दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
८ जून
जन्मदिवस : संगीतकार तोमासो अल्बिनोनी (१६७१), संगीतकार रॉबर्ट शुमान (१८१०), चित्रकार जॉन एव्हरेट मिले (१८२९), वास्तुविशारद फ्रँक लॉईड राईट (१८६९), विचारवंत व समीक्षक दि. के. बेडेकर (१९१०), नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक (१९१६), संगीतकार गजानन वाटवे (१९१७), क्रिकेटपटू डेरेक अंडरवुड (१९३५), 'वर्ल्ड वाईड वेब' (www) चा जनक टिम बर्नर्स ली (१९५५), 'डिलबर्ट'चा निर्माता व्यंगचित्रकार स्कॉट अॅडम्स (१९५७), अभिनेत्री डिंपल कपाडिया (१९५७), अभिनेत्री शिल्पा शेट्टी (१९७५), टेनिसपटू लिंडसे डॅव्हेनपोर्ट (१९७६), टेनिसपटू किम क्लाईस्टर्स (१९८३)
मृत्युदिवस : विचारवंत व लेखक थॉमस पेन (१८०९), अभिनेते व लेखक राम नगरकर (१९९५), संगीतकार दत्ताराम (२००७), रंगकर्मी हबीब तन्वीर (२००९)
---
आंतरराष्ट्रीय ब्रेन ट्युमर दिवस.
जागतिक महासागर दिन.
१६३७ - रने देकार्तचे 'Discourse On The Method' पुस्तक प्रकाशित झाले. आधुनिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. "I think, therefore I am" हे सुप्रसिद्ध वचन त्यात आहे.
१६९० - सिद्दी यादी सकट याने मुंबईतला माझगांव किल्ला उद्ध्वस्त केला.
१८८७ - हर्मन हॉलेरिथला पंच कार्ड कॅल्क्युलेटरसाठी पेटंट प्रदान.
१९१४ - लो. टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका.
१९१५ - लो. टिळकांचा 'गीतारहस्य' ग्रंथ प्रकाशित झाला.
१९३६ - 'भारतीय नागरी नभोवाणी'चे 'ऑल इंडिया रेडिओ' उर्फ 'आकाशवाणी' असे नामकरण.
१९४८ - 'एअर इंडिया'ची पहिली आंतरराष्ट्रीय सेवा (साप्ताहिक मुंबई-लंडन) सुरू झाली.
१९४९ - जॉर्ज ऑरवेल यांची कादंबरी '१९८४' प्रसिद्ध झाली.
१९५३ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने वॉशिंग्टन डी.सी. येथील हॉटेलांतून कृष्णवर्णीय गिऱ्हाईकांना सेवा नाकारणे बेकायदा ठरवले.
१९७२ - नापामच्या हल्ल्यात भाजल्यानंतर पळणाऱ्या व्हिएतनामी मुलीचे पुलित्झर पारितोषिक विजेते प्रख्यात छायाचित्र निक यूट याने टिपले.
२०१४ - मुंबईत मेट्रो सुरू झाली.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.