बखर....कोरोनाची (भाग ४)
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

दारूच्या दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंग
म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.
ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.
म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात
बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
भारतीय गृहसखी?
घरकामासाठी येणारे सेवक सोसायटीत येऊ द्यावेत का? काम करायला येत नसल्यामुळे आलेल्या अडचणी, काम न करता त्यांना पगार द्यावेत का, असे प्रश्न अनेक सोसायट्यांच्या व्हॉट्सॅप गटांत सध्या चघळले जात आहेत. आता बीबीसीने त्याविषयी लेख प्रकाशित केला आहे :
Coronavirus: How India's lockdown sparked a debate over maids
सेवक ठेवणारे नोकरी करणारे असतील
घरकाम करणारे सेवक ठेवणारे नोकरी करणारे असतील आणि ते घरात बसून किंवा खूपच कमी काम करून सरकार,/कंपनी कडून पगार आणि बाकी सुविधा घेत असतील तर त्यांच्या घरी काम करणाऱ्या सेवकांना सुद्धा काम न करता पगार द्यावा.
आणि खूप मानी असतील फुकटचा पगार किंवा बाकी सुविधा सरकार /कंपनी कडून घेत नसतील तर घरकाम करणाऱ्या सेवकांना सुद्धा पगार देवू नये.
मी एक दृश्य बघितलं आणि दोन प्रश्न लगेच मनात आले.
एक अब्ज पती व्यक्ती त्याच्या सोसायटी च्या आवारात round Marat होता.
वय झालेलं शरीर चालण्यासाठी सुद्धा साथ देत नव्हतं.
आणि त्या श्रीमंत व्यक्तीचं हात त्याच्या गरीब नोकराने थरला होता.
आणि तो गरीब व्यक्तीचं हात च त्याचा आधार होता.
तो सुटला की ती श्रीमंत व्यक्ती जमिनीवर नक्की आपटणार.
तेव्हा डोक्यात विचार आला हा व्यक्ती तरुण असताना गरीब सेवकांचा स्पर्श सुद्धा करून घेत नसेल आणि आज त्या शिवाय तो दोन पावले चालू पण शकत नाही.
ट्रेन च्या गर्दीत एकदा भिकारी,किती तरी महिने अंघोळ न केलेली व्यक्ती जवळ उभी राहिली की आपण जागा बदलतो.
आपल्याला किळस वाटते.
पण पुढच्याच क्षणी आपण ट्रेन मधून पडलो आणि गंभीर जखमी झालो.
आणि त्याच भिकारी,घाणेरड्या व्यक्ती नी आपल्याला खांद्यावर उचलून दवाखान्यात नेले तर त्या क्षणा पूर्ती आपल्याला त्या व्यक्तीची किळस वाटेल का?.
नोकरान चे असे किती पगार असतील ते देण्यास पण जे असमर्थ असतील तर अशा लोकांना फक्त वयस्कर आहेत म्हणून दया दाखवण्याची गरज नाही.
There is no free lunch
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणतात की फुकट जेवण मिळत नाही.
भांडवलशाही वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक देशांनी मोठमोठे उत्तेजनार्थ उपाय केले आहेत. भारत सरकार मात्र पैसे जमा करायच्या मागे आहे. श्री. मोदी यांनी एखाद्या सीईओ प्रमाणेच सरकार चालवावे आणि मुसलमान, दलित, व गरिबांना मारावे म्हणूनच त्यांना निवडून दिले गेलेले असल्याने सरकार अत्यंत कार्यक्षमतेने आपले “कर्तव्य” करत आहे असेच म्हणावे लागेल.
Except for some people
उत्तर प्रदेशमध्ये बरचसे कामगार कायदे शिथील केले गेले आहेत. गेली कित्येक वर्षे डिमांडचा प्राॅब्लेम असताना उपाय सप्लाय साईडलाच का केले जात आहेत हा प्रश्न पडायचे कारण नाही. चीनला सोडचिठ्ठी देणाऱ्या उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी हा उपाय आहे म्हणे. ही वेठबिगारी आहे असे निराशावादी व लिबरांडू लोक म्हणायला लागले आहेत.
दुसरीकडे राममंदीरासाठी केलेल्या दानासाठी करमाफी मिळणार आहे असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
There is a free lunch after all for poor manufacturers and poor brahmins.
बरोबर आहे; पण चीन व भारत या
बरोबर आहे; पण चीन व भारत या दोन देशांतली मागणी हीच ग्रोथ इंजिन म्हणून पाहिली जाते प्रामुख्याने. विकसित देशांमधली मागणी वाढणे शक्य नाहीय फार.
भारतातली मागणी कमी होत असताना चीनशी पंगा घेऊन उद्योग भारतात पळतील ह्या अंदाजालाही काही आधार नाहीय.
नुकताच चीनमधील अमेरिकन चेंबर ऑफ काॅमर्सने सर्व्हे घेतला म्हणे, त्यात ७०% पेक्षा जास्त उद्योगांनी चीन सोडून जाण्याचा विचार नाही असे सांगितले असे म्हणतात.
डेव्ह एगर्स
डेव्ह एगर्स ह्या अमेरिकन लेखकानं करोनाविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं असं 'न्यू यॉर्क टाइम्स'मध्ये लिहिलं आहे. सध्या जी अनिश्चितता अनेकांना भेडसावते आहे त्याकडे पाहण्याचा एक वेगळा प्रयत्न -
Flattening the Truth on Coronavirus
गालिब जेव्हा लॉकडाउनमध्ये होता...
गालिब जेव्हा लॉकडाउनमध्ये होता आणि त्याला दारू मिळेनाशी झाली...
When Ghalib Too Was Locked Down and Missed His Favourite Tipple
अंधश्रद्धा
गुजरातमध्ये असल्या अंधश्रद्धा बऱ्याच आहेत. तिथे असताना मला एक ८५ वर्षांचे गृहस्थ भेटले होते, त्यांना वाचायला चष्मा लागत नसे. त्याचे रहस्य विचारल्यावर त्यांनी एक बाटली दाखवली. ते डोळ्यांत घालायचे आयुर्वेदिक ड्रॉप्स होते. नांव होतं, 'खाखरानु अर्क'(पळसाच्या पानाचा अर्क) . मी ही तशी बाटली विकत आणली आणि डोळ्यांत ड्रॉप्स घातले असता, डोळ्यांची प्रचंड आग झाली. त्यानंतर मात्र, घळघळा पाणी येऊन थंड वाटले. पुन्हा ते घालण्याची हिंमत झाली नाही. पुढे एका आय सर्जनला त्याबद्दल विचारले असता, त्याने, हे असले प्रकार परत करु नका असा सल्ला दिला.
