दोन किलो पुस्तकं...

या निमित्ताने मनात आलेले विचार आणि प्रश्न.

- "पुस्तकं" ही इतर मालापेक्षा वेगळी आहेत की ती "माल"च आहेत आणि त्यामुळे बाजाराच्या नागड्या मागणी पुरवठा तत्वानेच सर्व व्हावं असं वाटतं का?

- पुस्तकांना लेखकाच्या पूर्वेतिहासानुसार आणि लिखाणाच्या अपेक्षित दर्जानुसार वेगवेगळ्या किंमती असाईन होणं हा पुस्तकाच्या वैविध्याचा भाग आहे आणि तो तसाच रहावा, की ही सर्व हाईप आहे? सिनेमाच्या तिकिटाच्या किंमती जशा कमीजास्त फरकाने एकच असतात (प्रीमियम सिनेमांचे दर जास्तही असू शकतात) तसंच पुस्तकाबाबत असावं का?

- की पुस्तक हा प्रकार पूर्णपणे मोफतच उपलब्ध असला पाहिजे? ("ओपन सोर्स" किंवा "फ्री नॉलेज" किंवा तत्सम विचारपद्धतीप्रमाणे)

- या निमित्ताने, पुस्तकांप्रमाणे इतर किमान काही वस्तू किंवा सेवा तरी बाजाराच्या नैसर्गिक नियमांपेक्षा वेगळ्या रितीने विकल्या जाव्यात हा विचार योग्य की अयोग्य? उदा. एका बायपास सर्जरीवर कुटुंबातली कोणतीही एक मायनर सर्जरी फ्री.. हे योग्य ठरावं का? (दंतविषयक उपचार आणि पॅथॉलॉजी टेस्ट यांची पॅकेजेस आधीच रुढ झालेली दिसतात()

किंवा कोणत्याही तीन विषयांची शिकवणी लावा आणि चौथा मोफत (हे होतही असेलच ऑलरेडी..) हे उचित आहे का?

- बाजारनियमानुसार सर्व गोष्टी योग्य रितीने चालतील का?

दोन्हीकडून विचार केला की दोन्ही बाजू योग्यच वाटतात. जर भाजीपाला किलोने विकला जातो तर पुस्तकं कुणीकडची टिक्कोजीराव लागून गेली आहेत? असंही वाटतं..

पण मग पुस्तक हे त्याहून जास्त काहीतरी आहे असंही वाटतं.. शिक्षक हा दुकानदारापेक्षा वेगळा आहे असं वाटतं..

की हा केवळ संस्कारांचा भाग? केवळ एक "कंडिशनिंग" फक्त?

...यामुळे विचारात स्पष्टता येत नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

ऐकून शहारायला झालं होतं. पण मी जाऊन पुस्तकं मात्र पाहीन आणि काही मनाजोगतं मिळालं तर आणीनच, हेही नक्की. दुहेरी वागणं आहे हे, मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुस्तकाच्या किमती कमीजास्त असणं याबद्दल मला काही वाटत नाही. पण अशी किलोवारी पुस्तकं मिळत असतील तर आमच्यासारख्यांना बरंच आहे Smile तेवढेच पैसे वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणतेही पुस्तक पन्नास रुपयात या योजनेनंतर
ही योजना वाचून धक्का बसला नाही
चांगली पुस्तके जर कमी किँमतीत मिळत असतील तर हरकत नाही
ती पुस्तके चांगली असण्याशी मतलब
नाहीतरी ट्रेनमधे पुलंचे व्यक्ती आणि व्यल्ली साठ रुपयात मिळते
एकदा सुंदराबाई हाँलला जाऊन बघावे असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

नाहीतरी ट्रेनमधे पुलंचे व्यक्ती आणि व्यल्ली साठ रुपयात मिळते

ही नेमकी काय भानगड आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रेनमध्ये पुलंचे व्यक्ती आणि वल्ली, जीए चे काजळमाया वैग्रे पुस्तके १०० ते १२० च्या दरम्यान विकली जातात.
बार्गेनिंग केल्यास ६० रुपयापर्यत मिळून जाते.
मे बी पायरटेडेड कॉपीज असाव्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

ट्रेनमध्ये पुलंचे व्यक्ती आणि वल्ली, जीए चे काजळमाया वैग्रे पुस्तके १०० ते १२० च्या दरम्यान विकली जातात.

