टॉक्सिक आई

भारतीय संस्कृती मध्ये आई या शब्दाचा गौरव केला आहे, आई वरच्या कविता आणि भरमसाट कौतुक वाचण्यात आले आहे. पण मला हे अनुभवायला कधीच मिळाले नाही, त्यामुळे माझा या गोष्टीवर विश्वास आहेच असं नाही.

माझ्या आई चे वडील ती चौथीत असताना गेले. वाड्यात राहताना त्या काळी मोलकरीण आणि नोकर होते, आजोबांच्या आजारपणावर खूप खर्च आणि नातेवाईकांनी दिलेले अनुभव या मुले तीच व्यक्तिमत्व वेगवेगळे वळण घेत गेले. लग्नानंतरहि एकत्र कुटुंब आणि मग रांधा वाढा उष्टी काढा या मधेच तीच आयुष्य गेले. स्वतःसाठी फार काही नको असं ती नेहमी म्हणते पण इतरांकडून खूप अपेक्षा. कोणी नातेवाईक आलेले आवडत नाही.

माझी आई प्रेमळ आहे का? असेलहि, मी २५ वर्ष झाले तरी अजून समजू शकले नाही. लहान पणी आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब होतो. आई छोट्या छोट्या गोष्टीत जाम चिडचिड करायची, कामात मदत करत नाही म्हणून सारखे टोमणे, मी आजू बाजूला बघायचे, माझ्या वयाचं कोणीच घरी काहीच काम करत नसे, मग मी हि नाही कराचे, मग आई खूप मारायची, मला आणि दादालाहि, मग दादा ला समजायचं नाही कि मला मार का मिळतोय, तो हि चीड चीड करायचा, मग लहानातं लहान चूक असली तरी दादा हि मला मारायचा. मला लहान पणीच्या कित्येक आठवणी आहेत, ज्या मध्ये बोलून प्रश्न सुटले असते आणि मी मार खाल्ला आहे, मी कोणाला सांगायचे नाही, मला वाटायचे सांगितले तर अजून मार मिळेल. बाबा खूप प्रेमळ, कधी मारायचे नाही, खूप कष्टाळू, त्यांना बघून काम करायची इच्छा व्हायची, हळू हळू मी घरातले बरेच काम करू लागले, झाडू, फरशी, भांडी घासणे, झाडांना पाणी घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, पोळ्या भाजून घेणे, हि सगळी काम मी शाळेत असताना करत होते. तरी हि अधून मधून काही ना काही कारणाने मला मार मिळायच.

मग मला एकांतात रडायची सवय लागली, नशिबाला दोष द्या वगैरे गोष्टी. आता मी अमेरिकेत राहते, थोडं फार डोकं असल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ शकले, पण अजून हि आईच्या अपेक्षा संपत नाही, फोने केला कि उपदेशाचा पाढा चालू होतो, काही प्रश्न विचारला कि भलतंच उत्तर द्यायचे आणि मग परत चुका काढायच्या, असं बार च काही चालू असत, १० वर्ष झाली अमेरिकेत, तरीही एकदा सुद्धा घरून फोन आला नाही, मी २-३ दिवसांनी फोन करते, मलाच करमत नाही, पण मी म्हणले तुम्ही कधी फोन करत नाही तर मला म्हणतात तूच करतेस ना... मी १० दिवस फोन न करता थांबून पहिले, काही कोणी फोन करत नाही, कितीही सक्सेसफुल, आनंद झाला तरी सुद्धा आई काय म्हणेल याची काळजी वाटत राहते, आता लग्न झालाय, सासू प्रेमळ आहे, पहिलं वर्ष, सगळे सण , माहेरून काही ना काही भेट वस्तू येत असतात, माझ्या महेर ची परिस्थिती उत्तम आहे... मला काही काही आले नाही. आता दिवाळी जवळ येत आहे तर मला म्हणाले तुम्हाला जे आवडत ते घ्या.. तुम्ही भारतात आल्यावर पैसे देऊ.. पैसे हवे आहेत कोणाला? त्यात काय मजा आहे?कधी एक फराळ पाठवला नाही कि कधी रक्षाबंधन ची ओवाळणी नाही.. मी मात्र राखी दर वर्षी पाठवली. सासरचे कितीही चांगले असले तरीही त्यांना विशेष वाटते कि हिच्या माहेरून कधीच काहीच कस आलं नाही. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवते. मी नेहमी डिसेंबर मध्ये भारतात जाते, यावर्षी मी म्हणले जमल तर जुन मध्ये येईन आणि माझी आई लगेच म्हणाली "का?" मला कधी जवळ घेत नाही, माझे लाड करत नाही. नेहमी चांगल्या आई बद्दल बोललं जात, मला एक वाट मोकळी करून द्यायची होती माझ्या विचारांना, आणि जर तुमची आई टॉक्सिक असेल तर मला नक्की सांगा.. मला तेवढीच सोबत.. कारण मला हल्ली खूप एकट वाटत.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

प्लानेट, वाईट वाटलं हे वाचून.