त्यावरून आठवलं
माझ्या आजोबांनाही वाचायला चश्मा लागत नसे. त्यांना मधुमेह, रक्तदाबाचे किंवा हृदयविकारही नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की ते खेड्यात राहतात म्हणून हे शक्य आहे. त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार नव्हते हे मान्य करण्यात मला अडचण वाटत नाही.
आजोबा वाचायचे फक्त वर्तमानपत्रातले मथळे. तेही दिवसाउजेडी, अंगणातल्या उन्हात बसून वाचायचे. मग चश्मा लागतोय कशाला! सतत पुस्तकं किंवा स्क्रीनवर काहीबाही वाचणाऱ्या, बारका टंकसुद्धा काडेचिराईतपणे वाचणाऱ्या लोकांना चश्मा लागणारच. ह्यात कार्यकारणभाव असा की, गरज लागणार. छोटा टंक वाचल्यामुळे डोळे बिघडत नाहीत, चश्म्याची गरज पडते. लहानपणी ह्याबद्दल मराठी लोकांच्या चिकार अंधश्रद्धा ऐकल्या आहेत.
लॉकडाउन उठवल्यानंतर
लॉकडाउन उठवल्यानंतर आपल्याकडे काय होऊ शकते ह्याचा विचार करायचा झाल्यास जर्मनी आणि द. कोरियातली ताजी परिस्थिती पाहावी :
'It isn't over': South Korea records 34 new Covid-19 cases, the highest in a month
Germany: Coronavirus transmission rate rises above 1
बदलत जाणारे वार्तांकन
करोना संक्रमणाच्या आणि लॉकडाउनच्या सातव्या आठवड्यात माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांची तुलना यापूर्वी येणाऱ्या बातम्यांबरोबर केली तर बरेच बदल जाणवतायत.
युरोप (मुख्यत्वेकरून इटली/स्पेन/यु.के.), अमेरिका (न्यूयॉर्क) येथील रोज वाढणाऱ्या करोनाच्या केसेस आणि त्यांमुळे होणारे मृत्यू यांचे वार्तांकन पूर्णपणे बंद झाले आहे. याचबरोबर स्थानिक पातळीवर देखील पुण्यासारख्या शहरात प्रभाग आणि वॉर्ड्निहाय आकडेवारी दोन आठवड्यांपर्यंत रोज जाहीर होत होती. ती देखील आता पूर्ण बंद झाली आहे. मुंबईत देखील धारावी वगैरे भागांची नावे बातम्यांमध्ये येणे बरेच कमी/बंद झाले आहे.
- ओंकार.
वुहानमध्ये
३ एप्रिलनंतर या ठिकाणी एकाही व्यक्तीत करोनाची लक्षणं सापडल्याची माहिती समोर आली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा चीनमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत.
कार्बन उत्सर्जन
चाळीस वर्षांत प्रथमच भारताचं कार्बन उत्सर्जन लॉकडाऊनमुळे कमी झालं आहे.
The study finds that Indian carbon dioxide emissions fell 15% in March, and are likely to have fallen by 30% in April.
कैद्यांना पॅरोल
आर्थर रोड आणि इतर तुरुंगांत करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात अंडरट्रायल आणि किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंगात असणारे १७,००० कैदी पॅरोलवर बाहेर सोडणार.
नोम चॉम्स्की
आपल्या धोरणांद्वारे ट्रम्प सातत्यानं अमेरिकनांचा जीव कसा धोक्यात घालतो आहे ह्याविषयी नोम चॉम्स्की -
Noam Chomsky: Trump is culpable in deaths of Americans - video
वास्तव वेगळे तर डावपेच वेगळे
लोकसंख्येची घनता कमी असलेले पाश्चात्त्य देश आणि आपला देश ह्यांत फरक असल्यामुळे साथीचा सामना करायला त्यांचे डावपेच आपल्याकडे वेगळ्याच समस्या उभ्या करतायत असं सांगणारा प्राध्यापक मिलिंद सोहोनी यांचा लेख -
In Phase II of epidemic, states must build empirical and analytic foundations of systems of delivery
For a country which has not been able to provide drinking water to its people, containment is an overreach.
अतिशय सुंदर विवेचन केले आहे
अतिशय सुंदर विवेचन केले आहे.पण इकॉनॉमिक्स
म्हणजे मी सर्वात श्रीमंत झालो पाहिजे ह्याच्या नादात असंख्य अजिबात गरज नसलेल्या वस्तू बनवून त्याची सवय लावली जात आहे.
त्या साठी पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे.
जागतिक पातळीवर आता आवाज उठताना दिसत आहे पण तो क्षीण आहे.
माणूस कधीच चुकितून स्वतः सुधारणार नाही.
Corona sarkha virus पंचवार्षिक योजने प्रमाणे दर पाच वर्षांनी आला पाहिजे येत नसेल तर आणला पाहिजे तेव्हा च माणसात काही बदल झाला तर होईल.
अन्यथा काही ही बदलणार नाही.
केस कापून घेण्यासाठी न्हावी
केस कापून घेण्यासाठी न्हावी नसल्याने ओरड सुरू झाली त्यास एक महिना झाला. तसे घरातल्या मुलांचे केस आईबाबांनी कापले. पण बाबांचे स्वत:चे कापणे बाकी आहेत. यातून मी वाचलो.
वीस वर्षांपूर्वी एका न्हाव्याने कटकट केल्यावर चिडून निर्णय घेतला होता यापुढे न्हाव्यांची {पैसे देऊन} कटकट मान तुकवून ऐकायची नाही. शिवाय त्या दुकानात एक तासभर {वेटिंग धरून} कंटाळवाणी हिंदी गाणी ऐकावी लागायची.
बाकी चार पाच प्रयत्नांत कुणीही कात्री कंगव्याने स्वत:चे केस कापण्यात यशस्वी होऊ शकतो.
Lock down cha kal
लॉक डाऊन चा काळ सुखाचा जाण्यासाठी मी खालील गोष्टी करतो.
न्यूज बघणे पूर्ण बंद केले आहे ,भयंकर शब्द वापरून सत्य परस्थिती च विपर्यास न्यूज वाले करत असतात.
त्या मुळे न्यूज बघणे पूर्ण बंद.
