ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ४
प्रकरण ४ – आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
सुधीर भिडे
विषयाची मांडणी
- त्रिदोष आणि व्यक्तित्व
- त्रिदोष आणि आहार
- त्रिदोषांना भौतिक अस्तित्व आहे?
- समालोचन
***
त्रिदोष
आयुर्वेदाप्रमाणे शरीरात पित्त, वात, आणि कफ असे तीन दोष असतात.
येथे हे लक्षात घेणे जरूर आहे की इंग्रजीत आणि मराठीत कफ या शब्दाचा वापर आपण सर्दी, पडसे, खोकला अशांसाठी करतो. आयुर्वेदातील कफ हा शब्द अगदी वेगळा, निराळा आहे. त्याचा सर्दी, पडसे, खोकल्याशी काही संबंध नाही. पित्त म्हणजे ॲसिडिटीमुळे घशाशी येणारा पदार्थ असा सामान्यपणे अर्थ होतो. पण त्रिदोषात तो अर्थ नाही.
त्रिदोषांतील समतोल गेला की आजार उत्पन्न होतो. (ही कल्पना जुन्या काळातील पाश्चिमात्य वैद्यकातील चार द्रव कल्पनेसारखीच आहे.) प्रत्येक व्यक्तीत या तीन दोषांचे प्रमाण निरनिराळे असते. जो दोष एखाद्या व्यक्तीत जास्त प्रमाणात असतो तेव्हा त्या व्यक्तिला त्या दोषाच्या प्रमाणे औषधे दिली जातात.
त्रिदोष आणि व्यक्तित्व
खालील तक्त्यातील माहिती आयुर्वेद उवाच भाग २, या श्री. बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील प्रकृती परीक्षण या प्रकरणातून घेतली आहे.
शारीरिक ठेवण, क्षमता | वात | पित्त | कफ |
---|---|---|---|
शरीराची ठेवण | अनियमित | मध्यम बांधा, नाजूक शरीर | धिप्पाड, पिळदार |
केस | कोरडे, राठ | रेशमी. मऊ | लांब, दाट |
डोळे | लहान, निस्तेज | पांढरा भाग पिवळसर | आकर्षक, तेजस्वी |
ओठ | कोरडे, काळे | नाजूक, लालसर | मांसल |
दात | वेडेवाकडे | पिवळसर छटा | बळकट चमकदार |
जीभ | रखरखीत | पातळ, लाल | गुलाबी, मांसल |
गाल | आत गेलेले, फुटणारे | चटकन लाल होणारे | गुबगुबीत |
त्वचा | कोरडी, खरखरीत | मऊ, नितळ | सतेज, गुलाबी |
नखे | लहान रुक्ष, | मध्यम, पिवळसर | मोठी गुलाबी |
तळहात | कोरडे खरखरीत. | लालसर, नाजुक | गुलाबी गुबगुबीत |
बोटे | बारीक, वाकडी | सडपातळ, लांब | मांसल जाड |
सांधे | प्रॉमिनंट, आवाज करणारे | मध्यम, खाज येणारे | मजबूत, घट्ट |
कान | वेडेवाकडे, लहान | मध्यम, लाल होणरे | मोठे |
भूक | अनियमित | जास्त | साधारण |
तहान | वारंवार | जास्त | जास्त नाही |
पचन | अनियमित | तेलकट पदार्थांचा त्रास | चांगले |
मलप्रवृत्ती | अनियमित | जुलाब प्रवृत्ती | व्यवस्थित |
मूत्र प्रवृत्ती | अनियमित | भरपूर, पिवळा रंग | ४/५वेळा, स्वच्छ |
घाम | कमी | जास्त | थोडाफार |
चालणे | भरपूर, अडखळत | जलद | डौलदार, |
हालचाली | सारखा चाळा | एका ठिकाणी बसणे आवडत नाही. | शांत बसायला आवडते |
बोलणे | बोलायला आवडते | स्पष्टवक्तेपणा | संथ, समगतीने |
अन्न | गरम आवडते | थंड आवडते | अतिरेक नाही |
नजर | चंचल | तीक्ष्ण | सौम्य, प्रेमळ |
स्वर | घोगरा | उंच, धारदार, | शांत, प्रेमळ |
वर्ण | निस्तेज | गोरा सतेज | सतेज, आकर्षक |
स्त्री-पुरुष संबंध | जबरदस्त इच्छा, क्षमता नाही | इच्छा आणि कुवत दोन्ही मध्यम | इच्छा तेवढी क्षमता |
रोगप्रतिकार | सर्वसाधारण | चांगली | |
मानसिक आणि बौद्धिक क्षमता | वात | पित्त | कफ |
प्रतिक्रिया | संदिग्ध | उत्कट आणि तीव्र | शांत, स्थिर |
