Skip to main content

बखर....कोरोनाची (भाग ३)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

Police & horsepower
(समाजप्रबोधन करताना पोलीस)

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)

तिरशिंगराव Mon, 20/04/2020 - 07:29

कोरोना प्रसार रोखण्यांत अपयश येऊ लागल्याने २० एप्रिल २०२० पासून संपूर्ण पुणे सील केले आहे. या संदर्भात आजचा लोकसत्ताचा अग्रलेख बोलका आहे. उद्योगांना अंशत: परवानगी देताना त्यांच्यावर इतक्या जाचक अटी टाकल्या तर कोणीही उद्योजक चालू करणार नाही. रोगापेक्षा उपाय भयंकर असा प्रकार होऊ पहात आहे. लॉकडाऊन किती दिवस चालू ठेवणार, त्याचेही काही तारतम्य असले पाहिजे. फक्त सकाळी १० ते १२ यावेळेतच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी ठेवणे म्हणजे गर्दी आणि रांगांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे.

Rajesh188 Mon, 20/04/2020 - 08:06

पूर्णतः अपरिचित अशा संसर्ग जन्य रोगाला अटकाव करण्यासाठी lockdown व्यतिरिक्त खालील दोन खात्रीशीर उपाय आहे त.
.
१) corono नी बाधित व्यक्तीला corona badhit व्यक्ती न म्हणता फ्ल्यू बाधित म्हणावे.
२) कोणाचीच टेस्ट करू नये
एक पण बाधित व्यक्ती अस्तित्वात च येणार नाही.
ह्या दोन उपाय व्यतिरिक्त दुसरा खात्रीशीर कोणताच उपाय नाही.
कोणाकडे असेल तर जगाच्या कल्याना साठी आता तोंड ughdave आणि जगाला उपकृत करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/04/2020 - 00:23

कच्च्या तेलाच्या किंमती शून्याच्या खाली गेल्या आहेत. पहिल्यांदाच कोणतं चलन ते महत्त्वाचं नाही, असं वाटलं!

Oil crashes 301% to -$36.73 a barrel

Rajesh188 Tue, 21/04/2020 - 08:21

आज तेल उत्पादक कंपन्यांनी जी अवस्था आहे तशी अवस्था शेतकऱ्याची वर्षातून बारा ही महिने कृत्रिम पने केली जाते आणि त्याला देशोधडीला लावले जाते.

Corona ni ti अवस्था कशी असते हे तेल उत्पादक,आणि बाकी सर्वच उत्पादक कंपन्यांना ना करून दिली आहे.
धन्यवाद carona

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/04/2020 - 20:03

In reply to by Rajesh188

ह्यातून कोणी देशोधडीला लागलेच तर फक्त भूमीहीन मजूर, गरीब लोकच! श्रीमंत माणसं आणि कंपन्यांचे नफे कमी होतील एवढंच!

१४टॅन Wed, 22/04/2020 - 20:53

स्थळ: मुंबईतील नवसधन उपनगर. ठाणे, पालघर, नवी मुंबई नव्हे, मुंबईच. दहिसर-कुलाबा-मानखुर्द-मुलुंड ह्या सीमारेषा असलेली.
काळ: मार्चचे शेवटचे आठवडे, एप्रिलचे पहिले आठवडे

ते थाळ्या वाजवणे आणि दिवे लावणे ह्याच कालखंडात झालं वाट्टं. पब्लिकने (आमच्या इथे नाही, पण) मनसोक्त आचरटपणा करून घेतला. व्हिडू खूप पाहिले इन्स्टा-फेबुवर. लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढण्याची घोषणा झाली.

खरं सांगायचं तर लोकांचा सिरीअसनेस आताशा कमी झालेला वाटतो. मी राहतो तिथे अर्धे लोक हे प्लंबर, इलेक्ट्रिशीअन, नर्स इ. असल्याने इसेन्शिअलांत येतात आणि त्यांची येजा सर्रास सुरू आहे. नाही तरी बाकी पब्लिकही बिन्धास्त फिरतं आहे. आमच्या सोसायटीतील एक मुलगी दगडाने सोसायटीच्या मेन डोअरचं कुलूप तोडून पळाली. पळाली मध्ये तसा काही अर्थ नाही म्हणा, कारण पहाटे परत आली. बाप घरात घेईना. 'कोरोना घेऊन आली असंल' म्हणे. शेवटी चांगला ३-४ तास तमाशा होऊन आटपल्यावर गेली घरात.

रस्ते सुनसानच आहेत, पण माझ्या घरासमोर एक सर्व्हिस रोड आहे. ह्यावर पब्लिक सर्रास फिरतं. गल्लीत राहणार अशिक्षित आणि/किंवा बेरोजगार पब्लिक अख्खा वेळ जे बाहेर असतं ते परत बाहेर दिसू लागलेलं आहे. मास्क जे १००% लोक वापरायचे ते आता ८०% वर आले आहेत. पण बाहेर मुख्य रस्त्यावर फिरायची अजूनही कोणाची हिंमत नाही. मात्र समोर पब्लिक सर्रास फिरू लागलं आहे. पोलीसही ह्या सर्व्हिस रोडवर बागडणाऱ्या वासरांस हाकलण्याची तसदी घेत नाहीत.

लोक मात्र अडाणी आहेत. मास्क हनुवटीला लावून फिरतात. मास्क खाली करून सर्रास थुंकतात, शिंकरतात. एक पोलीस एके दिवशी माझ्या घरासमोर मास्क खाली करून थुंकणारच होता. मी घरातूनच खुनशी नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने ती इच्छा आवरली. अर्थात त्याने ती पुढे ३ यार्डावर पूर्ण केली असणारच ह्यात शंका नाही. दुसऱ्या दिवशी (त्या मुलीच्या प्रकरणामुळे) पोलिसांची दुसरी गाडी आली. तिच्यातला पोलीस बिंधास्त मास्क खाली करून रस्त्यावर पिंकप्रकोप करता जाहला.

ह्या देशाचं काही खरं नाही.

Rajesh188 Thu, 23/04/2020 - 00:20

काही शंका मनात निर्माण होत आहेत पण त्याची उत्तर मिळाली नाहीत.
चीन मध्ये एका व्यक्तीस corona chi lagan झाली आणि हा व्हायरस प्राण्यांच्या मार्फत माणसाकडे आला .
हे कोणत्या प्रकारे घडते?
Corona virus ha नवखा असल्या मुळे सुरवातीला हा व्हायरस माहीतच नसलं पाहिजे.
लक्षण सामान्य फ्ल्यू ची असल्या मुळे फ्ल्यू च आहे असं ग्रह झाला असला पाहिजे.
पण फ्ल्यू ची औषध देवून सुद्धा बरा होत नाही म्हणून हा नवीन व्हायरस आहे ही शंका आली असणार.

मग हा व्हायरस मानवी शरीरात उपस्थित आहे की नाही हे कोणत्या टेस्ट मार्फत कन्फर्म केले जाते आणि ती पद्धत सदोष नाही ना?

बाधित व्यक्तीच्या संपर्कात आठ फुटाच्या परिघात आलेल्या व्यक्तीला बाधा होत आहे ह्याची जाणीव झाल्या नंतर चीन नी योग्य काळजी घेतली होती
हे बातम्या वरून वाटत.
मग हा व्हायरस वुहान मध्ये आणि तेथून जगात कसा पसरला?,
आज जगात अठरा एकोणीस लाख लोक बाधित आहेत ती सर्व बाधित लोकांच्या आठ फूट परिघाच्या अंतरावर संपर्कात आले होते
हे पूर्ण सत्य असेल का?
उपचार नाही तर बाधित लोक फक्त प्रतिकार शक्तीच्या जोरावर च बरी होत आहेत का .
की अजुन वेगळी करणे सुद्धा आहेत.

साती Thu, 23/04/2020 - 07:02

जगभरात करोनाची साथ पसरू लागली तशी भारतात त्या साथीशी लढा द्यायला सरकारी रूग्णालये सज्ज होऊ लागली. एकेक वाॅर्ड करोनााठी राखीव ठेवण्यात येऊ लागला.

आमच्या जिल्ह्यातही BRIMS या वैद्यकीय महाविद्यालयात अशी तयारी सुरू झाली. पल्मोनाॅलाॅजी डिपार्टमेंटवर या वार्डची जबाबदारी देण्यात आली. डाॅ. योगेश म्हणजे माझे अहो पल्मोनाॅलाॅजीचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्यावर आता फ्रंटलाईन वाॅरियरची जबाबदारी आली.

तरीही हा आजार एवढा भयंकर निघेल आणि आपल्या अगदी दारात येईल असे तेव्हा वाटले नव्हते. भारतात हा आजार हळूहळू पसरू लागला तरी बंगळुरू या राजधानीच्या शहरापासून ५०० किमीहून दूर असलेल्या, नुकताच एक छोटासा विमानतळ सुरू झालेला असला तरी बंगळुरू सोडून कुठेही विमानसेवा नसलेल्या आमच्या जिल्ह्यात करोना येईल असे वाटत नव्हते.

अचानक एक दिवशी दिल्लीतले निजामुद्दीन प्रकरण गाजू लागले. इकडेही २१ जमाती लोक करोना सस्पेक्ट म्हणून दाखल करण्यात आले आणि त्यातले दहाजण पाॅजिटीव निघाले. यानंतर मात्र एकच गडबड सुरू झाली. दिवसरात्र केवळ करोना , प्रायमरी काॅंटॅक्टस, सेकंडरी काॅंटॅक्टस, आयसोलेशन , क्वारंटाईन असेच शब्द ऐकू येऊ लागले. एका वाॅर्डऐवजी अख्खे हाॅस्पिटल करोनासाठी राखीव झाले.

शहरात एकच मुख्य हाॅटस्पाॅट होता, आमच्या बिदर शहरातला जुना भाग ज्याला ओल्ड सिटी म्हटले जाते. हा भाग मुख्य शहरापासून वेगळा करण्यात आला. जिल्हा प्रशासन तत्पर असले की किती चांगले काम होऊ शकते हे या निमित्ताने दिसले. खूप खोलपर्यंत काॅंटॅक्टसची तपासणी झाली. यामुळे सहा रूग्ण अजून सापडले.

या सापडलेल्या रुग्णांची जबाबदारी योगेशवर होती. यात काही अत्यवस्थही होते. अचानक सरकारी रुग्णालयात येऊन ॲडमिट करून ठेवल्याने बरेच संभ्रमाचे वतावरण बिचाऱ्या रुग्णांमध्येही होते. त्यात वेगवेगळ्या अफवा पसरत, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही घाबरून जात.