रोज नियमित व्यायाम आणि ज्वारी ची भाकरी,पोहे,सर्व डाळी ,थोडक्यात आपला पारंपरिक आहार च घेणे.
मॅगी, पास्ता च्या नादाला न लागणे.
ह्या दोन्ही सवयीचा परिणाम म्हणून झोप योग्य वेळी योग्य वेळ लागते.
आणि पचनसंस्था उत्तम काम करते.
निगेटिव्ह विचार असणाऱ्या लोकांवर बहिष्कार त्यांच्या शी कोणत्याच माध्यमातून संबंध ठेवत नाही.
जे नेहमी निगेटिव्ह विचार करत असतात.
Positive vichar असलेल्या आणि खराब वेळ असली तरी स्थिर विचार असणाऱ्या प्रयत्न वादी लोकांशी सर्व माध्यमातून चर्चा करणे गप्पा मारणे.
जे उपलब्ध आहे त्या मध्येच समाधान मानणे
जे उपलब्ध नाही आणि गरजेचे पण नाही ते मिळवण्यासाठी आटापिटा न करणे.
फॅमिली बरोबर पूर्ण वेळ एकरूप होणे.
Vadache विषय पूर्ण टाळणे.
ह्या नियमात लॉक डाऊन व्यतीत करत असल्या मुळे बिलकुल कंटाळा आलेलं नाही.
अजून चार महिने जरी लॉक डाऊन राहिले तरी ते एन्जॉय च करू शकतो.
अजून चार महिने जरी लॉक डाऊन
अजून चार महिने जरी लॉक डाऊन राहिले तरी ते एन्जॉय च करू शकतो.
तुम्ही स्वत: भाकरी-भाजी (जे काही खाताय ते) बनवता का? त्याला लागणारी भांडी घासता का? केर फरशीची काय सोय आहे? आणि सर्वात महत्वाचे - आत्ता पैसे मिळताहेत आणि पुढे देखील मिळत राहतील अशा क्षेत्रात आहात का?
परिचयातील दोन उदाहरणे - एक कुटुंब अत्यंत सुखवस्तू. तुळशीबागेत तुलसी नावाच्या दुकानात ज्या प्रकारचे सामान मिळते तशा सामानाचा होलसेल बिझनेस आहे. गेले दोन महिने बिझनेस बंद आहे. जरी पैशांची कमतरता नसली तरी आणखी चार महिने बिझनेस बंद हे त्यांना पण सहन होणार नाही. दुसरे उदाहरण ब्युटी पार्लर चालणाऱ्या महिलेचे. दोन महिने एक पैशाची कमाई नाही. गाळ्याचे भाडे थकलेले आहे. नवरा कमिशनवर प्रॉपर्टीची कामे करतो. त्याचे काहे उत्पन्न नाही तसेच कौटुंबिक वादविवाद आहेत. बचतीची तितकी सवय नाही. ब्युटी पार्लरचे भविष्य काय असेल याची खात्री नाही. आणखी चार महिने जर अशीच परिस्थिती राहिली तर तिला उसनवारी करून जगायला लागेल अशी शक्यता आहे.
- ओंकार.
ही पण नोद आजचा इतिहास लिहला जाईल तेव्हा होईल
२१ वें शतक चालू होते माणसाने विज्ञान मध्ये उत्तुंग प्रगती केली होती.
अगदी पर ग्रहांवर वर सुद्धा मानव जावू लागला होता.
मानवाने पाठवलेले यान सूर्यमाला भेदून पुढील प्रवासाला गेले होते.
पूर्ण विश्व माणसाच्या मुठ्ठीत आले आहे अशीच स्थिती होती.
यांत्रिक मानव तयार केले होते ते सर्व माणसाची काम करू लागले होते.
३d printer var Manvi शरीराचे अवयव निर्माण केले जाते होते.
जुने अवयव बदलून नवे अवयव शरीरात बसविण्यात येत होते.
मानवी शारीच्या एका एका पेशीचे कार्य माहीत झाले आहे असे दावे केले जात होते.
मानवाची गुणसूत्र वाचण्यात पूर्ण यश आले आहे असे घोषित झाले होतें.
मानवी शरीरात वाटलं तो बदल करण्याचे ज्ञान माणसाला प्राप्त झाले आहे ह्याची चर्चा चालू होती .
आ नी अशा प्रगतशील माणसाच्या जगात एका विषाणू नी प्रवेश केला आणि सर्वच बदललं .
मानवी शरीराची पेशी ना पेशी माहीत असलेल्या माणसाला अत्यंत निकृष्ट रचना असलेल्या विषाणू ची माहिती मिळवणे कठीण जात होते.
परस्पर विरोधी विधाने केली जात होती...
सहा महिने विषाणू चे आगमन होवून झाले तरी त्या विषाणू ची जैविक रचना समजत नव्हती.
सर्व ठप्प झाले होते .
चार भिंती च्या आत मध्ये राहणे हा एकमेव उपाय शिल्लक होता.
जेव्हा माणूस खूप मागास होता तेव्हा हा उपाय केला जायचा .
प्लेग च्या साथी मध्ये लोक गाव सोडून गावा बाहेर राहत.
आता घरात राहत होती.
दोन्ही वेळेच्या स्थिती मध्ये काहीच फरक नव्हता.
एका एका पेशीचे कार्य माहीत आहे असा दावा करणारा माणूस हतबल झाला होता.
पायपीट करणाऱ्या अश्राप
पायपीट करणाऱ्या अश्राप जीवांचे हाल बघवत नाहीयेत.
मला एक अतिशय पर्सनल असा उपाय सुचतोय.
मी शनिवार-रविवार माझ्या गाडीतून साधारण २ (/३?) लोकांना ८ ते १० तासांचा ड्राइव्ह करून पोचवू शकतो.
उदाहरणार्थ कोकण / मराठवाडा इत्यादी. (स्टार्टींग पॉईंट पुणे)
आठवड्यातून एकच वीकांताची ट्रीप करता येईल कारण इतर दिवशी मलाही जगण्यासाठी नोकरी करणं भाग आहे.
ह्याच कारणामुळे फार लांबचा प्रवास उदाहरणार्थ (बिहार) ही शक्य नाही.
प्रवासाची परवानगी बहुधा इथे मिळवता यावी. (इकडे प्रायव्हेट गाडीचा ऑप्शन आहे.)
e-pass
पण कृपया अधिक चपखल मार्ग माहिती असल्यास जरूर कळवा.