ट्रेनमध्ये, बोले तो लोकलमध्ये? मुंबईच्या?

मे बी पायरटेडेड कॉपीज असाव्यात

पायरेटेड असाव्यात, याबद्दल फारशी शंका नाही. पण माझ्या प्रश्नाचा रोख तो नव्हता.

मुद्दा हा, की तुम्ही पुस्तकांबद्दल बोलताय, परवा कोणीतरी साड्यांबद्दल म्हणाले, बहुधा वॉशिंगमशीनबद्दलसुद्धा म्हणाले... म्हणजे, आजकाल मुंबईच्या लोकलमध्ये विक्रेते येतात?

पूर्वी असे नव्हते. ("स्वातंत्र्यपूर्व काळात...")

म्हणजे, मुंबईच्या लोकलच्या गर्दीत जेथे प्रवाशांना चढायलाउतरायला, झाले तर उभे राहायला तर सोडा, पण लटकायलासुद्धा जागा नसते (निदान आमच्या काळात तरी नसे), तेथे विक्रेते आपापला माल बरोबर घेऊन डब्यात हिंडूफिरू, झालेच तर आपल्या वस्तू विकू शकतात? आणि प्रवासीसुद्धा जेथे श्वास घ्यायला ना जागा असते ना उसंत (निदान पूर्वी तरी नसे), तेथे घासाघीस नि पैशाची आणि मालाची देवाणघेवाणसुद्धा करतात?

काय मुंबई ओस पडली आहे काय हल्ली?

(वॉशिंग मशीन????? गिम्मी अ ब्रेक!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रेनमध्ये, बोले तो लोकलमध्ये? मुंबईच्या?

येस बोले तो मुंबईच्याच लोकलमध्ये. गोरेगाववरुन सुटते सकाळी ९.३० ला

पायरेटेड असाव्यात, याबद्दल फारशी शंका नाही. पण माझ्या प्रश्नाचा रोख तो नव्हता.

ओके

मुद्दा हा, की तुम्ही पुस्तकांबद्दल बोलताय, परवा कोणीतरी साड्यांबद्दल म्हणाले, बहुधा वॉशिंगमशीनबद्दलसुद्धा म्हणाले... म्हणजे, आजकाल मुंबईच्या लोकलमध्ये विक्रेते येतात?

आजकाल काय मुंबईच्य लोकलमध्ये नेहमीच विक्रेते येतात. तुम्हाला माहीत नाही काय?? अभ्यास वाढवा जमले तर

पूर्वी असे नव्हते. ("स्वातंत्र्यपूर्व काळात...")

असेलही. मला याबाबतीत काही माहीत नाही. सो पास

म्हणजे, मुंबईच्या लोकलच्या गर्दीत जेथे प्रवाशांना चढायलाउतरायला, झाले तर उभे राहायला तर सोडा, पण लटकायलासुद्धा जागा नसते (निदान आमच्या काळात तरी नसे),

हो, मुंबईच्या लोकलच्या गर्दीत जेथे प्रवाशांना चढायलाउतरायला, झाले तर उभे राहायला तर सोडा, पण लटकायलासुद्धा जागा नसते हे खरे आहे. पण तरीही तेथे प्रवास होतो. धक्के मारत आणि धक्के खातही

तेथे विक्रेते आपापला माल बरोबर घेऊन डब्यात हिंडूफिरू, झालेच तर आपल्या वस्तू विकू शकतात? आणि प्रवासीसुद्धा जेथे श्वास घ्यायला ना जागा असते ना उसंत (निदान पूर्वी तरी नसे), तेथे घासाघीस नि पैशाची आणि मालाची देवाणघेवाणसुद्धा करतात?

या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे होय अशीच आहेत. खच्चून भरलेल्या विरार किंवा बोरीवली ट्रेनमध्ये माल विकला जातो.

आणि मालाची व्हरायटी पुढीलप्रमाणे

१) फळे, केसाच्या क्लिप्स, ईयररिंग्ज, बांगड्या,
२) रेल्वेपासचे कव्हर, गोळ्या ( लिमलेट्च्या), कॅल्कुलेटर्स, सौंदर्यप्रसाधने
३) ड्रेसपीस, कपडे, भाज्या, पुस्तके ईत्यादी

काय मुंबई ओस पडली आहे काय हल्ली?

