सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु!
आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो.
==============================================================
सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर "सत्यच जिंकते" असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर. आपण जर या ब्रह्मांडाकडे (विश्व वा यूनिवर्स या शब्दांत भारतीय भावजगतातल्या अनेक संकल्पना नसतात म्हणून ब्रह्मांड) पाहिले तर जाणिव असलेले मानव ही स्पेसिस वा तत्सम इतर सजीव वा इतर काहीही आणि ब्रह्मांडातल्या कोठल्याही जागेतले तत्सम "प्रकार" सोडले तर, म्हणजे त्यांना ब्रह्मांडातून वगळले तर, असत्य नावाचा प्रकार कुठे उरत नाही. उरायला स्कोपच नाही. सगळं असत्य या सजीवांच्या विचारांत, मनांत, मेंदूंत, आणि कंच्या, इ इ आढळून येईल. याच्याबाहेर सांडलेलं असेल कोरडंफटक, रख्ख, मृत, नियमबद्ध वा कसं, अस्ताव्यस्त, अनिरीक्षित वास्तव विश्व. हे वास्तव म्हणजेच सत्य. हे जिंकते म्हणजे काय? कोणाशी त्याची लढाई चालू असते? कोणाशीही नाही! मग सत्यमेव जयते कशाला म्हणायचे? सत्यमेव वसते म्हणा किंवा सत्यमेव अस्ते म्हणा किंवा मराठीत सत्यच असते असे म्हणा!!!
आता हे गडबड गोंधळ करणारे सजीव सिच्यूएशन मधे घेऊन पाहू. त्यांच्या मनांत, मेंदूत अनंत सत्य, असत्य संकल्पना आहेत. परंतु सत्य संकल्पनांची नेहमी एक युद्धशील खुमखुमी आढळते. त्यांना असत्याचं पृथ्वीतलावरचं, ब्रह्मांडातलं नामोनिशान मिटवून टाकायचं असतं. या खुमखुमीतच सत्यमेव जयते चा जन्म होतो. मानवाने सत्याला अवाजवी महत्त्व देऊन ठेवलं आहे. सत्य हे साध्य तर नाहीच, पण मार्ग देखील नाही. ते फक्त एक टूल,परिमाण आहे आपल्या मानवजातीच्या उद्दिष्टांच्या पूर्तींतल्या मार्गांमधलं. म्हणजे विधान सत्य नसेल तर नीट वापरता येत नाही, मग त्या विधानाचा काय उपयोग असं काहीसं सत्याचं स्थान आहे. म्हणून ती एक आवश्यक बाब आहे, किचनमधे मीठ असल्यासारखं. तसं पाहिलं तर जीवनात गंतव्य सत्य "एवढंच" नाही, जायचा तो मार्ग सत्य "एवढाच" नाही. मार्गात वाटेल तेवढ्या असत्याच्या कुबड्या चालाव्यात. एक उदाहरण देतो. एका माणसाला मोठा उद्योग प्रस्थापित करून धनसंचय करायचा आहे आणि समाजासाठी रोजगार उत्पन्न करायचा आहे. हा एक सद्दुदेश मानू यात. मात्र या प्रक्रियेत त्याला कितीतरी प्रकारचा अनावश्यक सरकारी कंप्लायन्स करावा लागतो. सत्य असं आहे कि त्या व्यक्तिसाठी कंप्लायन्स अनावश्यक आहे. पण अन्य लोक गैरफायदा घेतात म्हणून तशी कायदेशीर तरतूद करणं देखील सरकारला आवश्यक आहे. या एकाच माणसाला सहुलियत दिली तर अन्य लोकांच्या मनातील संशय आणि त्यांच्या निराकरणाची आवश्यकता देखील सत्य आहे. अशी अनेक सत्यं या उद्दीष्टात, त्याच्या मार्गात कामाला येतात. पण आपण अशी अनेक चांगली कंप्लायन्स मॉनिटरींग अनावश्यक असलेली माणसं दुर्लक्षून काटेकोर कंप्लायन्सचे कायदे बनवले आहेत. इथे वेगवेगळ्या लोकांचं सत्य काय काय आहे, ते कसं कसं जाणायचं, कुठे कुठे मांडायचं आणि निर्दोषांना त्रास कसा होणार नाही हे कसं ठरवायचं याचं पूर्ण फ्रेमवर्क बनवायचं आणि सत्याचं अचूक पालन करायचं असंभव आहे. असलं फ्रेमवर्क लोकमान्य नसेल हे वेगळं आलंच. म्हणून सगळेच खोटारडे असू शकतात असा सर्वजनपतनन्याय लावायचा!
सत्याविना जग चालतं. आणि व्यवस्थित चालतं. तुमच्या मनातलं सगळं, सगळं सगळं, सग्गळ्ळं कधी सांगीतलंय कोणाला? चार सत्य फक्त आपल्यालाच माहित असतात. कोणतं सत्य कोणासाठी आणि दुसरं कोणतं सत्य कोणासाठी याचे हिशेब असतात. तरीही "मोकळी नाती" जुडतात, "मोकळ्या मैत्र्या" होतात. मग सत्याचा अट्टाहास का? कि चारचौघांना अलाईन होणारी ऑफिशियल पोझिशन म्हणून उगाच? माणसाचं स्वतःचं असं एक असत्य जग असतं. त्यात तो बर्याच गोष्टींत मुद्दाम असत्यपणे वागत असतो. हे अचाट आहे पण कधीकधी स्वतःशीही बराच खोटारडेपणा चालू असतो. आणि अज्ञान हा तर असत्यांचा महासागर. या महासागरात वाट हरवलेली लोकं देखील सुखेनैव संसार करत असतात. बरीच सत्यं भीषण असतात आणि लपून असतात. ती तशी लपून नसली तर कल्लोळ होइल. मग सत्याचा अट्टाहास का?
विश्वाचं, पृथ्वीचं, मानवजातीचं सत्य काय आहे हे कोणालाही माहित नाही. आपण का आहोत, आपण कुठे जात आहोत, कसे जावे इ इ प्रश्न अनुत्तरीत आहेत. सत्यवादी लोकांना विश्वाचं संपूर्ण ज्ञान हवं आहे. (कल्याणवाद्यांना ब्रह्मांडाचं कल्याण हवं आहे.). सध्याला हे ज्ञान घेण्याकरिता खूप श्रम घेतले जात आहेत, खूप पैसे ओतले जात आहेत. त्यात मानवाच्या कल्याणकारणाकडे दुर्लक्ष होत आहे. मंगलयान मंगळावर जातं आणि तिथेच शेजारी ओरिसातल्या आदिवास्यांना शेजारचं, भरून वाहणारं पाणी मिळत नाही. सत्यवाद्यांचा असा दावा आहे असा होणारा खर्च ही एक उद्याची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूकीची जाहिरात बरेच दिवसापासून चालू आहे आणि त्याचा परिणाम काय आहे तर अजून गुंतवणूकीची मागणी. समजात दोन वर्ग आहेत. या सत्यवाद्यांच्या जवळचा आणि लाभार्थी. खूप पावरफूल. सत्ताधारी. दुसरा आहे कल्याणवाद्यांचा. निर्बल. दुर्लक्षित. आपलं सरकार देखील तोंडदेखलं कल्याणवादी आहे. त्याची जास्तीत जास्त संसाधनं सत्यवाद्यांच्या सेवेतच जातात.