हे मॉडेल चाललं तर शासनाशी समन्वय साधून 'आहे रे' वर्गातील अनेक इच्छूकांची मदत घेता येईल.
उदाहरणार्थ महिन्याला साधारण १०००० रुपयांच्या पेट्रोलच्या अंतरास मी विनामूल्य सेवा देऊ इच्छितो.
मोफत किंवा वाजवी दर आकारणे हे चालकासाठी ऐच्छिक असू शकतं.
किंबहुना टॅक्सी / उबर चालकांनाही ह्यात सामील करून घेता येईल.
त्यांनी वाजवी दर आकारल्यास त्यांचाही उत्पनाचा स्रोत पुन्हा चालू होईल.
समन्वय करणारा सेटअप उबर/ ओला/ ब्ला-ब्ला कार इत्यादी कम्पन्यांकडे आहेच त्यात शासन चा समन्वय आणणं फारसं अवघड नसावं माझ्या मते.
अर्थात हे सगळं थोडं नंतर ...
पुण्यातल्या जेन्यूइनली गरजू लोकांपर्यंत पोचण्यासाठी कोणी मदत करू शकेल का?
अजून कोणी बऱ्या घरचे लोक्स ह्या उपक्रमात सामील व्हायला इच्छूक आहेत का?
गाड्या २-३ च्या ग्रूपमध्ये नेल्या तर एकाचा दुसऱ्याला आधार होईल.
लॉकडाऊन ४
नवीन लॉकडाऊन जाहीर झाला आहे. तो ३१ मे २०२० पर्यंत असला तरी त्या तारखेला काहीच महत्व उरले नाहीये, हे सामान्य माणसालाही कळले आहे. नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाकडून एक नियमावली, ते रंगीत झोन्स ठरवण्याची राज्यांना मुभा, त्याखाली जिल्हाधिकाऱ्यांची आणि त्याखाली पोलिसांची मनमानी अशी उतरंड आहेच. देश एकच असला तरी प्रत्येक भागांत रहाणाऱ्या अश्राप भारतीय जनतेला वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकार स्वत:ची पाठ थोपटत आहे, राज्य सरकार तर लॉकडाऊन हेच जीवन, असे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच, डिझास्टर मॅनेजमेंटचेच डिझॅस्टर करणारी देसी मानसिकता प्रकर्षाने जाणवत आहे.
Covid 19 पसरण्या चे गणिती मॉडेल डोळ्यासमोर ठेवा आणि ह्याचा विचार
भारतात सकल घरेलु उत्पादनाच्या 5% खर्च आरोग्य सेवे वर केला जातो.
तोच अमेरिकेत 15% तर तिमोर मध्ये 10% केला जातो
भारतात दर लाख लोकसंख्या मागे 3 आरोग्य केंद्र आहेत.
भारतात दर हजार लोकसंख्या मागे दवाखान्यात 1 बेड उपलब्ध आहे.
तोच कोरिया मध्ये 13 आणि मोनॅको मध्ये 196 बेड आहेत
आधुनिक वैद्यक प्रणाली चे प्रशिक्षित डॉक्टर्स चे प्रमाण भारतात 0.7% आहे तर क्युबा मध्ये 59 आणि दक्षिण कोरिया मध्ये 32 आहे.
परचारिका.
दर हजारी प्रमाण भारतात 0.8 % आहेतच दक्षिण कोरिया मध्ये 4 आहे.
प्रसूती सेवक दर हजारी भारतात 0.5%
स्वच्छता सेवक दर हजारी
0.4%
Lab tech dar hajari
0.02%
अशी भारताची आरोग्य यंत्रणा आहे ह्या मध्ये ताबोडतोप सुधार करायचा झाला तरी त्याला मर्यादा आहेत.
डॉक्टर्स,नर्सेस,instant ulabadh karta yet नाहीत.
भारतात 46% लोकांना उपचार करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत किंवा काही तरी विकावे लागते.
अशा स्थितीत लॉक down hach पर्याय आहे.
ह्या विषाणू चे संक्रमित करण्याची गती अती प्रचंड आहे.
गणिती मॉडेल ते दाखवत आहे.
इथे जर लॉक down kele nahi tar kay अवस्था होईल ह्याचे चित्र फक्त डोळ्या समीर आणा.
संक्रमित लोकांची संख्या दोन महिने होवून गेले तरी एक लाखाच्या आताच ठेवण्यात लॉक down cha मोठा हात आहे.
नाहीतर आज तीच संख्या 4 ते पाच लाख पर्यंत सुद्धा गेली असती.
त्या मुळे शासन भित आहे.
एकदा वेळ निघून गेली तर बघत बसण्या शिवाय काहीच करता येणार नाही.
स्वीडन
स्वीडनने लॉकडाऊन न करता करोना खूप चांगल्या प्रकारे हाताळला असं म्हटलं जातंय. मात्र, काही बातम्यांनुसार वृद्ध लोकांना ऑक्सिजन किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल करायलाच नकार दिल्यामुळे आणि योग्य ती ट्रीटमेंट नाकारल्यामुळे एरवी पुष्कळ वर्षं जगू शकले असते असे वृद्ध नागरिकही मरत आहेत असं तिथल्या नर्स आणि डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे.
Coronavirus: What's going wrong in Sweden's care homes?
"They told us that we shouldn't send anyone to the hospital, even if they may be 65 and have many years to live. We were told not to send them in," says Latifa Löfvenberg, a nurse who worked in several care homes around Gävle, north of Stockholm, at the beginning of the pandemic.
तैवान, चीन, करोना आणि WHO
कालपासून WHOतर्फे करोनाविषयक World Health Assembly सुरू झालेली आहे. तैवाननं ज्या प्रकारे करोनाची साथ हाताळली त्याविषयी त्याचं खूप कौतुक होत आहे, पण चीनच्या विरोधामुळे २०१६पासून तैवानला WHOचं सदस्यत्व नाही. ह्याविषयी आता बोंबाबोंब सुरू आहे, पण चीनचं मन वळवता येईल अशी चिन्हं नाहीत.
World Health Assembly: what is it, and what is the coronavirus inquiry proposal?
China backs 'comprehensive review' of pandemic
ह्याबद्दल अमेरिका रास्त तक्रार करते आहे -
Pompeo Blasts WHO And China For Excluding Taiwan From This Week's Health Assembly
लॉकडाऊनचे परिणाम
लॉकडाऊन करण्यामागची उद्दिष्टं नक्की कितपत साध्य झाली ह्याचं विदा वापरून केलेलं विश्लेषण -
50 days of lockdown: Measuring India’s success in arresting COVID-19
हा हा हा!
