Skip to main content

बखर....कोरोनाची (भाग ८)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---

Ahmedabad testing

सध्या लसीकरण जोमाने चालू आहे. मात्र श्रीमंत देशांनी जास्तीच्या लशी मागवून घेतल्या आहेत आणि गरीब देशांना लशी मिळत नाहीत अशी तक्रारही केली जाते आहे. इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे केल्या गेलेल्या अभ्यासावर आधारित न्यू यॉर्क टाईम्सच्या ह्या वार्तांकनानुसार लसीकरणात समता नसेल आणि गरीब देशांत जर साथ आटोक्यात आली नाही, तर त्याचाही आर्थिक फटका श्रीमंत देशांना बसणार आहेच.
If Poor Countries Go Unvaccinated, a Study Says, Rich Ones Will Pay

राजेश घासकडवी Tue, 26/01/2021 - 20:59

कुठचे गरीब देश? भारत, चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ या देशांत मिळून जगातली निम्मी लोकसंख्या आहे जवळजवळ. या देशांत मृत्यूदर मिलियनमागे १००हून कमी आहे. सगळ्या पाश्चिमात्य, श्रीमंत देशांत तो दहापट आहे. यात अकारण गरीब-श्रीमंत डिव्हाइड करून, 'गरीब देशांना बघा कशा लशी मिळत नाहीयेत, हो' असे कढ काढण्याची काय गरज आहे?

आज खरं तर अमेरिका, युके, फ्रान्स वगैरे देशांना या 'गरीब' देशांकडून मदत होण्याची गरज आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/01/2021 - 00:13

In reply to by राजेश घासकडवी

देश बंद करायला लागणं, व्यवसाय बंद होणं, बेरोजगारी असेही काही प्रश्न असावेत. कारण ते अर्थकारणाबद्दल बोलत आहेत. मूळ वृत्तांकनातून -

If people in developing countries remain out of work because of lockdowns required to choke off the spread of the virus, they will have less money to spend, reducing sales for exporters in North America, Europe and East Asia. Multinational companies in advanced nations will also struggle to secure required parts, components and commodities.

At the center of the story is the reality that most international trade involves not finished wares but parts that are shipped from one country to another to be folded into products. Of the $18 trillion worth of goods that were traded last year, so-called intermediate goods represented $11 trillion, according to the Organization for Economic Cooperation and Development.

चिंतातुर जंतू Wed, 27/01/2021 - 10:00

ऑक्सफॅम या संस्थेने असमतेविषयी एक अहवाल प्रकाशित केला आहे - ‘The Inequality Virus’. त्यानुसार भारतातल्या अतिश्रीमंत लोकांची संपत्ती लॉकडाऊनमध्येच ३५% वाढली, तर उर्वरित लाखो भारतीयांचे उत्पन्नाचे स्रोत आटले -
Covid deepened inequalities: wealth, education, gender

“In fact, the increase in wealth of the top 11 billionaires of India during the pandemic could sustain the NREGS scheme for 10 years or the health ministry for 10 years,” according to Oxfam’s calculations.

चिंतातुर जंतू Wed, 03/02/2021 - 15:21

करोनाशी लढण्यासाठी यूकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेला मदत करण्याचे आवाहन करून तब्बल ३३ मिलियन पाउंड गोळा करणाऱ्या कॅप्टन (सर) टॉम मूर यांचे करोनाने निधन झाले आहे. दुसऱ्या महायुद्धात कॅ. मूर भारतात आणि ब्रह्मदेशात लढले होते.
Captain Sir Tom Moore: 'National inspiration' dies with Covid-19

चिंतातुर जंतू Thu, 04/02/2021 - 19:24

सीरम / ऑक्सफर्ड / ॲस्ट्राझेनेका लशीमुळे लस घेणाऱ्याला तर विषाणूपासून संरक्षण मिळतंच, पण त्याच्याकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही एका डोसमध्येच कमी होतो असं दिसून आलं आहे -
Single dose of AstraZeneca vaccine could cut transmission by 67%

तिरशिंगराव Thu, 04/02/2021 - 19:55

मॉडर्ना लशीच्या पहिल्या डोस नंतर फक्त दंड दुखला होता. दुसऱ्या डोसनंतर मात्र, बरोब्बर १२ तासांनंतर प्रचंड अंगदुखीसहित हुडहुडी भरुन ताप भरला, पण एका पॅरासिटॅमॉलच्या टॅब्लेटने उतरला. असा जवळच्या नातेवाईकाचा अमेरिकेतला खात्रीलायक रिपोर्ट आहे. बहुतेक लोकांना दुसऱ्या डोसनंतरच हा अनुभव आला आहे.

चिंतातुर जंतू Mon, 08/02/2021 - 11:03

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या विषाणूच्या नव्या प्रकाराला ऑक्सफर्ड (भारतात सीरमची कोव्हिशील्ड) फारशी परिणामकारक ठरत नसल्यामुळे द. आफ्रिकन सरकारने पुढच्या आठवड्यात चालू होणारी आपली लसीकरण मोहीम स्थगित केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन आणि फायझरची लस उपलब्ध करून देण्याचा त्यांचा विचार दिसतो आहे. (ऑक्सफर्डच्या मते संसर्गातून गंभीर आजार होण्याला त्यांच्या लशीमुळे आळा बसेल.)
South Africa halts AstraZeneca jab over new strain

चिंतातुर जंतू Sun, 14/02/2021 - 13:27

स्वीडन आणि भारत यांचा साथीला प्रतिसाद काय होता, आणि आज काय परिस्थिती आहे याची तुलना करणारा डॉ. मृदुला बेळे यांचा लेख आजच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मधून.

अनुप ढेरे Mon, 15/02/2021 - 13:16

India disappoints both, the pessimists as well as optimists. हे वाक्य वाचले अलिकडे. कोव्हिडच्या बाबतीत आत्तापर्यन्त पेसिमिस्ट लोक खोटे ठरले आहेत. गेल्या आठवड्याभरात पुण्यात रुग्णसंख्या बरीच वाढते आहे. टेस्ट पोझिटिव्हिटी रेशो आधी ६% होता तो आता १०% आहे. ऑप्टिमिस्ट लोक निराश होणार आता अशी चिन्हे आहेत.

