'बहु' मताने बटण मोर्तब !!

चमेलीशी लग्न केल्यावर चंदूने घरी आई बाबांना सांगितलं होतं , आता 'बहु'मताने निर्णय घेऊया बर्का . बहु चमेलीला वाटलं , अहाहा ! काय लोकशाही आहे हो घरात . सासू -सासरे तिचे अतोनात लाड करू लागले आणि बहुमताने वागू लागले तेंव्हा मात्र चंदूचा विरोधी पक्षागत तिळपापड होऊ लागला. लोकहो ,संघर्षाशिवाय जीवन असो किंवा लोकशाही, अळणीच भासतंय नै का ? कुटुंबात एका गोंडस बालकाच्या चिंटूच्या आगमनानंतर लवकरच असं लक्षात आलं की बालवयापासूनच तो स्वतंत्र विचारांचा , लोकशाहीत मताधिकाराचे महत्व जाणणारा प्रगल्भ नागरिक निपजला आहे . इयत्ता चौथीपासून परमोत्कर्षप्रवण सीबीएससी शाळेत जाण्यास सपशेल नकार देत चिंटू स्टेट बोर्डाला चिकटुन राहिला . दहावीत एका नामांकित पण अत्यंत उद्धट , मार्कट/गुणाढ्य ट्युशन क्लासवाल्याने याला सिलेक्ट केले हे ऐकून लोक अवाक झाले तरी याने तिथे ढुंकण्यास सपशेल नकार दिला होता वगैरे,अशारितीने त्यांच्या घरात लोकशाहीची जाज्वल्य परंपरा उपजत आहे .