सत्यवाद्यांनी नवे फॉर्म्यूले बसवले आहेत. कायद्यांचे. म्हणून कायदा हेच सत्य झाले आहे. कल्याण करायचं काम कायद्याचं आहे तर आपण मधे का पडा अशी वृत्ती निर्माण झालेली आहे. कायदे एकतर जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करत नाहीत. तिथे सत्य काय ते प्रत्येकजण आपापला रँडमली ठरवत आहे आणि समाजात दुह्या, दुफळ्या निर्माण होत आगे. दुसरं म्हणजे कायदे जिथे स्पर्श करतात तिथे ते नीट राबवले जात नाहीत. प्रशासन असो वा लोक असो वा सरकार असो वा माध्यमे असो - कायदा कसा कमीत कमी पाळायचा याच्याच पळवाटा शोधत असतात. म्हणून कल्याणवाद्यांना फ्रस्टेशन आलं आहे. कायदा हा त्याच्या स्पिरिटनुसार पाळला पाहिजे पण सांगतो कोण?
आता कायद्याच्या बाजूनं विज्ञान आहे. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायची विज्ञानानं चिक्कार शस्त्रास्त्रांची निर्मिती करू ठेवली आहे. म्हणून आहे ती व्यवस्था कल्याणकारी आहे असं समजून चालायचं आणि कायद्यात बदल करायचे. पण कायद्यात बदल संसदेत निवडून दिलेले लोक करतात; लोक थेट करत नाहीत. म्हणजे लोक विषयवार मतदान करत नाहीत, उमेदवारवार मतदान करतात. आणि प्रत्येक विषयात उमेदवारांत आणि लोकांत दुमतं असतात. हे सगळं सत्य मानायचं आणि चालायचं. या आणि सामाजिक गदारोळातल्या प्रत्येक विधानावर सांगोपांग चर्चा करायची, चिकित्सा करायची जे होत आहे ते कल्याणच होत आहे असं सत्य मानायचं. हा बराच विचित्र प्रकार आहे.
सत्याचं अजून एक प्रकरण आहे, ते म्हणजे सत्य ढोबळ असू शकत नाहीत. खणखणीत पुरावा आणि वाटरटाईट वाक्यरचना पाहिजे. मी जर म्हणालो कि मी थकलोय नि ते सत्य असेल तर आणि दुसर्याला तसे मानायचे नसेल तर मला मी थकलो असल्याचे त्याला पटतील असे पुरावे गोळा करावे लागतील. हे कठीण आणि अशक्य कर्म आहे. समोरचा दुराग्रही असेल तर अजूनच कठीण. मग मोजमापं आली. प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवणं आलं. त्यातून बनणारी गणितीय मानसिकता - आयुष्य म्हणजे गणित- आली.
जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक बैज्ञानिक नसतो. नसावा. तो मूलतः कल्याणवादी हवा. माझं तुझं, सर्वाचं भलं होऊ दे, मग सत्य काही का असेना. उद्या जर सत्य असं निघालं कि सजीव सगळे निसर्गनियमांच्या कळसूत्री बाहुल्या आहेत (काहींना ते आजच वाटतं) त्या सत्याला पोचल्यानंतर काय? मृत बाहुल्यांचं काय करतात? इथे कोणीतरी कर्ता लागतो म्हणून मृत बाहुल्यांचं काय करतात ऐवजी काय होतं असं म्हणा. राहतात त्या पडून. ते निरर्थक पडून राहणं म्हणजे जीवन का? या असल्या अंतिम सत्यावर पोचल्यावर कसला जीवनविषयक दृष्टीकोन असणार आहे? आणि का म्हणे मानवी जीवनाचं सातत्य अबाधित राहावं आणि का म्हणे मंगळावर वस्ती कराणे?
सध्याला सत्य आणि कल्याण या संकल्पनांचं द्वंद्व चालू आहे. ट्रूथ वर्सेस बेनेव्होलेन्स!! बख्खळ सारी गृहितकं केली तर समाजात विवाद सत्यवादी नास्तिक आणि कल्याणवादी अस्तिक असा संघर्ष काही काळाने दिसून येईल असं मला वाटतं. सत्यवादी लोकांना पुरावा हवा असतो. पण पुराव्याला देखील त्याचा स्वतःचा पुरावा हवाच ना? मग ही साखळी कुठेच संपत नाही. शेवटी काहीतरी मानावं लागतं. निसर्ग वा वैश्विक अस्तित्व हे असम्यक आहे, त्यात ईश्वर नाही, ईश्वरीयता नाही, त्याचा कोणी कर्ता नाही, त्याचे काही उद्दीष्ट नाही, चांगुलपण आणि वाईटपण समानच आहे, आपण भौतिकशास्त्राच्या नियमांनी बद्ध आहोत, सगळ्या क्रिया, प्रक्रिया, भाव, भावना, मूल्ये ही भौतिकशास्त्रातल्या कणांच्या रिअॅक्शनचा परिपाक आहेत अशी विचारसरणी बळावत चालली. त्यात आपलं इतरांशी सदवर्तनाचं दायित्व प्रश्नांकित होण्याचा संभव आहे. "मी लोकांच्या कल्याणाची चिंता का करू?", "लोकांच्या कल्याणात माझं देणं घेणं काय?", "चांगलं आणि वाईट यापैकी चांगलं निवडावं असा शोध कधी लागला आहे??, "आपण मृत तर नाहीत ना?", "हे जग नाहीच असे नाही ना?", "कुटुंब, नाती, देश, धर्म , इ इ मूर्ख लोकांनी पुरातन काळात बनवलेली अनावश्यक ठिगळं आहेत.", "मानवाला बुद्धी गेल्या १०० वर्षांत आलीय आणि त्यामागचा सगळा काही अंधार होता (म्हणजे आता माझ्यासारखे चार आहेत म्हणून सिच्यूएशन कंट्रोल मधे आहे.) म्हणून तिथलं सरसकट सगळं भलंबुरं न पाहता टाकावं" इ इ विचार करणारी मंडळी फोफावली आहेत.
मानवकल्याणाचा विचार हा शेवटी सामान्य माणसानंच करायचा असतो नि त्यात सत्याचा विजय होईपर्यंत ताटकळत बसायची गरज नाही.
