शेजारच्या काकांचा पुरुषार्थ जागा झाला.
कासारवडवली, ६ एप्रिल.
व्लादिमिर पुतिन, आणि वोलोदिमिर झेलेन्स्की दोघांनाही मिळालेल्या अभूतपूर्व, आंतरराष्ट्रीय यश आणि प्रसिद्धीमुळे शेजारच्या काकांचा न्यूनगंड पुन्हा एकदा अभूतपूर्व प्रमाणात उफाळून आला. हा जर न्यूनगंड नसता तर त्याच्या उफाळून येण्याच्या प्रमाणाबद्दल काकांना फेसबुकवर स्टेटस लिहिता आलं असतं. पण काकांनी आता व्हॉट्सॅपवरही जाणं कमी केलं. त्यातून काकांच्या शाळेतल्या मैत्रिणीनंही, सगळ्या बायकांचा आता झेलेन्स्कीवर क्रश आहे, असं जाहीर केल्यावर काकांच्या न्यूनगंडाला पारावार राहिला नाही.
महिना उलटून गेला तरी काकांची कोंडी सुटत नव्हती. (काकूंचा मूड चार दिवस खाली जाऊन पुन्हा नेहमीसारखा वरही गेला. तरीही काका खालीच होते.) व्हॉट्सॅपवर काकांना महागाईचा व्हिडिओही येऊन गेला, 'महंगाई से लडे, सरकार से नही'. सगळ्या नातेवाईकांच्या ग्रूपमध्ये व्हिडिओ शेअर करूनही काकांना समाधान वाटेना. होळीला बोंब मारून काकांना समाधान लाभलं नाही, पुरणपोळी गोड लागली नाही, कॉलनीतल्या पोरा-पोरींना धुळवड आणि रंगपंचमीमधला फरक समजावूनही त्यांना चैन लाभेना. जणू गणपती कायमचे गावाला गेले! आता काकांच्या स्वप्नातली 'व्होलोदिमिर - व्लादिमिर' ही नावं येऊन नाचायला लागली.
काकूंचं म्हणणं होतं की काकांना युद्धात बाजू निवडता येत नाहीये, म्हणून काकांची घुसमट होत आहे. दुष्ट अमेरिकेला आणि वाईट नाटोला विरोध करणाऱ्या पुतिनला समर्थन द्यावं, का देशासाठी प्राणपणानं लढणाऱ्या झेलेन्स्कीची बाजू घ्यावी हे काकांना समजत नाहीये; म्हणून त्यांना व्हॉट्सॅपवर भरीव योगदान देता येत नाहीये; आणि युपीच्या निवडणुका पार पडल्यामुळे सध्या देशातही फार काही घडत नाहीये; त्यामुळे काकांना रायटर्स किंवा कसलासा ब्लॉक आला असणार, असा काकूंचा हेका होता.
मात्र ऑस्कर सोहळ्यानं कोंडी फोडली. विल स्मिथनं त्याच्या बायकोच्या संरक्षणासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारला. शिवाय आता स्मिथच्या बायकोचा शत्रू नाटोसारखाच दुष्ट असला तरी बायकोचं संरक्षण हीच पहिली जबाबदारी असली पाहिजे. काकांनी व्हॉट्सॅपवर लिहायला सुरुवात केली -
"फक्त 'देव, देश, अन धर्मापायी' प्राण हातात घेऊन पुरावं असं जग आता उरलेलं नाही. आता आपण आपल्या बायको-मुलांच्या संरक्षणासाठीसुद्धा प्राण हातात घेतले पाहिजेत. मित्रांनो, विल स्मिथ हा आपला आदर्श असला पाहिजे. युक्रेनमध्ये झेलेन्स्की तसा ऑस्करमध्ये विल स्मिथ. ..."
काकांचा ब्लॉक गेल्यापासून काकूंचं ऑफिसचं कामही लवकर उरकतं.
प्रतिक्रिया
.
शीर्षक अंमळ अश्लील आहे, एवढेच सविनय नमूद करून तूर्तास खाली बसतो.
बाकी चालू द्या.
चला!
तुम्हाला एक जोक समजला!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कासारवडवली, ६ एप्रिल.
आमच्या गावाचं नाव लिखाणात कसं काय आलं बुवा (की बाई ) ?
ष्रीस्थानक
ते सगळं म्हणे हल्ली ठाण्यात मोजतात!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सत्य आपण का स्वीकारत नाही
माणूस एक प्राणी आहे ..हे सत्य आहे .सरकार,कायदे,नियम,देश हे बनले कारण माणसात जास्त किडे आहेत..माणसाने जे काही निर्माण केले आहे तो भास आहे . मीच हुशार हा किडा आहे
एक किंवा दोन सेकंद मध्ये माणसाची पूर्ण दुनिया नष्ट करण्याची ताकत निसर्गात आहे .
माणूस हा अती शुल्लक प्राणी आहे ..
काका ना काही vatu ध्या किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लं काही ही वाटू ध्यान.
अमेरिका किंवा प्रबळ देशांना काही ही वाटू ध्या..
ह्या ब्रह्मांड मध्ये त्यांच्या इच्छेला मातीच्या कणांच्या पेक्षा खूप कमी किंमत आहे ..अगदी नगण्य .
हा शब्द पण काही तरी संख्या सांगतो.
पण ती पण नाही.