चिंतातुर जंतू Mon, 15/02/2021 - 21:05

“कदाचित कठोर निर्णय घ्यावे लागतील, मानसिकता तयार ठेवा” - अजित पवार

राज्यातील करोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा काल एकाच दिवसांत चार हजारापेक्षा अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे प्रशासन काही कठोर पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषदेत तसा सूचक इशारा देखील दिला. नागिरकांनी मानसिकता तयार ठेवावी, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

चिंतातुर जंतू Wed, 17/02/2021 - 15:01

जागतिक आरोग्य संघटनेने आता ऑक्सफर्ड (भारतात सीरमची कोव्हिशील्ड) लशीला मान्यता दिली आहे. COVAX या कार्यक्रमांतर्गत गरीब देशांना लस पुरवण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेमार्फत होत आहे. त्यातील बहुतांश डोस (३३ कोटी) या लशीचे असतील.
WHO approves AstraZeneca/Oxford COVID-19 vaccine for emergency use

चिंतातुर जंतू Tue, 23/02/2021 - 09:00

अमेरिकेत करोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या आता पाच लाखांवर गेली आहे. दोन महायुद्धे व व्हिएतनाम युद्धांत मरण पावलेल्या सैनिकांच्या एकूण संख्येहून ही अधिक आहे. सरकारी इमारतींवरील ध्वज अर्धा उतरवला जाणार आहे.

चिंतातुर जंतू Tue, 23/02/2021 - 16:38

इस्राएलमध्ये निम्म्याहून अधिक नागरिकांना लस मिळाली आहे. त्यामुळे अशा नागरिकांना 'ग्रीन पास' घेऊन जिम, हॉटेल, स्विमिंग पूल आदि ठिकाणी जाता येणार -
vaccinated Israelis to enjoy bars and hotels with ‘green pass’

चिंतातुर जंतू Wed, 24/02/2021 - 11:52

लशींच्या परिणामकारकतेविषयी इंग्लंडमधून येणारी माहिती दिलासादायक आहे. फायझर आणि सीरम (AstraZeneca) यांच्या लशीनंतर आजार बळावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे.
Covid vaccines - 'spectacular' impact on serious illness

चिंतातुर जंतू Thu, 25/02/2021 - 12:56

१ मार्चपासून भारतातील लसीकरणाचा पुढचा टप्पा चालू होणार. यात ६०+ वयाच्या लोकांना आणि को-मॉर्बिडिटीज असणाऱ्या ४५+ वयाच्या लोकांना लस मिळणार -
समजून घ्या : सोमवारपासून कोणाला, कधी आणि कशापद्धतीने मिळणार करोना लस?, कुठे करावी लागणार नोंदणी?

चिंतातुर जंतू Fri, 26/02/2021 - 16:56

एकीकडे WHO आणि अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी उच्चभ्रू जगाला सांगतायत की सगळ्या देशांमध्ये पुरेसं लसीकरण झाल्याशिवाय जगाचं काही खरं नाही, तर दुसरीकडे इस्राएल आणि युरोप आपल्याच नागरिकांमध्ये लस घेतलेले आणि न घेतलेले अशी वर्णव्यवस्था निर्माण करते आहे. 'लेट कॅपिटलिझम'चा असाही एक आविष्कार ;-)
EU urged to adopt 'vaccine passports'

तिरशिंगराव Tue, 02/03/2021 - 16:31

१ मार्चला सरकारी संकेतस्थळ, https://www.cowin.gov.in/home इथे रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला. प्रथम मोबाईलवर त्वरित ओटीपी आला म्हणून खूष झालो होतो. पण रजिस्ट्रेशन व्यवस्थित झाल्यावर स्केड्युल ठरवायला गेलो. प्रथम महाराष्ट्र राज्य, मग जिल्हा पुणे, प्रभाग पुणे इथपर्यंत नीट झालं. त्यानंतर लिस्टमध्ये सर्व हॉस्पिटल्सही आली. जवळचं म्हणून जोशी हॉस्पिटल निवडलं. पण त्याचा पिनकोड त्यांच्या लिस्टमध्ये नव्हता. आणि पिनकोड सिलेक्ट केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. त्याचप्रमाणे कुठलंही सेंटर निवडलं तरी सर्व स्लॉटस फुल दाखवतात. आधी मला शंका आली की, आयआरसीटीसीच्या साईटप्रमाणे , सकाळी ९ वाजता सुरु झाल्यावर ९ वाजून एक मिनिटांनी सर्व बुकिंग्ज फुल झाली की काय? पण असाच अनुभव माझ्या अन्य मित्रांना मुंबई, पुणे, अमदाबाद, बडोदा इथेही आल्याचे कळले. अर्थातच, पुन्हा एकदा आपला देश महान आहे याची खात्री पटली. दुसऱ्या दिवशी जोशी हॉस्पिटलमध्ये स्वत: जाऊन विचारले असता, तिथे १ तारखेपासूनच लसीकरण बंद झाल्याचे कळले. पुन्हा ते चालू होणार की नाही याबाबत माहीत नाही, हे उत्तर मिळले.
असो. असेल माझा हरी तर देईल लस खाटल्यावरी!
खालील प्रतिसादातील लिंक बरोबर आहे, त्यानुसार माझ्या प्रतिसादात सुधारणा केली आहे. अनुभव मात्र तोच आहे.

चिंतातुर जंतू Tue, 02/03/2021 - 16:08

In reply to by तिरशिंगराव

'आरोग्य सेतू'द्वारेही लसीकरणाची वेळ घेता येते आहे. शिवाय, कोणत्याही केंद्रावर स्पॉट रजिस्ट्रेशन होतं आहे असं कळलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/03/2021 - 03:25

In reply to by तिरशिंगराव

आमच्या हाफिसातल्या एकाचा अनुभव - आई-वडील वयस्कर आहेत. त्यांना आता लशी मिळाल्या पाहिजेत. राज्य सरकारनंच सांगितलंय की या लोकांनी लशीसाठी वेळ घ्यायला पाहिजे. पण .... कितीही क्लिक केलं तरी नंबर लागत नव्हता.

त्याची बायको तंत्रज्ञानातच काम करणारी असल्यामुळे तिनं स्क्रेपर लिहिला आणि सतत क्लिकून वेळ घ्यायचं काम त्या स्क्रेपरला-लॅपटॉपला दिलं. त्यामुळे त्याच्या आई-वडलांचा नंबर लागला, बहुतेक दोनेक आठवड्यांपूर्वी लस मिळाली.

हे अमेरिकेत. थोडक्यात काय, लस मिळवण्यासाठीही पैसेवाल्या आणि तंत्रशिक्षित घरांतल्या लोकांचाच नंबर आधी लागणार!

चिंतातुर जंतू Thu, 04/03/2021 - 20:05

आज माझ्या कामवाल्या बाईला मी विचारलं की लस मिळाली तर घेणार का, वगैरे. त्यांचं उत्तर - आमच्याकडे आता कुणाला होत नाही कोरोना-फिरोना. सगळं आधीच होऊन गेलं (मे महिन्यात त्यांच्या वस्तीत कंटेनमेंट झोन होता). आता सगळं तुमच्या श्रीमंत लोकांच्याच वस्तीत होतंय. आणि असं म्हणून त्यांनी माझ्या गल्लीत आता किती केसेस आहेत याची यादी वाचून दाखवली.

