पिंकी प्रामाणिक

पिंकी प्रामाणिक या नावाच्या खेळाडूने सध्या धुमाकुळ घातला आहे. खरे तर तीने धुमाकुळ घातला आहे म्हणण्यापेक्षा मिडीयाने घटनांना धुमाकुळाचे रूप दिले आहे. पिंकी ही भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून देणार्‍या चमुतील एक खेळाडू. एक भारतीय नागरीक आणि सर्वात मुख्य म्हणजे एक 'माणूस'! तिच्यावर एका महिलेने बलात्काराचा (लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा) आरोप केला आहे व पिंकी ही स्त्री नसून पुरूष आहे असाही दावा केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळणे हे कोर्टाचे कामच आहे आणि ते झालेच पाहिजे. पिंकीच्या विरूद्ध केलेला दावा खरा असेल तर त्याची शहानिशा कोर्टाने करून मग तिला कायद्याने जी योग्य शिक्षा असेल ती दिली पाहिजे. मात्र तोपर्यंत, पिंकी ही एक स्त्रीच आहे असे मानणे अनिवार्य ठरावे.

याप्रकरणात मिडीयाने जो अश्लाघ्य वार्तांकन केले आहे ते 'जबाबदार पत्रकरीतेला' शोभणारे नाही असेही मला वाटते. जेलपासून कोर्टापर्यंत व परत अश्या क्षणांची सतत दृश्य दाखवणे, 'ये चीज क्या है?" असले प्रश्न पिंकी यांचा चेहरा दाखवून विचारणे वगैरे अपमानास्पद आहे.

मात्र दोन दिवसांपूर्वी जे झाले ते आपल्याला एक समाज म्हणून लांच्छनास्पद होते. पिंकीवर झालेल्या आरोपांची शहानिशा दोन सरकारी हॉस्पिटल्समधे होऊ शकली नाही. तिथे 'खात्रीशीर' चाचण्या करण्यासाठी लागणार्‍या सार्‍या सुविधा नव्हत्या. मात्र चाचण्या चालु असताना 'कोणीतरी' त्याचे शुटिंग करतो काय, ते इंटरनेटवर चढवतो काय आणि काही तासांत भारतभरात बातमी पसरून अनेक लोक ते बघतात काय हे सारेच एक समाज म्हणून शरमेचे आहे.

पिंकीला पुरूषांच्या जेलमधे ठेवणे, तिला पुरूष पोलिसांनी सोबत करणे तिच्यावर अन्याय्य आहे काय? सतत क्यामेरा घेऊन मागे धावणार्‍या मिडीयापैकीच एकाने हे शुटिंग केले नसेलच असे खात्रीने सांगता येईल काय? अश्या बातम्या (मिटक्या मारत) चर्चिल्या जातात, असे विडीयो चढवलेले कळताच बघायला झुंबड उडते हे कसले लक्षण वाटते? अशी विकृतता जगभरात असावी असा अंदाज आहे, इतरत्र/यापूर्वी असे काही घडले आहे काय? त्यावर काय अ‍ॅक्शन घेतली गेली?

द हिंदुच्या या अग्रलेखात तर सुचवले आहे की हे शुटिंग करायला डॉक्टरांनी परवानगी दिलीच पण तिथे पोलिसही हजर होते (शेवटून दुसर्‍या वाक्यातील मागणी हेच सुचवते)

या विषयावर तुम्हाला काय वाटते?

याव्यतिरिक्त, लिंग बदल वगैरेच्या शक्य असण्याच्या जमान्यात एखाद्या व्यक्तीच्या लिंगाची(जेन्डर) शहानिशा करणे खरच शक्य आहे का? असल्यास कोणत्या चाचण्या केल्या जातात? त्या भारतातील हॉस्पिटल्समधे करणे का कठीण आहे? वगैरेवर येथील वैद्यकीय ब्याकग्राऊंड असणार्‍यांनी प्रकाश टाकावा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

लिंग संबंधित एकूणच सगळ्या व्यवाहारात आपल्याकडे संवेदनक्षमता नाहीच. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

या बाबतच्या बातम्या वाचून/ त्या देण्याची पद्ध्त बघून, आणि त्यातून समोर आलेले पोलिसांचे वर्तन पाहून अतिशय चीड येत होती/आहे. प्रामाणिक यांना गुन्हा सिद्ध होण्या आधीच पुरेशी शिक्शा झाली आहे असंच वाटतय.
यावरून "guilty until proven innocent" या पद्ध्तीने चालणार्या कार्यवाहीवर टिप्प्णी करणारा हा एक ब्लाऑग आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0