कृतज्ञता | कृतज्ञता ठेवतील असे नाही | जेवढ्यास तेवढे | भरभरून देणारे |
क्षमाशीलता | माफ करत नाहीत | चूक कबूल केली तर माफ करतात | पटकन माफी |
समाधान | समाधान कशानेच होत नाही | हवी असलेली गोष्ट मिळाली की समाधानी | आंतरिक समाधानी |
संयम | चंचल | संयम कमी | संयम वाखाणण्याजोगा |
निर्णयक्षमता | गोंधळलेल्या | झटपट निर्णय | अचूक, पक्के निर्णय |
व्यक्तिमत्त्व | साधारण | चार चौघात उठून दिसणाऱ्या | प्रभावी |
औदार्य | औदार्य नसते | काही व्यक्तींसाठी औदार्य | खऱ्या अर्थाने उदार |
श्रद्धा | कशावरच विश्वास नाही | विश्वास चटकन बसतो, पण कायम राहील असे नाही | अढळ श्रद्धास्थान |
सहकार्य | मदत करण्याची वृत्ती कमी | अतिशय संवेदनशील | मदतीला तत्पर |
भीती | लहानसहान गोष्टींची भीती | भीती वाटली तरी सावरतात | असुरक्षितता नाही |
हेवा | लहानलहान विषयात असूया | असूया असते | हेवेदावे क्वचित |
लोभ | लोभ असतो | काही विशिष्ट गोष्टींचेच आकर्षण | लोभ कमी |
राग | लहानसहान गोष्टीवरून राग | राग येतो आणि लवकर उतरतो | राग कमी |
मैत्री | मैत्री कमी | मोजके मित्र | मोठे मित्रमंडळ |
अवधान | एकावेळी दोन कामे करणे अवघड | एकावेळी जास्त कामे शक्य | अष्टावधानी |
योजना | योजना करतात पण तडीला नेत नाहीत | सर्वोत्तम | दीर्घकालीन योजना तडीस नेणे जमते |
विचार | विचारांचा गोंधळ | निर्णय क्षमता कमी | सुसूत्र विचार |
सहन शक्ती | कमी | हळव्या आणि संवेदनशील | सामंजस्य |
एकाग्रता | अवघड | कामात रुची असेल तर एकाग्रता | चांगली एकाग्रता |
आकलनशक्ती | चटकन लक्षात येते पण स्मरणात रहात नाही | कुशाग्र बुद्धी, चांगली स्मरणशक्ती | बुद्धिमान आणि विद्वान |
या तक्त्यातील माहितीवरून असे दिसते की कफ वृत्तीच्या व्यक्ती चांगले गुण आणि शारीरिक क्षमता दाखवितात. पित्त दोषाच्या व्यक्ती मध्यम प्रतीच्या असतात आणि वात दोषाच्या व्यक्ती कनिष्ठ दर्जाच्या असतात. हे समजण्यासारखे आहे की हे ५५ गुणधर्म दाखविणार्या वात, पित्त किंवा कफ प्रकृतीच्या व्यक्ती मिळणे लाखात एक हेही शक्य नाही. सर्व व्यक्तींत हे तीनही प्रकारचे गुणधर्म निश्चित प्रमाणात असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये वात गुणधर्म जास्त दिसतात, कफ गुण त्यापेक्षा कमी दिसतात आणि पित्त गुण सर्वांत कमी दिसतात अशा व्यक्तीस वात – कफ – पित्त प्रकृतीची व्यक्ती असे ओळखले जाते. अशा प्रकारे सहा प्रकारच्या प्रकृतीच्या व्यक्ती असतात.
- वात – पित्त – कफ
- वात – कफ – पित्त
- पित्त – वात – कफ
- पित्त – कफ – वात
- कफ – वात – पित्त
- कफ – पित्त – वात
खालील संदर्भात वात, पित्त आणि कफ याचा निराळाच अर्थ दिलेला आहे - The nervous system (Vata or air), the venous system (Pitta or fire) and the arterial system (Kapha or water) are three basics of Ayurveda and very important for normal body function. (Ayurveda and cancer, Roopesh Jain, Susmit Kosta, and Archana Tiwari, Pharmacognosy Res v.2(6); Nov-Dec 2010 , PMC3111701)
त्रिदोष आणि आहार
वातप्राधान्य, पित्तप्राधान्य आणि कफप्राधान्य व्यक्तींसाठी निरनिराळे आहार सांगितले आहेत.