अशा सगळ्या रुग्णांना दिलासा देणे, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना उपचारांसाठी शारीरिक आणि मानसिकरीत्याही तयार करणे ही एक वेगळीच जबाबदारीही योगेश आणि त्यांच्या टीमवर होती. मात्र सुरुवातीचे एक दोन दिवस सोडल्यास या रुग्णांचा विश्वास आमच्या टीमने जिंकला. जे काही चाललंय ते आपल्याआणि आपल्या नातेवाईकांच्या भल्यासाठीच हे त्यांच्याही लक्षात आलं. दिवसरात्र, तहान भुकेची पर्वा न करता, आपल्या घरी न जाता, आपल्या बायकोमुलांपासून लांब राहून रूग्णसेवा करणाऱ्या या टीमवर रुग्णांचा विश्वास बसत गेला.

आज जवळपास तीन आठवड्यांनी, लागोपाठ दोनवेळा करोनाची टेस्ट निगेटीव आलेले नऊ रुग्ण घरी गेले. बाकीचेही बरे झालेत पण त्यांचा दुसरा निगेटीव रिपोर्ट यायचा बाकी आहे.

रुग्णांनी दाखवलेल्या विश्वासाचे आणि धैर्याचे कौतुक करायला त्यांच्या डिसचर्जचा एक खास छोटेखानी कार्यक्रमच जिल्हा प्रशासनाने आयोजित केला होता. सगळ्याच रुग्णांनी आपल्या मनोगतात प्रशासनाचे कौतुकतर केलेच , डाॅक्टरांचे विशेष आभार मानले. कार्यक्रम संपल्यावरही एकेकजण येऊन डाॅक्टराना विशेष दुवा देत होते. यापुढेही आमच्या प्रत्येक प्रार्थनेत तुमच्यासाठी विशेष दुवा मागू म्हणून आश्वासन देत होेते. सुरुवातीस काही चुका गैरसमजातून झाल्य त्याबद्दल माफी मागत होते. स्पेशल ॲंब्युलन्स देऊन रुग्णांना सन्मानाने घरी सोडण्यात आले तो क्षण डाॅक्टरांच्या आयुष्यातलाही एक भाग्याचा क्षण होता.

बिदरकरांनाही आपल्या जिल्हाप्रशासनाबद्दल कौतुकाचा क्षण होता हा. माझ्यासाठी अर्थातच योगेशबद्दलच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा!

फोटोत , ॲडमिट झालेल्यांपैकी सगळ्यात अत्यवस्थ रुग्णाला डिसचार्ज कार्ड देताना डाॅ. योगेश आणि त्यांचे सहकारी डाॅक्टर.

अबापट Thu, 23/04/2020 - 09:13

आज या कोरोना साथी च्या परिस्थितीत या संकटाला संधीत रूपांतरित करू शकतो भारतात परिस्थिती अशी आहे की शेतीवर संशोधन होत आहे पण ते शेतकऱयांपर्यंत पोचत नाही त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्याना मिळत नाही
आज स्थिती अशी आहे की शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळत नाही आणि ग्राहकाला खूप महाग भाव द्यावा लागत आहे पण तो विषय परत घेऊ
आत्ता अशा बातम्या येत आहेत की इथे या शेतकऱ्याने भाव मिळत नाही म्हणून हे पीक नागरून टाकले तिथे पीक बाकर्याना खाऊ घातले .पण या बाबतीत शोध आहेत की काही फलभाजाची द्राक्ष पीक सारखी छाटणी करावी व परत पीक घ्यावे . आत्ता नवीन लागवड करून पीक येण्यास खूप वेळ घेणारी आणि खर्चिक आहे पण छाटणी करून पीक घेतले तर बचत होऊन, ज्यावेळी पीक येईल तेंव्हा भाव पण चांगाला मिळेल.
पण या साठी गरज आहे शोध शेतकऱ्याच्या बांधा वर पोचण्याची मी स्वतः शेतकरी आहे. मला माहित आहे आपला शेतकरी प्रयोग करायला तयार असतो. पण गरज आहे माहिती त्याचा पर्यंत पोहोचण्याची
संकटाचे सोने करूयात .

जय जवान जय किसान
लेखक स्वतः गेली पन्नास वर्षे शास्त्रोक्त पद्धतीने शेती व दुग्ध व्यवसाय करत आहे.

अबापट Thu, 23/04/2020 - 09:56

In reply to by चिमणराव

फुलगाव नावाच्या गावात मोठी शेती व सहाशे म्हशी असलेला गोठा आहे./होता. आत्ताच निवृत्त झाला असावा त्यातून.
शास्त्रोक्त म्हणजे काय मी सांगू शकणार नाही.पण त्याच्याशी गाठ घालून देतो.फोनवर बोलून घ्या हवं तर .
चालले का ?

चिमणराव Thu, 23/04/2020 - 11:50

लेख घ्या त्याच्याकडून एखादा.

-----------
बाकी जनावरं अधिक शेती हे संपूर्ण चक्र आहे त्यामुळे त्याची शेती चांगली चालत असणार यात शंकाण नाही.
इयर बऱ्याच लोकांनी 'फक्त शेती' असा उपक्रम चालू केल्याने जमीन निकस होत गेली. पीक कमी होऊ लागले. शेणखत विकत घेऊन टाकणे हे नफा कमी करणारे आहे.

Rajesh188 Thu, 23/04/2020 - 12:24

शेतीची उत्पादकता हा प्रश्न च नाही ,
शेतकरी कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यात कुठेच कमी पडत नाहीत.
असंख्य संकट येतात .
शेती ही निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग माणसाच्या हातात नाही
कधी अवकाळी पावूस,कधी पाण्याची कमतरता,हवामान बदलामुळे होणारे रोग,वीज.
अशा अनेक प्रतिकूल घटकांना तोंड देवून उत्पादन घेतले जाते.
मूळ प्रश्न बाजारमूल्य नसणे हे आहे.
आणि त्याची कारण कृत्रिम आहेत .
उत्पादक शेतकरी,आणि ग्राहक ह्या दोन्ही घटकांना ह्याचा फटका बसतो .
आणि त्या वर उपाय शोधला जात नाही.
हा प्रश्न सुटला तर शेती नुकसान दायक बिलकुल नाही.
हा प्रश्न पूर्ण जगात आहे.
मध्ये search करून अमेरिकेत ह्या समस्या चे काय कारण आहे ह्याची माहिती घेत होतो त्यांचे विवेचन पटण्यासारखे आहे.
शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही कारण प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थ ना निर्माण केलेली जास्त मागणी.
आणि ही मागणी ठरवून जाहिराती करून निर्माण केली गेली.
प्रक्रिया न केलेले अन्न धान्य ह्यांना मागणी कमी आहे.
आणि प्रक्रिया उद्योग हे मोठ्या उद्योग पतींच्या हातात आहेत त्या मुळे एकाधिकार शाही आहे.
कच्च्या मालाचा दर ते ठरवतात त्यांना हवा तसा आणि ते संघटित क्षेत्र असल्या मुळे गरीब असंघटित शेतकरी त्यांचा प्रतिकार करू शकत नाहीत.
टोमॅटो सॉस,बटाट्याची चिप्स,फ्रेंच फ्राईज,विविध soups che tayar pkt,butter,cheese, bake beans,kiti tari prajriya केले ले पदार्थ सांगता येतील.
गहू चे पीठ कंपन्या विकू लागल्या त्या मुळे गव्हाची विक्री मागणी मंदावली .

खूप उदाहरणे आहेत.
दुसरे महत्त्वाचे कारण बीज निर्मिती जे पहले शेतकरी पारंपरिक पद्धती नी करायचे ती पद्धत नष्ट केली गेली अगदी सरकारी सहभागाने..
त्या मुळे आता शेतकरी बियाण्या साठी ह्या कंपन्या वर अवलंबून राहू लागला ते बी परत वापरता येत नाही .
दुसऱ्या वर्षी नवीन बी घेणे भाग आहे.
इथे पण लूटमार.
एकंदरीत अनेक संस्था,सरकारे,भांडवल दर ह्या सर्वांनी मिळून शेती तोट्यात आणली.
का आणली ?
ह्याचे उत्तर अतिशय त्रास दायक असेल.
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध buisness magzin chya
Cover page var mukesh ambani che chhaya chitr छापले होत नांगर खांद्या वर घेतलेलं .
ते चित्र बरेच बोलके होते

चिंतातुर जंतू Thu, 23/04/2020 - 15:30

निकोटिनमुळे करोनापासून बचाव होतो का हे फ्रेंच संशोधक तपासून पाहताहेत -
French researchers to test nicotine patches on coronavirus patients

“Our cross-sectional study strongly suggests that those who smoke every day are much less likely to develop a symptomatic or severe infection with Sars-CoV-2 compared with the general population,”

चिंतातुर जंतू Fri, 24/04/2020 - 11:10

चाचण्या आणि सर्वेक्षणं करण्यासाठी पााऊल उचला असं शास्त्रज्ञांनी वेळेत सांगूनही सरकारनं दिरंगाई केली असं कोव्हिड-१९ टास्क फोर्समधले लोक सांगताहेत -
‘No Action Has Been Taken’: Frustration In National Covid-19 Task Force

One of the authors of the studies cited above told Article14, on condition of anonymity, that a nationwide lockdown was not the same as quarantine or social isolation. “In Indian conditions such a lockdown provides social isolation for only the rich who live in less dense and high-floor space areas,” he said. “To some degree it can protect them from the spread.”

Rajesh188 Sat, 25/04/2020 - 10:35

In reply to by तिरशिंगराव

चाचणी किट्स सदोष आहेत.
अश्या बातम्या मध्ये आल्या होत्या .
त्या सत्य असतील तर ह्या चाचण्यांना काही किंमत उर्ते का?

अभिरत Sat, 25/04/2020 - 17:57

In reply to by तिरशिंगराव

आणि जगात सर्वात कमी चाचण्या केलेला देशांमध्ये भारताचा समावेश आहे. (प्रति मिलियन हिशोबाने)

Rajesh188 Fri, 24/04/2020 - 11:24

अमेरीका पासून इटली पर्यंत
चीन पासून जपान पर्यंत.
कोणताच प्रगत देश corona pasun वाचला नाही

त्या मध्ये भारत कसा वाचेल
सल्ले देणे वेगळे आणि उपाय योजना करणे वेगळे.
Task force ni सुचवलेल्या उपाय योजना अमलात आणणे भारता सारख्या प्रचंड लोकसंख्या आणि झोपडपट्टी नी कटोकात भरलेल्या देशात शक्य आहे का.
मी पण सूचना करतो सर्वांनी चंद्रा वर जावून राहवे आणि corona pasun सुटका karun ghavi
पण हे शक्य आहे का.
सल्ला देणे हे सर्वात सोप काम आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/04/2020 - 20:19

In reply to by Rajesh188

आजच बातमी आहे, डेनिश शाळा, आस्थापना उघडायला सुरुवात झाली आहे. न्यू झीलंडमधली परिस्थितीही सुधारायला लागली आहे. ह्या दोन्ही देशांनी वेळेतच पावलं उचलली, आस्थापना बंद केल्या, चाचण्या केल्या.

