दिनवैशिष्ट्य
१ नोव्हेंबर
जन्मदिवस : शिल्पकार अॅन्तोनिओ कानोव्हा (१७५७), लेखक हर्मन ब्रॉक (१८८६), अभिनेता शरद तळवलकर (१९१८), गणितज्ञ हर्मन बॉन्डी (१९१९), संगीतकार यशवंत देव (१९२६), कवी अरुण कोलटकर (१९३२), लेखक व विचारवंत एडवर्ड सैद (१९३५), अभिनेता किशोर प्रधान (१९३६), समाजसुधारक नरेंद्र दाभोलकर (१९४५), अभिनेत्री ऐश्वर्या राय (१९७३), क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (१९७४)
मृत्युदिवस : लेखक अल्फ्रेड जारी (१९०७), कवी एझ्रा पाउंड (१९७२), कवी व स्वातंत्र्यसैनिक कुंजविहारी (१९७८), लेखक विलिअम स्टायरॉन (२००६)
---
शाकाहार (व्हेगन) दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : अल्जेरिया, अॅन्टिग्वा-बार्बुडा
वर्धापनदिन / स्थापनादिन : हरियाणा, कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेश राज्ये, पॉप ग्रूप अब्बा
१६०४ : शेक्सपीअरचे नाटक 'ऑथेल्लो'चा प्रथम प्रयोग.
१६११ : शेक्सपीअरचे नाटक 'टेम्पेस्ट'चा प्रथम प्रयोग.
१८५८ : १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या राणीचा जाहीरनामा प्रसृत. इस्ट इंडिया कंपनीच्या हातून भारताचा कारभार काढून घेतला गेला आणि पार्लमेंटकडे तो सोपवण्यात आला.
१९५६ : भाषावार प्रांतरचनेच्या अंमलबजावणीला सुरुवात. आंध्र प्रदेश, केरळ व म्हैसूर (नंतरचे कर्नाटक) राज्यांची स्थापना.
१९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येपश्चात भारतभर शिखांविरोधात दंगली.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- चिंतातुर जंतू