नै नै ती काळजी सोडून द्या. उलट आता मुंबईलाच वाढता भार सोसवेनासा झालाय. वर्तमान पत्र वाचत नाही काय

(वॉशिंग मशीन????? गिम्मी अ ब्रेक!)

ओके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

बादवे,

"Minimum purchase of 1/2 kilo & in multiples of 100 grams thereof"

ही ओळ विशेष लक्षवेधी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Books By Weight
असं लिहीलंय म्हणून बरं, नाहीतर मला वाटलं हजाराच्या संख्येत पुस्तकं मिळताहेत शंभर रुपयात!
असो.
असलेल्या पुस्तकांच्या किंमती पडताहेत याचा आनंदही होतो पण पडलेल्या किंमतींमुळे नवीन पुस्तके लिहीणे बंद होईल याची भीतीही वाटते.

वजनावारी विकताहेत म्हणजे नक्कीच चांगली आणि गंभीर पुस्तके असणार! (सेल्फ हेल्प, अध्यात्मिक व मोटिव्हेशनल टाईपच्या पुस्तकांना चिकार मागणी असल्याने ती वजनावर विकत नाहीत असे वाटते).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकला पहिल्या सेलच्यावेळी "मूल्य" असते.

ही जुनी सेकंडहॅण्ड (प्री ओन्ड Wink ) पुस्तके आहेत. त्यांचा दर ती कोणाची आहेत यावर अवलंबून नाही.

भंगारात रोल्सरॉईसचा पत्रा आणि इंडिकाचा पत्रा एकाच भावाने जातात.

या पैकी जी पुस्तके जुनी न विकली गेलेली आहेत ती विकली गेली नव्हती कारण त्यांचे "ग्राहकाच्या मनातले मूल्य" त्यावर छापलेल्या किंमतीपेक्षा कमी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भंगारात रोल्सरॉईसचा पत्रा आणि इंडिकाचा पत्रा एकाच भावाने जातात.

+१०० Smile सहमत आहे नितिन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यू अँड प्रीओन्ड अशी दोन्ही प्रकारची दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही जुनी सेकंडहॅण्ड (प्री ओन्ड (डोळा मारत) ) पुस्तके आहेत.

तेथे 'न्यू अँड प्री-ओन्ड' पुस्तके म्हटले आहे. सर्वच पुस्तके सेकंडहँड नसावीत.

जुनी पुस्तके रद्दीच्या भावाने (बोले तो, वजनावर) विकणे हे एक वेळ समजू शकतो. पण नव्या पुस्तकांच्या बाबतीत काही शंका उद्भवतात.