संदर्भ - #घरोघरी आयुर्वेद, लेखक वैद्य परीक्षित शेवडे, एम. डी. (आयुर्वेद), नवचैतन्य प्रकाशन, २०१६
वातप्राधान्य व्यक्ती – तेल लावून गरम पाण्याने स्नान करावे, स्वयंपाकात तिळाचे तेल वापरावे, कानात दोन थेंब तेल घालावे, झोपण्यापूर्वी तळपायांना तेल लावून मसाज करावा. आहारात दूध, तूप, सुकामेवा यासारखे स्निग्ध पदार्थ असू द्यावे. वाऱ्याचा झोत अंगावर पडू देऊ नये, एरंडेलाचा वापर करावा. अधूनमधून बस्ती करावी, काम, शोक, भय यांचा त्याग करावा. चिंता करणे टाळावे.
पित्तप्राधान्य व्यक्ती – पित्त म्हणजे साक्षात अग्नीच; तूप हे पित्ताचे शमन करते. तूप-साखर, साय-पोळी-साखर आहारात ठेवावी, उपवास करू नये, उन्हात काम करू नये, चंदनाचा लेप लावावा. लोणचे, पापड टाळावेत,; विरेचन चांगला उपक्रम आहे.
कफप्राधान्य व्यक्ती – कफावरचे औषध म्हणजे मध. आहारात जव, ज्वारी आणि बाजारीच्या भाकऱ्या खाव्यात. तिखट, कडु, तुरट पदार्थ खावेत; मिठाईपासून दूर राहावे, नियमित व्यायाम करावा, दिवसा झोपणे टाळावे.
त्रिदोषांना भौतिक अस्तित्व आहे?
या विषयावर बनारस हिंदू युनिवर्सिटीत आयुर्वेदातील शरीरशास्त्र शिकविणारे प्राध्यापक, किशोर पटवर्धन काय लिहितात ते पाहू. Confessions of an Ayurveda Professor हा निबंध इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स या मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाला. नंतर हा निबंध Science, the wire येथे प्रकाशित झाला. त्या निबंधातील काही भाग –
Rescuing tridosha theory
As tridosha theory lays the foundation for all aspects of Ayurveda, making it sound relevant was very essential for me.
Ayurveda makes use of the concept of three doshas, viz, vata, pitta and kapha, to describe one's constitution, to explain physiology, to plan diet and lifestyle, to explain the pharmaceutical effects of herbs, to explain the pathogenesis of different diseases, to explain various symptoms and to plan therapeutic interventions. It is the fundamental theory that all Ayurveda students deal with during their entire educational programme.
All these efforts made tridosha theory look very practical, modern, relevant, and attractive.
I made every effort to legitimise ancient literature using a strategy of "strained interpretation" (drawing unintended but convenient meanings of certain words and phrases using cherry-picked references from commentaries) – which I called "rationalisation" – to make it sound modern and relevant. A few of my teachers who followed this strategy had had a profound influence on me as they made it possible for us to connect very well with the subject.
As tridosha theory lays the foundation for all aspects of Ayurveda, making it sound relevant was very essential for me.
One of my teachers had already convinced me that this was a mere theory and did not represent any material entities in the human body – which, I thought, solved most of the problems. I went on to elaborate how different entities in the human body at different levels of organisation could fit in well within this framework. I also included the most recent advances in neuro-endocrine immunology to justify this theory.
Let us take up a hypothetical example to understand this more clearly. Suppose we plan a study to record resting blood pressures among adults of different prakriti groups. Let our hypothesis be that the individuals with kapha prakriti could be more prone to hypertension as they tend to gain weight easily and are likely to be leading a sedentary lifestyle because of the "heavy" (guru) and "slow" (manda) nature of kapha. Kapha could also be leading to plaque formation in the arteries because of its "oily" (snigdha) nature.
However, let us assume that the results of our study suggest something very different: "individuals with pitta prakriti tend to develop hypertension more frequently than those of kapha individuals". Now we can argue that "pitta prakriti individuals tend to be more aggressive because of 'hot' (ushna) and 'sharp' (tikshna) properties of pitta, and hence, their overactive sympathetic nervous system might lead to hypertension".
Thus, every result can be justified, irrespective of what our actual hypothesis was. In this example, though the original assumption stands falsified, we rescue the theory by proposing an ad hoc conjecture and re-interpretation. This way, our theories will never be "disprovable" or "refutable".
समालोचन
त्रिदोष ही आयुर्वेदातील महत्त्वाची संकल्पना आहे. या कल्पनेचा आजाराचे निदान आणि उपचार याच्याशी संबंध आहे. त्रिदोष कल्पनेचा प्रथम संबंध व्यक्तित्वाशी येतो. वर आलेल्या तक्त्यातील माहिती प्रमाणे वात, पित्त आणि कफ या तीन पकारची व्यक्तित्वे असतात. साधारणपणे कफ प्रवृत्तीच्या व्यक्ती सुदृढ शारीरिक स्थिती आणि चांगली मानसिक स्थिती दर्शवितात.