पुढची गंमत - नॅन्सी पेलोसी, अमेरिकी संसदेच्या खालच्या सभागृहाची नेती, आणि ट्रंपच्या विरोधी पक्षातली, म्हणाली की ह्याने काळजी घ्यायला हवी; वयोगट आणि वजनगट पाहा. तिचे शब्द morbidly obese.
तर तात्या चिडला. आता तिच्या डोक्यावर परिणाम झाला, म्हणतोय. शिवाय गोळ्या घेण्याचं तुणतुणं सुरू आहेच.
जयंत जोपळे (यवतमाळ) यांची लॉक डाऊन निरीक्षणे
अमरावतीहून कोरोंना नोंदी
१) पहिल्या दुसर्या लॉकडाउन मध्ये आध्रप्रदेश तेलंगणा हैदराबाद कडील परप्रांतीय मजूर कुटुंब यवतमाळ अमरावती मार्गे रस्त्याने पायी मध्य प्रदेशाकडे राजस्थान कडे जात होती.
२) तिसर्या चौथ्या लॉकडाउन मध्ये १०-२० सदस्यांचा गट करून परप्रांतीय पुरुष मजूर सायकल वरुन शेकडो किमी अंतर कापून घरी मध्य प्रदेशाकडे राजस्थान कडे जात होती. काही मजूर कुटुंबे मोटर सायकल, स्कूटी सारख्या मोपेड वर गाठोडे पिशव्या, लहान लेकरे घेऊन जातांना दिसत होते.
३) चौथ्या लॉकडाउनच्या काळात यवतमाळमध्ये काही दुकाने उघडयास परवानगी दिली. सध्या ४५ डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्यामुळे लोकांनी चपलांच्या दुकानात प्रचंड गर्दी केली.
४) रमजानच्या काळात लॉकडाउन वाढवले हा एक चांगला निर्णय आहे.
५) माळरानात पालावरच्या वस्तीत भटक्या जमाती लोकांकडून हरिण नीलगाई रान डुकरे वगैरे अवैध शिकारी वाढल्या आहेत.
६) यवतमाळ जिल्ह्यात यंदा बराच पाऊस पडला आहे, भूजल पातळी सुमारे दोन अडीच मीटर्सने वाढली आहे. अगदी मे महिन्यात विहिरी बोअरला पुरेसे पानी आहे . शहरातून गावाकडे बरेच मजूर परत आलेले आहेत. या मजुरांनी आपल्या शेतात भाजीपाला लावला आहे. त्यामुळे अगदी एप्रिल मे महिन्यात यवतमाळ विदर्भात ताज्या पालेभाज्या टरबूज काकडी बाजारात विकायला येत आहेत. धरणे तळी यात पानी असल्याने ताजी मच्छी असते.
७) गरीब लोकांच्या जनधन बँक खात्यात दर महिन्याला सरकार पाचशे रुपये अनुदान टाकत असते . त्यामुळे दर महिन्याला आठवडाभर बँक समोर 400-500 लोकांची प्रचंड गर्दी झालेली असते. बँक समोर मोठा मंडप टाकलेला असतो. तिथे उन्हामुळे बरेच ग्रामस्थ निराधार वृद्ध स्त्री पुरुष दाटीवाटी करून बसलेले असतात.
ढिलाईमुळे ३६००० अमेरिकन मृत
लॉकडाऊन करण्यात ढिलाई केल्यामुळे ३६,००० अमेरिकन मेले असा दावा न्यू यॉर्क टाइम्सनं केला आहे -
Lockdown Delays Cost at Least 36,000 Lives, Data Show
झकरबर्ग काय म्हणतोय
करोना महासाथीच्या काळात चुकीची माहिती पसरू नये म्हणून फेसबुक प्रयत्न करत आहे असा झकरबर्गचा दावा -
Facebook's Zuckerberg defends actions on virus misinformation
It removed Brazilian president Jair Bolsonaro's claim that scientists had "proved" there was a coronavirus cure.
He also said that Facebook had removed content from groups claiming that the rollout of the 5G digital network was a cause of the spread of the virus and in some cases encouraged those who believed that to damage the networks physical infrastructure.
अपेक्षित आणि तेवढंच
This was removed because it was "obviously" not true, he said.
ह्या सगळ्या अफवा पाश्चात्त्य देशांमधल्या. आशियाई अंधविश्वासांचं काय, चीनमध्येही असले अंगारे-धुपारे प्रकार आहेत; आपल्याकडेही शब्दशः दिवे लावून झाले. त्याचाही प्रचार फेसबुकवर होतो. हे सगळं शोधायला, त्याची व्यवस्था उभारायला फेसबुकला वेळ लागणार, हे अपेक्षितच. पण ते होईल तरी का?
ब्रिटनमधला लोच्या
ब्रिटनने करोनाशी लढायला चुकीच्या आजारासाठीची व्यूहरचना वापरली की काय, असा प्रश्न उपस्थित करणारा गार्डियनमधला लेख -
Covid-19: did the UK government prepare for the wrong kind of pandemic?
अगोदर वाटलं की होमिओपॅथिक औषध
अगोदर वाटलं की होमिओपॅथिक औषध ( आर्सेनिकम का काही) सापडलं हे इतर काही अमुक औषध तमुक ठिकाणी सापडले या प्रकारची वाटसप चालढकल आहे.
मग त्या औषधाच्या बाटल्या कशा भरत आहेत तो पुण्याचा एक विडिओ आला.
आता डोंबिवलीत वस्त्यांमधून लोकांना या औषधाचे वाटप नगरपालिका करत आहे.
प्रश्न असा आहे की जर हे औषध सापडले तर मग अगोदरच होमिओपॅथी आणि आयुर्वेदवाल्यांकडे जाऊन तुमच्याकडची संभाव्य औषधे का मागवली नाहीत. सिद्ध झालेली औषधे नाहीत कोणाकडेच हे माहितच आहे पण एक व्यवस्थित प्रयत्न करायला हवे होते.
लक्षणांची तीव्रता किती?
कोव्हिडनं आजारी पडलेले अनेक लोक, ज्यांची लक्षणं तीव्र नाहीत, अन्न-पाणी आणि पॅरासिटामोल घेऊनच बरे होत आहेत. त्यात होमिओपथीच्या साखरेच्या गोळ्या खाऊन काही नुकसान होणार नाही. ना मसाल्याचे ठरावीक पदार्थ - आलं, मिरी, पुदीना, लवंग, हळद, बडिशोप, आणि तत्सम काही - खाऊन!