चिंतातुर जंतू Fri, 05/03/2021 - 20:58

बाहरीनमध्ये होऊ घातलेल्या फॉर्म्युला-१ (F1) शर्यतीसाठी येऊ घातलेल्या सर्व अधिकृत पाहुण्यांना लस देण्याचे बाहरीनने दिलेले आवताण फॉर्म्युला-१ने फेटाळले
तिकिटे विकत घेणाऱ्यांना लशीचे प्रमाणपत्र किंवा कोरोना होऊन गेल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

चिंतातुर जंतू Fri, 05/03/2021 - 21:23

ब्रिटन किंवा इस्राएलसारख्या देशांच्या मानाने युरोपीय महासंघातील लसीकरण धीमे चालू आहे. फ्रान्समध्ये कित्येक लोक लस घेण्यास नकार देत आहेत. आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांपैकी केवळ १/३ लोकांनीच लस घेतली आहे. अखेर आरोग्यमंत्र्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आवाहन केले आणि पंतप्रधानांनीही विनंती केली आहे. आतापावेतो फ्रान्समध्ये केवळ तीसेक लाख लोकांचेच लसीकरण (किमान एक डोस) झाले आहे. तुलनेत लोकसंख्या साधारण तितकीच असलेल्या यूकेमध्ये हा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला आहे. ऑक्सफर्डच्या लशीला ज्येष्ठ नागरिकांसाठी परवानगी युरोपात जानेवारीतच मिळाली पण फ्रान्सने इतके दिवस दिलेली नव्हती ती आता कुठे दिली आहे.

दुसरीकडे लशीच्या निर्यातीवर निर्बंध लादणे सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलियाला निर्यात होऊ घातलेले अडीच लाख डोस इटलीने थांबवले आहेत.

या सगळ्या गोंधळाचा कंटाळा येऊन म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे (युरोपीय महासंघाने परवानगी न दिलेल्या) चिनी आणि रशियन लशी आयात करून आपल्या नागरिकांना द्यायला काही युरोपीय देशांनी सुरुवात केली आहे. हंगेरी, चेक प्रजासत्ताक, पोलंड, सर्बिया वगैरे पूर्व-कम्युनिस्ट देशांत ही बंडखोरी सुरू आहे.

अनुप ढेरे Tue, 09/03/2021 - 10:22

In reply to by चिंतातुर जंतू

दुसरीकडे लशीच्या निर्यातीवर निर्बंध लादणे सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलियाला निर्यात होऊ घातलेले अडीच लाख डोस इटलीने थांबवले आहेत.

या तुलनेत भारताची कृती फारच उठून दिसते. आत्तापर्यंत कमीतकमी 50 देशांना भारताने प्रत्येकी काही लाख लसी दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर वेगवेगळ्या देशांमधले फोटो दिसत असतात. बहुतांश देश आफ्रिका, लेटीन अमेरिका इथले असतात.

अबापट Tue, 09/03/2021 - 10:48

In reply to by अनुप ढेरे

सर , गेल्या आठवड्यातील मा श्री आदर पुनावाला यांचे ट्विट आपण वाचले नाहीत काय ?
उर्वरित देशांच्या महामहिम ना उद्देशून लिहिलेले ?

अनुप ढेरे Tue, 09/03/2021 - 10:56

In reply to by अबापट

नाही वाचले.
पण मुद्दा समजला नाही. भारताने आफ्रिकन, अमेरिकन आणि एशियन गरीब देशांना मदत म्हणून प्रत्येकी लाखों लसी दिलेल्या नाहीत असे म्हणताय का?

अबापट Tue, 09/03/2021 - 11:42

In reply to by अनुप ढेरे

नक्कीच दिल्यात. पण तो ट्विट वाचाच म्हणतो मी. बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.
आज अफगाणिस्थान चीही बातमी देतोय मी , त्याचेही डिटेल्स बघा कृपया. बाकी बोलूयात फोनवर. आज सुट्टी का तुम्हाला ?

अनुप ढेरे Tue, 09/03/2021 - 12:45

In reply to by अबापट

माझा मुद्दा भारताने संकुचित भूमिका न घेता प्रचंड प्रमाणात गरीब देशांना लसिंची मदत केली आहे असा आहे. वर म्हटल्याप्रमाणे मदत/निर्यात रोखणे वगैरे शक्य असून केलेले नाही. तुमचा मुद्दा (असल्यास ) लिहा.

अबापट Sat, 06/03/2021 - 13:14

The vaccine passport divide
First it was masks. Then summer vacations, the holidays and, most recently, jumping the vaccine line. Now, the next major pandemic flash point could be vaccine passports.

The idea is that governments will issue documents or phone badges that demonstrate that people have been inoculated against the coronavirus, allowing them access to flights, businesses and other areas of public life. Vaccine passports have already been initiated to some extent in Israel, and are under discussion in the European Union, the United States, and among airlines and tourism-related sectors around the world.

But the idea presents sticky ethical and practical risks for governments and organizations, which my colleague Max Fisher explored in the Interpreter column.

There are clear upsides to the passports. They could help economies to restart, families and friends to reunite and allow for some degree of normalcy to return. They may enable more sporting events, concerts, cultural events, parties, international travel and tourism. Businesses would be able reopen without putting employees or customers at undue risk. Many experts say they will be an inevitable part of post-pandemic life.

But dividing the world into vaccinated and unvaccinated people could also widen socioeconomic and racial gaps. Privileges for the vaccinated would favor groups that are inoculated at higher rates, which in the Western world tend to be white and wealthy.

It could also lead to prejudices and discrimination against groups that are perceived to have lower vaccination rates, experts say, similar to racial profiling.

The passports may also create huge inequalities among nations. Most vaccines have gone to rich countries, and it may be two or three years before vaccines reach poorer countries, essentially blocking their citizens from traveling abroad.

A complex set of rules that govern the passports will also need to be sorted out, said Nicole A. Errett, a University of Washington public health expert. Do Russian- or Chinese-made vaccines qualify? What are the rules for religious or medical opt-outs? Are restrictions in place until herd immunity is reached, or forever?

The first steps. Cyprus announced today that it plans to allow vaccinated residents of Britain to visit the island beginning in May.

