"विक्षिप्त" मन...
खूप दिवसांनी काहीतरी लिहायला घेतोय, आणि नेहमीप्रमाणे सुरुवात कुठून अन कशी करावी हे दोन प्रश्न डोळ्यांसमोर घिरट्या घालत होते.
यामुळेच कदाचित थोडा उशीर झाला हे लिहणं सुरु करायला. विषय तसा फारसा काही विशेष नाहीये, पण सांगावासा वाटतोय, मनमोकळ बोलावासा वाटतोय.
Office मध्ये थोडं काम असल्याने, त्यादिवशी bus ऐवजी bike ने गेलो होतो, कारण उशीर होणार होता हे ठाऊक होतं.
माझी कामं आटपून मग मी घरी जायला निघालो, थोडं पावसाचं वातावरण आधीच होतं, पण तेव्हा तो थांबलेला होता.
bike सुरु केल्यावर कुणास ठाऊक का पण हळू-हळूच घरी जावं असं वाटत होतं म्हणून speed जरा कमीच ठेवला होता मी.
वाटेत एक signal लागला आणि थांबलो. तसं त्याच signal वरून मला नेहमी प्रमाणे डावीकडे वळायचं होतं.
Signal सुटायला काही सेकंदं बाकी असतांना अचानक मी पूर्वी वापरत असलेल्या रस्त्याने म्हणजे सरळ जावसं वाटलं.
सरळ जाऊ की नको या दुविधेत signal सुटला आणि मी मनाचं ऐकलं, सरळ निघालो.
रस्ता तसा जुना नव्हता, पण माझ्यासाठी काहीसा जुना झाला असावा. काही वर्षांपूर्वी मागच्या कंपनीत असतांना मी ह्याच रस्त्याने घरी जायचो.
आज मी पुन्हा तीच जुनी वळणं घेत गेलो जी तेव्हा घ्यायचो. प्रत्येक वळणावर एक वेगळीच आत्मीयता जाणवत होती, एक वेगळाच आनंद अनुभवत होतो मी. जुन्या आठवणी नजरेत तराळत होत्या. खूप छान वाटत होतं.
एखादी सासुरवाशीण स्त्री माहेरी परतत असावी, तसाच काहीसा आतुर आणि काहीसा कासावीस होत होतो मी.
आणि अचानक अजून काहीतरी आठवायला सुरुवात झाली. पूर्वी ह्या रस्त्याने जातांना डोक्यात ज्या गोष्टी सुरु असायच्या, जे जे प्रश्न त्या काळात भेडसावत होते, ज्या आठवणी, वेदना त्या वेळी डिवचत होत्या ते सारं आज पुन्हा डोक्यात गर्दी करू लागलं.
ह्याच साऱ्या गडबडीत एक प्रश्न मनाला शिवून गेला की ह्या सगळ्याचा जो त्रास तेव्हा होत होता तो आज कितीतरी पटीने कमी झालाय. काही प्रश्नं नाही म्हटलं तरी सुटलीयेत आणि बरीचशी अनुत्तरीत प्रश्नं मी जशीच्या-तशी, काहीही छेडछाड न करता मान्य केलीयेत.
एकंदरीत आज मी त्यांच्यासोबत "शांततेचा करार" केलाय, पण तरी मला तेव्हाचे ते प्रश्नं, तेव्हाच्या त्या वेदना, त्या आठवणी जवळच्या वाटताय, तो मानसिक त्रास मला जवळचा वाटतोय…! आणि एक नवीन प्रश्न मला त्रासून गेला - "असं का?"
आता मी माझ्या मनाची विलक्षण "विचित्रता" अनुभवत होतो. हा नवीन प्रश्न मला स्वतःला वेडं ठरवत होता, मूर्ख ठरवत होता.
म्हणजे मला कळतंच नव्हतं की नेमकं हे काय सुरु आहे? का माझं मन असं बावळटासारखं वागतंय? झालंय तरी काय ह्याला?
ह्यावेळी "मन" आणि "मी" अशा दोन व्यक्ती एकमेकांशी वाद घालताय, हुज्जत घालताय असं प्रकर्षाने जाणवत होतं मला.
बुद्धीला एकंच गोष्ट पटत नव्हती, जी खरंच कुणाला पटण्यासारखी देखील नाही की- त्या काळी "त्या गोष्टी, तो मरणाचा त्रास कधी एकदाचा संपतोय?" असं वाटायचं, तोच काळ आज ह्या मनाला प्रिय वाटतोय, आपलासा वाटतोय? असं कुणाला वाटू तरी कसं शकतं?
