मागचा कागद.....

आकाशावर लिहिलेल्या सुखांतिका,
रुततात कशा हृदयावर?
तोंडी हिशोबांची न लिहिलेली उत्तरं;
कशी काय दिसतात मागच्या कागदावर?

मागच्या कागदावर उमटलेले
कोरीव अन खोल ठसे,
काही कवितांचे, चित्रांचे, ऋणांचे,
आणि न जुळलेल्या ताळेबंदांचे

पुढे पाठ असलेली स्वप्ने
मागे थोडीशी सपाटच उमटतात
पांढुरक्या रंगहीन मागच्या कागदावर
आजकाल ठसेही अवचितच दचकतात

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता अतिशय आवडली. लिखाणकामाच्या प्रक्रियेमधील एखाद्या जुजबी वाटणार्‍या निरीक्षणातूनही इतकी उत्तम कविता सुचू शकते !

या सायटीवर स्वागत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मागच्या कागदावर राहिलेल्या खुणा हे रूपक आवडलं. इतक्या प्रभावी रूपकामुळे कवितेला वजन आलेलं आहे. मागच्या कागदावरच्या ठशांमध्ये सगळ्याचीच सरमिसळ होऊन जे विचित्र चित्र होतं ते म्हणजे आपण.

मात्र मांडणी किंचित विस्कळित वाटली. रूपकाच्या वेगवेगळ्या पैलूंचा धावता आढावा घेतल्यासारखी. तीन कडव्यांमध्ये ठशांविषयी प्रश्न, ठशांविषयी अपूर्ण विधान, आणि नंतर ठशांची 'हालचाल' येते. अजून थोडी मेहनत घेतल्यास चांगल्या, छान कवितेपलिकडे जाऊन उत्कृष्ट कविता होऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहा! एका आशयगर्भ कवितेचे आणि कवीचे ऐसीअक्षरेवर स्वागत!

येत रहा.. लिहित रहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!