... आणि दोन्ही देश स्त्रिया चालवत आहेत. ट्रंपतात्या आणि आपले परमपूजनीय, प्रातःस्मरणीय नमो ह्यांच्या माचो वक्तव्यांशी तुलना करता, संकटांशी सामना करताना हे सतत आठवत राहतं.

अस्वल Sat, 25/04/2020 - 05:15

इथे (वॉशिंग्टन स्टेट. म्हणजे डी.सी नव्हे, ते वेगळं. असो) मार्चच्या सुरूवातीला बरीच गडबड होती आणि अमेरिकेतली करोना व्हायरसच्या साथीची सुरूवातही इथेच झाल्याने घबराटही होती.
पण मार्च संपेस्तोवर न्यूयॉर्क आणि इतर राज्यांत करोनाचा प्रादुर्भाव दुर्दैवाने भयानकच वाढला आणि मग वॉशिंग्टन स्टेटवाल्यांना समदु:खी राज्यं येऊन मिळाली.
मार्च २० ते एप्रिल २० संपूर्ण घरात राहून काढला. एकदाही घराबाहेर गेलो नाही. अर्थात सुदैवाने अमेरिकेच्या साईझचं घर असल्याने हे शक्य झालं.
ह्या दिवसांत ऑफिसचं काम/ घरचं काम/ मुलीसोबत वेळ - हे सगळं जुळवताना तारांबळ उडली, चिडचिड झाली आणि क्वचित कधीतरी भांडणं.
पण हे सगळं अगदीच मामुली - अडचण वगैरे म्हणता येणार नाही.
.
खाऊन पिऊन सुखी असलेल्या आम्हाला तोशीस लागली नाही- अन्नधान्य वगैरे पुरवठ्याला असल्याने अडचण आली नाही.
उच्च मध्यमवर्गाला खाण्यपिण्याचा किंवा उपासमारीचा त्रास कधी होणार नाहीच, पण नोकरीवर गदा म्हणजे खेळ खलास.
.
पहिली लाट सहज अंगावर घेतल्यानंतर आता पुढलं संकट दिसतं आहे - नोकरी. अस्वलीणबाईंच्या कंपनीत ह्याची सुरूवात झालीये. बऱ्याच लोकांना नारळ देणारेत असं ह्या आठवड्यात कळलं, काहींना आता बिनपगारी रजेवर पाठवतील, काहींना ऐच्छिक सुट्ट्या, कमी दिवसांचे आठवडे वगैरे पर्याय उपलब्ध करून दिले जातील.
ह्या सगळ्याचा विचार करुन रात्री थोडा जीव घाबरा झाला. अतिशय साधंसरळ आणि सुरक्षित जगायची सवय असल्याने हे इतकं मोठं प्रकरण आपल्याला कसं आणि केव्हा खड्ड्यात घालेल काही सांगता येत नाही - असे सगळे विचार डोक्यात येऊन दहीकाला झाला.

माझ्यामते हा दुसरा टप्पा (अर्थव्यवस्थेचा) बऱ्याच लोकांना करोनाच्या हाहा:काराची जाणीव करून देईल. इतका वेळ बाहेर कुठेतरी, हॉस्पिटलांत असणारा करोना आता अर्थव्यवस्थेच्या रूपाने घराघरांत शिरेल.

बघू काय होतं! बचेंगे तो और भी लडेंगे :)

अबापट Sat, 25/04/2020 - 15:53

स्थळ : हिंगणे बुद्रुक अर्थात कर्वेनगर (अर्थात मुख्यतः नवं सपे ,शपे,नापे,शुपे )
आमच्या भागात फारश्या केसेस नाहीत . दोनतीन वस्त्या वगळता बाकी ममव भाग.
चार दिवसांपूर्वीपर्यंत सगळं ठीकठाक चालू होते . म्हणजे फार जास्त कायदा न मोडता लोके ठरल्या वेळी बाहेर पडत . जीवनोपयोगी गोष्टी आणून उर्वरित वेळी सुमडीत घरात किंवा सोसायटीत बसत . उगा जास्त खरेदी नाही आणि उगा जास्त साठेबाजी नाही.
पण चार दिवसांपूर्वी स्ट्रिक्ट कर्फ्यू लागला . म्हणजे मेडिकल दुकाने चालू आणि दहा ते बारा फक्त दूध विक्री चालू . किराणा भाजीपाला पण बंद . कडक मधे . किरकिर झाली थोडी , पण फार नाही.
एकदाच रस्त्यावर गर्दी दिसली . गोसावीवस्ती , कामना वसाहत , नवीन शिवणे वगैरे झोपडपट्टीतील गरीब समुदाय रस्त्यावर अवतरला . मोठ्या प्रमाणात . सगळ्यांकडे एक हॅण्डबील . त्यावर आदरणीय खासदार साहेब , आदरणीय आमचे नवीन इंपोर्टेड आमदार साहेब ( या दोघांचे मोठा साईझ )आणि चार लोकल नगरसेवक यांचे ( छोटा साईझ ) फोटो. कर्तव्यभावनेतून उपर्निदीष्ट मंडळी गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप ( पाच किलो पीठ, साखर तेल डाळी इत्यादी )
त्या एका सभागृहापुढे गर्दी आणि गर्दी . सोशल डिस्टंसिंगला बंदी . मंदीत संधी सगळ्यांची . आणि हे सर्व कॉरोनची साखळी तोडण्यासाठी.

आज किराणा मालाची दुकाने उघडली अन सगळीकडे रांगाच रांगा . अगदी एक गरिबांचे दोराबजी असलेलया , थोड्याश्या हाय फाय , नेहमी रिकामे असणाऱ्या दुकानापुढेही तब्बल एक्कावन्न लोके . रांगेत . एक मीटर अंतर ठेऊन .( मोजली मी ) पोलिसांची गस्त . वगैरे .
पिशव्याच पिशव्या , भरभरून पिशव्या .
विजयोन्मादात फुगलेल्या पिशव्या घेऊन कर्तव्यपूर्तीचे समाधान चेहऱ्यावर नेसून आम्ही सर्वे घरी परत . बाराच्या आत . ( तेवढं एक कैलास जीवन राहिलं आणायचं ) आम्ही खुश.
बरेच दिवस तुंबून राहिलेली इन्व्हेन्टरी मोकळी झाल्याने नाक्यावरचा वाणीही खुश .
तर एकंदरीत हे असे आहे.
आजचे चित्र.

अबापट Sat, 25/04/2020 - 17:28

न्यू जर्सी हुन मिलिंदराव पदकी हे लिहितात की :
हे कार्डावर लिहून खिशात ठेवा आणि दिवसातून चार-पाच वेळा वाचा. घरात एकदोन प्रिंटआउट्स महत्वाच्या जागी लावा. माहिती असणे आणि त्यावर कृती होणे या दोन फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पूर्ण सवय व्हायला अनेक आठवडे लागू शकतात. तुमच्याही मनात इतर स्टेप्स असतीलच, त्याही लिहा. तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्ही एकाच दिवसात अनेक टाइम्सचे अलार्म लावू शकता. हात धुण्यासाठी ते लावा. (रोचक आणि महत्वाचे: अमेरिकेतील प्रसिद्ध मराठी डॉक्टर अतुल गवांडे यांचे "चेकलिस्ट मॅनिफेस्टो" म्हणून गाजलेले पुस्तक आहे (जरूर वाचा!) . त्यात ते लिहितात की एअरलाईन्स आणि बांधकाम-व्यवसायात जवळजवळ १०० टक्के खात्रीशीलता ("reliability") लागते. ती ते अशी साधी "चेकलिस्ट" बनवून साधतात. ही सिस्टीम त्यांनी हार्वर्ड मेडिकल मध्ये लागू केली आणि खात्रीशीलता सत्तर टक्क्यांवरून ९९ + टक्क्यावर पोचली!)
कार्डावरचा मजकूर:
"करोनाविरुद्धचा लढा:
१. आपले हात दिवसातून निदान चार-पाच वेळा साबणाने एक पूर्ण मिनिट धुणे.
२. सार्वजनिक सरफेसेसना हात लावताना प्लास्टिक ग्लोव्ह नक्की घालणे. घरात किंवा ऑफिसात शिरताना तो ग्लोव्ह बाहेरच काढून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे उदा. प्लास्टिक बॅग.असा ग्लोव्ह काढताना त्याच्या बाह्य भागाला उघडा हात लागू न देणे.
3. आपला मोबाईल फोन अल्कोहोल किंवा बाजारातले सॅनिटायझर्स वापरून वारंवार पुसत रहाणे .
४. नाकातोंडाचा मास्क किंवा निदान चेहरा पूर्ण कव्हर करणारा स्कार्फ /रुमाल बांधूनच बाहेर जाणे.
५. नाक , तोंड आणि डोळे यातून मुख्यतः इन्फेक्शन होते. डोळे वारंवार न चोळणे. बाहेर जाताना टाईट गॉगल घालणे.
६. रोज निदान १५ मिनिटे जोरकस, दमविणारा व्यायाम.
७. दररोज पुढील व्हिटॅमिन्स घ्या: व्हिटॅमिन डी (१००० आय यू) , व्हिटॅमिन सी (१००० मिलिग्रॅम, जमल्यास दोन हजार मिलिग्रॅम . यासाठी ५०० मिलिग्रॅमच्या गोळ्या दिवसभरात काही काही तासांनी. तुम्ही वैद्यकीय कर्मचारी असल्यास दिवसाला ६ ग्रॅम ). आणि एक मल्टीव्हिटमिन टॅब्लेट .
८. गर्दीशी संपर्क जमेल तितका टाळणे . शक्यतो घरी राहून काम करणे.
९. अनोळखी व्यक्तीशी बोलताना निदान सहा फूट दूर रहाणे .
१०. डायबेटीस आणि ब्लड प्रेशरवर उत्तम कंट्रोल.
११. दारू आणि ड्रग्स मुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
१२. भाज्या किंवा फळे घेताना विक्रेत्याला ती डायरेक्ट पिशवीत टाकायला सांगणे (किंवा स्वतः ग्लोव्ह्स घालूनच हाताळणे). घरी आणल्यावर ती सॅनिटायझरने धुवूनच वापरणे .
१३. कागदी वर्तमानपत्रे बंद . ऑनलाईन वाचणे.
१४. पत्रे निदान काही तास उन्हात ठेवून मग हात लावणे.
१५. अधिक "नाजूक" व्यक्तींना (७० +, कॅन्सर , फुफुसाचे आजार असणारे) अधिक संरक्षण आणि विलगीकरण देणे.
१६. सर्व मार्गांनी अनावश्यक "ताण" कमी करणे- कामातला आणि कुटंबातला . आसपासच्या व्यक्तींच्या निदान ९० टक्के "त्रासदायक" कृती या सहज माफ करता येतात. अंगात क्षमाशीलता बाळगणे.
xxx

मिलिंदराव पदकी हे ऐसीचे जुने लेखक. त्यांची संक्षिप्त ओळख नवीन वाचकांसाठी. पस्तिसेक वर्षे फार्मा कंपनी मधे संशोधन , (तत्पूर्वी त्याच विषयात शैक्षणीक उच्च पात्रता प्राप्त शिक्षण)
सध्या विविध मानवी आजारांविषयी विस्तृत लेखन करतात.
आपले पुण्याचेच आहेत मूळचे.