प्रश्न आहे तो ज्यांना खऱ्या आणि आधुनिक उपचारांची गरज आहे त्याच लोकांचा; ह्या लोकांत गंभीर लक्षणं दिसत आहेत. होमिओपॅथीमध्ये हे लोक काय विरळ हवेचा सिलिंडर लावणार का, विरळ हवा, कमी ऑक्सिजन अधिक गुणकारी म्हणत? हे असं व्हेंटिलेटर लावणं होमिओपथीमध्ये मोडतं का? तोच प्रश्न आयुर्वेदाबद्दल.
आधुनिक विज्ञान
आधुनिक विज्ञान अंधारात चाचपडत आहे .
त्यांना ह्या व्हायरस विषयी काहीच बोध होत नाही .
हतबल झालेले आहे.
अमेरिकी सारख्या विज्ञानवादी देशात मृतांची संख्या लाखात आहे.
त्या मुळे बाकी शास्त्रात काही उपचार सापडतो आहे का ह्याचे प्रयोग होत आहेत .
निदान प्रतिकार शक्ती, तरी वाढावी म्हणून पारंपरिक ज्ञान च आधार घेतला जात आहे.
सहा महिने होवून गेले तरी आधुनिक विज्ञान काहीच ठोस करू शकल नाही.
हे सत्य आहे.
अमेरिका विज्ञानवादी ?
बाकी चालू देत
पण अमेरिका हा देश विज्ञानवादी आहे हा निष्कर्ष आपण नक्की कशाच्या आधारावर काढलात ?
अमेरिकेत लाखात मरण पावले हे खरेच.पण महासाथीचा सामना कसा करायचा याची पॉलिसी त्यांचे राष्ट्रपुरुष श्री डोलांड ट्रम्प यांनी ठरविली असावी. शास्त्रज्ञांनी नाही
आणि एक, आधुनिक विज्ञानाला कोरोना चे उत्तर सापडले नाही हे खरेच, पण याचा अर्थ पारंपरिक विज्ञानाला उत्तर सापडले आहे असा होत नाही.
आधुनिक विज्ञानात त्रुटी/कमी शोधून त्यावर उपाय शोधणे लाजिरवाणे समजले जात नाही, त्यामुळे ते प्रगत आहे आणि होत राहील.
आधुनिक उपचारांची गरज आहे
आधुनिक उपचारांची गरज आहे त्याच लोकांचा; ह्या लोकांत गंभीर लक्षणं दिसत आहेत. >>>>
१) उपचारांत आधुनिक वगैरे काही असण्याची गरज नाही. फक्त ते औषध रोगासाठी परिपूर्ण असावे. साध्य आणि सिद्ध केलेले असावे.
२)कोणत्याच पद्धती सध्या तरी अमुक एक औषध आहे अशी ग्वाही देऊ शकत नाही.
३) वेंटिलेटर जोड उपचार आहे. म्हणजे तात्पुरता आराम देणे. जेवढी हवा घेतली त्यातला प्राणवायू कमी पडतो म्हणून थोडा अधिक देणे.
हे खरे आहे का
जगातील सर्वात जास्त नफा देणारं धंधा म्हणजे pharmaceutical industry.
पण जगातील सर्वात मोठ्या चार pharmaceutical कंपन्यांनी नी कोरोणा व्हायरस वर लस शोधण्यात बिलकुल रस दाखवला नाही.
जे काही लस निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत ते सरकारी पातळीवर आणि ट्रस्ट मार्फत होत आहेत
त्या मुळे लस शोधण्यात उशीर होत असावा.
हे खरं असेल का
लस शोधण्याचे प्रयत्न सरकारी
लस शोधण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर चालू नाहीत.
खाजगी कम्पन्या हे काम करत आहेत (उदा .सिरम इन्स्टिट्यूट ,पुणे)
लस तयार करणे व त्याच्या ट्रायल्स हे सोपे व जलद होणारे काम नसते
(नवीन लसीचा काही घातक परिणाम तर नाही ना , आणि त्याची इफेकटीव्हीटी किती आहे याच्या चाचण्या घेणे अतिशय जरुरी असते. त्यालाच अनेक महिने लागतात)
तरीही प्रयत्न जोरात व वेगवान पद्धतीने जगभर चालू आहेत
(सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील लस बनवणाऱ्या कंपन्यांपैकी टॉप च्या दोन तीन कंपन्यांपैकी एक आहे.ती संपूर्णपणे खाजगी मालकीची आहे)
>>> होमिओपॅथी अवश्य घ्यावी,
>>> होमिओपॅथी अवश्य घ्यावी, फक्त इतर मूळ उपचार बंद करू नयेत इतकीच सुचवणी.>>>
सहमत नाही.
कारण एखाद्या औषधाव्यतिरिक्त आणखी काही घ्यावं लागत असेल तर ते औषधच नाही. कधी साइड इफेक्टस कमी करण्यासाठी जोड औषध किंवा ( आयुर्वेदात अनुपान असतं ) वरून लावायचं/पोटात घ्यायचं/ टोचून घ्यायचं असा प्रकार असतो तो ठीक.
गरम/गार पाण्याचा शेकसुद्धा चालेल.
पण इतर प्रकार नाही पटत.
माझे एक होमिओपथी डॉक्टर भडकले होते. सर्दीचं औषध घेतलं, विक्स लावू का विचारलं. " हे औषधच आहे, फार तर गरम पाण्याचा वाफारा घ्या. विक्स लावू का विचारायचंही नाही."( '९० साली चार दिवसांचे औषध सहा रुपये.) इतकी खात्री असायची त्यांना.
प्रयास आरोग्य गटातर्फे सर्वेक्षण
प्रयास आरोग्य गटाकडून आलेली माहिती :
प्रयास आरोग्य गटातर्फे कोविड १९ संदर्भात आम्ही एक अभ्यास करतो आहोत. कोविड-१९ आजाराची साथ सुरु असताना एखाद्याला लागण होईल किंवा नाही, कोणत्या परिस्थितीत लागणीची शक्यता आहे ह्याबद्दल लोकांची काय समजूत आहे, त्याबद्दल लोकांचे काय मत आहे हे समजून घेणं हा ह्या अभ्यासाचा हेतू आहे. कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, जी धोरणे ठरवली जात आहेत त्यांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करता येण्यासाठी ह्या अभ्यासात गोळा केलेल्या माहितीचा उपयोग होऊ शकेल. खालील सर्वेक्षणात आपण भरलेली माहिती पूर्ण गोपनीय ठेवली जाईल व त्याचा वापर फक्त संशोधनासाठी केला जाईल याची आम्ही आपल्याला खात्री देतो.