அவர் மெதுவாக ??, "நீங்கள்
அவர் மெதுவாக ??, "நீங்கள் இறக்கவில்லை நீங்கள் செய்தால் செய்ய?" "குடும்பம், உறவுகள், நாடு, முதலியன மதம், முதலியன, முட்டாள் மக்கள் தேவையற்ற பழைய நாட்களுக்குப் உள்ளன.", "மனித மூளை," உலகின் மன்னிப்பு வேண்டாம்? ", கர்நாடக 100 ஆண்டுகள் கடந்த கால மற்றும் (அனைத்து இருண்ட பின்னால் இருந்தது எம்ஹெச்ஏ இப்போது என் நான்காகும்
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लेखाला कुवतीप्रमाणे दाद
लेखाला कुवतीप्रमाणे दाद दिल्याबद्दल धन्यवाद.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भाषांतर
?? हळूच, "आपण मरणार नाही तर?" , "मानवी मेंदू," जगात दिलगीर आहोत नका "कुटुंब, नाते, देश, धर्म, इ, इ, नको असलेले जुने दिवस लोक मूर्ख आहेत."? "100 वर्षे गेल्या कर्नाटक, (गृह मंत्रालयाच्या आता माझ्या चौथ्या सर्व मागे गडद होते आहे
थ्यांक्यू.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
लेखाला कुवतीप्रमाणे दाद
लेखाला कुवतीप्रमाणे दाद दिल्याबद्दल धन्यवाद.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बहुतेक ते भाषांतरित शब्द
बहुतेक ते भाषांतरित शब्द असावेत्. अनुप ढेरे यांच्या प्रतिसादातुन भाषांतरीत केलेले.
यू रॉक!
यू रॉक!
ऐसीवर मराठीत लिहावं म्हणून मी आपलं गुगलून भाषांतर केलं फक्त. जोशी भडकले.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
You Rock!
You Rock!
Such as write in Marathi translation of our gugaluna I just did. Joshi stirred up.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ओहो, असा सगळा प्रकार झाला
ओहो, असा सगळा प्रकार झाला तर, खूप वाईट झाले
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्हालाही वाईट वैगेरे वाटू
तुम्हालाही वाईट वैगेरे वाटू लागलंय? अच्चं जालं तल!!!!!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उगी उगी
ओह आय सी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लेखाला कुवतीप्रमाणे दाद
लेखाला कुवतीप्रमाणे दाद दिल्याबद्दल धन्यवाद.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
असं झालं तर एकूण
असं झालं तर एकूण
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मित्र म्हणून सांगतो. न वाचता,
मित्र म्हणून सांगतो. न वाचता, न समजून घेता, समोरचा मूर्ख आहे असं समजून वागायचा आपला काँफिडेन्स थ्रेशोल्डच्यावर गेला आहे. याउपर बोलवत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग पूर्ण बोला ना, उगा मित्र
मग पूर्ण बोला ना, उगा मित्र म्हणून ह्यांव आणि शत्रू म्हणून त्यांव वगैरे कशाला? मतभेद आणि मैत्री वेगळे हे कोण सांगितले होते याचा इच्यार करतो आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
context, or lack of
लेख कॉंप्लिकेटेड आहे.
अर्थात मंजूर. पण पुरेशा व्यापक दृष्टीने काहीही बघायला गेलं तर त्याचं स्वरूप "हे आहे कारण ते आहे." इतकंच उरतं. त्यामुळे तुम्ही जर "भारत नावाच्या देशातल्या कायद्यातल्या एका पुस्तकातल्या वचनाचा" अर्थ वैश्विक किंवा ब्रह्मांडाच्या पातळीवरून लावला तर तो लागणार नाहीच, कारण तो त्या चौकटीकरिता लिहिलाच गेला नाहीये.
अण्णा बापटांचं वचन (परवानगीशिवाय, सॉरी!) उधृत करायचं झालंच तर -
क्रिकेटचा बॉल घेऊन कोणी बोलिंग करतोय , त्याच्यासमोर कोणी हॉकी स्टिक घेऊन उभा आहे पण त्याला कबड्डी च्या नियमात बसवू इछितोय पण बोलर ला आईस हॉकी अपेक्षित आहे , यावर राज्यसभेत तारांकित प्रश्न तिसऱ्याला उभा करायचंय
==================
भूतकाळातील आस्वल्य.
माझं वाचन दांडगं इ इ नाही
माझं वाचन दांडगं इ इ नाही अन्यथा मी दहा बापट कोट केले असते. लेखात सुसूत्रता, ससंदर्भता नसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अगोदर स्वतःच्या समजेबद्दलचे गैरसमज जमिनीवर आणून मग लेख वाचा. लेखक एक मूर्ख आहे हे शीर्षकापासून माहित असेल तर उपयोग नाही. मला ऐसीसारख्या बुद्धिप्रामाण्यवादी संस्थळावर असं लिहावं लागेल असं वाटलं नव्हतं, पण दुर्देवानं तसं आहे.
====================================
जगात असे किती "हे" आहेत? सर्वसाधारणपणे "हे" म्हणजे नियम आणि तुमचा "ते" म्हणजे उदाहरण असं गृहित धरलं तर "हेंची" संख्या "तेंपेक्षा" खूप कमी भरेल. मग या हेंची कारणं शोधणं आलं. त्यांना क्षे म्हणू या. "क्षेंची" संख्या अजूनच कमी. असं करत करत शेवटी "एकम् सत्यम्" वर येतं.
लेखात असे नियमांचे नियम गाळून गाळून बनलेल्या अंतिम सत्याचा उल्लेख आहे. हे मी लेखात वर्णिलेलं भकास नास्तिकी अंतिम सत्य असो वा एकम सत्यम असं अध्यात्मिक सत्य असो, त्याचा उल्लेख आला आहे.
ही एक नविन नास्तिकी खोड आहे. क्लासिकल लेवलवर एक नियम आणि क्वांटम लेवलवर दुसरा नियम. नियम नक्की काय ते माहित नाहीच पण असं वेगवेगळे नियम का हे तर माहित नाहीच नाही.
अर्थात लेखात सुसूत्रतेचा आग्रह आहेच. नास्तिक वा विज्ञान जे सत्य म्हणून मांडतात ते संपूर्ण, सुसूत्र आणि शाश्वत असलंच पाहिजे. अर्ध्याकच्च्या खिचडीचं तत्त्वज्ञान मानवतेनं का मानावं? आणि जर विज्ञानाला स्वीकार करायला इतके रिलॅक्स केलेले नियम समाजात हवे असतील असलं शिथीलीकरण देव आणि धर्म या संकल्पनांना देखील असू द्यावं? काय म्हणता?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कठीण आहे.
(तुमच्या प्रतिक्रियेतला अभिनिवेश वगळणं कठीण आहे, पण तरीही वगळलाय. असो.)
"सत्यमेव जयते" ह्या वाक्यातल्या सत्याचा अर्थ लावण्याचा तुमचा लेखात प्रयत्न आहे असं वाटलं, त्यावर माझं मत मांडलं. ते तुम्हाला पटलं नसेल तर नो प्रॉब्लेम.