प्रभुदेसाई Sat, 25/04/2020 - 19:13

In reply to by अबापट

नमस्कार श्री मिलिंदराव पदकी आणि अमेरिकेतील प्रसिद्ध मराठी डॉक्टर अतुल गवांडे यांना सादर प्रणाम
धारावीतून माझ्या मित्राची शिफारस
आता जरा हे पण वाचा
https://www.rediff.com/news/special/how-can-there-be-social-distancing-…

प्रभुदेसाई Sat, 25/04/2020 - 20:08

In reply to by प्रभुदेसाई

आपण दिलेल्या ह्या लिस्टिकलचे इंग्रजीत भाषांतर करून अमेरिकन ऐसी अक्षरे वर प्रकाशित करावे म्हणजे अमेरिकन लोकांना सुद्धा थोडी अक्कल येईल. व त्यांचा जागतिक विक्रम करायचा उत्साह थोडा कमी होईल.

Rajesh188 Sun, 26/04/2020 - 20:48

खूप दिवस चार भिंतीच्या आत राहून आता मन विचलित होवू लागले आहे.
दूरदर्शन वरचे कार्यक्रम सुद्धा निरस वाटू लागले आहेत.
सुरवातीला जेव्हा टाळेबंदी जाहीर केली त्याची तारीख ३१ मार्च होती तेव्हा ३१ मार्च नंतर सर्व ठीक होईल साखळी तुटेल असा जबरदस्त आत्मविश्वास होता त्या मुळे ते दिवस मजेत गेले १ तारखेला सर्व ठीक होईल असा आशावाद मनाला उभारी देत होता .
नंतर १४ तारखे पर्यंत परत वेळ वाढवला गेला ती पण मुदत संपली आणि मनात संशयाची पाल चूक चूक करू लागली .
संक्रमणा ची साखळी १४ दिवसात तुटते ह्या वरचा विश्वास पूर्ण पने तुटला .
आता तर भविष्यात अंधार वाटत आहे.
साखळी तुटली नाहीच उलट साखळी वाढत च गेली .
ती अशी किती वाढेल ह्या विषयी काहीच अंदाज बांधता येईनासा झाला.
आणि हेच मन दुखी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.
ह्या अंधारात थोडा पण आशेचा प्रकाश दिसत नाही.
रोजच्या बातम्या अजुन धडकी भरवत आहेत.
माणूस विवश होताना आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलं.
बाकी संकट येतात पण त्यांना अंत असतो

आताच्या संकटाला अंत नाही अनंत काळ हे असेच चालेल अशी खात्री होत चालली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 26/04/2020 - 22:52

त्यातही विषाणूसोबत चीनचा उल्लेख आहेच. भारतात मुस्लिमद्वेषासोबत चीनचा दुस्वासही दिसायला लागला आहे का?

'न'वी बाजू Sun, 26/04/2020 - 23:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुस्लिमद्वेषासोबत चीनचा दुस्वासही दिसायला लागला आहे का?

कधी नव्हता?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/04/2020 - 01:55

In reply to by 'न'वी बाजू

तेही खरंच आहे.

आता वर ट्रंपतात्या आणि अमेरिकेची री ओढायचीही संधी आहे.

Rajesh188 Tue, 28/04/2020 - 17:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

देशाच्या विविध भागात मुस्लिम लोकांकडून कायदे पाळले जात नाहीत.
उलट पोलिस न वर हल्ले होत आहेत तरी त्यांच्या वर प्रेम करायचे द्वेष करायचा नाही.
अजब न्याय आहे

तिरशिंगराव Mon, 27/04/2020 - 06:50

चीनचा दुस्वासही दिसायला लागला आहे का?

स्वत:च्या साठवणीवर जगणाऱ्या उच्च आणि मध्यमवर्गीयांना तितकी झळ पोचत नाही. पण ज्यांचा रोजगार बंद झालाय, पुरेसं खायला मिळत नाहीये, जे अडकून पडले आहेत, ज्यांच्या घरातले लोक या रोगाला बळी पडले आहेत, त्यांच्या भावना तीव्र असणारच ना ?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/04/2020 - 19:31

In reply to by तिरशिंगराव

भावना तीव्र असणं अर्थातच समजण्यासारखं आहे.

पण ह्यात चीनला दोषी धरणं कितपत योग्य आहे; चीनला दोष देऊन नक्की काय मिळणार, ह्याचा विचार लोकांनी नाही तरी किमान नेत्यांनी करायला हरकत नाही. अमेरिकेत मोठ्या शहरांत चिनी, कोरियाई, जपानी लोकांना निष्कारण वर्णद्वेषाचा सामना करावा लागत आहे. ह्याच धाग्याच्या पहिल्या भागात मिहिरच्या मैत्रिणीला वंशवादाचा त्रास झाल्याचं त्यानं लिहिलं आहेच.

भारतातही इशान्येच्या लोकांना आधीही वर्णद्वेषाचा त्रास होत होता. आता तो कमी होण्याची चिन्हं नाहीत.

मग चीनचा दुस्वास करून काय मिळवणार?

अभिरत Tue, 28/04/2020 - 10:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

. पण ह्यात चीनला दोषी धरणं कितपत योग्य आहे; चीनला दोष देऊन नक्की काय मिळणार, ह्याचा विचार लोकांनी नाही तरी किमान नेत्यांनी करायला हरकत नाही. .

तुमच्या मते चीनचे वागणे संपूर्णपणे दोषरहित होते का? ही महामारी पसरण्या मध्ये सुरुवातीला चीनचे काहीच योगदान नव्हते का?
"मरणारा मेला, आता संशयितावर खटला चालवून काय मिळणार?" अशा छापाचे युक्तिवाद चीनसारख्या अ-उदारमतवादी व्यवस्थेला प्रोत्साहनपर ठरतात.
असमर्थनीय वांशिक विद्वेष व चिनी सरकारची धोकादायक व बेजबाबदार वागणूक यांची जाणीवपूर्वक केलेली गल्लत योग्य नव्हे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/04/2020 - 19:49

In reply to by अभिरत

चीनला कोणी दोष द्यायचा आणि कसा द्यायचा? आजच ट्रंपतात्यांनी तेल ओतलं आहे; चीननी करोनाग्रस्त देशांना नुकसानभरपाई द्यायची म्हणत. हे होणार आहे का?

गणपतीच्या मूर्तीमधून चीनबद्दल दुस्वास प्रकट करून काही साधणार आहे का? देव म्हणून जी मूर्ती पूजायची त्या मूर्तीमधून राग, दुस्वास प्रकट करणं गणपतीभक्तांना पटतं का? मी देव मानत नाही; पण जे मानते त्यातून दुस्वास प्रकट झालेला मला आवडत नाही.

दुसरं, चीनबद्दलचा राग म्हणून इशान्य भारतीयांवर हल्ले होत आहेत; ह्याबद्दल सामान्य माणसांनी काही संताप व्यक्त करावा असं तुम्हाला वाटत नाही का? हे हल्ले करणारे लोक सामान्यच असतात. कोणत्याही प्रकारे अशा लोकांना उत्तेजन मिळू नये, ह्याबद्दल तुमचं काय मत?

त्याहीपुढे, सध्याची परिस्थिती अशी की चीन परिस्थितीचा फायदा घेऊन जागतिक सत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे. चीनचा दुस्वास करून नक्की काय मिळणार? जळफळाट झाल्यामुळे काही मिळतं असं तुम्हाला वाटतं का? त्याजागी चीनच्या चुका त्यांच्या पदरात टाकून आंतरराष्ट्रीय राजकारणात अधिक फायदा होईल ह्याबद्दल काय मत?

अभिरत Thu, 30/04/2020 - 15:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असमर्थनीय वांशिक विद्वेष व चिनी सरकारची धोकादायक व बेजबाबदार वागणूक यांची जाणीवपूर्वक केलेली गल्लत योग्य नव्हे.

माझा प्रतिसाद वाचला तर मी असमर्थनीय वांशिक विद्वेष लिहिल्याचे स्पष्ट दिसावे. याचा अर्थ ईशान्य भारत काय जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात ते अयोग्यच आहे. पण Xenofobia व racism च्या नावाखाली चीन सरकारची कातडी वाचवण्याचा जो प्रयत्न दिसतो तो मला असमर्थनीय वाटतो.तुम्ही सहमत असालच.

त्याजागी चीनच्या चुका त्यांच्या पदरात टाकून आंतरराष्ट्रीय राजकारणात अधिक फायदा होईल ह्याबद्दल काय मत?

यस्स. याबद्दल सहमती आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारतासाठीही संधीची कवाडे उघडी होतील (म्यानुफ्याक्चरिंग मधे) असे मला वाटते आहे. आपले कर्मदरिद्री सरकार किती पदरात पाडून घेते ते बघायचे.

Rajesh188 Mon, 27/04/2020 - 08:10

हे जसे ऊर्जेचे सूत्र आहे तसे पुरोगामी विचारवंतांचे एक सूत्र आहे.
हिंदू,हिंदुस्तान चा जो व्यक्ती देश वाईट करू इच्छितो.
त्या देशावर , व्यक्ती वर प्रेम करायचे .
आणि जो हिंदू,हिंदुस्थान चा पाठीराखा आहे त्याचा द्वेष करायचा.
चीन नी भारतावर सशस्त्र हल्ला केला,भारतीय राज्य स्व च्या नकाशात दाखवली तरी ,आणीबाणी च्या प्रसंगी सदोष किट्स भारताला दिली, covid १९ जगात पसरवला तरी त्या देशाचा द्वेष करायचा नाही प्रेम करायचे .
कसं शक्य आहे.
पाकिस्तान नी असंख्य वेळा हिंदुस्थान वर कधी उघड कधी लपून हल्ले केले किती तरी लोकांना जिवानिशी मारले तरी त्यांचा द्वेष नाही करायचा प्रेम करायचे.
पुरोगामी मंडळी नी खुशाल हिंदू धर्म ,हिंदू देव देवता,हिंदू संस्कृती ह्याची टिंगल टवाळी करावी तरी पुरोगामी लोकांचा द्वेष न करता त्यांच्या वर प्रेम करावे.
हे कधीच शक्य नाही .
जो पर्यंत समोरचा सुधारत नाही.

