Skip to main content

नवल- पुस्तक परिचय

नवल.
जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे..

पुस्तकाची बांधणी, मुखपृष्ठ, ब्लर्ब, फॉंट आणि बुकमार्कसाठीची स्ट्रीप हे सगळं एवढं सुंदर आहे की पुस्तक हातात घेतल्यावर लगेच लक्षात आलं की काहीतरी कुलवंत असा प्रकार असणार आहे हा..!

कादंबरीची थीम म्हणाल तर, सोनकुळे आडनावाचा, एक अत्यंत चांगली ॲकॅडमिक गुणवत्ता असलेला तरूण खानदेशातून पुण्यात ग्रॅज्युएशनसाठी येतो, त्याच्या जगण्याचा ऐसपैस तुकडा आहे हा..

समीक्षेचा विषय निवडा

गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...10

युक्लिडची अजरामर कृतीः एलिमेंट्स

No employment can be managed without arithmetic, no mechanical invention without geometry.
----Benjamin Franklin

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

"भक्ति"

सकाळी दोन वाफाळते कॉफीचे कप
समोरासमोर टेबलावर ठेवा: एक स्वतःसाठी
एक देवासाठी. (देव समोरच्या खुर्चीत बसेल!).
विचारा त्याला : शर्ट कुठला घालू, बस घेऊ
का ट्रेन, ऑफिसातल्या खन्नाला चीत कसे करू,
मुलाला अभ्यासाला कसे लावू?
"तो" काय म्हणतोय ते लक्ष देऊन ऐका : उत्तरे मिळतीलच.
रिलायन्सचा शेअर, बाबांचे हार्ट ,
आईचा कॅन्सर , सर्वासर्वात "तो" बाप आहे म्हणतात.
लक्ष देऊन ऐका , हवे तर नोट्स घ्या,
बैठकीच्या शेवटी समोरचा कॉफी कप
संपलेला दिसला तर घाबरून ओरडू नका,
"थँक्यू" म्हणा आणि चला ऑफिसात!
गुड डे !
xxx

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१

दिनेशभाई त्यांच्या गावी गेले असल्यामुळे टॅक्सी पहिल्या शिफ्टच्या राजकुमारकडेच होती.

म्हणून ह्या वेळेस गाडी शनिवारी रात्रीच घरी आणून ठेवायचा प्लॅन होता.

म्हणजे उद्या जरा आरामात उठता आलं असतं.

राजकुमारकडून रात्री ९:३० च्या सुमारास गाडी उचलली. तडक घरी जायचाच प्लॅन होता पण भाडीच लागत गेली :)

तीसुद्धा नाना चौक, नवजीवन सोसायटी, सँडहर्स्ट रोड, ऑपेरा हाऊस अशी

बाय द वे गिरगावच्या आंबेवाडी जवळच्या एका घराची ही कुमारसंभवातील पार्वतीच्या बिसतंतूही न पास होणाऱ्या यौवन-कुंभांच्या मदनघळीइतकी चिंचोळी एंट्री.

ललित लेखनाचा प्रकार

निकिता

आज सकाळची गोष्ट.

मह्याचा नऊ वाजताच फोन आला, "भेंजो सद्गुरू स्टाॅलला ये पटकन. अर्जंट बोलायचंय."

"आई डोसे करतेय; खाऊन येतो. अर्ध्या तासात पोचतो."

मह्या पालीसारखा चुकचुकला. डोसा म्हणजे त्याचा वीक पॉइंट आहे.

एनीवे, मी डोसे हादडले आणि मग सद्गुरू स्टाॅलला पोचलो. मह्या लगेच बोलू लागला,

"ते बाजूचं रेस्टाॅरंट बघ. मी अर्धा तास काउन्ट करतोय. स्विगी आणि झोमॅटोचे एकोणीस जण येऊन गेले."

"बव्वं मग?" मी चहा पितापिता विचारलं.

"आता असा विचार कर. समज तू स्टेशनजवळ राहतोस आणि राबोडीच्या रेस्टाॅरंटमधून तू तंदूरी चिकन मागवलंस झोमॅटोनी."

ललित लेखनाचा प्रकार

मालाडचा म्हातारा

म्हातार्‍याचे भिरभिर डोळे-
आठवणींचा भुगा भुगा
छटाक उरले खोड, पोखरी
कभिन्न काळाचा भुंगा

म्हातार्‍याचे वखवख डोळे-
लवथव गोलाई बघती
दारु संपला जसा फटाका
दावू न शकतो स्फोटभिती

म्हातार्‍याचे टपटप डोळे-
पापणीत पाऊसमेघ
जसा वळीव कोसळतो कधिही
तसा कढांचा आवेग

म्हातार्‍याचे विझुविझू डोळे-
पैलतिरी काऊ बघती
कोकुनी हाकारितो अहर्निश
उडून जा त्याला म्हणती

हिवाळ्यातल्या पाकृ

हिवाळ्यात मिळणारी लिंबं, मिरच्या आणि आवळे यांमुळे लोणची घालावीशी वाटतात, आणि थोडी थोडी का होईना ती मी दरवर्षी घालतेच. आंब्याचं लोणचं घरात फार खपत नाही आणि मुंबईच्या हवेला फ्रिजच्या बाहेर ते टिकतही नाही. त्यामुळे ते कधीतरी थोडंसं विकत आणते. गेल्या आठवड्यात हे पदार्थ केले.

एक प्रयोग

काल रात्री बराच वेळ पडून, इन्स्ट्रुनेम्टल म्युझिक (https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=PLo4u5b2-l-fBE7Yg_v5XW…) ऐकलं. रागांमधलं काहीच कळत नाही पण नोट केलेले की 'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे. कदाचित संस्कॄतप्रचुर नावाच्या मोहातच पडले असेन, त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर. ते काहीही असो पण मन खूप शांत झाले. बराच वेळ गेल्यानंतर आपोआप मनात एक विचार आला. जशी पाच इंद्रिये असतात तसे आपले सहावे इंद्रिय असते आपले मन.

ललित लेखनाचा प्रकार

ऐसे ऐकिले आकाशी

||१|| ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"

||२|| पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"