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते पूर्ण लेख वाचूनही खरंच उमगलं नाही, सॉरी. तुम्ही एक तर विषयाची व्याप्ती मर्यादित ठेवावी किंवा मग अधिक सुस्पष्टतेने लिहावं, मग काय ते कळण्याची शक्यता आहे.
थ्यांक्यू.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तुमचा हा प्रतिसाद अभिनिवेश
तुमचा हा प्रतिसाद अभिनिवेश रहित आहे, नि मला हे आवडतं. वरचा अभिनिवेश रिअॅक्शनरी होता.
==============================
असं अजिबात नाही. लेखाचा विषय "कल्याण साधण्यासाठी सत्याची अहंता नसणे (अनावश्यकता शब्द टाळला आहे.)" असा आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ही एक नविन नास्तिकी खोड आहे.
म्हणजे तथाकथित कल्याणवादी पारंपरिक व्यवस्थेत पुरुषांना एक अन स्त्रियांना दुसरा नियम लावला जायचा ते सुसूत्र होतं काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Talk the topic if you can.
Talk the topic if you can.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
टॉपिकवरच बोललोय तर
टॉपिकवरच बोललोय तर त्याला हा हा हा करून दुर्लक्षिणारी प्रतिक्रिया तुमचीच आहे आणि तरीही विषयांतर करतो मात्र आम्हीच. #अजोईयलॉजिक
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
.
ह्म्म्म,
कल्याण साधण्यासाठी सत्याची "अहंता" नसावी.
सत्य विरुद्ध कल्याण असा जो सामना तुम्ही मांडता आहात ,ते गृहितक तितकंसं बरोबर वाटत नाही.
तुम्हाला नियम विरुद्ध कल्याण म्हणायचंय का? किंवा व्यवस्था विरुद्ध कल्याण? तर ते मी समजू शकतो. कारण तशी उदाहरणं तुमच्या लेखात आहेत.
सत्याचा शोध कोण घेतं? कुठल्याही क्षेत्रात मूलभूत काम करणारे लोक.
उ.दा. एडवर्ड जेन्नर (चू.भू.द्या.घ्या)ने देवी हा रोग कशामुळे होतो, त्याचं कारण काय आहे हे (त्याच्या सापेक्ष) सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच इतक्या रोग्यांचं कल्याण झालं. बरेचशे (खरं तर करोडो) जीव वाचले.
किंवा मग आर्किमिडीजने त्याला जाणून घ्यायचे होते म्हणून (च्यायला आहे तरी काय भानगड बघूया तरी) बऱ्याचशा गोष्टींमागे काय कार्यकारणभाव असतो ते बघितलं असेल, अहंता कुठे आली इथे?
सत्याचा पाठपुरावा करणारे लोक जगाच्या कल्याणाच्या आड येतात- असं तुम्हाला वाटतं का?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
उचित प्रश्न्. उत्तर देईन्.
उचित प्रश्न्. उत्तर देईन्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सत्य विरुद्ध कल्याण असा
कल्याणासाठी सत्याचा शोध घेणारा सर्वांस माझा नमस्कार आहे. सत्य आणि कल्याण हे अँटॅगॉनिस्टिक मूडमध्येच असतात असं नाही. लेख जेव्हा ते नसतात तेव्हा काय या विषयी आहे.
तरीही एक छोटीशी कॅव्हिएट आहे. समजा सर्व प्रकारचे रोगी वाचले नि अगदी मृत्यूवर विजय मिळाला तर लाँग टर्म मधे काय होइल? सध्याला, शॉर्ट मधेच, फक्त काही देशांतले फक्त काही क्लासेसचे लोक सुखी आहे. जीव वाचणे आणि मरण टळणे यांच्याबद्दल फक्त भौतिक चिंतन, शोध, प्रयोग नि उपाय करून संपत नाही.
इथे आर्किमिडिजची अहंता असं नाही म्हणयाचंय. समजा त्याला भानगड कळाली तर पुढे काय काय होऊ शकते या विचाराला स्थान न देणे. मादाम क्यूरी ने व्यक्तिगत अहंता न ठेवता किरणोत्साराचा शोध लावला. पण त्यामुळे आज क्षणार्धात मानवजात नष्ट होणे हे एक वास्तव होऊन बसले. अगोदर हे शक्यच नव्हतं, इच्छा किती का असेना!! प्रत्येकच शोधाची ऋण बाजू आणि धन बाजू अशा दोन बाजू आहेत. शोध, सत्य, शोधकर्ता इ चा गवगवा करणं चूक असावं (आहे नाही म्हटलं.). त्याचं प्रयोजन सत्कारणासाठी होईल याची फ्रेमवर्क अगोदर लक्षात घेतली पाहिजे. आज जगभर फिरत असलेल्या अण्वस्त्र सज्ज पाणबुड्यांना आर्किमिडिजचा हात आहेच. त्याने हा विचार केला नाही, फक्त कूपमंडूक पद्धतीने शोध लावला.
एक हायपोथेटिकल उदा. देतो. समजा एका शास्त्रज्ञाने असा एक शोध लावला ज्याने प्रत्येकच मनुष्य काही प्रयत्नांनंतर पृथ्वी नष्ट करू शकेल. या शोधाला आपण एच एस ए (होमो सॅपियन अॅनिहिलेटर) असे नाव देऊ. (हे संभव का नाही? शक्यता आहेच. शोधांचा इतिहास पाहिला तर यात अशक्यप्राय काहीच नाही.) . एच एस ए एक सत्य आहे. निसर्गाचा नियम आहे. पण अद्यापिपर्यंत असलेली सुरक्षा गेली. अगोदर "काही सरकारे" विनाश करू शकत होती, आता कोणीही करू शकतो. एतत्समान सारी सत्ये बाहेर येण्याबाबत तुमचं काय मत आहे?
सत्याचा पाठपुरावा करणारे लोक स्वतः सज्जन (किंवा कॉमर्शियल ) असतील. तो भाग वेगळा. त्यांचा दृष्टीकोण कल्याणवादी निश्चितच म्हणता येणार नाही, जरी पाटी ती लावली असली तरी. सत्याचा पाठपुरावा करून त्यांनी परिस्थिती रिस्की करून ठेवली आहे.
शास्त्रज्ञ असोत, पण असा अप्रोच लावल्याने सामाजिक व्यवस्थांत भयानक ढवळाढवळ झाली आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
समजा त्याला भानगड कळाली तर
हे किरणोत्सर्ग काय, कुठल्याही शोधास लागू व्हावे.
अग्नी निर्माण करण्याचा शोध ज्याने कुणी लावला त्याचा गुन्हा तर काहीच्या काहीच मोठ्ठ्ठ्ठठ्ठ्ठ्ठा होऊन बसतो. त्याचं काय करणार मग?
