छायाचित्रण स्पर्धा
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १० : गर्दी
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : गर्दी
"गर्दीचं गाणं", "गर्दीतला निवांत क्षण" असे विषय मनात आले होते, पण छायाचित्राचं आकलन/बोध हा सापेक्ष विषय असल्याने फक्त गर्दी असा विषय देतो आहे. विषय गर्दी असला तरी आशय तुमच्या मनातला असू शकतो, विषयासाठी चित्र न काढता आशयासाठी चित्र काढा, तुमच्या छायाचित्रातून तुमच्या मनीचे थोडक्यात सांगा. फोटो नीट एडिट करून दिल्यास तुम्हाला जे सांगायचे आहे ते नेमके कळण्यास मदत होते.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १० : गर्दी
- 15 comments
- Log in or register to post comments
- 8540 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ९ : रंग
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: रंग
रंग - जर रंग नसले तर? हा अगदी टोकाचा विचार सोडला तरी प्रत्येक वस्तूबरोबर, पदार्थाबरोबर, प्राण्याबरोबर, फुलाबरोबर एक रंग नकळत डोक्यात पक्का झालेला असतो. रंगाचं अस्तित्व विलक्षण. स्पर्श, गंध, स्वाद, नाद या इतकाच रंग महत्वाचा. 'रंग' या विषयाला कसल्याही मर्यादा नाहीत! आकाशातले रंग, पाण्यातल्या प्रतिबिंबांचे रंग, फुले, पक्षी, प्राणी यांचे रंग, कुंचल्यातुन साकारलेले रंग, कृत्रिम रंग. ज्याला जसा वाटेल त्याने तसा साकारावा असा हा विषय. म्हटलं तर सोपा म्हटलं तर महाकठिण विषय!
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ९ : रंग
- 57 comments
- Log in or register to post comments
- 39674 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ८ : पोत (टेक्श्चर)
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: पोत (टेक्श्चर)
ऐकण्या-पाहाण्यापेक्षा स्पर्श वास्तवाच्या खूप जवळ जातो. मृगजळ म्हणजे काय? प्रकाशकिरणे दूरवरून डोळ्यांपर्यंत येता-येता प्रतिमा विकृत झालेली असते. ध्वनीसुद्धा दुरून विकृत होऊनच कानांना भेटतो. स्पर्श मात्र अगदी जवळ धडकलेल्या वस्तूचाच होतो. विकार व्हावा इतपत वास्तव आणि ज्ञानेंद्रिय यांत अंतरच नसते.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ८ : पोत (टेक्श्चर)
- 61 comments
- Log in or register to post comments
- 31892 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ७ : भारतीय शिल्पकला
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: भारतीय शिल्पकला
जगभर विख्यात असलेली भारतीय शिल्पकला शेकडो वर्षापासून अनेकांना भुरळ घालत आली आहे. मग ती शिल्पे हंप्पीची असो, खजुराहो ची असो. अनेक मोठ मोठी मंदिरे असो किंवा आपल्या गावी असलेले खंडोबा, भैरोबाचे छोटेखानी मंदिर. दगडाना बोलके करण्याची ही सुंदर कला आपण भारतभर कोठेही फिरताना आपल्याला नजरेस पडत असतेच. यामध्ये मानवनिर्मित मंदिरे, लेणी, गुफा, स्तंभ इत्यादीची आपण टिपलेली छायाचित्रे देणे अपेक्षित आहे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ७ : भारतीय शिल्पकला
- 38 comments
- Log in or register to post comments
- 27335 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ६ : पाऊस
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: पाऊस
आशा आहे की हा असा विषय आहे जो कुणालाही सहज हाताळता येईल आणि अगदी साध्यात साध्या कॅमेर्याने सुद्धा चित्रबद्ध करता येईल. मला असे वाटते की यात प्रचंड वाव आहे, आपल्याला अनेक कल्पक चित्रे पाहावयास मिळतील.
तेव्हा आपल्या कल्पनाशाक्तीला भरारी द्या आणि येउद्यात फोटो.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ६ : पाऊस
- 26 comments
- Log in or register to post comments
- 13039 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: रात्र
कुण्या एका चित्रकाराचे उद्गार आठवतात की रात्र दिवसापेक्षा जास्त रंगीत व जिवंत भासते! तेव्हा आपल्या कल्पनाशाक्तीला भरारी द्या आणि येउद्यात फोटो.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र
- 25 comments
- Log in or register to post comments
- 11305 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ४ : सावली
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: सावली
प्रकाशामधे अडथळा आल्यामुळे पडलेली...आणि मायेची, प्रेमाची, दु:खाची सावली वगैरे...सर्व कल्पनांचं स्वागत.
सर्वांना शुभेछा !
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ४ : सावली
- 26 comments
- Log in or register to post comments
- 13078 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३ : वाट
येत्या पंधरवड्याच्या स्पर्धेचा विषय आहे: वाट
या विषयाचा अनेक प्रकारे अर्थ लावता येईल - जसे वाट पाहणे, वाट काढणे, वाट लावणे, वाट दाखवणे ... इत्यादी :-) असे आणखी अनेक अर्थ व्यक्त होतील याची खात्री आहे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३ : वाट
- 39 comments
- Log in or register to post comments
- 22458 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २ : घर
धागाकर्त्याने पहिल्या पंधरवड्याच्या स्पर्धेत मी काढलेले एक छायाचित्र सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले याचा आनंद वाटला. ते छायाचित्र सुखावह नाही. त्यात एक अस्वस्थता आहे.
त्यामानाने इतरांनी काढलेली अनेक छायाचित्रे नयनरम्य आणि मनाला शांती देणारी आहेत. तरीही त्या छायाचित्राची निवड झाली हे पाहून थोडे आश्चर्य वाटले.
तर, येत्या पंधरवड्याच्या स्पर्धेचा विषय आहे: घर
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २ : घर
- 43 comments
- Log in or register to post comments
- 24563 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १ : माझे शहर/गाव
ऐसीअक्षरेवर अनेक हौशी छायाचित्रकार आहेत. काही मंडळी वेगवेगळे प्रयोग करत असतात. खास छायाचित्रणासाठी विविध ठिकाणी जाणे, काही विशिष्ट दिवशी - वेळी हव्या त्या छायाचित्रासाठी प्रयत्न करणे वगैरे सव्यापसव्ये अनेक जण करताना दिसतात. मला बहुतांश चित्रे छान वाटतात. इथे प्रसिद्ध होणारी सर्व चित्रे ही सहेतूक असली तरी एकाच विषयाला धरून असतातच असे नाही.
मात्र, नुकत्याच झालेल्या दोन खगोलीय घटनांच्या वेळी - कंकाणाकृती ग्रहण आणि शुक्राचे अधिक्रमण - एकाच विषयावर अनेक चित्रे बघायला मिळाली व तुलना करायला मजा आली व बरेच काही शिकायला मिळाले
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १ : माझे शहर/गाव
- 48 comments
- Log in or register to post comments
- 17992 views