दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२९ मे
जन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)
मृत्युदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)
---
आंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस
लोकशाही दिन : नायजेरिया.
१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.
१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.
१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.
१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.
१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.
१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.
१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.
१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.
१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.
१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.
२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- Rajesh188
- चिंतातुर जंतू