्ये शिक्षा दिली होती. कालांतराने सुप्रीम कोर्टाचे जज (आणि निकालात अवघड इंग्लिश वापरा शाळेचे महागुरू) कृष्णा अय्यर देखील तेच म्हणाले. व्यक्तिगत पातळीवर जजला मूर्ख म्हणणे, शोषक म्हणणे, अमुक तमुक म्हणणे हे देखील चिरंतन काळ चालू आहे. ह्यात न्यायालयाचा अवमान होत नाही.

भांडवलशाही हीच एक मोठी समस्या

01 पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारी भांडवलशाही – मग ती कार्पोरेट भांडवलशाही असो की ग्राहक (consumer) भांडवलशाही की, क्रोनी कॅपिटॅलिझम, वा social, liberal , market economy इत्यादीपैकी कुठलीही असो,- हीच एक फार मोठी समस्या आहे. भांडवलशाहीला जोडलेल्या या विशेषणांना दोष न देता मूळ नामपदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यामुळे सयुक्तिक ठरू शकेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

व्यक्तिस्तोमाचे डंके

व्यक्तिस्तोमाचे डंके वाजू लागले की समजून जायचे अनुयायांना करण्यासाठी काहीच राहिलेलं नाहिए. मुळात आपण भारतीयांना गुलाम होणे फार आवडते. सुरुवातीला अधीन होऊन दीनदुबळ्यासारखे शरण जातो. यामुळे लाचार होणे ठरलेलं असतं. भारतात सगळ्याच महापुरुषांच्या नावाने जो खेळखंडोबा करून ठेवलाय तो त्यांच्याच अनुयायांनी. एखादी व्यक्ती श्रद्धेय असेल तर तिच्या वाईट गोष्टी पोटात घालून उदो उदो करून अंधभक्तांच्या फौजेत सामील होणं हे भारतीयांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यातून कोणीही सुटलेला नाही. नीर क्षीर विवेक हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

एका भारतीय नागरिकाचे मनोगत

एका भारतीय नागरिकाचे मनोगत...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फेज १,२ एकत्रीत मतदान टक्केवारी

लोकसभेची फेज १ व २ चे मतदान पूर्ण झाले व त्याची माहिती आयोगाने जाहीर केलेली आहे. मात्र ती फेज प्रमाणे प्रकाशीत केलेली आहे. ही माहिती एकत्रीत करून येथे देत आहे. बऱ्याच जणांना निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी, मतदारसंघात नव्याने आलेले मतदार, मागील निवडणूकीतील टक्केवारी याची माहिती अंदाज बांधण्यासाठी पाहिजे असते. त्यासाठी ती येथे देत आहे. फेज ३ चे मतदान पूर्ण झाले असले तरी आयोगाने त्यासंबंधीची अद्ययावत माहिती अजून जाहीर केलेली नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - राजकारण