- ही विक्री नेमके कोण करत आहे? पुस्तकविक्रेता, प्रकाशक, की अन्य कोणी तृतीयपक्ष?
- नव्या पुस्तकांची विक्री ही सामान्यतः नेमकी कशी चालते? म्हणजे, पुस्तकविक्रेता हा अमूकअमूक पुस्तकाच्या इतक्याइतक्या प्रती स्वतःच्या जोखमीवर प्रकाशकाकडून / वितरकाकडून घाऊक भावात विकत आणून मग त्या आपल्या दुकानात मांडून एकएक करत विकत बसतो, की प्रकाशक / वितरक हा केवळ एखाद्या आवृत्तीच्या प्रती या विविध इच्छुक पुस्तकविक्रेत्यांकडे स्वतःच्या (बोले तो, प्रकाशकच्या) जोखमीवर आणि टक्केवारीच्या (कमिशनच्या) वायद्यावर वितरित करतो?
- एखाद्या आवृत्तीच्या प्रती जर खपल्या नाहीत, तर त्याचा भुर्दंड नेमका कोणाला पडतो? पुस्तकविक्रेत्याला, की प्रकाशकाला? न खपलेल्या प्रती या प्रकाशकास परत करण्याची / प्रकाशकास तसे कळवून नष्ट करण्याची मुभा आणि/किंवा जबाबदारी पुस्तकविक्रेत्यास असते काय?
- पुस्तकाच्या प्रतीची विक्रीपूर्व तात्त्विक मालकी नेमकी कोणाची? प्रकाशकाची, की पुस्तकविक्रेत्याची? विकल्या न गेलेल्या प्रतींची हवी तशी विल्हेवाट लावण्याचा अथवा वाटेल त्या किमतीला विकण्याचा अधिकार अथवा मुभा पुस्तकविक्रेत्यास असते काय? की तो केवळ प्रकाशकाचा अधिकार आहे?
- काही इंग्रजी पुस्तकांवर, "ही प्रत तिच्या आवरणाविना विक्रीस ठेवलेली आढळल्यास ती खरेदी करू नये; ती 'विकली न गेलेली आणि म्हणून नष्ट केलेली' म्हणून प्रकाशकास कळवली गेलेली असू शकते, आणि त्या परिस्थितीत आपण चोरीचा माल विकत घेत असू शकता, याची जाणीव असू द्यावी" अशा आशयाचा (काहीसा पुणेरी / ब्रिटिश छापाचा?) मजकूर छापलेला वाचल्याचे स्मरते. ही नेमकी काय भानगड आहे?
- यावरून संबंधित परंतु किंचित अवांतर: 'पेंग्विन' या प्रकाशनसंस्थेने वितरित केलेल्या पुस्तकांवर सामान्यतः ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या देशांतील त्यात्या पुस्तकाची किंमत छापलेली पाहिलेली आहे. पैकी, (बहुधा) ऑस्ट्रेलियातील किमतीसोबत 'रेकमेंडेड, बट नॉट मँडेटरी' अशीही पुस्ती सामान्यतः छापलेली असते, असे निरीक्षण आहे. ही नेमकी काय भानगड आहे?
- नव्या पुस्तकांच्या विक्रीतील / वितरणातील प्रकाशक / वितरक आणि पुस्तकविक्रेता यांच्या नेमक्या भूमिकांच्या संदर्भात एकाहून अधिक मॉडेले प्रचलित आहेत काय / असू शकतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक प्रकाशनाचा व्यवहार नक्की कसा चालतो ते ठाऊक नाही.

बहुधा प्रकाशक रिस्क घेतो - गुंतवणुक करतो. (गरजू/नवोदित) लेखक कधीकधी त्यातील काही रिस्क शेअर करतो. मुद्रक बहुधा कसलीच रिस्क घेत नाही.

यात नवी आणि जुनी दोन्ही पुस्तके आहेत. त्यातली नवी पुस्तके (किलोच्या) कमी भावाने विकण्याची वेळ प्रकाशकावर आली असावी ती पुस्तके खपत नसल्यामुळे असावी.

बर्‍याच ठिकाणी इतर अनेक वस्तू (उदा कपडे, टॉवेल वगैरे) मूळ किंमतीच्या पेक्षा खूप कमी किंमतीला (वजनावर देखील) विकल्या जातात (स्टॉक क्लिअरन्स म्हणा किंवा इतर काही कारणाने). काही हाय एण्डचे ब्रॅण्डेड कपडे नेहमीच (बाराही महिने) सेलमध्ये विकले जातात. तर पुस्तके विकली जायला काहीच हरकत नाही.

अवांतर: पुस्तके वजनावर विकली जात आहेत याचा (मानसिक) धक्का मोठा असावा. माझ्या रफ अंदाजाप्रमाणे २०० रु किलोने घेतलेले पुस्तक सरासरी २५-३०% हून अधिक स्वस्त मिळणार नाही असे वाटते. (वेगवेगळ्या पुस्तकाचे वजन करून किलोला दर किती बसतो ते पहायला हवे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसेही २०० रु किलो म्हणजे फार स्वस्त विकली जात नाहीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

किंमत कमी किंवा जास्त अशा प्रकारे पाहिलं तर फार स्वस्तात विकली जात नसतीलच.. उलट विक्री करण्यापूर्वी नक्की अंदाज घेतला गेला असेल आणि फायदेशीर आहे म्हणूनच विकली जात आहेत यात शंकाच नाही.

मनात आलेली शंका किंमत कमी किंवा जास्त यापेक्षा त्या पद्धतीवरुन आलेली आहे.