अस्वल Mon, 27/04/2020 - 23:30

In reply to by Rajesh188

कुणालातरी ठेचायचं,
कुणाचातरी सतत द्वेष करायचा,
कुणीतरी शत्रू सतत समोर उभा करायचा -
असा कुणीतरी असला की मग फारसं काही करावं लागत नाही.

भारतीय संस्कृतीचे गोडवे गायचे,
आम्ही सहिष्णु म्हणून हात जोडायचे,
अहिंसा वगैरेची आरती करायची -
म्हणजे भारत कसा महान ते नुसतं सांगत रहायचं.

"बोले तैसा चाले त्याची वंदावि पाऊले"
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः"
"अहिंसा परमो धर्म:"
वगैरे रोज पाठ करून मग मुस्लिम, चिनी, मणिपुरी, स्त्रीवादी,
आणि हो- फेवरिट म्हणजे पुरोगामी; ह्यांना सतत शिव्या घालायच्या.
ढोंगीपणासुद्धा लाजेल.
पण मेरा भारत महान म्हणत असं चालू ठेवायचं.

'न'वी बाजू Tue, 28/04/2020 - 07:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त पांढरेच लोक रेसिस्ट/झेनोफोबिक असतात म्हणून कोणी सांगितले?

पुण्यात एखाद्या नायजीरियन (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, इराणी) विद्यार्थ्याला भाड्याचे घर कितपत सहजी मिळू शकते?

(रेसिस्ट सालटीच जर काढायची झाली, तर ऐऱ्यागैऱ्यांची तर सोडाच, परंतु स्वामी विवेकानंदांपासून ते पार महात्मा गांधींपर्यंत व्हाया पु.ल. देशपांडे अशा भल्याभल्यांचीसुद्धा काढता येतील. असो चालायचेच.)

Rajesh188 Tue, 28/04/2020 - 09:06

In reply to by 'न'वी बाजू

आज काल सरकार पासून सामान्य व्यक्ती पर्यंत आदर्श गुणवत्तेचे प्रमाणीकरण करू लागले आहे.
जगात आदर्श गुणवत्ता मुळात कशातच अस्तित्वात नाही आणि कधी नव्हती..
आपले कुटुंब आदर्श नसते जशी आदर्श कुटुंबाची व्याख्या आहे.
वडील कर्तृत्व वान,कोणतेच व्यसन नसलेले,कुटुंब प्रती पामनिक पने बांधील असलेले
मुल कशी असावीत .
सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळवले ली,आई वडिलांवर प्रेम करणारी,आणि चांगली आदर्श वर्तणूक असलेली.
आई पण आदर्श च असावी.
पण अशी कुटुंब समाजात आहेत का प्रतेक कुटुंबाला आदर्श गुणवत्तेची फूट पट्टी लावली तर 100 टक्के कुटुंब बाद होतील .
आदर्श गुणवत्ता अस्तित्वातच नाही.
आपले रक्त दाब 120/80 असावा तो आदर्श आहे पण 24 तास हा रक्तदाब कोणाचाच नसतो.
कारण आदर्श रक्तदाब अस्तित्वातच नाही.
त्या मुळे एकाध्य घटनेकडे बघून एकाद्य देशाचे,धर्माचे मोजमाप करू नका .
कुठे तरी कोणत्या तरी शुल्लक व्यक्ती नी फेसबुक वर गणेश जी चा चीन ला मारताना असलेला फोटो टाकला म्हणून हिंदू सर्व चीन चा द्वेष करत आहेत असे मत बनवता येणार नाही .
मुस्लिम विषयी एकाधी घटना घडली म्हणून मुस्लिम द्वेष होत आहे हे खरे नाही.
तुम्ही लगेच समाजाचं न्याय निवडा करू नका .
एक तर घरात बसून समाज विषयी विशिष्ट मत बनवणे अर्धवट बुध्दी मत्तेचे लक्षण आहे.
तुम्ही समाजाला judge Karu naka .
Tumhi ti क्षमता अजुन प्राप्त केली नाही..
मुंबई मधील झोपपट्टीवासीयांना चे जीवन समजून घेण्यासाठी एक ब्रिटिश कुटुंब झोपपट्टीवासीयांना बरोबर त्याच पद्धतीने महिनाभर राहून नंतर त्यांनी मत व्यक्त केले होते.
घरात ac madhye बसून फक्त समाज माध्यम,आणि प्रसार माध्यम ह्यांच्या जीवावर मत तर बिलकुल बनवू नका.
त्याला सत्याचा वास नसेल.
आपण स्वतः आपले स्वतःचे सकाळ पासून रात्री झोपेपर्यंत चे वागणे कसे होते ह्या विषयी पण विचार करा.
आपण किती तरी वेळा खोटे पना केलेला असतो,
किती वेळा सार्वजनिक ठिकाणी कचरा केलेला असतो.
किती वेळा दुसऱ्याचा द्वेष केलेला असतो .
किती वेळा भेदभाव केलेला असतो .
ह्या मधील प्रतेक गोष्ट एकदा तरी आपण केलेली असते.
डाव्या विचार वांताच्या च्या पोस्ट मध्ये उजव्या विचारांच्या लोकांविषयी द्वेष कटोकोट भरलेला असतो.
त्यांनी द्वेष करू नका हे सांगणे हा मोठा जोक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 28/04/2020 - 22:26

In reply to by 'न'वी बाजू

... पण ह्या तपशिलांमुळे संस्कृती हा confound factor वगळणं सोपं होतं.

'न'वी बाजू Tue, 28/04/2020 - 07:26

In reply to by चिंतातुर जंतू

आज सूर्य पूर्वेला उगवला. पाणी ओलेच होते. कुत्रा माणसाला चावला. आणि याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या.

Rajesh188 Tue, 28/04/2020 - 13:32

प्रकाशाच्या वेगाने प्रवास केल्यास काळ थांबतो असे म्हणतात.
इथे तर वेग पण शून्य आहे आणि काळ पण धिमा झालेला आहे..
दिवस लवकर संपतच नाही.

चिंतातुर जंतू Tue, 28/04/2020 - 15:28

करोनाव्हायरसमुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत १०० आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला आहे.
१७ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात ब्रिटनच्या वृद्धाश्रमांत राहणारे २,००० वृद्ध करोनाव्हायरसमुळे मेले आहेत. (त्याआधीच्या आठवड्यात हा आकडा निम्मा होता.)

अबापट Wed, 29/04/2020 - 14:59

मी ढोले पाटील , पुण्याच्या एका उपनगरात राहतो. मूळचा पुण्याच्या जवळच्या एका गावातील आहे .
मी आपणास कोरोना विषयी काही बोलू इच्छित आहे व ही आजच्या घडीची सत्य परिस्थिती आहे.
आपणास माहिती आहे की कोरोना हा विषाणू संपूर्ण जगामध्ये थैमान घालत आहे . आपल्या देशामध्ये परिस्थिती काही वेगळी नाही आहे . तरी आपण सयंमाने वागून आपल्या देशावरील हे संकट परतवून लावण्यास समर्थ आहोत .
मी कोरोना विषयी आपणास सांगू इच्छितो की कोरोनाचा परिणाम साऱ्या कुटुंबांच्या संसारावरती झाला आहे . सर्व किराणा , भाजीपाला आणि सर्व जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत . या सर्व वस्तू मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीला विकल्या जात आहेत . यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे खूप हाल होत आहेत व जे लोक मुंबई पुणे इथे कामधंदा करत आहेत तरी त्यांना गावी जाता येत नाही . जरी पायपीट करत गावी गेले तरी नातेवाईक ही त्यांना घरात नाहीत . या लोकांना गावाकडचे लोक मंदिरात किंवा शाळेत ठेवतात . त्यांची चाचणी करून घेतली जाते .
मी माझ्या एका नातेवाईकाला फोने केला तर त्याने असे सांगितले ( कि तिथे असा समज पसरला आहे की ) की बाहेरूनयेणाऱ्या व्यक्तीला चार महिने कारावास व ज्यांच्या कडे आले आहेत त्यांनाही शिक्षा भोगावी लागू शकते .
येथे अनेक लोकांचे अन्न पाण्याबाबतीत लोकांचे खूप हाल होत आहेत, त्यामुळे संचारबंदी असल्यामुळे महामार्गाने न जाता शेतातून आडवाटेने , जिकडे वाट मिळेल तिकडे आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत .

चिंतातुर जंतू Wed, 29/04/2020 - 19:12

मोदी सरकारचा मोठा निर्णय: इतर राज्यात अडकलेले विद्यार्थी, कामगारांना जाता येणार घरी

ह्यातून संसर्ग सगळीकडे पसरणार? की मानवतेच्या मुद्द्याला धरून हे योग्य आहे?