आपली लोकशाही निवडणूक हा त्यांच्या कुटुंबांसाठी अर्थातच जिव्हाळ्याचा विषय असतो . चमेलीला लहानपणी रेडिओवर ऐकलेली शुद्ध हिंदीतली निवडणूक वार्तापत्रे आणि त्यातले निकटतम प्रतिद्वंद्वी नामक लफडे विलक्षण आकर्षक वाटे . तिला असं वाटायचं की हे प्रतिद्वंद्वी एकमेकाला चिकटून काहीबाही गुलुगुलु करून, हजारो व्होटांचे ढीग इकडून तिकडे ढकलून हार जीत खेळतात . तेंव्हा तमाम जनता सिनेमा किंवा क्रिकेट ऐवजी याच विषयावर बोलते , तर ते असो .
दर पाच वर्षांनी कुठल्यातरी चिन्हावर ठप्पा मारला की कुणीतरी निवडुन येईल असं अष्टौप्रहर ऐकूनसुद्धा चमेलीनं पहिल्यांदा मतदान करताना चिन्हावर कसा ठप्पा मारायचा बै , खराब दिसेल नै म्हणून बावळटागत कोर्या जागेत ठप्पा मारून आपलं मत वाया घालवलं होतं .चमेलीच्या ऑफिसातल्या एका निडर महिलेनं स्वतःच्या मृत भावजयीच्या नावानं बोगस मतदान केलं आणि ते अभिमानाने सांगितलं तेंव्हा चमेलीला पल्पिटेशन होऊ लागलं . महिला म्हणाली घाबरू नका म्याडम बोटाला साबण लावून गेले की हळुच शाई पुसता येते .तिनं पुन्हा असलं गुन्हेगारी कृत्य करू नये म्हणून चमेलीनं तिला शप्पथ घातली . मतदार ओळखपत्रासाठी फोटू काढताना चमेलीचा चेहेरा थोबाडीत मारल्यागत दिसत होता . चंदू मात्र गालावर खळ्या वगैरे पाडून उगीच गोड दिसत होता त्यामुळे तिचा जळ्फ़ळाट झाला . प्रचारासाठी महापौर स्वतः घरी येउन आमच्या पार्टीला मतदान करा म्हटल्याने चंदू हुरळून गेला . ओळखपत्रानंतरच्या निवडणुकीत चमेलीला चिन्हावर ठप्पा मारण्यात एकदाचं यश आलं . इलेक्ट्रोनिक यंत्रामुळे आता मतदान आणखी सोपं झालं आहे , नुसतं बटन दाबलं कि झालं . यावेळी निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या चिंटूसह जाउन मत द्यायचं होतं. तर त्याचं असं झालं की ……............
सक्काळी पायी फिरायला जातानाच गर्दीच्या आधी शांततेत झटपट प्रथम मतदान करावं म्हणून चमेलीचं कुटुंब उत्साहानं निघालं . चिंटूच पहिलं वहिलं मतदान होतं . तो एकटा मतदानाला गेलाच नसता म्हणून आईनं त्याला झोपेतून उठवून नेलं .ते केंद्रावर १५ मिनिटे आधीच पोचले मग यादीत चिंटूच नाव शोधून दहा मिनिट आधी जाऊन शासकीय लगबग पाहू लागले. वेळ झाली हो , मतदान सुरु करा , म्हणून उत्साही चंदू त्यांना घाई करू लागला.
काय साहेब घाई करता, अस म्हणून निवडणूक कर्मचारी अन पोलीस हसू लागले .
यथावकाश पोलिंग एजंट समोर यंत्र सील करण्यात आलं . अन त्या केंद्रावर सर्वप्रथम मतदान करण्यास उत्सुक चमेली बोटाला शाई लावून बटन दाबू लागली पण ते काही ढिम्म हलेना ती म्हणाली , अहो इथे रेडीचा हिरवा दिवा दिसत नाहीया . तरी पोलिंग यंत्रणा म्हणे दाबा बटन ,मग पुन्हा बटन दाबलं . असे ५/६ वेळा दाबदुब करून काहीच होईना मग तिला हसू येऊ लागलं . चंदूला तर उकळ्या फुटू लागल्या. त्याने लगेच खिदळत्या चमेलीचा फोटू पण काढला . चिंटूला आता फारच मज्जा येऊ लागली . तो आईला म्हणे ,तूच बंद पाडले यंत्र, तू आतंकवादी आहेस . संदेहास्पद महिला म्हणून तुझा हा फोटू देतो पेपरात .
तपासणीनंतर असं लक्षात आलं कि मतदान झाल्यावर ५ वाजता दाबायचं क्लोज बटन त्यांनी सुरु व्हायच्या आधीच दाबलं होतं . हरी ओम हरी !
मग यंत्राचे सील काढलं ते रिसेट केलं . पुन्हा एकदा सिलिंग केलं आणि नव्याने पोलिंग एजन्टच्या सह्या झाल्या . दरम्यानच्या काळात चमेलीच्या अतोनात फ्रेंडली कुटुंबाचे प्रेमळ (!) संवाद ऐकून काही जणांचे फुक्कट मनोरंजन होत होते . फुकटे लेकाचे .चंदू बिनधास्त वाट्टेल ते शासकीय कागद ,सील हाताळत होता . त्याला अटक करून तुरुंगात टाकायची वेळ आलीच होती . शिवाय शासकीय दिरंगाई हा त्याचा यथेच्छ टर उडवायचा आवडता विषय असल्याने त्याने सरकारी यंत्रणेला टोमणे मारून हात स्वच्छ धुवून घेतले .तेंव्हा सरकारी यंत्रणासुद्धा क्वचित हसल्याचा भास झाला . मग भरपूर खटाटोप करून ते यंत्र एकदाचं सुरु झालं .
पहाटे उठल्यापासून चहापाण्याविना,उपाशीपोटी ५० मिनिट नुसतं उभं राहून चमेलीला चक्कर येऊ लागली होती. अखेर ती मतदान करून बाहेर पडली तेंव्हा रांगेतले काहीजण तिच्याकडे संशयाने पाहात होते . मतदान नाट्य अपेक्षेपेक्षा जास्तच मनोरंजक झाल्याने ती उल्हसित मुद्रेने घरी गेली .
चमेलीने मत दिलेला उमेदवार निवडून आला . चंदूचा उमेदवार हरला . एकदा सुक्काळी त्यांच्या रोजच्या मॉर्निंग वॉकला जात असताना चमेलीनं बहुमुल्य मत दिल्याने जिंकून आलेला उमेदवारपण फिरायला जाताना दिसला . चंदू म्हणे , काय ग, तू एवढे मत दिले तरी तो तर तुझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाहिये, आं ? चमेली मनोमन खजील होऊन वरकरणी डाफरून म्हणे , का बे , तो काय नैन मटक्का करणार आहे का माझ्याशी ? आं ? गरज सरो वैद्य मरो , पुढच्या निवडणुकीत तिकिट मिळाले तर येईल पुन्हा हात जोडून ,तेंव्हा करू हं लाल मिरच्यांचा गुलकंद, ते जाऊदे , तुझा उमेदवार आला का निवडून ? नाही न ? तो फिर बकवास बंद ! मुकाट्याने कलिंगड खा अँड जष्ट षटप !