मनाच्या "अशा" वागण्याचा पहिलाच अनुभव होता माझा हा, त्यामुळे काहीसा बिथरलो होतो मी.
ह्या सगळ्या धांदलीत मी घरी पोहचलो, bike बंद केली. आता घरात शिरत असतांनाही डोक्यात तेच विचार गोंधळ घालत होते, थैमान सुरु होता नुसता.
काही वेळाने "यावर आता जास्त विचार नाही करायचा" असं ठरवलं, पण तसं शक्य नाही हे मलाही चांगलंच ठाऊक होतं.
मी देखील काही काळ जाऊ दिला, आणि नंतर शांतपणे विचार केला की, "असं नेमकं का झालं ? मी पुन्हा भूतकाळात अडकत तर नाहीये ना ? पुन्हा त्या दरीत ओढला तर जात नाहीये ना ?" वगैरे वगैरे…
मग मला काही प्रमाणात उलगडा झाला, माझ्या मनाच्या त्या "विक्षिप्त" वागण्यचा.
कदाचित मनाला तो काळ, तो त्रास हवा-हवासा वाटत नसावा, तर त्या काळाने दिलेल्या, शिकवलेल्या गोष्टी प्रिय असाव्यात.
त्या काळाने लोकांना "ओळखणं" शिकवलं , मित्र कुणाला म्हणतात, नातेवाईक कुणाला म्हणतात हे शिकवलं. प्रेम आणि स्वार्थ यांची व्याख्या, नेमका अर्थ शिकवला. "दुःख" सहन करण्या पलीकडे गेलं किंवा व्यक्त करण्या पलीकडे गेलं की फक्त "शब्द" कसे मित्र होतात हे शिकवलं.
एकंदरीत हाच तो काळ होता ज्याने मला खऱ्या अर्थाने मोठं केलं, प्रगल्भ (Mature) केलं.
नाही म्हटलं तरी ह्या बोचणाऱ्या काळाने, त्याच्या त्रासाने, खूपकाही दिलंय मला. असं काही जे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि जे पावलोपावली मला मार्गदर्शन करत राहील. ह्या काळाचा मी "ऋणी" असल्याची प्रचिती झाली.
आता मनाची मानसिकता मला समजू लागली, त्याला त्या काळाबद्दलची वाटणारी जवळीक पटू लागली, खरं तर योग्य वाटू लागली.
मला कमाल याचं वाटलं की मन किती मजबूत झालंय आता, त्याला ह्या गोष्टी आठवून त्रास होण्याऐवजी त्या जवळच्या वाटल्या.
एक समाधानाची जाणीव डोक्यात घर करत होती, थोडं हसू सुद्धा येत होतं मनाच्या ह्या "विक्षिप्त" वागण्यावर.
- सुमित विसपुते
प्रतिक्रिया
पुलेशु
बरंय.. फक्त हे मधेमधे रोमन अक्षरं नजरेला डाचतात. इंग्रजी शब्द वापरण्याबद्दल काहीच आक्षेप नाही, पण ते देवनागरीत असते तर वाचताना अधिक प्रवाही वाटलं असतं.
पुलेशु.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद...
धन्यवाद ऋषिकेश... आपल्या "सजेशन" वर नक्कीच विचार करेन...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
आम्हाला वाटलं तुम्ही इकडच्या
आम्हाला वाटलं तुम्ही इकडच्या "मनोबां"ना विक्षिप्त म्हणताय!
तसे ते पेटलेत सध्या पण विक्षिप्त नाही म्हणणार मी!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
:)
मी इकडच्या "मनोबां"ना नाही, तर माझ्या "मनोबां"ना विक्षिप्त म्हणतोय...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
या इथे पहा काही संदर्भ जुळतोय
या इथे पहा काही संदर्भ जुळतोय का? काही संगती लागतेय का?
http://www.aisiakshare.com/node/3140
पुर्ण वाचून नक्कीच प्रतिक्रिया देतो...
पुर्ण वाचून नक्कीच प्रतिक्रिया देतो...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
गुड
चांगलं लिहिलय. पण शीर्षक वाचून जे वाटलं तसा मजकूर मिळाला नाही.
जे लिहिलय ते चांगलय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धन्यवाद...
धन्यवाद "मनोबा"...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
छान लिहीलय.
छान लिहीलय.
धन्यवाद...
धन्यवाद टिंकरबेल...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
अतिशय आवडलं. सुंदर लिखाण!!!
अतिशय आवडलं. सुंदर लिखाण!!!
धन्यवाद... :)
सारीका, आपल्या प्रतिक्रियेकरीता धन्यवाद...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."