चित्रं / पेंटिंग्ज स्क्वेअरफुटांच्या मापात. (रंगारी स्क्वेफुटाच्या भावात भिंती रंगवतात तसं)
नृत्याविष्कार प्रतिमिनिट दराने...

.. वगैरे अशांची अद्याप सवय नसल्याने हे विचार आले असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. पुस्तक किलोनं विकलं जायला काही हरकत असावी असं वाटत नाही.

२. पुस्तकाची किंमत शेवटी बाजारातच ठरते, ते सध्यातरी सिनेमाहून वेगळे नाही, उत्तम पुस्तकाला बरा प्रतिसाद मिळाला की ते कलानिर्मितीसाठी पुरेसे असावे.

३. ओपन सोर्स चा मनी-सोर्स दुसरीकडे असतो ते पुस्तकाच्याबाबत साध्य झाल्यास तीपण ओपन होतील.

४. जिवनावश्यक सेवांमधे बाजारूपणा येणं घातक असेल/आहे, त्याचा दर्जा राखण्याचे निकष पाळले गेल्यास/हमी मिळाल्यास/नुकसान भरपाई मिळाल्यास बाजारुपणा देखील चालेल.

५. बाजारनियमानुसार सर्व गोष्टी योग्य रितीने चालतील का? - उत्क्रांतीचा नियम इथे पण लागू होतो त्यामुळे योग्य-अयोग्य साठी काळ-चौकट ठरवावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकाच थिएटरमध्ये लागलेले उदा. 'बायको चुकली स्टॅँडवर' आणि 'बालक पालक' ह्यांची तिकिटे वेगवेगळ्या दराची नसतात मग सुहास शिरवळकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकांच्या दरामध्ये फरक का असावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- पूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा सोविएत संघ अस्तित्वात होता, त्या काळी, 'मीर', 'प्रोग्रेस', 'नाउका' वगैरे सोविएत प्रकाशकांतर्फे (आणि 'लोकवाङ्मय गृह' या त्यांच्या भारतीय एजंटाद्वारे) तांत्रिक आणि वैज्ञानिक विषयांवरील अनेक रोचक व चांगलीचांगली पुस्तके काहीच्याकाही स्वस्त भावात वितरित केली जात असत. (म्हणजे, आतील मजकुराच्या दर्जाच्या तुलनेत किंमत ही प्रमाणाबाहेर कमी असे.) त्याबाबत कोणास काही आक्षेप असल्याचे आढळले नाही अथवा आठवत नाही.
- अनेक चांगल्याचांगल्या पुस्तकांच्या कमी प्रतीच्या कागदावर (बहुधा) झेरॉक्सपद्धतीने छापलेल्या (आणि अर्थातच बेकायदेशीर) आवृत्त्या भारतातील मोठमोठ्या शहरांच्या पदपथांवर राजरोसपणे विक्रीस आढळतात, आणि खपतातही. पुस्तकविक्रेत्यांकडील (दुकानांतील) अधिकृत प्रतींच्या किमतीत आणि या आवृत्त्यांच्या किमतीत प्रचंड तफावत असते. आता हे जर सर्रास चालू शकते, तर मग 'किलोच्या भावाने पुस्तकांची विक्री' हा फारसा आश्चर्यकारक प्रकार ठरू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किलोचा भाव तोलला तर १०० रु. प्रतिकिलो हा काही स्वस्तातला सौदा नक्कीच नव्हे.
(वाड्ग्मयाच्या मौलिकतेबद्दल पूर्ण आदर बाळगून..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाङ्मयाची मौलिकता वगैरे सोडा, पण पुस्तकांच्या सध्याच्या किमती पाहिल्या तर १०० रु. प्रतिकिलो हा तुलनेने लै स्वस्त सौदा आहे. लॉट्री म्हटली तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१०० रु. त फार तर एक पुस्तक बसेल, पुठ्ठ्याच्या वजनासहित !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाह! तुम्ही कुठल्या प्रकारचे पुस्तक घेताय त्यावर अवलंबून आहे. २०० पानाचे पुस्तक हार्डबाऊंड असले तरी वजन कमीच भरेल असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजही पुस्तकं एका विशिष्ट प्रमाणात वजनावरच विकली जातात. एक अभ्यास करायला हवा. कुठच्याही पुस्तकविक्रेत्याकडे जायचं, आणि १०० पानांची, २०० पानांची, ३०० पानांची आणि ४०० पानांची पुस्तकं बघायची. त्यांच्या किमती नोट करायच्या. माझी खात्री आहे की वजन आणि किंमत यांच्यात उत्तम कोरिलेशन सापडेल. या कोरिलेशनमध्ये काही प्रसिद्ध पुस्तकं आउटलायर असतीलही. जी वजनाच्या मानाने काहीशा अधिक किमतीला विकली जातात. अशी अधिक मागणीची पुस्तकं या अभ्यासातून काढून टाकली तर तयार होणारा आलेख हा अत्यंत लिनियर असेल. मग का झंझट करावी अचूक किमती ठरवण्याची? किलोवर पुस्तकं मिळतात या हव्यासाने कदाचित काही लोक जास्त पुस्तकंही घेतील.