माझी आई कर्तबगार बाई होती; तिच्या काळातल्या बहुतेक स्त्रियांना सुपरवुमन सिंड्रोम होता; तिलाही होता. मी १३ वर्षांची असताना ती गेली. त्यामुळे आई ही बाई व्यक्ती म्हणून काय, कशी होती हे मला कधीच समजलं नाही. आता मला त्याबद्दल वाईट वाटतं. तिच्यासाठीही. तिला तिच्यासाठी जगायला वेळच मिळाला नाही.

आपण कधी शारीरिकदृष्ट्या घरच्यांपासून लांब असतो, कधी मानसिकदृष्ट्या. लोक आजूबाजूला असले तरीही एकटेपणा राहतोच. कुणाचा एकटेपणा कमी असतो, कुणाचा जास्त.

तुम्हाला जमलं तर बाबा आणि भावाशी बोलून बघा. त्यांना स्पष्टच सांगून बघा की, छोटीशी काही वस्तू पाठवली तरी तुम्हाला आनंद होईल. किंवा भारतातच मिळतात अशा काही गोष्टी तुम्हीच मागा त्यांच्याकडे. आता तुम्ही शारीरिकदृष्ट्या त्यांच्यापासून पुरेश्या लांब आहात, मोठ्या आहात, तुमचं स्वतःचं स्वतंत्र आयुष्य आहे. जुन्या चांगल्या गोष्टी तेवढ्या जवळ ठेवल्यात तर पुढे आनंद मिळवणं आणखी सोपं होईल कदाचित.

कॉमिक रिलीफ म्हणून 'गिलमोर गर्ल्स' मालिका बघा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे वाचून मानसिक धक्का बसला. माझ्या आईलाही सुपरवुमन सिंड्रोम होता. अनेक बाबतीत माझं तिच्याशी पटायचं नाही. पण तरीही तिने आमच्यासाठी जे काय केलं त्याची जाणीव सदैव मनांत आहे. प्रेमस्वरुप आई सारख्या भावनिक कवितांनी वाहवून जाणाऱ्यातला नसलो तरी, आयुष्यात तिच्या आस्तित्वाचा आम्हाला झालेला फायदा आम्ही नजरेआड करु शकणार नाही. ती अत्यंत स्पष्टवक्ती होती पण तिला कधी टॉक्सिक म्हणावं असं वाटलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

प्रेमस्वरुप आई सारख्या भावनिक कवितांनी वाहवून जाणाऱ्यातला नसलो तरी

बादवे, माधव ज्युलियनांनी 'प्रेमस्वरुप आई' हे जिला उद्देशून लिहिले, ती त्यांची आई नव्हती (आणि ती मेलेलीबिलेलीसुद्वा नव्हती - मा.ज्युं.चा काहीतरी चावटपणा होता तो.), अशी काहीशी थियरी मागे कधीतरी इथे 'ऐसीअक्षरे'वरच वाचल्याचे अंधुकसे स्मरते. चूभूद्याघ्या.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माधव ज्युलियन ह्यांच्या मातोश्री पारंपरिक विचारसरणीच्या होत्या त्यांना लेकाचे आधुनिक विचार (काव्य, देशभक्ती इ पायी पैसे मिळवणे मर्यादा फार महत्त्व न देणे) सहन व्हायचे नाहीत परिणामी मायलेकरांचे कधीच पटले नाही. 'प्रेमस्वरुप आई' हि कविता मनातल्या आईच्या प्रतिमेला आणि खर्या आयुष्यातल्या पोकळिला उद्देशुन लिहिलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय संस्कृती मध्ये आई या शब्दाचा गौरव केला आहे

असे म्हणता? माझी समजूत होती की मातृत्व ही अमेरिकन खासियत आहे म्हणून. कधी 'मातृत्व, आणि सफरचंदावर भाजून मळलेले पीठ घालून भाजून तयार केलेले पक्वान्न, यांच्याइतके अमेरिकन' हा (अमेरिकन) वाक्प्रचार ऐकला नाहीयेत काय?

असो. अमेरिकेप्रमाणेच (तुम्ही म्हणता तर) भारतीय संस्कृतीतसुद्धा मातृत्वाचा (नको तितका) उदोउदो, मखरात बसविणे, हे होत असेलही कदाचित. (त्यामागे, एकीकडे मखरात बसवून दुसरीकडे पायदळी तुडविण्याचा पुरुषी कावा आहे, असा स्त्रीवाद्यांचा दावा असतो. त्यात तथ्य नाही, असे निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. आणि, हे भारतीय किंवा अमेरिकन संस्कृतींतच नव्हे, तर थोड्याफार फरकाने जागतिक पातळीवर होत असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. आफ्टर ऑल, कितीही म्हटले तरी मातृत्व ही अमेरिकन खासियत असण्याचे काही कारण निदान मला तरी दृग्गोचर होत नाही. परंतु ते एक असो.)