मग पर्याय काय? अंधाऱ्या गुहांमधे न शिजलेलं मांस किंवा झाडपाला खात जेमतेम जगायचं ? कारण ठेविले अनंते तैसेचि रहावे टाईप वागलं तरच रिस्की परिस्थिती न निर्माण करणं शक्य आहे.
तुम्ही म्हणताय की बेसिकली "धोका आहे तेव्हा खरं काय ते शोधत असाल तर आधी त्याचे दुष्परिणाम १०० वर्षांनी होणार नाहीत याची खात्री करून घ्या. ये बात बिलकुल झेपी नही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अगदी टोकाचं म्हणजे आण्विक
अगदी टोकाचं म्हणजे आण्विक विजेचा खेळखंडोबा. जपानला अपघात झाल्यावर जर्मनीने ताबडतोब ते प्लांट बंद केले अन वाय्राची वीज केली.
औषधांचे दुष्परिणाम छापलेले असतातच. पॅरसिटोमल( केशरातले क्रोसिन) ताप उतरवण्यासाठी आहे पण अतिवापर लिवर खराब करते. सत्य आणि कल्याणाचे द्वंद्व.
There is a much better
There is a much better response to the article on Misalpav. Thank God, I posted on both. Else, people here might have convinced me of my incoherence.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सत्यमेव जयते
Saatyamev Jayate
.
.
.
.
.
.
सत्यमेव जयते
सत्य
अजो,
तुमचा लेख, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचला आणि माझ्या कुवतीची मर्यादा मला माहित असल्यामुळे, दोनदा वाचला. लेखातील काही वाक्ये आकर्षक वाटली. उदा.-
सत्याविना जग चालतं. आणि व्यवस्थित चालतं. तुमच्या मनातलं सगळं, सगळं सगळं, सग्गळ्ळं कधी सांगीतलंय कोणाला? चार सत्य फक्त आपल्यालाच माहित असतात. कोणतं सत्य कोणासाठी आणि दुसरं कोणतं सत्य कोणासाठी याचे हिशेब असतात.
काही वाक्यं वाचल्यावर, ऐसीवरील विदा मागणाऱ्या सदस्यांची आठवण झाली. उदा.-
मी जर म्हणालो कि मी थकलोय नि ते सत्य असेल तर आणि दुसर्याला तसे मानायचे नसेल तर मला मी थकलो असल्याचे त्याला पटतील असे पुरावे गोळा करावे लागतील.
काही वाक्ये पटली नाहीत. उदा.-
सध्याला हे ज्ञान घेण्याकरिता खूप श्रम घेतले जात आहेत, खूप पैसे ओतले जात आहेत. त्यात मानवाच्या कल्याणकारणाकडे दुर्लक्ष होत आहे. मंगलयान मंगळावर जातं आणि तिथेच शेजारी ओरिसातल्या आदिवास्यांना शेजारचं, भरून वाहणारं पाणी मिळत नाही. सत्यवाद्यांचा असा दावा आहे असा होणारा खर्च ही एक उद्याची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूकीची जाहिरात बरेच दिवसापासून चालू आहे आणि त्याचा परिणाम काय आहे तर अजून गुंतवणूकीची मागणी.
या विश्वातल्या सर्वांना, समान पातळीवर आणेपर्यंत, विज्ञानाने विश्वाचा शोध घेणे थांबवावे का ? बाहेरील विश्वाचा शोध घेतला नाही आणि बाहेर काय आहे, हे समजायच्या आंत, बाहेरुन काही संकट आले तर, हा नुसता कल्याणकारी दृष्टीकोन उपयोगी पडणार आहे का ?
पर्सनल लेव्हलवर मात्र, सत्य न बोलणे, याचा उपयोग होतो, हे मान्य आहे. समोरचा मूर्ख असेल. पण ते त्याला लगेच सांगणं, हे आपल्या फायद्याचं नसतं. आणि ते त्याच्या फायद्याचं वा कल्याणाचं असलं, तरी त्याला उमजणे, कठीणच असतं! एक तर, तो चिडतो किंवा तुमचीच कुवत काढतो.
राहता राहिलं, माझ्यासारख्या माणसाचं! सत्य बरोबर की असत्य, हे राहू दे बाजूला. पण, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सत्य उत्तर, माहित असूनही दिलं नाही, तर ज्याला झोप लागत नाही, त्याने काय करावं? आणि, एखाद्या गोष्टीतलं सत्य कळेपर्यंत, त्याचा पाठपुरावा करणं, या मूळच्याच स्वभावाला, विज्ञान शाखेत काम केल्यामुळे, आणखीनच धार आली असेल तर, काय करावं ? लोकांचे कल्याण होवो वा अकल्याण, सत्य हे कळलेच पाहिजे, अशा वृत्तीचा मी, किंवा, माझ्यासारखी अनेक माणसं असावीत, असं मला मनापासून वाटतं.
पर्सनल लेव्हलवर मात्र,
असत्य गोष्टिस सत्य मानणारा जर त्यासाठी दमड्या मोजायला तयार असेल तर ?
या विश्वातल्या सर्वांना, स
किमान सगळे प्रवासी आत चढेपर्यंत बस थांबावी कि नाही?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
kaahee बथ्थड
kaahee बथ्थड प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर अशी प्रतिक्रिया वाचून छान वाटलं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाहेरील विश्वाचा शोध घेतला
एकतर बाह्यसंकटाची प्रोबेबिलिटी निअर झिरो आहे. तरी तुमचा मुद्दा मानला. ते संकट आल्यावर जे काही होईल त्यापेक्षा भयानक आजच काही उघड दिसत असताना अजून ५०० कोटी वर्षानी येणार्या संभाव्य संकटासाठी किती महत्त्ब द्यावे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
गोंधळात भर किंवा गोंधळात गोंधळ
बराच गोधळ आहे. सत्य हे बाय डेफिनेशन 'असते'च, आहेच. आपण जगतो हे सत्य आहे. कसाई गायीला मारतो हे सत्य आहे. वाघ गायीला खातो हे सत्य आहे. शेतकरी आत्महत्या करतात हे सत्य आहे. जे आहे ते सत्यच आहे. 'सत्'' हे व्याख्येनेच 'असणारे' असे आहे. जे जे आहे , ते ते सत् . कसाबाने माणसे मारली हा भूतकाळ. म्हणून ते वर्तमानात सत्य नाही. कसाब माणसे मारेल हे आत्ता सत्य नाही. क्लिशेय् उदाहरण म्हणजे 'कोलंबसाने अमेरिका शोधली' हे सत्य नाही.(तसेही ते सत्य नाही कारण त्याने pacific मधली काही बेटे पाहिली, अमेरिका नव्हे.) अमेरिका होती, आहे, राहील. कदाचित वेगळ्या नावाने. हे चिरंतन सत्य. कोलंबसाला त्या सत्याची जाणीव झाली. व्यापक अर्थाने, त्याची भौगोलिक जाणीव विस्तारली. अशा जाणीवा विस्तारणे म्हणजे सत्याचा प्रत्यय येणे. जे आधीपासून म्हणजे आपल्या जाणीवेच्या आधीपासून आहे, ते स्वच्छ दिसणे.