याचं कारण उघड आहे. कोणीही लिहिलेलं पुस्तक असो, लेखकाची रॉयल्टी हा पुस्तकाच्या एकूण प्रकाशनाच्या खर्चाचा फार छोटा हिस्सा असतो. त्यामुळे पुस्तकाची किंमत ठरवताना, मोठा हिस्सा किलोवारीच ठरतो. ही प्रक्रिया आपल्या दृष्टिआड होत असल्यामुळे आपल्याला 'तसं होत नाही' असं समाधान असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
तसेही पुस्तके तयार करण्याचा कागद हा किलोवरच मिळत असावा.
दिल्ली मीरत कडच्या प्रकाशकांची पुस्तके आपल्या महाराष्ट्रातील प्रकाशकांच्या तुलनेत बरीच स्वस्त असतात. त्यांच्या काही पुस्तकांचा कागद/ बांधणी आपल्याकडच्या पुस्तकांसारखाच असतो तरीही.
हा प्रकार ते कसे काय करत असावेत?

तसेही पुस्तकांच्या किंमती ह्या जास्तच वाढीव असतात हे नक्की. सर्व खर्च वजा जाता टक्केवारीच्या हिशोबाने त्या वाढवलेल्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आंबे किलोवर विकतात तेंव्हाही एवढेच दु:ख होते. आमच्या मुंबईला मात्र डझनावर मिळतात अजून! (दुसर्‍या कुठल्याही शहराचे नांव घेतले नाहीये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


आंबे किलोवर विकतात तेंव्हाही एवढेच दु:ख होते.

अगदी अगदी - मलाही होते..

आमच्या मुंबईला मात्र डझनावर मिळतात अजून! (दुसर्‍या कुठल्याही शहराचे नांव घेतले नाहीये)

आमच्या पुण्यातही आंबे डझनावरच मिळतात अजून. काही पुणेकर आंबे पेट्यांच्या भावातही घेतात (मी पण दुसर्‍या कुठल्याही शहराचे नांव घेतले नाहीये);)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गोष्टीकडे जरा वेगळ्या नजरेने बघुयात का? म्हणजे कसं की दुकानदाराने ही पुस्तके लवकर विकली जात नाही म्हणून ही युक्ती केली असावी. मुळ किंमत हे एक न विकलं जाण्याचं कारण असू शकतं. पुस्तके साठवून ती दुकानदाराची जागाच अटवताहेत आणि कुणीही व्यवहारी व्यक्ती/दुकानदार माल खपला जावा म्हणून प्रयत्न करेलच की! आता पुस्तके ही वाचकांकरता 'माल' ह्यापेक्षा पुढची गोष्टं असू शकते/असते हे मान्य. परंतु ह्या पुस्तक विक्रीकडे त्यांनी 'सेल' म्हणून पाहायला हवं. शिवाय, दुकानदार काही अगदीच रद्दीच्या भावाने पुस्तके विकत नाहीये. जी पुस्तके लवकर विकली जाताहेत किंवा ज्याना जास्त मागणी आहे त्यांचा ह्यात नक्कीच समावेश नसेल असे वाटते, पण शोधायला गेलं तर लॉटरीही लागू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

विक्रीकरिता ठेवलेली पुस्तके नीट निवडली, तर वजनावारी विक्री करता येईल असे वाटते.

सर्वात सोपे उदाहरण म्हणून साधारण एका आकारमानाची (म्हणजे वजनाची, पृष्ठसंखेची म्हणा) पुस्तके निवडूया. मग त्यांच्यापैकी साधारण एका किमतीची पुस्तके निवडूया. अशा पुस्तकांची विक्री वजनावारी केली तर साधारण किंमत तितकीच मोजावी लागेल.

त्याच प्रकारे अशी पुस्तके निवडली की दुप्पट पृष्ठसंख्या असलेले पुस्त्क दुप्पट महाग हवे, तिप्पट पृष्ठसंख्या असलेले पुस्तक तिप्पट महाग... तर अशा पुस्तकांची रास यादीनुसार विका वा वजनानुसार किंमत तीच येईल.

- - -
वरील प्रक्रियेइतकी नेमकी प्रक्रिया अपेक्षित नाही. वाङ्मयीन मूल्य असे काही असते म्हणा. पण तरी जाडजूड पुस्तके अधिक महाग असतात, नाही का? सरासरी वजनावारी किंमत काढली, तर किलोवारी किंमत साधारण मूळ किमतीइतकीच येईल.

- - -
क्षणभर शहारायला झाले, पण अधिक विचार करता मला काही वाईट वाटत नाही.

- - -
पुस्तक काय भाजीपाला काय कॉफी काय, सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. परंतु खरेदी विक्रीकरिता ठेवल्या की प्रत्येक रुपयांच्या दरात मोजल्या जाणार. (शिक्षकाबद्दल मुद्दा कळला नाही. भाजीपाल्याच्या बाबतीत म्हणावे, तर शेतकरी हा सुद्धा दुकानदारापेक्षा वेगळा असतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाडजूड पुस्तकं महागच असतात असं बहुदा सापडेल. नाहीतर इ-बुकं काढावीत आणि/किंवा तेवढीच विकत घ्यावीत. किलोचा सवालच नाही.

बायपास सर्जरीबद्दल अजून ऐकलेलं नाही, पण एका चष्म्यावर पुढचा फुकट किंवा अर्ध्या किंमतीत असं ऐकलेलं आहे. त्यात काही गैर वाटलंही नाही. आयुर्विम्यातही संपूर्ण कुटुंबाचा एकत्र घेतला सूट मिळते.

दातातल्या फिलींगची वर्षाची गॅरेंटी घेतात आमचे दंतवैद्य. सहा-सात महिन्यात फिलींगचा थोडासा तुकडा निघून आला तर पूर्ण काम फुकटात केलं. "Since this is within one year, I'll bear the cost" असं दंतवैद्य म्हणाला तेव्हा अंमळ गंमत वाटली होती.

आमच्या शाळेत काही शिक्षक भयंकर जातीयवादी किंवा मुलांवर अविश्वास दाखवणारे वगैरे होते; एक कारकून होते ते मात्र फार प्रेमळ होते. कोणाच्याही अंगावर कधी ओरडले नाहीत, सगळ्यांना नेहेमी मदत करायचे. शिक्षक कोणी जगावेगळे वगैरे आहेत असं का वाटावं?

मोबाईल, टॅब्लेटवर काही अ‍ॅप्स आहेत. ती फुकट आहेत, पण एवढी आवडतात की त्यांच्यासाठी थोडे पैसे खिशातून आपण होऊन दिले जातात. भिकार चित्रपट, पुस्तकांचे पैसे परत मिळत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे कदाचित अवांतर वाटेल पण तसं नाही.

विकीपेडिया फुकट आहे म्हणून त्याच्यातली माहिती ठार चुकीची आहे असे नव्हे. मदतीचे आवाहन केल्यास विकीला बर्‍यापैकी पैसे मिळतात. लोक आपणहून पैसे देतात.
ज्यांना पुस्तके वजनावर विकत घ्यायची नसतील (तसे घेणे हा विद्येचा अपमान वाटत असेल) त्यांनी आपणहून पुस्तकाच्या दर्जाप्रमाणे पैसे द्यावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात हे होऊन गेलं असं ऐकून आहे.. फारशी चांगली पुस्तकंही नव्हती.. अपेक्षेप्रमाणेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!