चिंतातुर जंतू Thu, 30/04/2020 - 17:18

ह्या अशा वेळीही काही लोकांची विनोदबुद्धी जागी आहे हे पाहून जगाविषयी आशा वाटते -

म्रिन Thu, 30/04/2020 - 17:51

अनेकांचे मानसिक आरोग्य डळमळले आहे असे वाटते, माझेही काहीसे. इतके दिवस घरी राहण्याची, घरकाम सातत्याने करण्याची, घरातल्या व्यक्तींसोबत इतका वेळ काढण्याची, मित्रमैत्रिणींना- सहकाऱ्यांना अजिबात ने भेटण्याची सवय बहुतांश लोकांना नाही. ज्या घरांमध्ये कुटुंबियांचे परस्पर संबंध चांगले आहेत तिथे सगळे बऱ्यापैकी आनंदात आहेत, असा निवांत वेळ घालवता येतोय म्हणून. परंतु जिथे हे संबंध ताणलेले आहेत अथवा त्या टोकावर आहेत तिथे परिस्थिती बिकट आहे. मी सध्या एका स्वयंसेवी संस्थेशी जोडली गेले आहे, त्यामुळे घरेलू कामगार, घरेलू हिंसा, स्त्रियांचे या काळातले प्रश्न या विषयावर देशभरातल्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळत आहे. ती उद्विग्न करणारी आहे. अनेक घरांमध्ये मुलींच्या शाळा अनायासे थांबल्या आहेत तर त्यांच्या लग्नाची बोलणी सुरु आहेत. lockdown उठला की लग्न. अनेकींना शाळेत पुन्हा जाणे मुश्किल वाटते आहे. विशेषतः निमन आर्थिक वर्गात स्त्रियांच्या गरजा खालीच असतात त्या आता या आर्थिक तंगीच्या काळात अधिक कठीण झाल्या आहेत. उदा सॅनिटरी नॅपकिन्स. अनेक महिला संस्थांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. domestic violence of all types वाढला आहे कारण आता मुली-महिलांना घराबाहेर पडताच येत नाही. अनेकांकडे स्वतःचा मोबाइल नाही त्यामुळे तक्रार करता येत नाही. बाहेर पडून कोणाला सांगणे शक्य नाही. अनेक महिलांना गर्भनिरोधके मिळत नाहीयेत. डॉक्टरांकडे जात येत नाहीये कारण गावांमध्ये स्थानिक गुंड किंवा स्वयंघोषित कार्यकर्ते रस्ते बंद करून पहारा देऊन उभे आहेत. घरकामाचा सगळं भर त्यांच्यावर पडतो आहेच अर्थात. हे चित्र बरेचसे ग्रामीण भागातले असले तरी शहरांमध्येही हेच असणार आहे, थोडे कमी प्रमाण असेल इतकेच. घरकाचे उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या अनेक मैत्रिणी सांगतायत की सुरुवातील स्वतःहून भांडी घासणारे, लादी पुसणारे नवरे/मुलगे आता निव्वळ तंगड्या पसरून बसलेले असतात. WFH करणाऱ्या, घरात लहान मूल असणाऱ्या स्त्रियांची अवस्था फार बिकट आहे. त्यांची पोरे तर फार वैतागलेली आहेत आणि त्यांना कसे शांत ठेवावे, याचे उत्तर कठीण आहे. अनेक माणसे आपले आजार अंगावर काढत आहेत, कारण आता बाहेर पडणे शक्यतो टाळायचे आहे. काही जण यातून नीट बरे होतीलही परंतु अनेक तितके सुदैवी नसतील, अशी भीती वाटते. आर्थिक समस्या तर जवळपास प्रत्येकालाच आहेत, त्याबद्दल लिहीत नाही.  

अबापट Sat, 02/05/2020 - 09:53

तीन मध्यम आकाराचे कांदे सुरीने बारीक कापायला घेतो. दोन कांदे कापून झाल्यावर कांदे बारीक कापणे अंधश्रद्धा असते म्हणून तिसरा कांदा परत ठेऊन देतो.
मग गॅसवर कढई ठेवतो.
दोन तीन मिनिटं काडेपेटी शोधतो.
ती मिळाल्यावर दोन तीन काड्या वाया घालवून काडी पेटवतो, पण गॅस काही पेटत नै कारण तो खालून बंद असतो.
गॅस खालून चालू करून परत दोन तीन काड्या वाया घालवून गॅस पेटवतो.
मग तेलाची बाटली शोधायला लागतो.
बाटली लगेच मिळते. तेल कढईत ओततो, ते खूपच पडतं.
तेल परत बाटलीत भरण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो.
कढईतलं तेल तोपर्यंत थोडं तापलेलं असतं.
मग मी चिमटा शोधाय लागतो तो काय काही केल्या मिळत नै.
दोन तीन मिनिटांनी मिळतो, तेव्हा कढईतून बाटलीत तेल ओतण्याचा प्रयत्न सुरू होतो.
कढईतून बाटलीत तेल ओतातना लक्षात येतं की गरम तेल प्लास्टिक बाटलीत ओतू नै शकत.
मग गॅस बंद करून तेल थंड व्हायची वाट बघतो यावेळी एकेक सेकंद पंधरा दिवसाचा लॉकडाऊन असल्या सारखं वाटायला लागतं.
तीन चार मिनिटांनी तेल थोडं थंड झाल्यावर बाटलीत ओतायला घेतो,जेवढं बाटलीत ओतायचं असतं त्यापेक्षा न चुकता जास्त तेल बाटलीच्या बाहेर ओततो.
मग परत गॅस पेटवण्यासाठी अगोदरचे सगळे काडेपेटीचे सोपस्कार न चुकता पूर्ण करतो आणि गॅस पेटवतो.
तेल तापल्यावर कढईत कांदा घालायला घेतो.
दोन तीन फुटावरून तापलेल्या कढईत कांदा मी अलमोस्ट फेकतो त्यात बऱ्यापैकी कांदा खालीच पडतो तो काय परत कढईत् घालण्यासाठी कष्ट घेत नै.
ही सगळी खटाटोप चालू असताना हात थोडा भाजतो,
मग पटकन सिंक खाली हात धरतो, पाण्याच्या फोर्समुळे हातावर पाणी आणि अंगावर पण पाणी आणि कट्टयावर पण पाणी, पाणीच पाणी सगळीकडे.
जास्त पाणी कट्ट्यावर म्हणून तो पुसायला फडकं शोधतो. दोन तीन मिनिटांनी फडकं बाहेरच्या खोलीत सापडतं, बाहेर कोणी नेलं म्हणून मी खूप शिव्या घालतो, एकटाच राहत असल्यामुळे आणि मीच कधीतरी बाहेर नेलं असेल हे कळतं आणि मीच मला शिव्या दील्याचं एक वेगळं समाधान मिळतं.
मग ओट्यावरचं पाणी पुसून घेतो आणि ओलं फडकं वाळवायला न्हाणी घरात ठेऊन येतो.
तिकडून आल्यावर कढईत बघतो तर पांढरा कांदा डार्क चॉकलेटी रंगाचा झालेला असतो.
कांद्यावर थोडं मीठ घालतो, गॅसच्या बाजूलाच मीठ ठेवल्या/राहिल्या मुळे ते लगेच सापडतं.
मग परतणं शोधायला लागतो, यावेळी मला पट्कन् सुचतं की कोणतीही वस्तू दोन,तीन मिनिटं गेल्यावरंच् मिळते. मग मोबाईल वर मी तीन मीनिटांचा टाइमर लावतो आणि गॅस थोडा बारीक करतो, कढईतला कांदा हा डार्क डार्क चॉकलेटी होत असतो.
बरोब्बर तीन मिनिटांनी टाइमर बंद करून आहे त्या ठिकाणाहून ओट्यावर सगळीकडे नजर फिरवतो, लगेच परतणं सापडतं.
मग मी कांदा परतवायला लागतो तेव्हा लक्षात येतं की कढईत चिरलेला कांदा घालताना जो कांद्याचा साईज होता त्यापेक्षा तो आता भाजून अर्धा झालेला आहे, त्यामुळे बारीक कांदा कापायला येत नै याचं जे मगाशी वाईट वाटलेलं त्या गिल्टफील मधून मी आपोआप बाहेर येतो.
या सगळ्या गडबडीत हळद घालायची राहिलेली असते ती घालायला हळदीचं पाकीट शोधतो, तीन मिनिटानंतर ते आपोआप माझ्या हातात येतं.
चिमूटभर हळदीसाठी मी पाकीटंच् डायरेक्ट् उलट करतो चिमूठभर हळद ऐवजी अर्धा मूठ हळद पडते.
परतन्या ने मी हळद बाजूला काढतो तर बराचसा कांदापण कढईतुन बाहेर येतो.
तीन कांदे कापण्या ऐवजी मी दोन कापून शेवटी कढईत अर्धाच कांदा शिल्लक राहिलेला असतोय.
चॉकलेटी रंगाचा कांदा थोडा पिवळा दिसायला लागल्यामुळे मला बरं वाटायला लागतं.
मग मी फ्रिजमधून अंडी आणतो. बाकी दूध सोडून फ्रीजमध्ये काहीच नसल्यामुळे अंडी लगेच सापडतात.
कमीत कमी तीन अंड्यान्ची भुर्जी करायची ठरवलेलं पण कढईतला कांदा बघता एक अंड पण खूप होईल असं वाटायला लागलं.
अर्ध अंड मिळत नै अजून पर्यंत तरी, म्हणून एक फोडायचं ठरवलं आणि फोडलं.
अंड्याचं अर्ध साल अंड्या बरोबर कढईत पडलं अर्ध साल बाजूला ठेवून काढईतलं साल काढायचा प्रयत्न सुरू केला,थोड्यावेळाने त्या साला बरोबर अर्ध अंड पण चिकटून आलं. आणि अर्ध्या कांद्याला अर्ध अंडं हे समीकरण पण व्यवस्थित जुळून आलं आणि "माझी भुर्जी" पण झाली.
#माझेस्वयंपाकघरातलेप्रयोग

उज्ज्वला Sat, 02/05/2020 - 11:49

हसणं तर सोडाच, कीव करण्यापलीकडे आहे. व्यवस्थापन आणि भौतिक व रसायन शास्त्र यातच जगण्याचे प्राथमिक धडे असतात.

अबापट Sat, 02/05/2020 - 13:29

निसर्ग मोठा गुरू

आज आपण या लॉक डाउन मुळे कित्येक गोष्टी नवीन बघत आहोत ज्याची आपण कधी कल्पना पण केली नसेल जसे काही निसर्गाने रिसेट बटन दाबले आहे
हवा पाणी ध्वनी किती शुद्ध झाले आहे
सकाळी सकाळी निरनिराळ्या पक्षाचे कर्णमधुर आवाज ऐकू येतात ते पूर्वी कधी जाणवले पण नव्हते
गंगा यमुना स्वच्छ करायला सरकार लाख करोड रुपये खर्च करते पण काही उपयोग नाही पण तेच लॉक डाउन मुळे सर्व कारखाने बंद धार्मिक कार्यक्रम बंद त्यामुळे कुठलेही प्रदूषण नाही तर सगळ्या नद्या एवढ्या स्वच्छ झाल्या की त्याचे तळ दिसू लागले काय हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल
थोड्या दिवसा पूर्वी टीव्ही वर पाहिले जलांधराहून हिमालय दिसत होता
आज 200 की मी वरून हिमालय दिसत आहे हवा इतकी स्वच्छ झाली आहे
स्वच्छ वातावरण व्यसनाला निर्बंध या मुळे इतर आजारपण कमी झाले आहे
मानवाने यातून धडा घेत शिकायला पाहिजे प्रगती जरूर हवी पण निसर्गाची हनी न करता

Vishwesh athavale

चिंतातुर जंतू Sun, 03/05/2020 - 21:36

अनेक देशांमध्ये करोनाचं परखड वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची गळचेपी सरकारं करत आहेत. अशा १४ देशांतल्या निवडक १७ पत्रकारांना डीडब्ल्यू ह्या जर्मन वृत्तकंपनीनं पुरस्कार दिले आहेत.
DW's Freedom of Speech Award honors journalists persecuted for coronavirus reporting
'द वायर'च्या सिद्धार्थ वरदराजन ह्यांचा त्यात समावेश आहे. संपूर्ण यादी इथे.

Rajesh188 Sun, 03/05/2020 - 21:51

In reply to by चिंतातुर जंतू

The wire विषयी बिलकुल प्रेम किंवा अस्था नाही त्या मुळे वरदराजन आणि त्याला मिळालेला पुरस्कार ह्या विषयी कौतुक नाही.