आपण कृपया खालील सर्वेक्षणात आपली माहिती भरावी व हे सर्वेक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पाठवावे ही विनंती!
स्वीडन
स्वीडनच्या लॉकडाऊन न करण्याच्या धोरणाविषयी बरीच चर्चा होते आहे. आता असं दिसतंय की युरोपीय देशांतला सर्वाधिक मृत्युदर स्वीडनमध्ये आहे. इतकंच नव्हे, तर हर्ड इम्युनिटी विकसित होण्यापासूनही स्वीडन अद्याप बराच दूर दिसतो आहे. त्यासाठी साधारणतः ४०% जनतेला संसर्ग होऊन जावा लागतो, पण अद्याप स्टॉकहोममधला संसर्ग केवळ सात टक्के लोकांपर्यंत पोचला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हर्ड इम्युनिटीवर विसंबता येणं सध्या तरी शक्य दिसत नाही.
Just 7.3% of Stockholm had Covid-19 antibodies by end of April, study shows
According to the scientific online publication Ourworldindata.com, Covid-19 deaths in Sweden were the highest in Europe per capita in a rolling seven-day average between 12 and 19 May. The country’s 6.25 deaths per million inhabitants a day was just above the UK’s 5.75.
The World Health Organization has warned against pinning hopes on herd immunity as a means of containing the coronavirus, saying last week that studies had found antibodies in only 1%-10% of the global population.
Herd immunity
Herd immunity म्हणजे नक्की काय आणि ती कसे कार्य करते ह्या वर कोण्ही तरी मार्गदर्शन करावे ते पण सविस्तर.
कारण मी आत्ताच मानवी शरीराची रोग प्रतिकार शक्ती ह्या विषयावर मराठी विश्वकोश वरील लेख वाचला.
खरे सांगायचे तर काहीच समजलं नाही.
रोग प्रतिकार शक्ती हा विषय अतिशय किचकट आहे .
शरीर विविध मार्गे रोग पासून स्वतःचा बचाव करते .
त्या साठी विविध यंत्रणा कार्यरत असतात .
प्रतेक वेळी एकाच प्रकारे रोग कारक विषाणू,जिवाणू,बुरशी ह्यांचा खात्मा केला जात नाही तर विविध मार्ग अवलंबले जातात.
तरी कोणी तरी सविस्तर ह्या विषयावर लिहावे.
खरं आहे. इमानी आणि ओळख न
खरं आहे. इमानी आणि ओळख न विसरणारा प्राणी तर आहेच पण अंगावर विशेष केस,लोकर नसणारा, ५० डिग्रि +/- सहन करतो.
अमच्या ओफिसला जाण्यासाठी जिथे अमच्या बसचा स्टॉप होता तिथे दुपारी दोन तीन गाढवं उभी राहात. मीही तिथेच त्यांच्यात उभा राहात असे कारण जागा सोडल्यास ड्रायवर लक्ष देत नसे.
आयुरवेदानुसार
आयुर्वेदिक औषध मध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक herbs hya aushadhi गुणधर्म असणाऱ्या आहेत.
.
Covid 19 वर उपचार करण्यासाठी अश्वगंधा ह्या वनस्पतीचा अभ्यास भारतात आणि जपान मध्ये चालू आहे.
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किंवा बाकी कारणासाठी आयुर्वेदिक औषधांचा वापर करणे ह्या मध्ये काही कमी पना नाही.जगात त्याविषयावर सखोल अभ्यास केला जातो.
जगाला आयुर्वेद वर्ज नाही .
भारतात काही लोकांना आहे त्याचे कारण
धार्मिक
आहे आयुर्वेदाच्या नावाखाली हिंदू धर्माचा प्रसार,प्रचार होईल अशी सुप्त भीती असल्या मुळे विरोध होत आहे.
दुर्लक्ष करणे.
आपण डोळे उघडे ठेवून चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या
त.
स्वतःच जज करून निर्णय घेण्यात माणूसपण आहे.
मेंढरं सारखे पुढच्याच पाठी मान खाली खालून डोळे झाकून मार्ग क्रमानं करण्यात काही अर्थ नाही.
समोरचे आजी-आजोबा
दोन आठवड्यांपूर्वी समोरची आजी रिहॅब होममध्ये गेली होती. घरात पडली आणि तिला काही वेळ काहीच समजेनासं झालं होतं. आजीला कॅन्सरही आहे. परवा आजी परत घरी आली. त्यांच्या घरासमोर घरची, गुलाबाची चार फुलं ठेवून आले. तेव्हा त्यांची कुत्री भुंकायला लागली म्हणून आजोबा बघायला आले.
आजोबा डेमोक्रॅट पक्षाचं स्थानिक काम करतात; ते सगळं बंद आहे. आजोबा-आजी एरवी फार डांबरटपणा करतात, पण आता आजोबा चिंतेत होते. आजीला दिवाणावरून स्वतःची स्वतः उठताही येत नाहीये म्हणून. आजोबांची तोंडदेखली समजूत घातली, "आता आजी किमान घरी आली आहे. आता तुम्ही दोघं एकत्र आहात. एकेक पायरी हळूहळू चढता येईल..." आजीला लांबून बघणंसुद्धा शक्य नाही. आजीनी मला काही फुलझाडं दिली होती. दर २-३ दिवसांनी मी आजी-आजोबांच्या दाराशी आमच्या दारातली फुलं ठेवते.
त्यांच्याशी नियमितपणे काहीबाही संवाद राखणं ही माझीच गरज जास्त आहे, असं आता वाटायला लागलं आहे.
ये दोस्ती...
ब्रिटन आणि फ्रान्समधली दोस्ती जुनी आणि जगजाहीर आहे. करोनाच्या निमित्ताने त्याचं पुन्हा दर्शन होत आहे.
११ मे - फ्रान्समधून येणाऱ्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही.
२२ मे - क्वारंटाईन केलं जाईल.
