कसाब आणि चाळीस कोटी रुपये...

कसाबवर चाळीस कोटी रुपये खर्च आला असं आपण सर्रास ऐकत असतो. त्याला जेवायला बिर्याणी दिली त्यावरही जनता खार खाऊन असते. आणि 'अशा नराधमाला बिर्याणी खायला घालून पोसलं तर चाळीस कोटी रुपये खर्च येणारच' असा काहीतरी विचार होतो. आता रोज बिर्याणी खायला घालूनही वर्षाला दहा कोटी रुपये खर्च येणार नाही हे उघड आहे. मग प्रश्न असा येतो की हा चाळीस कोटीचा आकडा नक्की कुठून आला?

भारतीय जनतेतर्फे सरकारने हा जर खर्च केला असेल तर त्याचा हिशोब मिळायला हवा. हा खर्च योग्य प्रमाणात झाला की नाही याची शहानिशा व्हायला हवी. असा हिशोब कोणी केलेला आहे का? मला खात्री आहे की कोणीतरी तो केला असणारच. कसाबसाठी होणारी सगळी व्यवस्था हा राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा मामला होता. तेव्हा त्यावर योग्य तो खर्च होतो आहे की नाही यावर लोकांनी बारीक लक्ष ठेवलेलं असणारच. आणि हिशोब केल्याशिवाय का कोणी ठासून हा आकडा सांगेल? मग या खर्चात नक्की काय काय आलं हे कोणी सांगू शकेल का?

१. त्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात केलेले पोलिस अधिकारी, त्यांचा पगार हे सगळं त्यात आहे का?
२. न्यायप्रक्रियेत केवळ कसाबच्या खटल्याचं कामकाज चालवण्यासाठी जी यंत्रणा लागते तिच्यावरचा खर्च त्यात धरलेला आहे का? वकिलांचा, न्यायाधिशांचा पगार, कोर्ट भरवण्याचा खर्च, तपासकामाचा खर्च इत्यादी.
३. तुरुंगात कैदी बाळगायचा म्हणजे विशिष्ट खर्च येतोच. हा खर्च नक्की किती? कसाब हा विशेष महत्त्वाचा कैदी असल्यामुळे तो किती पट झाला? त्याचा कोणी दुसऱ्या कैद्यानेच खून करू नये म्हणून काही विशेष खर्च करावा लागला का?
४. आणि हो, बिर्याणी... ही दररोज दिली की सणासुदीच्या दिवशी दिली वगैरे काही माहिती आहे का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

इन्डो तिबेट बॉर्डर पोलीस त्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाला बिल पाठवले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कदाचित इंडोतिबेट बॉर्डर पोलिसांना महाराष्ट्रात पाचारण करण्याऐवजी कसाबलाच भारत-तिबेट सीमेच्या बाजूस पाठवून दिले असते, तर खर्च थोडा कमी होऊ शकला असता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिलावरून आठवले.

- कसाबबरोबर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या इंडोतिबेट बॉर्डर पोलिसांनाही बिर्याणी अलौन्स होता काय?
- असल्यास, बिर्याणीवर झालेल्या एकूण खर्चापैकी कसाबने खाल्लेल्या बिर्याणीवर झालेला खर्च किती, आणि इंडोतिबेट बॉर्डर पोलिसांनी खाल्लेल्या बिर्याणीवर झालेला खर्च किती, याच्या ब्रेकडाऊनबद्दल काही माहिती उपलब्ध आहे काय?
- इंडोतिबेट बॉर्डर पोलिसांनी खाल्लेल्या बिर्याणीवरील खर्चाचा आकडा उपरोल्लेखित बिलात अंतर्भूत आहे काय?
- असल्यास, बिर्याणीवर झालेल्या खर्चापैकी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी खाल्लेल्या बिर्याणीवरील खर्चाच्या हिश्शाचे चुकून डबलकाउंटिंग (सरकारच्या एकूण बिर्याणीबजेटात एकदा, नि इंडोतिबेट बॉर्डर पोलिसांच्या एकूण बिलातील लाइनआयटेममधून दुसर्‍यांदा) झालेले असण्याची शक्यता काय?
- या "चुकून" दोनदा मोजल्या गेलेल्या खर्चातून नेमक्या कोणाच्या बिर्याणीची "सोय" झाली असावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय राव तुम्ही पण! छ्या... माहितीच्या अधिकाराखालचा अर्ज करायचा ना. काढला इथं धागा... Wink
हे दोन दुवे, अर्थातच बातम्यांचे असल्याने, ढोबळ माहिती देतात.
एका वर्षापूर्वी
चार दिवसांपूर्वी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्न - ४२,३१३ रुपये
औषधौपचार - ३९,८२९ रुपये
कपडेलत्ता - १८७८ रुपये

हे वाचून मला हसावं की रडावं कळलं नाही. चार वर्षांचा त्याला 'पोसण्याचा' खर्च ~८४००० रुपये. दिवसाला ६० रुपये! तरी लोकं बिर्याणीच्या बोंबा का मारतात?

एकंदरीत झालेला खर्च हा त्याला 'पोसण्याचा' किंवा त्याचे लाड करण्याचा नसून त्यातला पैसा भारतीय सुरक्षा व्यवस्थतल्या जवानांना पगार म्हणून मिळाला आहे. तीस लोक रात्रंदिवस सशस्त्र, जोखमीचं काम करणारे - मग खर्च होणारच. उरलेला पैसा सुरक्षित तुरुंग तयार करण्यासाठी झालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरी लोकं बिर्याणीच्या बोंबा का मारतात?

...मत्सर? (पक्षी: यांना कोणी रोज फुकटात बिर्याणी खाऊ घालत नाही म्हणून?)

अवांतर: या समस्त मत्सरकर्त्यांना चार वर्षांनंतर जर कोणी फासावर लटकवणार असते, तर यांच्या रोजच्या तीन ते चार वेळच्या बिर्याणीच्या खर्चाकरिता कररूपाने माझ्या वाट्याचा हातभार (फूल ना फुलाची पाकळी) लावायला मला काहीही दु:ख झाले नसते. करा म्हणावे जितकी मजा करायची तितकी! रोज बिर्याणी खा! (शाकाहारी असलात, तर व्हेज बिर्याणी खा! नाहीतरी शिक्रण, मटारउसळ आता (पु.लं.बरोबरच) औट-ऑफ-फ्याशन झाली.) चैन करा, लेको! नाहीतर तुम भी क्या याद रख्खोगे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, आता मला बिर्याणी खाऊ घाला पाहू... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघा हं ! चार वर्षांनी फ़ाशी जावे लागेल......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घासुगुर्जींकडून बिर्याणी मागतोय हो मी... सरकारकडून नव्हे. तो कसाब बिच्चाराच! त्याला सरकारी बिर्याणी खावी लागली. तुम्हाला चवीची कल्पना नसेल तर सांगा, सोय करतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरकारी बंदोबस्त अन सरकारी बिर्याणी यांची 'सरकारी' किंमत असेल ती !
नाहीतरी सर्व सरकारी टेंडरांमधले दर बाजारभावापेक्षा किमान दीडपट असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0