वात, पित्त आणि कफ हे शब्द आजार या संबंधातही वापरले जातात. आपण पाहिल्याप्रमाणे कफदोषात बहुतेक चांगले गुण दिसतात. कफदोष वाढला तर शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारली पाहिजे मग इलाज कशाचा?
प्रा. पटवर्धन यांच्या लिखाणाप्रमाणे या तीन दोषांचे शारीर अस्तित्व असते की नाही याबद्दल शंका आहे. आणि असले तरी मोजमाप हा प्रश्न राहतोच. पित्त वाढले हे काय मोजून ठरवायचे?
ॲलोपथीपूर्वीचे पाश्चिमात्य वैद्यक आणि आयुर्वेद यांत बरेच साम्य दिसते. दोन्ही प्रणालींचा निर्माता त्या संस्कृतीतील देव होता. पाश्चिमात्य वैद्यकात चार ह्युमर्सचा विचार होतो; ज्यांतील समतोल बिघडला की आजार होतात असे समजले जाते. आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ यांचा समतोल गेला की आजार होतो. दोन्ही प्रणालींत धर्माचा प्रभाव होता. व्यक्तित्व आणि त्रिदोष यांचा संबंध ही कल्पनाही ॲलोपथीपूर्वीचे पाश्चिमात्य वैद्यकात येते.
चरक, सुश्रुत, पतंजलि आणि शारंगधर या वैद्यांनी आयुर्वेदाचा पाया आठशे वर्षे किंवा त्या आधी रचला. आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धान्त आहेत – त्रिदोष, आम, धातू आणि अग्नि कल्पना. या सिद्धांताविषयी जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती वर्णनात्मक आहे. या कोणत्याच कल्पनेचे मोजमाप नाही. त्यामुळे या कल्पना शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणे शक्य नाही. आयुर्वेदात काम करणार्या व्यक्तीही या कल्पनांविषयी साशंक दिसतात. या क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींनी शास्त्रीय दृष्टीकोन ठेऊन वरील कल्पना सिद्ध करण्याची गरज आहे. आणि या कल्पना शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकत नसतील तर त्यांचा त्याग करणे आवश्यक आहे.
(क्रमशः)
***
भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
Result Kay आहे
आरोग्य उत्तम कसे असावे .आहार ,विहार , हे फक्त आयुर्वेद च सांगू शकतो.
Alopathy नाहीं.
काही बाबी ह्या फक्त जाहिराती आहेत.
अवयव ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया जी जाहिरात केली जाते त्या पेक्षा खूप विपरीत आहे.
अनेक औषध आयुष्भर घेणे किती दिवस तो व्यक्ती जगेल ह्याची काही खात्री नाही
पण ह्या गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत.
अनेक गंभीर आजारात बरे होण्याची काहीच शास्वती alopathy डॉक्टर पण देवू शकत नाहीत.
आयुर्वेद नी हे गंभीर आजार बरे होतील ह्याची पण शास्वती नाही.
दोन्ही एकाच लेवल ल आहेत
Result Kay आहे
आरोग्य उत्तम कसे असावे .आहार ,विहार , हे फक्त आयुर्वेद च सांगू शकतो.
Alopathy नाहीं.
काही बाबी ह्या फक्त जाहिराती आहेत.
अवयव ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया जी जाहिरात केली जाते त्या पेक्षा खूप विपरीत आहे.
अनेक औषध आयुष्भर घेणे किती दिवस तो व्यक्ती जगेल ह्याची काही खात्री नाही
पण ह्या गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत.
अनेक गंभीर आजारात बरे होण्याची काहीच शास्वती alopathy डॉक्टर पण देवू शकत नाहीत.
आयुर्वेद नी हे गंभीर आजार बरे होतील ह्याची पण शास्वती नाही.
दोन्ही एकाच लेवल ल आहेत
पतंजलि ने अनेक जुन्या
पतंजलि ने अनेक जुन्या लुप्तप्राय आयुर्वेदिक ग्रंथांच्या पांडुलिपी शोधून त्यांचे डिजिटली करण (हजारो पुस्तकांचे ) आणि काहींचे प्रकाशन केले आहे. https://acharyabalkrishna.com/book-category/ancient-indian-treatises/
लक्षणं आपल्याला लागू पडतात
शाळेत रोगांची लक्षणं वगैरे शिकवायचे. ते सगळे रोग आपल्याला झाले आहेत, असं वाटायचं. हा तक्ता बघून पुन्हा आपण किती आजारी आणि कमकुवत मानसिक शक्ती असणाऱ्या आहोत, असं वाटायला लागले. एकदम स्मरणरंजनातच बुडाले मी!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.