सध्या पुरे. कदाचित क्रमश:
Log in or register to post
जे जे आहे , ते ते सत् .
The same is said in the first paragraph.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सत्य म्हणजे भीती, नुकसान ही
सत्य म्हणजे भीती, नुकसान ही कल्पना आता देशात रूढ होत चालली आहे. लाल किल्यांवरून बारा स्पिकरस लावून सांगितलेली भाषणे खरी सत्ये सांगत आहेत.
विरोधाभास असणारी असंख्य उदाहरणे आहेत ती इथे नाव घेऊन सांगता येणार नाहीत हे सत्य आहे.
कुठे गुन्हा घडताना, अपघात झालेला दिसला तर माहिती द्यायला पुढे या अशी दवंडी का पिटावी लागते? कारण सत्याच्या मागे लागतो ससेमिरा आणि त्यावरच घेतला जाणारा संशय . एनरॅानच्या मागचे सत्य अजूनही कळलेले नाही.
एन्रॉन हे सत्य.
तसं नाही. एन्रॉन हे सत्यच. एन्रॉनच्या मागे सत्य कसे असेल? रूढार्थाने एन्रॉनच्या मागे असत्य होते ना?
मुण्डक उपनिषद आदि भाषांत
मुण्डक उपनिषद आदि भाषांतरे चाळून पाहीली. मुण्डक उपनिषदामध्ये हे वाक्य येते. ते ब्रह्म नामक संकल्पनेशी जोडलेले आढळते. आता ब्रह्म म्हणजे काय यावर काही लोकांनी अनेक जन्म घालविले असताना त्यांना त्याचा अर्थ कळलेला नसल्याने म्या पामर काय बोलणार!
.
जे ५ यम (हे करु नका) सांगीतलेले आहेत त्यात - सत्य म्हणजे avoid falsehood सांगीतलेले आहे., अन्य अहिंसा (हिंसा करु नका) , अस्तेय (चोरी करु नका) वगैरे (=अहिंसा · सत्य · अस्तेय · ब्रह्मचर्य · अपरिग्रह) येते.
.
मला वाटते स्वार्थी वृत्ती टाळण्याकरता व सहकार्याने नांदण्याकरता ऋषीमुनिंनी हे यम - नियम सांगीतलेले आहेत.
.
पापपुण्य या ही कल्पना यांच्या जोडिस हातात हात घालुन येतात्. एक जण आला की मागे ताफाच येतो.
ती गोस्ट आठवते - राजाच्या घरातील लक्ष्मी सोडून चालली तेव्हा त्याने तिला अडवले नाही, मग ती गेली म्हणुन तिच्या मागे नशीब गेले त्याला अडवले नाही .... असे अनेक गेले व शेव्टी धर्म निघला त्याला मात्र राजा म्हणाला "तू मला सोडुन जाऊ नकोस्." व हर्म थांबला आणी धर्म थांबला म्हणुन आख्खा ताफा मागोमाग परत आला.
.
तद्वत सत्य/अहिंसा/अस्तेय/अपरिग्रह/पाप/पुण्य/ब्रह्म हे सगळे कंपूबाज आहेत्. एक आला की सगळे येतात्.
यात आली सहवेदना. अर्थात प्रत्येक जीवात एकच परमात्मा आहे.
.
तेवा जर मी खोटे बोलले तर क्षणिक आनंद मिळू शकेल अथवा तात्पुरता फायदा होऊ शकेल पण नंतर मला त्या कर्माचे (पापाचे) वाईट फळ मिऌअच्. म्हणुन सत्य हेच सरतेशेवती जिंकते किंवा सत्याला अनुसरुन जगलो तर ते जीवन आनंददायी, clear conscience चे होते.
असा अर्थ असावा.
पण मग एका बाळाला कर्करोग झाला तर ५ व्या वर्षापासून तू मरणार (कर्करोग बरा होतो माहीते. मग एडस घ्या एबोला घ्या) असे सत्य सांगायचे का?
.
मज पामराला माहीत नाही.
आपल्याला सोयीचे, कल्याण
आपल्याला सोयीचे, कल्याणकारी-- ते सत्य जगासमोर यायला हरकत नाही.
पण गैरसोयीचे , अकल्याणकारी -- ते झाकुन ठेवलेले बरे.
असं म्हणायच आहे का ?
पण ह्याला सापेक्षते चा नियम लागू होतो.
तुम्ही तुमच्या दृष्टीकोनातून सोय, कल्याण इ बघणार.
बाकीचे त्यांच्या दृष्टीकोनातून बघणार ..
मग नीती, नियम, न्याय -- कशालाच अर्थ राहणार नाही.
किंवा " बळी तो कान पिळी " -- हाच कायदा होईल.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
You have made an assumption
You have made an assumption here that self-welfare and public welfare are always intrinsically antagonistic.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सत्याचा शोध जगायला पुरेसा
सत्याचा शोध जगायला पुरेसा नाही म्हणून सत्य हे मूल्यच कचर्यात टाकू अशी मिलिटंट मांडणी आहे ही. जर काही करून जगल्याशी मतलब आहे तर बाकी कल्याण बिल्याण तरी कशाला पाहिजे? आहारनिद्राभयमैथुनादि सहजप्रेरणांच्या आधारे कोट्यवधी वर्षे कैक प्राणी आणि लाखभर वर्षांपासून माणूस हे जगत आलेलेच आहेत. सबब, त्या तथाकथित कल्याणाची काय एवढी मातब्बरी लागून गेलीय? आणि सर्वांचे भले व्हावे म्हणजे नक्की कुणाचे? माण्साचे भले झाले तर किडामुंगी, गायी, कोंबड्या, बोकड, इ. चे भले होत नाही. हे समर्थनीय का असावे याबद्दल लेखक काहीच बोलत नाही. तेव्हा या मांडणीत बराच तार्किक घोळ आहे. सध्याच्या परिस्थितीतला प्रॉब्लेम दाखवण्याच्या अभिनिवेशी थाटात लेखक बाकीचे विसरलेला दिसतो. अर्थात तेही "सत्य यूसलेस" या मांडणीला धरून आहे म्हणा, पण मग कल्याण म्हणजे काय, ते कुणाचे, ते का समर्थनीय असावे याबद्दल काहीच हातात येत नसेल तर लोकांचे तथाकथित कल्याण या मांडणीत आहे हे कशावरून?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+११११
अगदी सहमत. असेच काहीसे लिहिण्यासाठी ऐसी उघडले तो तुमचा हा प्रतिसाद.
१)मिलिटन्ट मांडणी.
२)सत्य आणि कल्याण म्हणजे नेमके काय या विषयी गोंधळ.
३)सत्याचे आणि कल्याणाचे उगीचच लावून दिलेले लगीन. आणि त्यामुळे पुढे उगीचच लावून दिलेले भांडण.