गवि Tue, 09/03/2021 - 11:22

In reply to by अबापट

The passports may also create huge inequalities among nations. Most vaccines have gone to rich countries, and it may be two or three years before vaccines reach poorer countries, essentially blocking their citizens from traveling abroad

शाब्बास.. vaccine paasport ही संकल्पना रद्द करुन हा ब्लॉक सुटणार आहे का एरवी? वैचारिक घोळदार पण निरर्थक विवेचनाचे उत्तम उदाहरण. श्रीमंत देश असेही गरीबांना १०० प्रकारे टुकटुक करत असतील, त्यात एकाची अजून भर नको म्हणून सर्वांनी सर्वांचे "वदनि कवळ घेता" म्हणून पूर्ण होईस्तो सात आठ वर्षे बसून राहायचे. टिपिकल..

काळा पहाड Thu, 01/04/2021 - 12:32

In reply to by गवि

अगदी बरोबर. कशावरही टीका करायची आणि भारत सरकार किंवा आपली विचारसरणी ज्यांच्या विरोधी आहे अशा लोकांवर किंवा देशावर टीका करायची ! Being an armchair analyst is an easy job. बाकी, सगळ्या गरीब देशांचा ठेका सगळ्या प्रगत राष्ट्रांनी घ्यायलाच हवा नाही का?

चिंतातुर जंतू Wed, 10/03/2021 - 16:07

इटलीतील मृतांच्या संख्येने आता एक लाखाचा टप्पा ओलांडलेला आहे. दरम्यान रशियन स्पुटनिक लशीचे उत्पादन करणारा पहिला देश इटली ठरणार असे दिसते आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/03/2021 - 23:21

दोन विशालांचं - भारद्वाज आणि दादलानी - 'मास्क खो गया' काल अचानक सापडलं. दोघांनाही चांगली विनोदबुद्धी आहे. व्हिडिओसकट बघा हे. सगळ्यांची टिंगल करणाऱ्या आणि काळ्या विनोदातली गंमत ज्यांना समजते त्यांच्यासाठी आहे हे -

चिंतातुर जंतू Thu, 11/03/2021 - 14:57

गेल्या वर्षी आजच्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोव्हिड-१९ विषाणूची साथ ही महासाथ (pandemic) असल्याचे घोषित केले होते.

Rajesh188 Mon, 15/03/2021 - 14:55

ह्याची जागतिक व्याख्या ठरवण्याची वेळ आली आहे.
ठराविक हेतू साठी संशोधन करणारे मोठ्या कंपन्यांचे कर्मचारी ह्यांना संशोधक म्हणता येईल का?
कोणत्याच संस्थेशी संबंध नसणारे स्वतः जन हितासाठी संशोधन करून पुराव्या सहित निष्कर्ष जागतिक पातळीवर मांडणारी लोक .
ह्याच लोकांना फक्त संशोधक म्हणता येईल.
बाकी तर गुलाम आहेत पहिला हेतू काय आहे हे पहिले ठरणार आणि त्याच मार्गाने जावून हवा तोच निष्कर्ष काढणारी मंडळी संशोधक नाहीत असेच माझे स्पष्ट मत आहे..
ढोंगी संशोधक लोकांना कठोर शिक्षा असलेला जागतिक कायदा करण्याची खरोखर गरज आहे.

चिंतातुर जंतू Sun, 28/03/2021 - 14:52

कोव्हिड निगेटिव्ह असल्याचा टेस्ट रिपोर्ट दाखवून ५००० लोकांनी बार्सेलोनामध्ये कन्सर्टला हजेरी लावली. ही सरकारी पाठिंब्यावर केलेली चाचणी होती. टेस्ट करून झाल्यावर १०-१५ मिनिटांत चाचणीचा निकाल मोबाईलवर दिला जात होता.
Spectacular: 5,000 pack Barcelona rock concert after COVID tests

चिंतातुर जंतू Tue, 30/03/2021 - 16:01

काल होळी होती. त्या निमित्ताने प्रयागराज येथे दर वर्षी होणाऱ्या होळीचा या वर्षीचा आविष्कार कुणी तरी फेसबुकवर लाईव्ह शेअर केला होता (दुवा). याचा परिणाम कसा होईल ते ब्रह्मदेवाला ठाऊक असेल बहुदा.

Rajesh188 Tue, 30/03/2021 - 17:31

In reply to by चिंतातुर जंतू

नांदेड मध्ये परप्रांतीय शीख लोकांनी सर्व corona चे नियम तोडून गोंधळ निर्माण केल्याची बातमी आहे
महाराष्ट्रात corona वाढण्यास मुंबई अंतर राष्ट्रीय विमानतळ आणि पोटासाठी महाराष्ट्र मध्ये रेल्वे नी येणारे परप्रांतीय .
जगातील विविध देशात फिरणारे उद्योग पती मुंबई मध्येच उतरतात...
ही सर्व लोक राज्य धोक्यात आणत आहेत.

तिरशिंगराव Wed, 31/03/2021 - 09:20

आज सकाळी गल्लीत एक सुदृढ,चांगले कपडे आणि पाठीवर बॅगपॅक असलेला माणूस, कल्हईवाल्याच्या हेलात ," जरा प्रॉब्लेम आहे, थोडी मदत करा", असं ओरडत गेला.

चिंतातुर जंतू Fri, 09/04/2021 - 16:58

फ्रान्समध्ये ज्यांनी ॲस्ट्राझेनेकाचा पहिला डोस घेतला आहे त्यांनाही (रक्तातील गुठळ्यांच्या शक्यतेमुळे) दुसरा डोस फायझर किंवा मॉडर्नाचा देऊ करणार -
France to offer alternative to AstraZeneca second jab for those under 55

राजेश घासकडवी Sun, 11/04/2021 - 21:48

In reply to by चिंतातुर जंतू

एक कोटी म्हणजे ८-९ टक्के. त्यातलेही बहुतांश सीनियर सिटिझन्स, म्हणजे सर्वात जास्त धोका असलेले. दुसरी लाट ज्या वेगाने पसरते आहे ते पाहाता हे आशादायी आहे. मृत्यू : रोगी हे गुणोत्तर घटेल अशी आशा आहे.

गवि Sun, 11/04/2021 - 22:09

In reply to by राजेश घासकडवी

त्यातलेही बहुतांश सीनियर सिटिझन्स, म्हणजे सर्वात जास्त धोका असलेले.

कोरोना झाला तर सर्वात जास्त धोका असणारे, असं म्हणायचं आहे का? कारण कोरोना होण्याचा जास्त धोका बाहेर कामासाठी जाणे भाग असलेल्या तरुण आणि मध्यमवयीन लोकांना जास्त आहे आणि त्यांजकडून घरी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना होण्याचाही.

तरुण आणि मध्यमवयीन लोकांत समजा मृत्यूचा धोका वृद्धांपेक्षा कमी असेल तरी संख्येने हे लोक जास्त आहेत आणि त्यांना कव्हरेजबाहेर ठेवल्याने एकूण मृत्यू उलट जास्त होतील. (खुद्द तरुण + त्यांनी घरी आणलेल्या संसर्गामुळे निवृत्त ज्ये.ना.)

राजेश घासकडवी Sun, 11/04/2021 - 22:18

In reply to by गवि

हो, अर्थातच रोगाच्या लागणीमुळे सर्वात गंभीर परिणाम, मृत्यू होऊ शकतील असा गट वृद्धांचाच आहे. मी जो ग्राफ बघितला होता त्यात पन्नासनंतर मृत्यूचं प्रमाण दर दशकाला दीडपट ते दुप्पट होत असल्याचं मला आठवतं आहे.

कव्हरेजबाहेर 'ठेवणे'बद्दल बोलायचं नसून मला १ कोटी लशींच्या कव्हरेजमध्ये जे सर्वाधिक धोका असलेले आले आहेत त्यांवर लक्ष केंद्रित करायचं होतं. बिगेस्ट बँग फॉर व्हॅक्सिनेशन बक - आरोग्यकर्मचारी आणि ८०+, ७०+, ६०+ इत्यादी लोकांना प्राथमिकतेने लस देणं केव्हाही चांगलं.

Rajesh188 Wed, 14/04/2021 - 20:57

आता पर्यंतच्या इतिहासात कशा आल्या आहेत.
म्हणजे प्लेग ची साथ घेतली तरी ती किती दिवस टिकली होती.
सलग दोन दोन वर्ष साथीच्या रोग्याच्या लाटा येत राहिल्या अशी उदाहरण इतिहासात आहेत का?
,. उच्च पातळीवर साथी चे रोग पसरल्या नंतर परत हळू हळू प्रमाण कमी होवून साथ नष्ट झाली अशीच उदाहरणे आहेत.
मग आता covid ची साथ उच्च पातळीवर आहे असे समजावे का?
जिवाणू,विषाणू पासून होणाऱ्या साथीच्या रोगांना कुठे तरी नैसर्गिक रित्या पूर्ण विराम मिळतोच.
तसे घडले नसते तर पृथ्वी वर माणूस अस्तित्वात च राहिला नसता.

राजेश घासकडवी Thu, 15/04/2021 - 21:59

In reply to by Rajesh188

अनेक साथी वर्षाभरापेक्षा जास्त टिकलेल्या आहेत, उदाहरणार्थ १९१८ सालची फ्लूची साथ आणि चौदाव्या शतकातली युरोपातली प्लेगची साथ

The Spanish flu, also known as the 1918 influenza pandemic, was an unusually deadly influenza pandemic caused by the H1N1 influenza A virus. Lasting from February 1918 to April 1920, it infected 500 million people – about a third of the world's population at the time – in four successive waves. The death toll is typically estimated to have been somewhere between 20 million and 50 million

The Black Death (also known as the Pestilence, the Great Mortality or the Plague) was a bubonic plague pandemic occurring in Afro-Eurasia from 1346 to 1353.[a] It is the most fatal pandemic recorded in human history, causing the death of 75–200 million

या साथींमध्येही अनेक लाटा दिसल्या. मात्र आत्ताची लाट शेवटची असं कधी खात्रीलायकरीत्या म्हणता येत नाही.

adam Thu, 15/04/2021 - 12:10

मी विचित्र मनस्थितीत हसत सुटलोय.
माझ्या म्यानेजरच्या टीममधील अजून एक जण गचकला. (दोघांचंही वय साधारण माझ्या इतकंच.)
अजून दोनेक जण अगदी गंभीर आहेत.
हे ऐकून मला हसू येतंय.
हसू येणं हे विचित्र आहे हे स्वत:ला समजतंय.
पण नक्की काय होतंय कळत नाही.
लागोपाठ कुणाचं तरी कुणीतरी गचकल्याचं ऐकतोय.
मेव्हणीचे सासरे, बाबांच्या जवळच्या मित्राचा मुल्गा, माझ्या म्यानेजरचे सहकारी....
कुणाच्या मरणावर हसू येणं हे स्वास्थ्यपूर्ण मनाचं लक्षण नाही हे नक्की.
विचित्र मन:स्थिती आहे.
(बहुतेक् हे हसू येणं "डाउनफॉल" सिनेमात हसत सुटालेल्या बेवड्या जर्मन सैनिकांसारखं असावं. त्यात हिटलरच्या आयुष्यातले शेवटचे दहा दिवस दाखवलेत. जर्मनीची दाणादाण उडालेली असते. बर्लिनच्या वेशीवर लाल सैन्याचा तोफांचा भडिमार सुरु झालेला असतो. बाहेर सगळीकडे हाहाकार उडालाय. कुणाला खाय्ला नाही, कुठं पाणी नाही. कुठं बॉम्बनं इमारती जळाल्यात, अशा वातावरणात हिटलरच्या जवळच्या सैनिकांपैकी कुणाला प्रत्यक्ष इजा झालेली नसली, तरी होणारी दाणादाण त्यांना समजत "दिसत" असते. त्यातलेच काहीजण दारुच्या आहारी जातात. हसत सुटतात.)
हे टाळायला मी वृत्तपत्रवाचन जाणीवपूर्वक कमी केलं होतं. पण इकडून ना तिकडून बातम्या येउन धडकतातच.
मी इतक्या कमकुवत मनाचा आहे हे आजच समजलं.

साधारण दहा एक मिनिटं ह्या वरच्या हसत सुटण्याच्या मनःस्थितीत होतो. हे नक्की काय घडून गेलं समजलं नाही. पण विचित्र होतं हे नक्की.

Rajesh188 Thu, 15/04/2021 - 23:14

हज यात्रा लसीकरण compulsary .
ह्या वरून एक आठवले लॉक down सुरू झाले की स्थलांतरित मजूर किंवा लहान सहान उद्योग करणारे,.
ज्यांच्या कडे फिक्स इन्कम चा मार्ग नाही ती लोक आपल्या मुळ गावी जातात.
आणि रेल्वे नी त्यांचा प्रवास असतो.
तेव्हा प्रचंड गर्दी रेल्वे स्टेशन्स आणि रेल्वे गाडीत सुद्धा होते .
कोणतीच काळजी घेतली जात नाही .
ना कोणती टेस्ट compulsary आहे.
ह्या लोकांकडून किती रोग प्रसार होत असेल ?.
हज यात्रा किंवा कुंभ मेळा ह्या पेक्षा जास्त गर्दी तिथे असते.
ज्याचा अर्थ खिडकी बंद करून घ्यायची आणि दरवाजा उघडा ठेवायचं असाच घेतला पाहिजे.
रेल्वे प्रवासाचे योग्य नियोजन साथीच्या काळात घेणे अनिवार्य आहे.
पण तिकडे दुर्लक्ष केले जाते.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 15/04/2021 - 23:35

In reply to by Rajesh188

हज यात्रा किंवा कुंभ मेळा ह्या पेक्षा जास्त गर्दी तिथे असते.
ज्याचा अर्थ खिडकी बंद करून घ्यायची आणि दरवाजा उघडा ठेवायचं असाच घेतला पाहिजे.

ह्याला काही पुरावा आहे का, की स्थलांतरित मजुरांची संख्या कुंभापेक्षा जास्त होती/आहे?

anant_yaatree Fri, 16/04/2021 - 20:46

करोना हवेतून पसरतो, केवळ सोशल डिस्टन्स पुरेसं नाही – लॅन्सेटचा अहवाल
लोकसत्ता बातमीचा दुवा

Rajesh188 Sat, 17/04/2021 - 00:12

In reply to by anant_yaatree

अशा वाक्य रचना लोकांचे मनोधैर्य खच्ची करतात.आणि मीडियानं घान सवय आहे .
भयंकर,बाप रे, असले शब्द वापरायची.
गेल्या वर्षी जेव्हा हा व्हायरस माहीत झाला तेव्हाच तो हवेतून पसरतो हे माहीत होते म्हणून तर पंधरा वीस फूट अंतर ठेवा हे सांगत होते..
भाज्या,काच,फळ,हवेत किती वेळ व्हायरस असतो हे तेव्हाच मीडिया नी डंका वाजवून सांगितले होते.
त्या मध्ये आता काही नवीन शोध लागल्या सारखे नाही..
गेल्या वर्षी च हवेतून व्हायरस नष्ट करण्यासाठी UV मशीन बाजारात आल्या होत्या,भाज्या, लाद्या,व्हायरस फ्री करण्यासाठी विविध उत्पादन आली होती.नंतर सर्व थंड पडले कारण असा हवेतून,भाज्या मधून,विषाणू चा प्रसार झालाच नाही.
आता परत तेच
पण तो हवेत असला तरी सूर्य प्रकाश,अद्रता,वाऱ्याची तीव्रता असे अनेक घटक त्या वर परिणाम करत असतात.
पन्नास साठ माणसांना एका खोलीत ठेवून काही लोकांनी प्रयोग केला आणि तो मीडिया नी प्रसिद्ध केला. ह्या पेक्षा जास्त ह्या बातमीला किंमत नाही.
लोकांना भीती दाखवू नका सावध करा.
आणि त्या साठी सर्व प्रसिद्ध माध्यमांनी योग्य अंत रणजित नसलेली माहिती संयमी शब्दात प्रसिद्ध केली पाहिजे.
आणि संशोधक लोकांनी सुद्धा घोड्या वर येवून निष्कर्ष काढू नये.मोठ्या प्रमाणात अभ्यास करून,प्रयोग करून नंतर त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध माध्यमांना द्यावेत.
बातम्या सब से तेज सबसे पहले असतात.
संशोधन त्या मार्गाने जावू नये.

काळा पहाड Sat, 17/04/2021 - 09:12

In reply to by anant_yaatree

हे खरंच होत असेल तर ही बातमी 2021 ची news of the year समजली जायला हवी. आतापर्यंत आपण समजत होतो की कोरोना चा प्रसार हवेतून होत नाही. आणि मग कुठलाही मास्क कामाचा नाही कारण मास्क विषाणूंना फिल्टर करू शकत नाहीत. ते ड्रॉप्लेट्स ना फिल्टर करतात. ही क्षमता विषाणू म्युटेटेड झाल्यामुळे आली आहे असे समजावे का?

Rajesh188 Sat, 17/04/2021 - 11:23

Droplets मधून विषाणू चा प्रसार होत होता तेव्हा एका droplet मध्ये हजारो विषाणू असण्याची शक्यता होती .पण तो आता droplet हे वाहक नसतील तर हवेत ते एका जागेवर असंख्य संख्ये नी असू शकणार नाहीत विखुरलेले असतील .
म्हणजे माझ्या मता नी ते रोग निर्माण करण्याची क्षमता काही प्रमाणात तरी गमावून बसतील.
COVID चा प्रसार होण्यास काहीच लक्षण नसलेले बाधित लोक च जास्त जबाबदार आहे.कोण बाधित आहे कोण नाही हे समजणे मुश्किल होते जेव्हा लक्षण विरहित आजार असणारी लोक जास्त असतात.
प्रतेक व्यक्ती च बाधित आहे असे समजून काळजी घेणे हे थोडेफार आपल्या हातात आहे
नाही तर आपली प्राथमिक प्रतिकार शक्ती .मुलाखती मध्ये जीचे वर्णन आहे ती नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्ासाठी संशोधन होणे गरजेचे आहे.
एका बाजू नी रोग प्रतिकार शक्ती (नैसर्गिक पहिल्या फळी मधील ) वाढवणे ,दुसऱ्या बाजू नी दुसऱ्या फळी मध्ये active होणारी प्रतिकार शक्ती लस देवून वाढवणे.
आणि रोग झाला तर उपचार वाढवणे ही त्री सूत्री च गरजेची आहे असे मला तरी वाटत.
आता बाधित होण्या पासून वाचणे तसे कठीण आहे.

गौराक्का Mon, 19/04/2021 - 10:50

बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला आहे.
१२ तारखेला रात्रीपासून सासूबाईंना ताप होता, मी आईकडे होते आणि नवऱ्याने येऊ नकोस तिथेच रहा सांगितले. दुसऱ्यादिवशी सकाळी तो एकटा राबतोय म्हणून घरी जायचे ठरवले.
वरच्याच मजल्यावरचा फ्लॅट नुकताच नणंदेने विकत घेतलेला, पण म्हातारा मालक लई आगऊ असल्याने १५ तारखे पर्यंत मी फ्लॅट अजिबात देणार नाही म्हणून आधीच सांगितलेले. राहत कुणी नाही पण उगाच अडेलतट्टूपणा, रजिस्ट्रेशन २० दिवसापूर्वी झालेलं आणि सगळे पैसे २८ तारखेला त्याच्या खात्यात जमा करून सुद्धा त्याने घर काही रिकामे केले नाही. एक महिना आधी टोकन देउन २०% टक्के रक्कम दिलेली तेव्हा मला आणि नवऱ्याला आयसोलेशन होतं. त्यांना विचारलेलं घरी कुणी राहत नाही आम्ही राहू का, तेव्हा टेचात आधी पैश्यांचा व्यवहार पूर्ण करा मग चावी घ्या म्हणून म्हातऱ्याने सांगितलं. आता अगदीच नाकातोंडाशी आलेली बात. मी म्हातऱ्याला सांगितलं उद्या पूजा करायची आहे, चावी द्या. मी आणि नवरा निगेटिव्ह होतो आम्ही शिफ्ट झालो वर. दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट आले, अपेक्षेप्रमाणे सासूबाई होत्याच पॉझिटिव्ह पण सासरेपण पॉझिटिव्ह निघाले. म्हातऱ्याला फोन करून सांगितले. येउन सामान घेऊन जा , किंवा आम्ही पाठवून देतो. म्हाताऱ्याच बेत १५ ला लॉकडाऊनचं कारण सांगून ३० पर्यंत घर ताब्यात ठेवायचा होता. मग बरीच तणातणी करून सामान नेलं टोमणे, कुजकट बोलणं झालं. बरं आणि रजिस्ट्रेशन करून १० १५ दिवसात घर ताब्यात द्यायचं असं आम्हालाच सांगत होता, म्हंट्लं काका १५ दिवसांच्यावर होऊन गेलेत. तुमच्या आईवडिलांशी दिवसाचे मोजमाप करता का? आपलं रिलेशन असं नाही वगैरे, मग नवऱ्याने आवाज चढवला. बरीच बाचाबाची होऊन गेले एकदाचे, पंखे, लाईट, कपडे वाळत घालायच्या दांड्या पडदयांचे रॉड सगळं उचलून नेल्याने उघडं बोडकं झालं घर, नवऱ्याने इलेक्ट्रीशयनला कॉल करून लाईट पंखे बसवले. बाहेर जिओवाले उभे होते त्यांच्याकडून इंटरनेट बसवून घेतलं (वर्क फ्रॉम होम व्हायचं कसं?) प्रेस्टिज मध्ये फोन करून दोन बर्नर वाली शेगडी बसवली.
संध्याकाळी धावपळ करत सामान जमा केले. तेल तिखट मिठ साखर चहा डाळ तांदूळ लसूण मिर्च्या, मिरपूड, जिरेपूड, धणेपूड, कांदे, बटाटे, साबण वगैरे. आईने घरून जुने पडदे, साडी, एक कढई कलथा, बालदी, तुपाची बाटली, हँगर हळद पाठवले. जुन्या पडद्यांचे लूप कसेबसे अडकवले आहेत. जिओच्या वायरी खिडकीत बांधून त्यावर कपडे वाळवतो आहे.
सद्या वरच्या घरातून जसा जमेल तसा स्वैपाक करून खाली पाठवणे सुरू आहे.
स्वयंपाक करून करून सध्या डोके बिलकूल भंगार झाले आहे. कशालाचं आले, बसले होते चांगले घरी असं दिवसातून शंभरदा वाटत आहे.
बट अच्छे दिन आयेंगेच्या आशेवर २६ तारखेची वाट पहाणं सुरू आहे. सध्या डंझो, ॲमेझोन फ्रेश वरून भाज्या मागवून सुरू आहे कारभार.
दोन पंख्याच्या खोक्यांवर शेगडीचा खोका ठेउन मेकशिफ्ट टेबल बनलं आहे. त्याचा फोटो नंतर डकवीन

चिंतातुर जंतू Mon, 19/04/2021 - 16:21

ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दरम्यान ट्रॅव्हल बबल खुला केला आहे. म्हणजे इतर देशांना प्रवास बंदी, पण हे दोन देश प्रवासासाठी खुले झाले आहेत.
Australia-New Zealand travel bubble opens with joy, tears

चिंतातुर जंतू Tue, 20/04/2021 - 13:36

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने जागतिक वृत्तस्वातंत्र्याविषयीचा आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महासाथीमुळे अनेक देशांतील वृत्तस्वातंत्र्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
Reporters Without Borders: Press freedoms under pressure in pandemic

चिंतातुर जंतू Tue, 20/04/2021 - 17:30

दुसऱ्या लाटेमागचे कारण हे असू शकेल कदाचित -
This CSIR sero survey could partly explain why India is in the grip of Covid wave again

At least 20 per cent of people found to be seropositive in a survey last year lost their neutralising antibody levels in the subsequent six months, according to a nationwide survey by the Council of Scientific & Industrial Research (CSIR). This, the researchers say, could partly explain why India is seeing a fresh surge in Covid-19 cases.

चिंतातुर जंतू Wed, 28/04/2021 - 15:27

भारताने आज दोन लाख अधिकृत मृत्यूंचा आकडा ओलांडला आहे. (स्रोत - वर्ल्डोमीटर)

चिंतातुर जंतू Wed, 28/04/2021 - 18:10

महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही.

“आपल्याला इच्छा असूनसुद्धा लसी उपलब्ध होत नसल्यामुळे १ मे ला लसीकरण सुरू करता येणार नाहीये. पण आपण यावर काम करत आहोत. ५ कोटी ७१ लाख लोकांना लसीकरण करायचं आहे. त्यासाठी वरीष्ठ मंत्र्यांची एक समिती याचं सूक्ष्म नियोजन करत आहे. १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. ३५ ते ४४ हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि ४५ वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील”, अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

चिंतातुर जंतू Thu, 29/04/2021 - 16:24

दानिश सिद्दिकी पुलित्झर विजेते छायाचित्रकार आहेत. ते रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करतात. दिल्लीतील ताजी लाट चित्रित करतानाचा त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दांत -

चिंतातुर जंतू Sun, 02/05/2021 - 15:45

काल भारतात चार लाख नव्या रोग्यांची संख्या प्रथम गाठली गेली. तर आज दैनंदिन मृत्यूंची संख्या उच्चांक गाठत आहे. दरम्यान मार्चमध्ये सरकारने शास्त्रज्ञांचा अंदाज दुर्लक्षित केला असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे :
Scientists say India government ignored warnings amid coronavirus surge

The warning about the new variant in early March was issued by the Indian SARS-CoV-2 Genetics Consortium, or INSACOG. It was conveyed to a top official who reports directly to the prime minister, according to one of the scientists, the director of a research centre in northern India who spoke on condition of anonymity. Reuters could not determine whether the INSACOG findings were passed on to Modi himself.

चिंतातुर जंतू Tue, 04/05/2021 - 15:37

भारताने आज एकूण रुग्णसंख्येचा दोन कोटींचा आकडा ओलांडला आहे. (स्रोत : वर्ल्डोमीटर)

Rajesh188 Tue, 04/05/2021 - 16:10

आता rt pcr test आणि antigen test ह्यांचा आकडा एकत्र पकडुन किती आज positive किती आले हे जाहीर केले जाते.ह्या मध्ये rt pcr हि कन्फर्म टेस्ट आहे.antigen टेस्ट चे रिपोर्ट चुकीचे येतात.
काही राज्य आकडा कमी दाखवण्यासाठी antigen test जास्त करतात आणि rt pcr टेस्ट कमी करतात.
Antigen टेस्ट मध्ये निगेटिव्ह रिपोर्ट चीच जास्त शक्यता असते.
Rt pcr test करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे एकूण टेस्ट पैकी 89 percent test maharashtra मध्ये rt PCR test असतात.
त्या मुळे येथील आकडा जास्त आहे .
आणि जे rt PCR test करतच नाहीत त्यांचे आकडे कागदावर कमी आहेत.

चिंतातुर जंतू Tue, 04/05/2021 - 21:49

क्लिनिकल ट्रायल्स, (कदाचित) लसनिर्मिती, संशोधन आणि विक्रीसाठी सीरमने यूकेमध्ये गुंतवणूक केली आहे -
Adar Poonawalla’s Serum Institute to invest 240 million pounds in UK

Serum Institute of India (SII) has started phase one trials in the UK of a nasal vaccine against coronavirus.

“Serum’s investment will support clinical trials, research and development and possibly manufacturing of vaccines. This will help the UK and the world to defeat the coronavirus pandemic and other deadly diseases. Serum has already started phase one trials in the UK of a one-dose nasal vaccine for coronavirus, in partnership with Codagenix INC,”

चिंतातुर जंतू Wed, 05/05/2021 - 16:15

जी७ शिखर परिषदेसाठी खास आमंत्रित भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यासह भारताचे प्रतिनिधी यूकेमध्ये आहेत. त्यांपैकी दोघे करोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे.
COVID scare at G7 meeting after Indian delegates test positive

Rajesh188 Wed, 05/05/2021 - 19:54

सर्व सरकारी, यंत्रणा नियोजन बद्ध पने काम करू लागल्या तर गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही जशी आता आहे.
पाहिले भारतात covid विषयी जो data आहे तो परिपूर्ण नाही.त्या मुळे त्या वर संशोधन करून अंदाज व्यक्त करणे संशोधक लोकांना कठीण जात आहे.
सरकारी डाटा लपवून ठेवण्याची स्पर्धा चालू आहे.
काही राज्यात covid मुळे होणारे मृत्यू लपवले जात आहेत.काही राज्यात corona बाधित लोकांची संख्या कमी यावी पण टेस्ट ची संख्या मात्र वाढावी म्हणून rt pcr test न करता antigen test चे निष्कर्ष जाहीर केले जात आहेत.
ज्यांना बिलकुल कसलीच लक्षण नाहीत त्यांना हॉस्पिटल मध्ये admit करून आरोग्य यंत्रणेचा बोजा वाढवत आहेत.
एकूण बाधित लोकं पैकी काहीच percent लोकं मध्ये गंभीर लक्षण दिसत आहेत,त्यांना ऑक्सिजन,व्हेंटिलेटर ची गरज लागत आहेत.
आणि असे बाधित कमीच असतील पण त्यांचा नक्की आकडा जाहीर केला जात नाही किंवा सरकार कडे ती माहितीच नाही.
ज्यांना गरज आहे त्यांनाच admit करावे.आणि जे घरी उपचार घेत आहेत त्यांना सर्व वैधकिय सुविधा घरीच द्याव्यात.त्या मध्ये कोणाची स्थिती गंभीर झाली तर सर्व सुविधा युक्त बेड ,सर्व गरजेच्या साहित्य व डॉक्टर सहित राखीव ठेवावे.
गंभीर स्थिती मध्ये उपचार होण्यास बिलकुल वेळ लागला नाही पाहिजे.
पण सरकारी यंत्रणा आणि सरकार नियोजन बद्घ पद्धतीने एक योजना आखून त्या नुसार काम च करत नाहीत.
देशात सरकार आहे की नाही अशीच शंका येत आहे.१९७२ च्या दुष्काळात त्या वेळच्या महाराष्ट्र सरकार नी कसे काम केले आणि राज्यात उपासमार कशी होवून दिली नाही ह्याचा पण अभ्यास आताच्या सरकार नी करावा .आणीबाणी च्या प्रसंगी सरकार आणि सरकारी यंत्रणेने कसे नियोजन केले पाहिजे त्याची माहिती मिळेल त्या मधून.
देशात जीवन आवश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत तेल साठ ते सत्तर रुपये प्रति किलो नी वाढले आहे.
परिस्थितीचा फायदा उचलणाऱ्या वृत्ती उचल घेत आहेत.
गरजेची औषध गायब झाली आहेत..
त्या साठी नियोजन हवेच
सरकार नी सर्व आवश्यक अन्न धन्य,तेल,औषध ह्यांचा साठा करून ठेवावा.
आयात करावी देशात उपलब्ध नसेल तर.
आणि जीवन अवशक्या वस्तू ची कमतरता (कृत्रिम पने) निर्माण करून महागाई भडकू नये ह्या वर लक्ष द्यावे.
नाहीतर उपासमारी नी सुद्धा लोक मरतील.
काळाबाजार ,करणाऱ्या लोकांवर आणीबाणी मध्ये जे कायदे वापरले जातात त्या कायद्यांनी च कारवाई करावी.
सीमित आणीबाणी जाहीर केली तरी चालेल..

चिंतातुर जंतू Thu, 06/05/2021 - 18:11

लशींचा पुरवठा वाढवण्यासाठी द. आफ्रिका आणि भारत यांच्या मागणीनुसार तात्पुरती पेटंटं बाजूला ठेवण्याची अमेरिकेची तयारी झालेली दिसते. यापूर्वी ट्रम्पने विरोध केला होता. युरोप आणि यूकेही अनुकूल दिसतायत.
US backs waiver on vaccine patents to boost supply

चिंतातुर जंतू Thu, 13/05/2021 - 11:52

भारतातली बिकट कोव्हिड परिस्थिती पाहता परदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे, मात्र परदेशी संस्थांनी भारतीय स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याविषयीचे नवे नियम त्याच्याआड येत आहेत -
India’s Strict Rules on Foreign Aid Snarl Covid Donations

“Everyone was caught off guard, especially given the role that NGOs played in Covid relief last year,” said Nishant Pandey, chief executive of the American India Foundation, one of the largest U.S. nonprofits working in India. “To come with an amendment like that in the middle of pandemic was problematic.”

चिंतातुर जंतू Thu, 13/05/2021 - 23:19

कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोसांतील अंतर वाढवण्याचे आदेश मा. आरोग्यमंत्र्यांकडून आले आहेत.