" न्यू जर्सीतील दाढीवाले"

फडताळातिल सुवर्ण-व्हिस्की
उपयोगाची काही नाही
पुष्ट पोटऱ्या दाढी-दिक्षित
अखेरचे ते वळून पाही.

आणिक नंतर रबर-सोलचे
स्नीकर किमती चढवी पायी
टिकुन उन्ह ते असे तोंवरि
जॉगिंग करणे- त्याला घाई

गंजत पडल्या रेल-रुळांवर
शुभ्र ससा तो वेगे जाई
जमीन सरते पायाखाली
बाकी दिसतहि काही नाही!

संध्याकाळी कॅफेमध्ये
निळ्या जीन्समधली ती बाई
घामट तीही , घामट तोही
काळ हातातुन निसटत जाई !
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाकी आपल्याला कविता वगैरे कळत नाही. पण बरेच दिवस दिसला नाहीत. आता आलात ,बरे वाटले. ऑल वेल ना मिलिंदराव ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाठीचे दुखणे वाढले आहे. उपचार चालू आहेत पण फारसे यश नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

वृत्त मुद्दाम चुकवले आहे का ? वाचताना मीटरमध्ये बसत नसल्याने बम्पी राईड वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की कोठे खड्डा लागला ब्वॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की कुठे वृत्त मार खाते आहे हे दाखवून दिल्यास सुधारणा करण्यात नक्कीच रस आहे! धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

दुसऱ्यांदा वाचल्यावर वृत्त सापडले. त्यामुळे आधीचा प्रतिसाद बाद.
- शिंगमोडराव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गंजत पडल्या रेल-रुळांवर
शुभ्र ससा तो वेगे जाई
जमीन सरते पायाखाली
बाकी दिसतहि काही नाही!

हे कळले नाही. बाकी कविता आवडली. पुण्यातील दाढीवाले असेही टायटल चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा
अजून करिते दिडदा दिडदा

याचा ‌अर्थ विचारण्याचा आगाऊपणा कधी केला होतात काय? (पण ते बाकीबाब पडले ना!)

बाकीबाब काय, शेक्सपियर काय, किंवा प्रस्तुत कवी काय, यांच्या कृतीत अर्थ शोधत बसायचा नसतो. उलट, यांच्या रचनेत काऽही (किंवा काहीऽही) अर्थ नाही, असे आगाऊ गृहीत धरूनच पुढे वाचायचे असते, नि रचनेचा आनंद लुटायचा असतो. (चुकून ‌अर्थ सापडलाच, तर तो बोनस! अर्थात, कवीला तो अर्थ अपेक्षित असेलच – किंवा, कवीला कोठलाही अर्थ अपेक्षित असेलच – असे नाही, या मिठाच्या खड्यासकटच.)

रचनेला अर्थ असलाच पाहिजे, असे कवीवर बंधन नसते. किंबहुना, अर्थ नसलेल्या रचना बनविणे, हा तर कवीचा अधिकारच आहे! (पोयटिक लायसन म्हन्त्यात त्यास्नी.)

असो चालायचेच.

—————

वुड्डहौससाहेबाकडून साभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीबाबांच्या उपरोद्धृत कवितेचे टायटल ‘चित्रगिटार’ असेही चालले असते, असे सुचविले असतेत काय?

(आम्ही सुचविले असते. परंतु, आमचे ऐकतो कोण?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यू जर्सीत असे गंजत पडलेले रूळ आणि त्याच्या आसपास असे ससे भरपूर आहेत. माणसे जवळ आल्यास ते पळत सुटतात. या दृश्याची आणि पळणाऱ्या दाढीवाल्याची काव्यात्मक सांगड घालण्याचा माझा प्रयत्न मात्र हुकलेला दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

न्यू जर्सीत असे गंजत पडलेले रूळ आणि त्याच्या आसपास असे ससे भरपूर आहेत. माणसे जवळ आल्यास ते पळत सुटतात. या दृश्याची आणि पळणाऱ्या दाढीवाल्याची काव्यात्मक सांगड घालण्याचा माझा प्रयत्न मात्र हुकलेला दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

न्यू जर्सीशी (एअरपोर्ट आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीव्यतिरिक्त ) काही संबंध आला नसल्याने गंजलेले रुळ किंवा ससे माहीत नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0