तुमच्या कटु अनुभवांबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही. मात्र, तुमच्या (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणाच्याही) आईची बाजू न घेता, ही सगळी भानगड पर्स्पेक्टिवमध्ये घालण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

१. जगात सगळ्या प्रकारची माणसे असतात. किंबहुना, It takes all sorts to make a world असे म्हटले जाते. जगात चांगली माणसे असतात, वाईट असतात; प्रेमळ असतात, दुष्ट असतात; सज्जन असतात, हलकट असतात; सरळमार्गी असतात, लबाड असतात; मनमिळाऊ असतात, खतरूड असतात; निःस्वार्थी असतात, स्वार्थी असतात; बिनाइन असतात, टॉक्सिक असतात. हे गृहीतक मान्य असायला मला वाटते हरकत नसावी.

२. आई ही बोलूनचालून एक मनुष्य आहे, हेदेखील सर्वपक्षी मान्य नसण्याचे काही कारण नसावे.

आता, १. आणि २. यांना छेद देता, आईच तेवढी वाईट, दुष्ट, हलकट, लबाड, खतरूड, स्वार्थी, टॉक्सिक, वगैरे असू शकत नाही, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही; आधार तर नाहीच नाही. (आय मीन, तिनेच काय घोडे मारलेय? तीही माणूसच आहे ना? मग जगातली इतर माणसे जर वाईट, दुष्ट, हलकट, लबाड, खतरूड, स्वार्थी, टॉक्सिक, वगैरे असू शकतात, तर तीच तेवढी का नसावी?)

आईने चांगले, प्रेमळ, सज्जन, सरळमार्गी, मनमिळाऊ, निःस्वार्थी, बिनाइन, वगैरे वगैरे असावे, ही केवळ एक सामाजिक अपेक्षा आहे. तिने तसे असण्यात अपत्याच्या दृष्टीने असलेले फायदे मी नाकारणार नाही, परंतु म्हणून तिने तसे(च) असणे हे(च) नैसर्गिक आहे, डीफॉल्ट स्थिती आहे, वगैरे मानणे ही दिशाभूल आहे, (स्वतःचीच) फसवणूक आहे, स्टीरियोटाइप आहे. (फार कशाला, हे 'नॉर्मल' असण्याबाबतसुद्धा मी साशंक आहे. एक तर 'जगातल्या पन्नास टक्क्यांहून अधिक आया या चांगल्या, प्रेमळ, सज्जन, सरळमार्गी, मनमिळाऊ, निःस्वार्थी, बिनाइन, वगैरे असतात' असे दाखवून देणारे कोणतेही सर्वेक्षण निदान माझ्या तरी ऐकण्यात नाही; आपल्या ऐकण्यात असल्यास जरूर कळवावे. (सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.) दुसरे म्हणजे, असे काही समजा सर्वेक्षणाअंती उघडकीस जरी झाले, तरी, या 'नॉर्म'मागे नैसर्गिक वृत्तीचा भाग किती, नि सामाजिक कंडिशनिंग किती, हेदेखील प्रश्नांकितच आहे.) तर ते एक असो.

हॅविंग सेड दॅट,

नेहमी चांगल्या आई बद्दल बोललं जात, मला एक वाट मोकळी करून द्यायची होती माझ्या विचारांना

इथवर ठीक आहे. बोले तो, ही तुमची खाजगी बाब असली, तरी इथे चव्हाट्यावर ती चर्चायची की नाही, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. (I wouldn't have done it, had I been you; but, after all, I am not you. My personal matters, good or bad, are none of anybody's business, ही माझी विचारसरणी असेलही, परंतु ती तुमची (तथा सगळ्या जगाची) असणे हेच इष्ट आहे, असे मला कितीही वाटले, तरी तसा आग्रह मी धरू शकत नाही. त्यामुळे, चालू द्या.)

मात्र,

आणि जर तुमची आई टॉक्सिक असेल तर मला नक्की सांगा.. मला तेवढीच सोबत..

इथल्या लोकांच्या आया टॉक्सिक असतीलही, किंवा नसतीलही. परंतु, ही अत्यंत खाजगी बाब, ना ओळखीच्या, ना पाळखीच्या, अशा तुमच्याबरोबर, शिळोप्याच्या गप्पा मारल्यागत चघळत, लोक शेअर काय म्हणून करतील, नि इथे चव्हाट्यावर नक्की काय म्हणून मांडतील, असे तुम्हाला वाटते? आणि, तेही, of all the things, तुम्हाला कंपनी म्हणून?