२३ मे - असं काय! मग आम्ही पण तुम्हाला क्वारंटाईन करणार - फ्रान्स
ब्राझील
आपल्याकडे अनेक लोक लॉकडाऊन नको असं म्हणतायत. युरोपपेक्षा आपली परिस्थिती वेगळी आहे वगैरे सांगितलं जातंय. त्यांच्यासाठी आता दक्षिण अमेरिकेतून : ब्राझीलमध्ये सातत्यानं करोनाला कमी लेखत लॉकडाऊनची गरज नसल्याचं अध्यक्ष बोल्सोनारो सांगत होते. मात्र, अमेरिकेपाठोपाठ आता ब्राझील करोनाव्हायरसच्या संसर्गात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. साओ पावलोमध्ये प्रेतांचं सामूहिक दफन केलं जात आहे.
इंडियन एक्सपरेस
मालकांच्या आदेश प्रमाणे मत मांडावी लागतात.
संपादक मंडळ ला.
नाही ऐकलं की बाहेरचा रस्ता.
स्वतःच्या बुध्दी ला पटेल ते लीहण्याचा अधिकार फक्त सामान्य लोक बजावतात .
त्या विद्वान मंडळी पेक्षा सामान्य लोकांची मत सत्याच्या जास्त जवळची असतात तर विद्वान लोकांची मत सत्या पासून कोसो दूर असतात.
राजकारण - अमेरिका
करोनाच्या काळात महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे ते आपण रोज बघतोच आहोत. जगभरही अशा अनेक रोचक राजकीय घटना घडत आहेत. उदा. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मा. ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलायनात (ऑगस्टमध्ये) होऊ घातलेलं रिपब्लिकन पक्षाचं अधिवेशन इतरत्र हलवण्याची धमकी दिली आहे. कारण? अधिवेशनाला पुरेशी गर्दी करण्याचं स्वातंत्र्य लोकांना असेल ह्याची खात्री राज्याचे गव्हर्नर (जे डेमोक्रॅट आहेत) आज देत नाहीयेत! यावर गव्हर्नरांचं उत्तर - राज्याचं सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा यासाठी आम्ही विदा आणि विज्ञानावर अवलंबून राहतो!
Republican National Convention: Trump threatens to move event from North Carolina
तात्यांचा काहीही भरवसा नाही.
उद्याच तात्यांनी शब्द फिरवला तरीही मला आश्चर्य वाटणार नाही! सगळीकडे फिरताना तात्या मास्कशिवाय फिरतात; 'माध्यमांना तेवढंही सुख मिळू नये म्हणून मी असं करतो' हाही आगाऊपणा वर आहे. तात्यांकडे काही योजना नाही म्हणून उदारमतवादी माध्यमं कधीपासून शंख करत आहेत.
सध्या जे काही पोल घेतले जात आहेत त्यात तात्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ८% मागे आहेत. निवडणुका नोव्हेंबरात आहेत. आणि दोन राज्यांनी संपूर्ण मतदान पत्राद्वारे घ्यायचं ठरवलं तर तात्यांनी त्यांना निवडणूक निधी न देण्याचं ठरवलं आहे. - Trump threatens to cut states' election funding over false claims of voter fraud
कॅलिफोर्निया राज्याला रिपब्लिकन पक्षानं कोर्टात खेचलं आहे. - Republican National Committee sues California to halt vote-by-mail for November general election
तात्यांचं घर न्यू यॉर्कात असलं - ट्रंप टॉवर - तरीही तात्यांचा मतदारसंघ फ्लोरिडात आहे. ते स्वतः ज्या निवडणुकीत निवडून आले, २०१६च्या निवडणुका, त्यात पत्रानं मतदान केलं होतं.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन!
हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा करोनाच्या लढ्यात उपयोग होतो अथवा नाही ह्यावरूनही राजकारण तापलेलं आहे. त्यात आज जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जाहीर केलं आहे की त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या चाचण्या सध्यापुरत्या तरी थांबवल्या आहेत. कारण? लॅन्सेट या प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये प्रकाशित शोधनिबंधानुसार या औषधानं मृत्यू किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो.
नुकताच मा. ट्रम्प यांनी आपण हे औषध घेत आहोत असं जाहीर केलं होतं. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनीही हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापराला दुजोरा दिला आहे. ताज्या WHOच्या निर्णयानंतरही ब्राझीलचं आरोग्य मंत्रालय ह्या औषधाच्या बाजूनं उभं आहे.
ता. क. ताज्या आकडेवारीनुसार जगात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि बळी कुठे आहेत? १. अमेरिका २. ब्राझील. वाचकांना यात काही योगायोग आढळल्यास ती या लेखकाची जबाबदारी नाही. ;-)
1. ICMR करोना प्रतिबंधासाठी
1. ICMR करोना प्रतिबंधासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची शिफारस करत आहे. ही शिफारस NIV पुणेच्या अभ्यासाधारे आहे. अर्थात डोक्टर लोकांच्या देखरेखीखाली.
https://www.livemint.com/news/india/icmr-issues-revised-advisory-on-use…
2. WHO जानेवारी पर्यंत सांगत होते ही हा व्हायरस माणुस ते माणुस संक्रमित होत नाही. जे अगदीच खोटं/चुकीच ठरलं. WHO वर विश्वास ठेवावासा वाटत नाही. WHO राजकारणापासून अलिप्त संस्था नाही.
Governments and WHO changed
Governments and WHO changed Covid-19 policy based on suspect data from tiny US company
https://www.theguardian.com/world/2020/jun/03/covid-19-surgisphere-who-…
लांसेटने देखील यावर आता संशय दर्शवला आहे.
Oxford
पण आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चाचण्यांनुसारही औषधाचा उपयोग होत नाही.
Hydroxychloroquine does not cure Covid-19, say drug trial chiefs
Hydroxychloroquine does not work against Covid-19 and should not be given to any more hospital patients around the world, say the leaders of the biggest and best-designed trial of the drug, which experts will hope finally settle the question.
अ व्हेरी ब्रिटिश स्कॅन्डल
ज्या शास्त्रज्ञाने अडीच लाख लोक मरतील असा अंदाज व्यक्त केला होता आणि ज्याच्या सल्ल्यावरून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्याने आपल्या विवाहित प्रेमिकेला दोनदा घरात घेऊन सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याचे उघड झाल्यामुळे त्याने राजीनामा दिला आहे.
दरम्यान ब्रिटनमधील मृत्यूंचा आकडा २९,४००वर जाऊन पोचला असून आता तो इटलीपेक्षाहीू जास्त आहे, त्यामुळे तो युरोपातला सर्वात मोठा आकडा ठरला आहे.