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

चमेलीचा उमेदवार भेटला मॉर्निंग वॉकला तर काही प्रॉब्लेम नाही. चुकुनमाकून तो हरलेला भेटला ना तर झोडपून काढेल चंदूला! खोटं नाय सांगत. गावाकडे एकदा सगळ्या पार्ट्यांनी १०० रुपये आणि १ खंभा वाटला प्रत्येकी बाप्याला आणि कमरेचा टॉवेल प्रत्येकी बाईला. आणि विनम्रतासे सांगितले कि बाबानो आम्हाला मत द्या. निकाल लागल्यावर जी पार्टी हरली त्यांनी दुसर्‍या दिवशी जाउन गावातल्या सगळ्यांना झोडपुन काढल...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''बहु'मत' ही कोटी आवडली.
तुमच्या आधीच्या लेखांच्या तुलनेत काहीतरी कमी वाटले या लेखात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह यस विकेडनेस जरा कमी आहे . अदिती म्हणते तशा मारामाऱ्या जुंपल्या नाहीत Smile
फॉर अ चेंज एखादा गोग्गोड लेख पाडावा का ? ;;)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चमेलीने मत दिलेला उमेदवार निवडून आला . चंदूचा उमेदवार हरला .

चंदू चमेलीकडून काही डँबिसपणा शिकलाय असं दिसत नाही. हे असं कसं चालायचं सखूताई? तुमच्या चंदूलाही चटपटीत बनवा आणि चमेली-चिंटू-चंदू अशी तिकोणी कौटुंबिक मारामारी घडवून आणा. रोजच्या हिंदी-मराठी मालिका पाहून मला तर कंटाळा आला बै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कितीही हाणामार्या केल्या तरी सोकावलेल्या मांसाहार्यान्ना त्याचे काय होय ? Wink शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड ! :-S

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाडी जरा लैच आडव तिडव फिरून गेलीया. काय बी कळना.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

गाडी निवडणुकीच्या अंगणात फिरतीये............तुम्ही सुशेगाद आहातच , मतदान करायला विसरू नका . Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मसाला लईच कम हय!
तितकं नै आवड्या.. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'बहु'मताने निर्णय, परमोत्कर्षप्रवण, संदेहास्पद महिला, लाल मिरच्यांचा गुलकंद वगैरे खास उसंत सखू टचवाले शब्दप्रयोग छान जमले आहेत. पण एकंदरीत कथा लवकर आटोपती घेतल्यासारखी वाटली.

चंदू, चमेली, चिंटू च्या चमत्कारिक चक्रम चष्टीगो चजूनअ चउद्यातये - याबाबत अदितीशी चहमतस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0