की, हा लोकांना बोलते करून त्यांचा खाजगी डेटा हार्वेस्ट करण्याचा, सोशल इंजिनियरिंगवाला काही प्रकार आहे? (In which case, it would be interesting to see how many people fall for it.)

असो.

----------

तळटीपा:

'सॉसेज'चे मराठी भाषांतर 'डुकराच्या मांसाचे तळलेले भजे' असे करणाऱ्या पठडीतल्या एका इंग्रजी-मराठी शब्दकोशवजा संकेतस्थळावरून 'ॲपल पाय'चे हे भाषांतर जुळविलेले आहे. प्रस्तुत स्थळी 'पाय'चा प्रस्तुत संदर्भात वापरता येण्याजोगा अर्थ 'मांस किंवा फळे इ. वर पेस्ट्री घालून भाजून तयार केलेले पक्वान्न' असा मिळाला. त्याउपर, 'पेस्ट्री'चा प्रस्तुत संदर्भात वापरता येण्याजोगा अर्थ 'भाजून मळलेले पीठ' असा दिला आहे. 'ॲपल'चे (प्रस्तुत संदर्भातील) मराठी भाषांतर 'सफरचंद' असे करण्यासाठी, मला वाटते, शब्दकोशाची गरज नसावी. चूभूद्याघ्या.

थोडक्यात, '(as American as) motherhood and apple pie'. पाठभेद: '(as American as) mom and apple pie', '(as American as) mom, apple pie, and flag', इ.इ. (मातृत्वाप्रमाणेच इतर देशांना राष्ट्रध्वजसुद्धा नसतात!) असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथल्या लोकांच्या आया टॉक्सिक असतीलही, किंवा नसतीलही. परंतु, ही अत्यंत खाजगी बाब, ना ओळखीच्या, ना पाळखीच्या, अशा तुमच्याबरोबर, शिळोप्याच्या गप्पा मारल्यागत चघळत, लोक शेअर काय म्हणून करतील, नि इथे चव्हाट्यावर नक्की काय म्हणून मांडतील, असे तुम्हाला वाटते? आणि, तेही, of all the things, तुम्हाला कंपनी म्हणून?

I take that back!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"Oh Matthew, we do love you very much"
"I don't want to be loved very much, I want to be LOVED."
"But there's no such thing as love, only proofs of love. Which proof would you have from us ?"

वाचून वाईट वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You know, sometimes I think I was born with a leak, and any goodness I started with just slowly spilled out of me and now its all gone. And I'll never get it back in me.
~ BoJack Horseman Secret

वाईट वाटले.

तुमचे अनुभव म्हणाल तर माझी आई टॉक्सिक नव्हती उलट प्रेमळ आणि इतरांच्यात मिसळणारी होती. आवडीच्या वस्तू आवर्जून करणे ही एक प्रेम व्यक्त करायची पद्धत त्या काळी होती. अमच्याकडे पाहुणे ओळखींच्यांची रीघ असायची. कमीतकमी तीन ठरलेले. घर लहान त्यामुळे राहायला येत नसत आणि तसे लांबून येणारे कुणी नव्हते.

आता आया अशा का वागतात याची कारणे म्हणजे
१) एकत्र कुटंब पद्धती. त्यात कोल्ड वॉर असते. स्पष्ट काही नसते पण राग असतो. सासूसासऱ्यांचे लाडके आणि फेवरिटिझम असतो.
२) तो राग मुलांवर काढला जातो.
३) एकत्र कुटुंबात नसले तरी नवऱ्याच्या वागणूकीचा राग असतो। त्या काळी किंवा सरळसरळ घटस्फोट होत नाही आणि राग बाहेर पडतो.
४) जेव्हा परिस्थिती सुधारते तेव्हा वेळ आणि वय निघून गेलेले असते.

तुम्ही कारणं विचारली नाहीत तरी दिलीत. तुमच्या आईला घराबाहेर कुठे तिच्याआवडीच्या ठिकाणी न्या. फरक पडेल नक्की.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

तुमच्या आईला घराबाहेर कुठे तिच्याआवडीच्या ठिकाणी न्या. फरक पडेल नक्की.

फुकटचे सल्ले देऊ नयेत. ते अंगावर उलटू शकतात. खास करून 'नक्की' वगैरे गॅरंटीवजा शब्द वापरून छातीठोकपणे दिलेले सल्ले तर नक्की उलटू शकतात. (हा आमचा फुकटचा सल्ला.)