४)आपणच मांडलेल्या थिअऱ्या, केलेली बिन्धास्त आणि बेफाट विधाने. सत्यवादी लोकांना विश्वाचं संपूर्ण ज्ञान हवं आहे,आता कायद्याच्या बाजूनं विज्ञान आहे,.समजात दोन वर्ग आहेत. या सत्यवाद्यांच्या जवळचा आणि लाभार्थी. खूप पावरफूल. सत्ताधारी. दुसरा आहे कल्याणवाद्यांचा. निर्बल. दुर्लक्षित. आपलं सरकार देखील तोंडदेखलं कल्याणवादी आहे. त्याची जास्तीत जास्त संसाधनं सत्यवाद्यांच्या सेवेतच जातात. ,सध्याला सत्य आणि कल्याण या संकल्पनांचं द्वंद्व चालू आहे इ. इ. काहीही.
कल्याणकारी राज्य म्हणजे वेल्फेअर स्टेट्. या वेल्फेर स्टेट्ला तर आता सडकून विरोध होतो आहे.
एकंदरीत लेख त्रागात्मक वाटला.
सत्य आणि कल्याण म्हणजे
I thought the words have some pre-existing meaning.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>२)सत्य आणि कल्याण म्हणजे
>>२)सत्य आणि कल्याण म्हणजे नेमके काय या विषयी गोंधळ.>>
गोंधळ नाही. बरीच उदाहरणे ,खटले न्यायप्रविष्ट आहेत.त्यांवर बोलता येत नाही परंतू वीसबावीस वर्षे जो न्याय रेंगाळत कीस पडतोय ते पाहून जनता हेच म्हणेल.
मग काय करायचं म्हणता?
मग काय करायचं म्हणता? तो दोष कोर्टाच्या ब्रीदवाक्याचा की व्यवस्थापनातील त्रुटींचा?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Militant logic? Ha ha ha.
Militant logic? Ha ha ha.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ऑ अच्चं जालं तल
ऑ अच्चं जालं तल
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कोर्ट कसं चालतं /चालवावं
कोर्ट कसं चालतं /चालवावं वगैरे ठरवणारे आणखी दुसरे कोणी आहे प्रत्येक देशात. अजोंचा मागचा धागा लॅाजिक घ्या. चौकट मोडून कोर्ट बाहेर येऊ शकत नाही हे पटतय का तुम्हाला?
'जयते' की 'जयति'?
खरे तर 'जि - जयति' हा धातु संस्कृतात परस्मैपदी आहे. तर मग 'जयते' हे अशुद्ध रूप ब्रीदवाक्यात कसे स्वीकारले गेले?
असे सांगतात की 'जयते' हे रूप 'सत्यमेव जयते' या ब्रीदवाक्यापुरते शुद्ध मानले जावे असे विधेयक संसदेमध्ये मंजूर केले गेले.
या विषयी कुणाला अधिक माहिती आहे का?
१. धातू नक्की परस्मैपदी
१. धातू नक्की परस्मैपदी आहे की उभयपदी?
२. सत्यमेव जयते हे वाक्य मूळ मुण्डकोपनिषदातील, अर्थात आर्ष आहे. आर्षवाल्यांना सगळं माफ असतं. त्याकरिता विधेयकाची गरज नाही. पाणिनिपूर्व संस्कृतात सगळेच पाणिनीय नियम पाळले जात नाहीत हे तर आपल्याला ठाऊक आहेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
परस्मैपदीच.
मुण्डकोपनिषदात असले तरी ते इतर संस्कृत साहित्यात भरपूर वापरले गेले आहे. अभिजात संस्कृतातल्या 'स जयति सिंधुरवदनो देव:' या प्रमाणे. तर इतरत्र हे रूप 'जयति' असेच वापरावे, फक्त या ब्रीदवाक्याचा अपवाद करावा असे काहीसे ते विधेयक होते. साधारण १९५२-१९६० दरम्यान हे घडल्याचे ऐकले आहे. 'ईम्प्रॉपर यूज़् ऑव्ह नॅशनल एम्ब्लेम़्ज्' असा काही प्रोटोकॉल आहे, त्या संदर्भात.
माहितीकरिता धन्यवाद, प
माहितीकरिता धन्यवाद, परंतु परंपरेने आर्षप्रयोग हे लेजिटिमेट अपवाद म्हणून गणले जातातच की संस्कृत व्याकरणात. पाणिनि काहीतरी नियम करणार, पण वेदउपनिषदात त्यापेक्षा काही वेगळे रूप असणार अशी स्थिती कैकवेळेस येते. तेव्हा मग वेदउपनिषदातली रूपे आर्ष म्हणून सोडून दिली जातात. त्याकरिता विधेयक वगैरे करायची काहीही गरज आहे असे आजिबात वाटत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आर्ष म्हणजे नक्की काय्? म
आर्ष म्हणजे नक्की काय्? मराठी व्यंकटेश स्तोत्रात "आर्ष हा भावार्थ माझा ...." अशी काहीतरी ओळ येते.
कुंतीचा तो कौंतेय तसा ऋषींचा
कुंतीचा तो कौंतेय तसा ऋषींचा तो आर्ष. पाणिनीपूर्व संस्कृतातले काहीही इरेग्युलर असले तरी ते आर्ष आहे म्हणून चालतंय असं मानतात कारण पाणिनिपूर्व संस्कृतातले ग्रंथ तुलनेने थोडे आणि धार्मिक आहेत, उदा. वेदसंहिता, काही उपनिषदे आणि ब्राह्मणे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद्.
धन्यवाद्.
चर्चा झाली होती.
https://groups.google.com/forum/#!topic/alt.language.hindi/cCZSMsERcNk
जरी बहुतेक मान्यवरांचे मत 'जयते'च्या बाजूनेच पडले होते, (उपनिषदातील वाक्य बदलू नये या कारणाने,) तरी राष्ट्रीय बोधवाक्यासंबंधी कोणतीही शंका राहू नये म्हणून एक बिल पास केले गेले होते हे नक्की. मला ज्यांच्याकडून कळले ते वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध संस्कृतज्ञ होते. त्यांना जाऊन बरीच वर्षे झाली.
सत्यमेव जयते
'सत्यमेव जयते' हे विधान मुण्डकोपनिषद ३.१.६ येथे असे येते:
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥ ६ ॥
ह्याचा इंग्रजीमध्ये अर्थ आणि त्यावरील शंकराचार्यांची टीका अशी आहे:
वाक्य मुण्डकोपनिषदातून उचललेले असल्याने तो आर्ष प्रयोग आहे आणि म्हणून पाणिनि व्याकरणाबाहेर आहे.