आदूबाळ Mon, 04/05/2020 - 13:54

(ग्रेटर) लंडन - लॉकडाऊनच्या नोंदी (एप्रिल - मे २०२०)

- वर्क फ्रॉम होमचा सहावा आठवडा. काम कमी होण्याऐवजी वाढतं आहे, कारण ज्यासाठी एखाद्याच्या डेस्कवर जाऊन किंवा हाळी घालून काम होत असे त्याला आता कॉलबिल करायला लागतो. हापिसमधले सगळे या कॉलच्या प्रादुर्भावाने गांजले आहेत. भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती. हल्ली पंचवीस आणि पन्नास मिनिटांचे कॉल ठेवतो, नाहीतर शू करायलाही वेळ राहात नाही.

- जगात सगळीकडे 'लॉकडाऊन' असला तरी व्याख्येत फरक आहे. इथे रस्त्यावर पोलीस वगैरे नाहीत. किराणा आणायला, व्यायाम करायला, आणि वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर जायला परवानगी आहे. तरी ग्रेटर लंडनच्या आमच्या उपनगरवजा खेडेगावात रस्त्यावर कुत्रं नसतं. तरी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तेव्हाच नेमकं लोकांना 'अत्यंत आवश्यक किराणा' आणायची खाज येते हे विनोदी आहे.

- NHSबद्दल सगळीकडे कृतज्ञतेचं वातावरण आहे. एरवी लोक NHS किती भिकार आहे याबद्दल कुरकुर करत असतात, पण या काळात तुटपुंज्या सामग्रीत NHS जो लढा देता आहे त्याबद्दल लोक आभारी आहेत. दर गुरुवारी रात्री आठला बाहेर येऊन टाळ्या, झांजा, क्वचितप्रसंगी फटाकेही वाजवतात. आमच्या फिरायला जायच्या रस्त्यावर खांबाखांबाला Thank You NHS लिहिलेले हस्तलिखित कागद चिकटवले आहेत. N मधून सुरु होणारं आणि S मध्ये संपणारं इंद्रधनुष्य हा मोटिफही वारंवार दिसतो आहे.

- विशेष खराब तोंड असलेला आणि 'मिलवॉल' नामक गुंड फुटबॉल क्लबचा समर्थक असलेला माझा ब्रिट मित्र परवा बोऱ्याबद्दल भरभरून बोलत होता. त्याचा स्वैर अनुवादित गोषवारा असा: "साला * बोऱ्या, लय उडत होता NHSसाठी पैसे द्या म्हणून. बरी अद्दल घडली *ला..." वगैरे.

ऐसीअक्षरे Mon, 04/05/2020 - 14:51

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागाच्या (आय.सी.यू.) संचालिका डॉ. प्राची साठे यांचा 'व्हेन्टिलेटर्स – त्यामागील विज्ञान आणि गैरसमज' हा लेख 'ऐसी अक्षरे'ने यापूर्वीच आपल्या करोना विशेष विभागात समाविष्ट केला आहे. करोनाच्या महासाथीविषयक आरोग्यविषयक इन्साइट्स देणारा त्यांचा एक व्हिडिओ नुकताच उपलब्ध झाला आहे. तो इथे शेअर करत आहोत. यूट्यूब व्हिडिओचा दुवा
सौजन्य : डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES)

चिंतातुर जंतू Mon, 04/05/2020 - 15:12

करोनाव्हायरसचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला इटली हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर यायला सुरुवात झाली आहे त्याविषयीची ही बातमी -
Anger as Italy slowly emerges from long Covid-19 lockdown

एका परकीय टीव्ही चॅनलवर एक इटालियन डॉक्टर याविषयी बोलत होता. त्याचं स्पष्ट म्हणणं असं होतं - निर्बंध सैल केले की पुन्हा संसर्ग वाढणार हे अगदी स्पष्ट आहे. आणि पुढचे काही महिने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या आकड्यांत चढउतार होत राहणार आहे हेही नक्की. सरकारला केवळ एवढीच आशा आहे की आमचा सर्वाधिक रुग्णसंसर्गाचा काळ आता लोटला आहे आणि नव्या केसेस आढळल्या तरी त्या पूर्वीइतक्या नसतील. मात्र, वैद्यकशास्त्राशी संबंधित कोणताही ज्ञानी माणूस अशी खात्री देणार नाही. त्यामुळे आमचा देश आता एक प्रयोग करून पाहतो आहे आणि त्याचे निष्कर्ष कसे येतील त्याकडे आता आमचं सगळ्यांचं लक्ष आहे.

आपल्याकडेही आजपासून निर्बंध सैल केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे रोचक वाटलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 04/05/2020 - 18:54

आष्टिनात शुक्रवारी १ मेला काही प्रमाणात बंधनं शिथील झालीत. मास्क लावण्याची सक्ती काढली आहे! (इथे सनातनी, उजव्यांचं राज्य सरकार आहे.) मी वाण्याचं दुकान वगळता इतरत्र न गेल्यामुळे बाकीचं माहीत नाही.

शनिवारी, आमच्या कॉलनीत लोक नवपरिणीत जोडप्यासाठी गाड्यांमधून फिरत होते. एका गाडीच्या पाठी पत्र्याचे डबे लावले होते; वर गुलाबी फुगे होते; गाडीत गुलाबी टूलचे झगे घातलेल्या, गोल-मख्ख चेहऱ्याच्या दोन अतिलहान मुली होत्या. आणि दोन-चार गाड्या हॉर्न मारत कॉलनीभर फिरत होत्या.

करोनामुळे बिचाऱ्यांना रविवार सोडून शनिवारी लग्न करावं लागलं. केवढे हे क्रौर्य...

'न'वी बाजू Tue, 05/05/2020 - 00:53

In reply to by चिंतातुर जंतू

- तुमच्यात करवल्यांची पद्धत नसते काय?

- लहानपणी वाड्यातल्या / बिल्डिंगीतल्या / कॉलनीतल्या / जेथे कोठे राहात असाल तिथल्या पोरींबरोबर बाहुला-बाहुलीचे लगीन खेळला नाहीत काय कधी? (मग खेळायचात काय नक्की? डॉक्टर-डॉक्टर? की आई-बाबा?)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/05/2020 - 07:11

In reply to by 'न'वी बाजू

जंतू कधी लहान होता, आणि तो खेळायचा ह्यावर विश्वास बसत नाही. काही लोकांचं बालपण नासतं म्हणतात... त्याचं चीज झालं असणार!

तिरशिंगराव Tue, 05/05/2020 - 10:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याचं चीज झालं असणार!

चीज ला चिज म्हटलं तर जास्त फिट बसेल नै ?

'न'वी बाजू Tue, 05/05/2020 - 10:25

In reply to by तिरशिंगराव

अनुच्चारित अनुस्वारांचा नियम काय? ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/05/2020 - 07:10

In reply to by चिंतातुर जंतू

तुमचं म्हणणं मला खोडून काढायचं आहे. पण त्यासाठी पुरेशी विदा माझ्याकडे नाही. मला गाडीत त्या दोन मुलीच दिसल्या. गाडी कदाचित स्वयंचलित असेल, कारण तिथेही मनुष्य दिसला नाही!

अबापट Tue, 05/05/2020 - 12:16

वैयक्तिक मत

(उशिरा चालू केलेला ) पहिला लॉकडाऊन गरजेचा असावा.

(आपल्या कुवतीप्रमाणे ) वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा तयार ठेवण्यासाठी .

आणि ही तयारी होईपर्यंत व्हायरसचा प्रसार अधिक क्षेत्रात होऊ नये म्हणून .

पहिल्या लॉकडाऊन मध्ये सर्व उद्दिष्ट समाधानकारक रीतीने पूर्ण न झाल्यामुळे दुसरा लॉक डाऊन .

ठीके .

पण आता तिसरा लॉकडाऊन अवाजवी वाटतो .

कारण एकतर वैद्यकीय यंत्रणा 'अजून ' सुसज्ज करणे शक्य आहे असे वाटत नाही .शिवाय गेले चाळीस दिवस वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणा ( विशेषतः पोलीस ) कायम ' emergency ' मोड मध्ये आहेत , अगदी युद्धसज्ज अवस्थेत( च्यायला हल्ली फिजिकल युद्धसुद्धा इतके दिवस चालत नाहीत ).

या महत्वाच्या यंत्रणा कायम अशा युद्धसज्ज अवस्थेत sustain करणे अवघड असावे . एखाददिवशी ओझ्याखाली कोसळून नयेत म्हणजे मिळवली . आणि मुख्य म्हणजे कुणी अशा समजात असेल की लॉकडाऊनमुळे यापुढे नवीन बाधित कमी होत जाणार आहेत , तर तो भ्रम आहे.

औषध किंवा लस येईपर्यंत काही लोकं इन्फेक्ट होणार आहेत , कोरोना संबंधित मृत्यू संख्या वाढणार आहे . लॉकडाऊन असो वा नसो .

या वस्तुस्थितीची जाणीव ठेऊनच पुढचे काही महिने काढायचे आहेत .

लॉकडाऊन हळू हळू कमी करत जाण्यात शहाणपण आहे .

( इकॉनॉमी हे कारण मुद्दाम मध्ये आणत नाहीये )

हे वैयक्तिक मत . कृपया यातील flaws दाखवावेत .

चिंतातुर जंतू Tue, 05/05/2020 - 14:16

In reply to by अबापट

पण आता तिसरा लॉकडाऊन अवाजवी वाटतो .

कारण एकतर वैद्यकीय यंत्रणा 'अजून ' सुसज्ज करणे शक्य आहे असे वाटत नाही

लॉकडाऊन वाढवला तरी रुग्ण वाढणार आणि सैल केला तरी वाढणार. मात्र सार्वजनिक वैद्यकीय सेवेवर ताण पडून ती कोलमडून पडेल हा धोका कशात अधिक संभवतो? आणि ती कोलमडू नये ही प्राथमिकता असावी का?

अभिरत Tue, 05/05/2020 - 16:13

In reply to by चिंतातुर जंतू

. मात्र सार्वजनिक वैद्यकीय सेवेवर ताण पडून ती कोलमडून पडेल हा धोका कशात अधिक संभवतो? आणि ती कोलमडू नये ही प्राथमिकता असावी का?

या साथीचा फैलाव पूर्ण 2020 भर कायम राहू शकतो.
इतके वर्ष सार्वजनिक आरोग्य सेवेकडे झालेले अक्षम्य दुर्लक्षाची काही महिन्यांच्या लॉक डाऊनने भरपाई होईल का?
इतके महिनोन्महिने लॉकडाऊन प्रत्यक्षात शक्य आहे का? (विशेषत भारतासारख्या कंगाल देशाला). म्हणजे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडणे ही अपरिहार्यता आहे, केवळ ती आपण आजच्या ऐवजी उद्यावर ढकलतोय.
लोक डाऊन किती काळ हवे याचे निश्चित उत्तर हवे. अन्यथा गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य ही! ( अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था) अशी वेळ यायची.