कसे असते, की कायम वाकडे तोंड करण्याची सवय असलेल्या माणसाला मोत्यांचा चारा/पंचपक्वान्ने/मुरांबा/केळ्याची शिकरण/मटार उसळ वगैरे जरी भरवलेत, तरी त्याचे तोंड (कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे) वाकडे ते वाकडेच राहायचे, हा जगाचा नियम आहे. त्यामुळे, समजा तुमचा सल्ला मानून लेखिकेने (स्वतःच्या पर्समधून खर्च करून) आईला तिच्या (तथाकथित) आवडीच्या ठिकाणी जरी नेले, आणि त्यानंतरसुद्धा आईचे तोंड वाकडेच राहिले / लेखिकेला तिला अपेक्षित असलेले कौतुक मिळाले नाही, तर मग लेखिकेने काय तुम्हाला शिव्या घालायच्या, की आर्थिक नुकसानभरपाईसाठी तुम्हाला धरायचे?

त्यामुळे, (तुमच्या एखाद्या मित्राचा ट्रॅव्हल एजन्सीचा धंदा असल्याखेरीज, आणि लेखिकेच्या आईच्या ट्रिपमधून तुम्हाला त्याच्याकडून काही कमिशन वगैरे मिळण्याची शक्यता असल्याखेरीज) या लष्करच्या भाकऱ्या भाजण्यात काही हशील निदान मला तरी दिसत नाही. बाकी तुमची मर्जी.

असो. चालू द्या.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सल्ले देऊन झाले. आता खाडाखोड नाही करणार

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मारणे वगळता बाकी सर्व गोष्टी अगदी परफ़ेक्ट नॉर्मल रेंजमधे बसतात असं वाटतं. हा विशिष्ट अपेक्षांतून आलेला भंग असावा.

खरोखर प्रेम दाखवणारी आई असती तर आपली स्वत:ची आई वाटलीच नसती. श्यामची वाटली असती.

मुलाची चाळिशी आली तरी अजून..

"पुन्हा तूरडाळ विसरलास.. जा परत आत्ताच्या आत्ता आणि घेऊन ये"

"कप तिरका होतोय, चहा सांडेल."

"लहानपणापासून तुला इतक्या चांगल्या सवयी लावल्या पण काय उपयोग झाला?"

एकूण आपण अगदीच वाया गेलो, संस्कारातले काहीच बरे उचलले नाही आणि अजूनही वयाने वाढूनही काही सुधारणा झालेली नाही अशा रितीने उपदेश वगैरे हे जोपर्यंत चालू आहे तोवर पाठीवर हात आहे आणि डोक्यावर छत्र आहे याबद्दल निश्चिंती आहे. इतके बस्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलाची चाळिशी आली तरी अजून..

हे जोपर्यंत चालू आहे तोवर पाठीवर हात आहे आणि डोक्यावर छत्र आहे याबद्दल निश्चिंती आहे. इतके बस्स.

चाळीस वर्षांच्या घोड्याला पाठीवर हात नि डोक्यावर छत्र कशाला लागते?

नाही, म्हणजे... त्यांनी आता मरावे वगैरे असे काही मुळीच म्हणत नाहीये मी... जीवेत शरदः शतम् अँड अ मेरी ख्रिसमस टू यू (विथ अ व्हेरी हॅपी दिवाली थ्रोन इन फॉर गुड मेझर) अँड ऑल दॅट गुड स्टफ... (ईद मुबारक!) परंतु, 'पाठीवर हात आहे... डोक्यावर छत्र आहे... निश्चिंती आहे' अशी अवलंबित्वाची भाषा कशासाठी, हे समजत नाही.

'डोक्यावर छत्र, पाठीवर हात (...हुश्श!)' वगैरे हे प्रौढत्वास न पोहोचलेल्या, स्वतःच्या पायांवर अद्याप उभ्या न राहिलेल्या व्यक्तीसाठी ठीक आहे. वयाच्या चाळिसाव्या वर्षीसुद्धा हे असे होत असेल तर... असो.

(नाही म्हणजे, आईवडिलांविषयी रँकरच असावा, असलाच पाहिजे, असेही म्हणत नाहीये. लेट देम अर्न दॅट. परंतु, ॲट दॅट पॉइंट, हे एक साधे, ईक्वल फूटिंगवरचे ह्यूमन-टू-ह्यूमन रिलेशन का होऊ नये, हे कळत नाही. असो.)

(तसे आम्हाला काहीच कळत नाही, हे आतापावेतो जगजाहीर आहे म्हणा. त्यामुळे, जाऊ द्या!)

तर आपली स्वत:ची आई वाटलीच नसती. श्यामची वाटली असती.

श्यामची आई हे एक फिक्शन आहे. त्यामुळे, चालू द्या.

(किंबहुना, त्या ष्टोरीत श्याम आपल्या आईची ष्टोरी नॅरेट करतो, हे लक्षात घेता, याला फिक्शनमधील फिक्शन म्हणता येईल काय?)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

चाळीस वर्षांच्या घोड्याला पाठीवर हात नि डोक्यावर छत्र कशाला लागते?

लागत नाही. जाणवतं फक्त.
तसे जीवनावश्यकही त्यात काही नाही.
जाणवणे आणि "लागणे" यात फरक असू शकतो ना?

