दोन कविता

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं

एकदा मी मराठ्यांवर
विद्रोही कविता केली
महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी गुजरात्यांवर
विद्रोही कविता केली
गुजराती अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी सरदारांवर
विद्रोही कविता केली
पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी चिडून हिंदी भाषिकांवर
विद्रोही कविता केली
उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

थोडसं सावरून तमिळींवर
विद्रोही कविता केली
तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्वेषाने तेलुगू लोकांवर
विद्रोही कविता केली
आंध्रा, तेलंगणातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी मल्याळींवर
विद्रोही कविता केली
केरळी अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्यानंतर बंगाली, ओरिया लोकांवर
विद्रोही कविता केली
तिथल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

शेवटी मी ईशान्येकडील लोकांवर
विद्रोही कविता केली
तिकडल्या अस्मितावाद्यांनी पण
मला ठोकून काढलं

सरतेशेवटी मी भारतीयांवर
विद्रोही कविता केली
एकदम सगळ्या सेक्युलरांनी
माझं कौतुकच केलं
मात्र राष्ट्रवाद्यांनी शोधून
मला ठोकून काढलं

- भूषण वर्धेकर
__________________________________

ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे शोषितांसाठी लढले
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

स्व अस्तित्व नष्ट होईल ह्याची तीव्र भीती आणि त्या मधून येणारी भावना म्हणजे अस्मिता.
ती कोणत्याच लॉजिक नी चुकीचं ठरवली तरी संबंधित लोक ते ऐकण्याच्या मन स्थिती मध्ये नसतात
अस्मिता नष्ट करण्याचा एक मेव मार्ग आहे देश नामक भू भागातील कोणत्याच समाज घटकाला आपले अस्तित्व धोक्यात आहे असे वाटून न देण्यासारखी स्थिती त्या भागात निर्माण करणे.

सर्व ..... माझे बांधव आहेत
हे तत्त्व ज्ञान आहे प्रॅक्टिकल आयुष्य मध्ये कूच कामी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सर्व ..... माझे बांधव आहेत
हे तत्त्व ज्ञान आहे प्रॅक्टिकल आयुष्य मध्ये कूच कामी.

बरे झाले सांगितलेत. तुम्ही माझे बांधव नाही, हे समजल्याने अत्यंत बरे वाटले. मनावरील एक प्रचंड दडपण उतरले. हुश्श्श्श्श!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट3
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे जे शोषितांसाठी लढले
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________

(लागोपाठ दोन धागे आल्यामुळे ते एकत्र केले आहेत. - व्यवस्थापन)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

एकंदरीत, कोणा ना कोणाकडून तरी ठोकून घ्यायची हौस म्हणा, (पार्श्वभागातली) खाज म्हणा, दुर्दम्य म्हणायची.

चालायचेच. होते असे कधी कधी.

एखाद्या चांगल्या मनोविश्लेषणतज्ज्ञास दाखवीत का नाही? कदाचित तो काही रोचक निष्कर्षांप्रत पोहोचू शकेल.

शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्मितावादी ठोकून काढतात
धर्मांध मारून टाकतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

सेक्युलर कोणाला ठोकत नाहीत. सेक्युलरांसारखे व्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निधर्मी वाले सेक्युलर की,
धर्मनिरपेक्ष वाले सेक्युलर
अनुदानित सेक्युलर की,
विनाअनुदानित सेक्युलर की
कायमस्वरूपी अनुदानित सेक्युलर की,
कायमस्वरूपी विनाअनुदानित सेक्युलर की,
नक्की कोणते??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

शंभरातील नव्व्याण्णव गेल्यावर उरतात, ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

त्यातले कोणालाही न ठोकणारे जे जे असतील त्यापैकी कुठलाही पर्याय चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

एका ठराविक विचाराने प्रेरित असतात आणि विरोधी विचाराच्या (त्यांच्या नजरेने धर्मांध) लोकांचा द्वेष करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेक्युलर म्हणजे निधर्मी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0