हे सर्व आहेच
हे सर्व विकीवर आहे, दुसऱ्या संस्थळावर उद्धृत झालेले आहे, मुंडक उपनिषद आहे, वेदाङग (अथर्व वेद) आहे, त्यात सत्यमेव जयते आहे, ते आर्ष आहे, पाणिनीबाह्य आहे, हे सर्व आहे. माझी माहिती अशी होती की हे सर्व असतानाही 'जयते'च्या शुद्धाशुद्धतेविषयी चर्चा झाली होती आणि भविष्यात कसलाच वाद, आक्षेप उद्भवू नये म्हणून संसदमध्ये त्या अर्थाचा ठराव पसार केला गेला होता.
मिळेल, माहिती मिळेल, थोडा वेळ लागेल इतकेच.
वेदांची भाषा ही अभिजात
वेदांची भाषा ही अभिजात (पाणिन्युत्तर) संस्कृताची आदि भाषा आहे. म्हणजे वेदवेदांगांच्या भाषेत बदल होत होत आणि कदाचित प्राकृताशी देवाणघेवाण होत होत अभिजात संस्कृत जन्मली. वेदांतल्या संस्कृताचे व्याकरण, धातुरूपे ही अभिजात संस्कृताहून वेगळी आहेत. त्यांना पुढील काळातल्या पाणिनीचे नियम लागू होत नाहीत. वेद हे ऋषींना स्फुरले असे मानतात. ऋषींपासून निघालेले ते आर्ष. ऋतु पासून आर्तव, रूजु पासून आर्जव, पृथापासून पार्थ तसे. Rishi असा शब्द विकीवर पाहिल्यास बरीच माहिती मिळेल.
क्षमायाचनेसहित क्षीण विनोदी विरंगुळा
आरारंभी (आर-आरंभी) शब्दांसाठी असे (मेडप) मूळशब्द बनवायला फार मजा येईल.
आरंभ याचा मूळ शब्द ऋंभ, आरस्पानी याचा मूळ शब्द ऋस्पानी, आरपार चा मूळ शब्द ऋपार असलं कायतरी. तसं 'आर' या भाषेचं मूळ ऋ ... घ्या, वेदों में तंत्रज्ञानही सापडलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आरं तिच्या! असं आहे होय!
आर्तिच्या-> (पुढे अज्ञानी लोकांनी केला अपभ्रंश) आरं तिच्या.. हे ही त्यातलंच काय?
-Nile
नको नको
आरतीला वाईट वाटेल.
...
आर. डी. बर्मन यांच्या तीर्थरूपांचे नाव ऋ. डी. बर्मन होते, हे नव्यानेच कळले.
उपक्रम
यावरून उपक्रमावरची शैथिल्य वरून सुरु झालेली थैल्लर्य, मौर्ख्य, सौकर्य वगैरे चर्चा आठवली.
तारा हो तारा
मी त्याच प्रेरणेला जागून हा विचार लिहिला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा काय सगळा गोंधळ माजवलाय आर
हा काय सगळा गोंधळ माजवलाय आर आणि ॠचा? आर्डर, आर्डर! (प्रख्यात न्यायाधीश श्री. ॠडर यांचा शब्द)
आर्ची कुणाची?
आर्ची कुणाची?
आय आर्
आमच्या इथे आय आर शहा नावाचे गुजराती गृहस्थ राहात असत. त्यांना पाहून तमाम मराठी लोक जणू काही मोट्ठा कूट जोक केल्याच्या थाटात म्हणत , ह्या गुज्जूंना इंग्लिशमधून साधं स्वत:चं नावसुद्धा नीट सांगता येत नाही.
काय पोर्कट जोक तरी.
काय पोर्कट जोक तरी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ते
वाय्. आय. पटेल
दॅट्स योर प्रॉब्लेम!
सारखाच जोक आहे हा.
खर्रे खुर्रे
खर्रे खुर्रे ऊर्फ सत्य जोक असेच असतात. पोरकट. मुळात सत्य हे पोरकटच असते. मराठी सत्य त्याहूनही पोरकट असते. हे विधान अजोना आवडेल बहुतेक. (हे शहा आमच्या येथे राहात होते हे सत्य आहे. पण हे मला समजलेले/भावलेले/ सत्य इतरांना पटेलच असे नाही. या वरून सत्यासंबंधी काही निष्कर्ष काढायला मदत होण्यासारखी आहे.)
हुश्श्श्य. आणली एकदाची हरदासाची कथा मूळ पदावर.
सॉलिड मस्त्. म्हणुन मी तुम
सॉलिड मस्त्. म्हणुन मी तुमची फॅन आहे छान हॅन्डल करता तुम्ही.
कसचं कसचं
पण आभार. तुमचे निर्व्याज लेखन आवडते.
आं?
सत्य पोरकट असते म्हणजे काय नेमके?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अजो, धावा.
ते तुम्ही अजोंना विचारा. त्यांना सत्याची परिभाषा, परिमिती वगैरे नाना परींची माहिती आहे.
लोलवा
लोलवा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सत्य पोरकट असते म्हणजे
उदा. श्वासोत्स्वास करताना माणूस प्राणवायू आत घेतो व इतर वायू बाहेर टाकतो - हे पोरकट पणाचे आहे.
आणखी - पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे पोरकटपणाचे आहे. म्हंजे पृथ्वी पोरकटपणा करते.
(No subject)
द सन डज हॅव अ रिलेटिव
द सन डज हॅव अ रिलेटिव व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हुश्श.
बरं झालं तुम्ही आलात. धाग्याची पार टी-ट्वेंटी करून टाकली होती लोकाल्नी.
आता जरा टेस्ट क्रिकेट होऊन जाऊ देत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
द सन डज हॅव अ रिलेटिव
हे सत्य असल्यास तो सूर्याचा पोरकटपणा आहे. आणि पृथ्वीचा सुद्धा.
खरा पोरकटपणा तुझा भांडव
खरा पोरकटपणा तुझा भांडवलवाद. खरा बाळकटपणा तुझं ते कागदी कौरड्य. खरा अर्भकपणा तुझा विमुक्ततावाद्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो चे अस्तित्व् हे सत्य आहे
अजो चे अस्तित्व् हे सत्य आहे. सत्य हे पोरकटपणा असते. व म्हणून्....
पृथ्वी
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे पोरकटपणाचे आहे.
त्यापेक्षा, ती स्वत्:भोवती, 'गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या' करते, ते पोरकटपणाचे आहे.
आई ग्ग! चो च्वीट्!!!
आई ग्ग! चो च्वीट्!!!
जुना जमाना आणि उदगीर हे ज
जुना जमाना आणि उदगीर हे जगातले महापोरकट प्रकार आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जुना जमाना आणि उदगीर हे ज
जुना जमाना हे महासत्य होते व उद्गीर हे महासत्य आहे. सत्य हे पोरकट असते. तेव्हा ....
मिरज, पम मुर्दाबाद, उदगीर
मिरज, पम मुर्दाबाद, उदगीर लातूर जिंदाबाद!!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे पम काय असतं अजो ?
हे पम काय असतं अजो ?
पश्चिम महाराष्ट्र.
पश्चिम महाराष्ट्र.