चाळीसच कशाला, विशीतही हे छत्र बित्र गमावलं तरी लाईफ गोज ऑन. लागत बिगत कोणाला काही नाही.

प्रतिसाद मातेचे प्रेम "दिसण्या"बद्दल अपेक्षा तपासून घेण्याबाबत होता.

तरीही रोचक दिली आहे . (..तुम्ही कित्ती हुशार आहात, वशिला असता तर निष्णात वकील किंवा पोपच्या खालोखालच्या दर्जाचे अधिकारी इ .इ ...)

१ . मांडून ठेवावी.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूल जन्माला घालण्याचा आणि प्रेमळ, भावनिकदृष्ट्या सुस्थिर असण्याचा सम्बन्ध हा आपणच जोडलेला असतो. आई म्हटली की तिचा Emotional Quotient उच्च असायलाच हवा असं शक्य नाही. वयपरत्वे आणि इतर अनुभवांमधून येणाऱ्या insecurities, भीती तिलाही असणार, इतर मानसिक आजारही तिला असू शकतात, हे मान्य करणं अवघड असलं तरी करावंच लागतं.

माझ्या आईला देखील सुपर वूमन सिन्ड्रोम बरीच वर्षे होता. पण त्यात अध्याह्रत अशी आम्हा मुलींकडून कौतुक/ आदर/ तिचं सगळ कर्तृत्व आम्हाला जीवनवश्यक असल्याची पावती मिळत राहण्याची गरजही सामावलेली होती.
मी मोठी होउन,स्वतंत्र आयुष्य जगायला लागल्यावर ही गरज माझ्याकडून सदासर्वकाळ भागेनाशी झाल्यावर मी आपोआप नावडती होत गेले. त्यातच माझी धाकटी बहीण मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या अजूनही आई बाबांवर अवलम्बून असल्यामुळे, ती आपोआपच चांगली ठरत गेली. काही अंशी मला माझ्या ज्या अचिव्हमेंट्सचा, स्वतंत्र असण्याचा, एकटीने आनंदात राहू शकण्याचा अभिमान होता, त्याच माझ्या आईच्या दृष्टीने वाईट ठरत गेल्या.
आईचं नोकरीतून निवृत्त होणं, बहिणीचं लग्न होउन ती दुसऱ्या गावात राहायला जाणं, या सगळ्यांतून ती आणखी दुरावतच गेली आहे.

सुरुवातीला मलाही या गोष्टीचा त्रास झाला. पण आता माझ्या अनेक मैत्रिणी आई झाल्यावर मातृत्वाबद्दल मी वेगळ्या बाजूने विचार करायला लागले आहे.
या सगळ्यात माझं आई बरोबरच नातं आता टिपिकल आई-मुलीचं राहिलं नाही हे सरळच आहे. आता मी फक्त तिच्याकडे एका मानसिक आधाराची गरज असलेल्या ओळखीच्या स्त्री सारखं पाहते. जमेल तशी मदत करते. पण तिला माझं कौतुक वाटलं पाहिजे ही अपेक्षा सोडून दिली आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळे सुपरवुमन सिंड्रोम बद्दल बोलतायत. कारण तो सिंड्रोम सांगण्यास विशेष वाईट वाटत नाही. प्लॅनेट माझी आई मानसिकदृष्ट्या अत्यंत कंट्रोलिंग होती किंवा अनमॅनेजड डिसॉर्डर असलेली होती हे कोणी इथे स्पष्ट लिहीणार आहे का? स्पेशली जेव्हा इथे बऱ्याच लोकांनी वास्तव जगातील ओळख लपवलेली नसताना. तुम्ही अनामिक आहात सो यु कॅन "ॲफोर्ड" इट. असो.

मला माझ्या आईविषयी सांगायचे नाही. बरेही व वाईटही. हा धागा मला तद्दन निरर्थक वाटला. पहील्यांदा येस. नेनेंची प्रतिक्रीया आवडाली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'काही घेणे नाही, देणे नाही, तरी फट् म्हणता सल्ला द्यायला सरसावून येणे' हा हिंदू समाजाचा स्थायीभाव आहे. (युअर्स ट्रूली नॉट एक्स्क्लूडेड.)

Minding one's own business is not an Indian virtue.

(पण आहे हेच बरे आहे. नाहीतर मराठी संस्थळे ओस पडतील.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हमरस्ता नाकारताना - सरिता आव्हाड हे पुस्तक याच विषयावर आहे.
https://www.aksharnama.com/client/article_detail/3635

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अगदी. पण मुलीने फक्त तिच्या स्वतःच्या बाजूने लिहिले आहे, त्यामुळे संशयाला जागा उरते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मला काय वाटतं' वगैरे निवेदनांमध्ये संशयाला काहीही जागा नसते. प्लानेट ह्यांची आई खरोखर कशी आहे, ह्यात मला फार रस नाही. मात्र प्लानेट ह्यांनी फार दुःखात असू नये, दुःख होत असलं तरी त्यांच्या आयुष्यात इतर काही, इतर अनेक चांगल्या गोष्टी होत असतील, होणं शक्य असेल ह्याकडे बहुतेकसं लक्ष द्यावं, असं मात्र मला आवर्जून वाटतं.

'न'वी बाजूंचे सगळे प्रतिसाद मी वाचले नाहीत. पण त्यांचं हे म्हणणं मला मान्य आहे - आईसुद्धा एक मनुष्यच असते; तिलाही मनुष्य म्हणून अनेक मर्यादा असतात.

तेव्हा 'हे-आहे-हे-असं-आहे' हे मान्य करून आपल्याला काय हवं आहे ते आपलं आपण मिळवण्याचा प्रयत्न करणं बरं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला 'हमरस्ता नाकारताना' हे पुस्तक अतिशय एकांगी वाटलं होतं. देवस्थळी बाईंच्या भाचीची प्रतिक्रियाही मी वाचली होती. लेखिकेविषयी संशय असं नाही, पण त्यांची एकेका प्रसंगातली मानसिक स्थिती आणि परिस्थितीचे मूल्यमापन यात गफलत झालेली असू शकते, असं वाटून गेलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'दोन बायका जेव्हा नळावर भांडतात, तेव्हा जे बाहेर पडते, ते सत्य.' स‌त्याची व्याख्या कोणीतरी (अर्थातच पुरुषाने) अशी केली आहे.

इथे तर तीन बायका आहेत!

(जाऊद्या. एवढे सीरियसली नका घेऊ. आव्हाडबाईंनासुद्धा, देवस्थळेबाईंनासुद्धा, नि देवस्थळेबाईंच्या भाचीलासुद्धा. (फुकटचा सल्ला. अगदी सरसावून दिलेला.))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

इथे सुमती देवस्थळे यांची बाजू त्यांच्या भाचीने मांडली आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What Paul says about Peter tells us more about Paul than about Peter
-Baruch Spinoza

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

(रुमाल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचले.
मला वाटते, आत्मचरित्र हे तटस्थ वृत्तीने लिहीता येत असेल तरच लिहावे. नाहीतर ते एकांगी होते. समोरच्याच्या चूका दाखवतांना आपण कुठे चुकलो? हे ही नमूद करता यावे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज तुमची संपली आहे असा मला निरोप झळकेल काय असे वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

हे पुस्तक रडके आहे हा सल्ला मिळाल्याने शालेय जीवनात वाचायचे पूर्ण टाळले होते ते आता वाचले हे एक अर्थी बरेच झाले.
त्या वेळी वाचले असते तर शामच्या आईबद्दल - तिच्या वागणुकीबद्दल - स्वभावाबद्दल विचार करत राहिलो असतो.
पण आता ते एक समाजचित्रण आहे असं मी घेतलं. कादंबरी/कथा माध्यमातून गुंफुन ते ऐतिहासिक झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्यामची आई वाचून श्यामच्या आईच्या वागणुकीबद्दल विचार करणे हे म्हणजे साधारणतः (जुनीच थीम आळवायची, तर) भारतीय रेल्वेचे टाइमटेबल वाचून त्यातील तमाम गाड्यांच्या वक्तशीरपणाचे कौतुक करण्यासारखे आहे.

सोडून सोडा हो! फिक्शन आहे ते.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचं मनोगत वाचलं-
इतक्या प्रांजळपणे लिहिलेलं भावलं आहे.
आपल्याकडे (म्हणजे मराठी-भारतीय लोकांमधे तरी) प्रत्येकावर एक "इमेज" लादलेली असते, आणि बायकांसाठी ती बरेचदा अशक्य कोटीतली (महान, त्यागी वगैरे) असते.
शिवाय -
All happy families are alike; each unhappy family is unhappy in its own way.

काही सल्ला वगैरे द्यायची कुवत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्लॅनेट , मला तुमच्या भावनासमजू शकतात. आई वडिलांचे प्रेम न मिळाल्याचे व्रण आयुष्यभर राहतात. हे काही छोटे दुःख नाही. मी early childhood development या विषयात संशोधन करते. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्याचे गांभीर्य मला कळते. आपण नेहमी समाजाच्या दबावामुळे या विषयांना वाचा फोडत नाही.  त्याची परिणीती मानसिक त्रासात होऊ शकते.
 
इंग्रजी मध्ये मराठी पेक्षा वेगवेगळ्या आयांची वर्णने आहेत असे मला वाटते. मुलीला न समजून घेणारी आई , स्वार्थी आई, आत्मकेंद्रित आया ह्या त्या बायांना ढोबळ प्रकारच्या खलनायिका न करता दाखवली आहेत. काही उदाहरणे द्यायची झाली तर: Joy Luck Club, Women's Room, Monalisa Smile, East of Eden, If you Tell, The art of Mending. या वाचून तुम्हाला तुम्ही एकट्या नाही असे वाटेल. 
बाप वाईट असू शकतात, भाऊ वाईट असू शकतात, बहिणी वाईट असू शकतात, बायको वाईट असू शकते, तशा काही आया पण वाईट/वेगळ्या असू शकतात. दुर्दैवाने, आईच्या नात्याकडून अपेक्षा एवढ्या मोठ्या असतात की ती बाई त्या कसोटीला उतरू शकली नाही कि मुलांना फार वाईट वाटते. त्या नात्याचे मुलांच्या आयुष्यात एवढे मोठे स्थान असते कि ते नाते जर कमी पडले कि त्याचे दुःख हि मोठे असते. 

तुम्ही स्वतःच स्वतःला समजावता येतेय का पहा. वडिलांशी तुमचे नाते बळकट करा. माया फक्त आईच देते असे नाही, वडीलही देतात. भावाशी बोला. आईशी नसलेले नाते या मुळे भरून येणार नाही पण बोच कमी होईल. तरी पण बरे नाही वाटले तर सरळ counselling घ्या. त्यात काही गैर नाही. 

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप छान प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Matilda (1996) या चित्रपटातील गोड मुलीला अत्यंत स्वार्थी आई-वडिल भेटलेले असतात. शाळेतली मुख्याध्यापिका भयानक राक्षसी असते. पण तिला खरे मातृतुल्य प्रेम एका दुसऱ्या शिक्षिकेकडून मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

गेल्या आठवड्यात पंकज भोसलेंचा हा अवनी दोशी यांच्या कादंबरीवरचा लेख वाचला.

अपवादाने आई-मुलीच्या नात्यामध्ये दूरावा असू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आई ह्या व्यक्तीला आपल्या संस्कृतीत देव बनवून ठेवलेय. माझी आई देव कधीच नव्हती, माझ्यासाठी तरी नाही. मला आठवतेय तेव्हापासून तिने माझा फक्त छळच केला. तशी बाकीच्या भावंडांशी पण प्रेमाने वगैरे ती वागली नाही. तिला फक्त तिचा स्वार्थ कळायचा. 'मुलगा म्हातारपणाची काठी' म्हणून लहानपणापासून तिने भावाला जवळ केलेले! मी वडीलांची फार लाडकी होते. वडील मला कधीच रागवले नाहीत, त्यामुळे ती माझा फार दु:स्वास करायची असे मला जाणवते.
असो.
मी आई म्हणून कशी आहे? ह्याचा मी जेव्हा विचार करते तेव्हा तर् तिचे वागणे मला फार खटकते.
आज मी लेखिका म्हणून ओळखली जाते, माझे व्यक्तिमत्व बॅलन्स आहे ही देवाची कृपा म्हणायची.
ह्याच भावनेवर आधारीत 'आशा आपराद' यांचे 'दु:ख जे भोगले त्याला.." हे आत्मचरित्र वाचा. आपल्यासारखी माणसे अजून बरीच आहेत जगात! Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नारसिस्ट असावि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नारसिस्ट असावि

शब्दच वापरायचा, तर नीट तरी वापरा ना! नारसिसिस्ट!!! (उच्चार)

की आपला ऐकला शब्द अर्धवट कोठूनतरी, नि दिला ठोकून!?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रमाण जरा कमी असावं, म्हणून एक “सि” गाळला असावा.

😉

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दामागचा देव ग्रीक आहे. तेव्हा नीटच वापरायचा तर ‘नार्किसिस्ट’. बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

https://www.psychologytoday.com/us/blog/communication-success/201908/dif...

नार्सिसिस्टिक?
निदान वर्तनाचे विशेषण म्हणून वापरायचे असेल तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Journey Is the Reward...

Pedantry may be defined, for the purpose of this book, as the saying of things in language so learned or so demonstratively accurate as to imply a slur upon the generality, who are not capable or desirous of such displays. The term, then, is obviously a relative one; my pedantry is your scholarship, his reasonable accuracy, her irreducible minimum of education, & someone else’s ignorance. It is therefore not very profitable to dogmatize here on the subject; an essay would establish not what pedantry is, but only the place in the scale occupied by the author; & that, so far as it is worth inquiring into, can better be ascertained from the treatment of details […].
फाउलरसाहेबाचे हे मत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...शुद्ध अमेरिकनमध्ये सांगायचे, तर, टोमेटो, टोमाटो???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

You like potato and I like potahto
You like tomato and I like tomahto
Potato, potahto, tomato, tomahto
Let's call the whole thing off
But oh, if we call the whole thing off then we must part
And oh, if we ever part, then that might break my heart

.
हा सिनेमाही फार विनोदी आहे. मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0