कासव Tue, 05/05/2020 - 16:52

In reply to by अबापट

विषाणू आत शिरूनही त्याची लक्षणं दरवेळी बाहेर पडू शकत नसतील, शारीरिक अंतर राखण्यात वा तशा सवयींबाबत पुरेशा प्रमाणात अजूनही सार्वत्रिक सजगता आलेली नसेल, चाचण्या घेण्याचं प्रमाण अजूनही पुरेशा प्रमाणात झालेलं नसेल वगैरे तर अशावेळी त्यातल्या त्यात का होईना पण टाळेबंदी हाच चांगला उपाय ठरावा.

मात्र, असं कधीपर्यंत ते नाय सांगता येत.

तिसरी टाळेबंदी खरंच फलदायी की नाही ते कळायला कदाचित अजून काही दिवस लागतील, असा एक आपला कयास.

हिमांशू Tue, 05/05/2020 - 22:53

In reply to by अबापट

सहमत.
जनगणना खात्याच्या अधिकृत संकेत स्थळावर २०१७ सालच्या देशभरातील रोगानिहाय मृत्यूंचे कोष्टक पाहायला मिळते. त्या वर्षात एकूण ६४,२६,५९५ मृत्यू नोंदले आणि त्यापैकी १४,११,०६० एव्हढे मृत्यू डॉक्टरांच्या देखरेखी खाली, रोगाचे कारण नोंदवून झाले. म्हणजे साधारणपणे २२% मृत्यूंची रोगानिहाय नोंद आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रत्यक्ष रोगानिहाय मृत्यू खालील आकडेवारीच्या साडेचार पट असण्याची शक्यता आहे. पण ते बाजूला ठेऊया.

यापैकी श्वास रोगांनी १,२९,६१८ मृत्यू नोंदलेले आहेत. म्हणजे दर दिवशी सरासरी ३५५.

विषाणूंचे बारसे करण्याची आणि रोजचे मृत्यू जाहीर करण्याची रीत २०१७ मध्ये असती तर “viral fever आहे तीन दिवस विश्रांती घ्या” अश्या वैद्यकीय सल्ल्या ऐवजी “एप्रिल महिन्यात ११,००० बळी. श्वसन मार्गाच्या अब्राकाडब्रा विषाणूचा धुमाकूळ. घरात लपून बसा आणि लढा दिल्याबद्दल पंतप्रधानांची शाबासकी मिळवा.” अश्या बातम्या वाचाव्या लागल्या असत्या. २०२० च्या एप्रिल मध्ये कोविड-१९ ने भारतात १०७९ बळी घेतलेले आहेत. हे बळी २०१७ च्या आकडेवारीनुसार अपेक्षितच असलेल्या मृत्यूंच्या शिवायचे आहेत की त्यातच मोजलेले आहेत ते इतर सर्व मृत्यंची आकडेवारी जाहीर झाली तरच कळेल. परंतु ते जास्तीचे असते तरीहि प्रचंड नाहीत हे उघड आहे.

नुसती लागण झाल्याची तर नोंद पूर्वी कुठे ठेवलीच गेलेली नाही. लागणही त्याच प्रमाणात असेल असे आपण फार तर गृहीत धरू शकतो.

आता एक शक्यता अशी धरायला हवी की लॉकडाउन मुळे मृत्यंची संख्या मर्यादित राहिलेली आहे. पण लॉकडाउन उठवल्या शिवाय हे सिद्ध होणारच नाही. आणि तो उठण्याचा निकष गाठण्याकडे वाटचाल होते आहे अशी अजिबातच चिन्हे नाहीत. नजीकच्या भविष्यात लाल क्षेत्र हिरवे होणार नाही हे कुणालाही स्पष्ट दिसेल. हिरवे मात्र नक्की लाल होणार आहेत.

त्यामुळे कोविड-१९ चे मृत्यू एरवीच्या अपेक्षित मृत्युंचाच भाग आहेत अशी “श्रद्धेची उडी” कधीतरी घ्यावीच लागणार आहे.

लशीचे म्हणाल तर साध्या फ्लू च्या लशीचा शॉट भारतात साधारण १७०० रुपयाला मिळतो. तेंव्हा HERD IMMUNITY निर्माण करण्याचा तो मार्ग नव्हे. नजीकच्या भविष्यात तर नक्कीच नव्हे.
सध्या आम्ही फार गर्दी वाढायच्या आधी कुठे infection मिळते का याच्या शोधात आहोत.

सुधीर Thu, 07/05/2020 - 22:31

In reply to by अबापट

(उशिरा चालू केलेला ) पहिला लॉकडाऊन गरजेचा असावा.

लॅक ऑफ "क्लिअर अ‍ॅण्ड ट्रान्सपरन्ट" डिसिजन मेकींग आणि पूअर कम्यूनिकेशनचा नमुना होता. (यावर हा लेख आवर्जून वाचा) जर मेसेज बरोबर पोहोचला असता, प्रिपरेशन साठी योग्य वेळ मिळाला असता तर अनिश्चित/प्रदीर्घ/लांबलेला लॉकडाउनही स्विकारला गेला असता.

वास्तविक टाळी-थाळी वाजवण्याच्या "एक दिवसाच्या कार्यक्रमाच्या" वेळी चार दिवसांनी येणार्‍या अनिश्चित मोठ्या लॉकडाउनची कल्पना देता आली असती म्हणजे लघू उद्योजक, मजूर यांनी आपापली सोय तरी केली असती आणि विनातक्रार अनिश्चित लॉकडाउनलाही हसत हसत सामोरेही गेले असते. (जशी ही बातमी वाचली) भूकेल्या पोटी वणवण झाली नसती. पण दुर्दैवाने त्यांना फक्त चारच तास मिळाले.

एक दिवसाचा कडकडीत लॉकडाउन का पाळतोय हाही मेसेज क्लिअरली पोहोचलाच नाही. अहमदाबाद मध्ये गरबा खेळला गेला, इंदोर मध्ये बाईक रॅली निघाली होती. धारावीसारखी झोपडपट्टी नसतानाही या दोनही शहरांत आज रुग्णसंख्या जास्त आहे. आणि ज्यांना कळले होते, त्यांना एक दिवस पाळून काय होणार आहे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. ना कुठलीही पत्रकार परिषद घेतली गेली त्यांच्या शंकांच्या निरसनासाठी.

गौराक्का Tue, 05/05/2020 - 14:39

होणाऱ्या नौऱ्याला कदाचित जॉईनींग आहे, परदेशातल्या पोर्टा पर्यंत पोचणे शक्य नसल्याने भारतातल्या पोर्टवर साईन इन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा एक मित्र ओडिसाला गेला जॉईनींगसाठी. मुंबई टू ओडिसा रस्त्याने, युनिफॉर्म मध्ये, कुठेही थांबण्याची व्यवस्था नाही. रात्री रस्त्यात गाडीत झोपून कसेबसे पोचले. बाहेर राहण्यात कोरोनाची भितीही आहेच. नैसर्गिक विधी आडोश्याला किंवा जंगलात. युनिफॉर्ममुळे कमी अडवणूक झाली. दोन दिवसाचा डबा होता. नाशकापुढे पाऊस आणि वादळ, ड्रायवर आणि हा दोघेच, येताना ड्रायवर एकटाच येणार. विचार करूनच अंगावर काटा आला. त्याचं पोर्टवर पोचून मग टेस्टींग आहे कोरोनाचं. काल एक पोर्ट सिल केला, साईन इन करणारा कोरोनाग्रस्त निघाला. सोबत बाकीचे चार सुद्धा अडकले, ते क्वारंटीन मध्ये गेले. साईन इनचा फज्जा उडाला ते वेगळं. सरकारने पोर्ट सिल केलं, लोडिंग, अनलोडींगसाठीसुद्धा.

ह्याचं जॉईनिंग कुठे येतं पाहायचं. सोबत द्यायला खूप काही स्कोप नाहीये, आई लाडू देणार आहे. म्हणाला जाताना तुझ्या घरावरून जाईन. पण जास्त थांबू शकत नाही, फिजिकल कॉन्टॅक्ट अजिबात नाही त्यामुळे गळ्यात पडू नकोस. आय कान्ट टेक रिस्क.
दोन दिवस आधी कुलाब्याला कोरोना टेस्ट साठी बोलावलं आहे. ई पास मिळवायला त्याच्या कंपनीला दोन दिवस लागले कुलाब्यापर्यंत जाण्यासाठी. तिथेही युनिफॉर्मवर जायला लागलं. पोर्टजवळ गेल्यावर टेस्ट करून तिथे दोन दिवस राहण्यापेक्षा हे बरय.
सहा महिन्यासाठी जाणार म्हणून आधी टॉयलेटरीज आणल्या होत्या ते सगळं आहे. इनरवेअर नंतर घेईन म्हणून त्याने लांबणीवर टाकलेलं, आता काही शक्यच नाही.

माझे ऑफिस कॉल्स आणि वर्क फ्लो व्यवस्थित सुरू आहे. गेल्या आठवड्यात प्रमोशन्स जाहीर केलीत. कंपनी प्रचंड प्रॉफिटमध्ये आहे.
इफेक्ट फक्त येणाऱ्या प्रमोशनल ॲक्टिविटिझ वर दिसतो आहे. नवीन लाँचींगसुद्धा पोस्टपोन होतात आहेत.
चायना प्लांट सगळ्यात जास्त इफिशयन्सीने काम करत असल्याच्या न्युज येतात आहेत पोर्टलवर.

क्रोमा आणि टाटा क्लिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची डिलिव्हरी डेट दाखवत आहेत. पण कॉल केल्यावर सांगतात की सरकारच्या आदेशानुसार तारिख बदलू शकते. म्हंजे तुम्ही बना मुर्ख, भरा पैसे आणि वाट बघा. त्यापेक्षा ॲमेझोन फ्लिपकार्ट सरळ डिलिवरी नाही म्हणून मोकळे.

चिंतातुर जंतू Tue, 05/05/2020 - 15:29

ताज्या वृत्तानुसार फ्रान्समधला पहिला करोनाचा रुग्ण डिसेंबरमध्येच निघाला होता असं समजतं. रुग्ण कधीच बरा झाला आहे, पण त्याच्या तेव्हाच्या स्वाबची चाचणी आता घेतली गेली आणि तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलं.
Coronavirus: France's first known case 'was in December'

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/05/2020 - 21:04

In reply to by तिरशिंगराव

सध्या जगभर थैमान घालणाऱ्या करोनाची सुरुवात वूहानपासून झाली, हे असिद्ध होत नाही तोवर सध्याचे सिद्धांत अबाधित राहतील; वैद्यकीय सिद्धांतांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणासकट!