" आज मराठी भाषा- दीन ! "


धरला मी अभिमान मनीं
"आज मराठीभाषा-दिन "
मी मराठी तू मराठी
बोलू सारे आज सुदिन !

सुरेख उत्तम वा वा छान
म्हणत वाहवा करू -
जमेल तेथे मायमराठी
आपण जवळ करू !

मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस !
मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया !
मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक !
मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब !
मराठी नेता गरजला- व्हेरी गुड !
मराठी जनता म्हणाली- गुड, छान !

भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी
जगास मराठी शिकवीन -
मजला पुरते कळून चुकले,
" आज मराठीभाषा- दीन !
"

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

कविता पटली नाही.
भाषा प्रवाही आहे.. ती बदलणारच! वगैरे वगैरे.. असो तळमळ समजली मात्र भावना पटली नाही
आजकाल "मराठी 'दीन' झाली आहे" वगैरे आरोळ्या "इस्लाम खतरेमे" यात फारसा फरक जाणवत नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यात कविता कुठे आहे? हे तर निबंधाचे मुद्दे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0