दखल
विश्वचषकविजेत्या भारतीय चमूचे अभिनंदन!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१ जुलै
जन्मदिवस : गणितज्ञ गटफ्रीड लिबनिझ (१६४६), कवी, संपादक एकनाथ रेंदाळकर (१८८७), अभिनेता चार्ल्स लॉटन (१८९९), सिनेदिग्दर्शक विली वायलर (१९०२), साहित्य अकादमी विजेते लेखक अमर कांत (१९२५), पंतप्रधान चंद्रशेखर (१९२७), सिनेदिग्दर्शक सिडनी पोलॅक (१९३४), बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया (१९३८), धावपटू कार्ल ल्यूईस (१९६१), अंतराळवीर कल्पना चावला (१९६१), गायक उस्ताद रशिद खाँ (१९६६)
मृत्युदिवस : विचारवंत मिखाईल बाकुनिन (१८७६), लेखिका हॅरिएट बीचर स्टो (१८९६), 'इंडियन होम रूल लीग'च्या संस्थापक सदस्यांपैकी एक व लो. टिळकांचे सहकारी ग. श्री. उर्फ दादासाहेब खापर्डे (१९३८), कादंबरीकार, नाटककार लक्ष्मण नारायण जोशी (१९४७), स्वातंत्र्यसैनिक डॉ. बी.सी.रॉय (१९६२), हिंदीला भारताची अधिकृत भाषा बनवण्यासाठी झटलेले स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न पुरुषोत्तम दास टंडन (१९६२), पर्यावरणवादी वास्तुरचनाकार रिचर्ड बकमिन्स्टर फ्युलर (१९८३), कवी व शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील (१९८९), दिग्दर्शक व नेपथ्यकार राजाभाऊ नातू (१९९४), अभिनेता रॉबर्ट मिचम (१९९७), अभिनेता वॉल्टर माथाऊ (२०००), लेझर, मेझर बनवण्यासाठी मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता निकोलाय बसॉब (२००१), अभिनेता मार्लन ब्रँडो (२००४), मराठी लोकसंस्कृतीचे संशोधक रा. चिं. ढेरे (२०१६)
---
महाराष्ट्र कृषी दिवस
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : घाना, सोमालिया (१९६०), रवांडा, बुरुंडी (१९६२), कॅनडा (१८६७)
राष्ट्रीय डॉक्टर दिवस (डॉ. बी.सी. रॉय यांच्या स्मृतिदिनानिमित्त)
१७७० : लेक्सेलचा धूमकेतू पृथ्वीपासून सगळ्यात कमी अंतरावरून (०.०१४६ खगोलीय एकक) गेला.
१८७९ : भारतात पोस्टकार्डांचा वापर सुरू.
१८५८ : चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड वॉलस यांनी उत्क्रांतीवरचे संशोधन एकत्रितरित्या लिनीयन सोसायटीत वाचून दाखवले.
१८८१ : कॅनडा आणि अमेरिकेतल्या दोन शहरांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय दूरध्वनी झाला.
१९०३ : 'तूर द फ्रान्स' या सायकलशर्यतीची सुरुवात.
१९०८ : SOS हा आणीबाणीचा इशारा म्हणून मान्य झाला.
१९०९ : क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी सर विल्यम कर्झन वायली याची हत्या केली.
१९१६ : पहिले महायुद्ध : सोमची लढाई सुरू. नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या लढाईत सुमारे दहा लाख सैनिक मृत.
१९३३ : नाट्यमन्वंतर संस्थेच्या ’आंधळ्यांची शाळा’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९५५ : 'इंपीरिअयल बॅंके'चे 'स्टेट बॅंक ऑफ इंडिया' नामकरण झाले.
१९६१ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी.) स्थापना.
१९६७ : युरोपीय समुदायाची पायाभरणी.
१९६८ : ६२ देशांनी अण्वस्त्रप्रसारबंदी कराराला मान्यता दिली.
१९७९ : सोनी कंपनीने 'वॉकमन' बाजारात आणला.
१९९१ : वॉर्सा करार अधिकृतरीत्या बरखास्त.
१९९७ : हॉंगकॉंगवर चीनचा ताबा.
२००२ : युद्धगुन्हे, वंशहत्याकांड अशा गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना.
२००४ : कसिनी-हॉयगन्स यान शनीच्या कक्षेत शिरले.
२००६ : चीनमध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.
२०१७ : भारतभर वस्तू व सेवा कर (GST) लागू.
२०२४ : भारतात नवी दंडसंहिता लागू.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- पॉर्न ओके प्लीज
- Rajesh188