Skip to main content

उर्फ

मुळ नाव सोडून दुसऱ्या नावानं बोलवण, बोलण, ओळख करून देणं, ओळख असणं किंवा स्वत: स्वत:ला ठेवणं, टोपणनाव, उर्फ नामकरण. फार कष्ट न करता आर्ध्या नावापुढ अर्धा "या" जोडला की झालं काम, आद्या, आज्या, नव्या, अभ्या अन् महिला मंडळासाठी "ॊ" इ इ.. (अपवाद काढायला हैतच मंडळी). पुढचा प्रकार बायोमेट्रिक ट्रेट्सवर, इकबाल, टकलं, चमण, चाँद, घसरगुंडी, नकटं, पोपट, मैना, भोंगा, लाऊडस्पिकर, काळ्या, कावळ्या,पांढरीपाल, इंग्रज, गा(घा)णकोकिळा, चकणं, बांगं, तिरळं, काणं, बचाळं, उकरी, बोळकं, बेडूक, उंट, जिराफ, टंगाळ, बाटूक, ढबरं, चिपाड, लंगड, आंधळं, बहिरं, चिडकं, लाजाळू, हावरं, डजगं, हरीशचंद्र व इतर. जातीवर पण.

IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २)

भाग १

यावेळच्या महोत्सवातल्या दोन ‘क्रांत्या’. किंवा प्रतिक्रांत्या. एक म्हणजे जुनी मोराची जोडी परत आली. उडत्या गालिच्यावर उडी मारणारे आणि भारतीय भाषांच्या वर्षावात अ हे अक्षर खाणारे मोर. काळोख झाल्यावर चित्रपट सुरू होण्याअगोदर पडद्यावर इफ्फीचा दृश्य उद्घोष करणारे मोर. गेल्या वेळी बदलले होते. जुने मोर परतले हे चांगलं झालं.

समीक्षेचा विषय निवडा

IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)

गोव्यात लोक दारू प्यायला येतात. इथे यायचं आणि नुसती दारू प्यायची, हे काही खरं नाही. तसं करताना संवेदनशील मनाला अपराधी वाटत रहातं. आपण आपला वेळ काहीतरी अनैतिक कृत्य करण्यात वाया घालवत आहोत, अशी टोचणी लागते. मग ना दारू एन्जॉय करता येते, ना मित्रकंपनी बरोबर असल्याने दारूपासून दूर रहाता येतं.

समीक्षेचा विषय निवडा

मागणं

मागणं

डायरीची काही पानं अजून कोरीच दिसतात
आयुष्याची काही वर्षंही आज गुलदस्तात

काय लिहावं या कोऱ्या पानांवर,
जुन्या आठवणी? नको, त्यात कडू गोड आणि बरंच काही,
काही प्रश्न अनुत्तरित, उत्तरं नाहीत अजूनही!

लिहावं एखादं हळवं गीत, शब्दांत गुंतवणारं,
पूरियाच्या स्वरांसारखं हलकेच मनाला शांतवणारं!

काय लपलं असेल आयुष्याच्या अवगुंठित क्षणांत?
सुखदु:खाचे तरंग तर असायचेच जीवनप्रवाहात!

पण दुःखाचे डोह नकोत आणि नकोत सुखाच्या लाटा;
पुढच्या प्रवासासाठी हे इतकंच मागणं आता!

मन

मन

मन भरून भरून आले
घनश्यामल नभ झाकळले

मन ओलेचिंब नहाले
आषाढसरी मेघ वर्षले

मन वाऱ्यासंगे भिरभिरले
अवखळ निर्झर खळखळले

मन पिसे बावरे खुळावले
जलदांनी इंद्रधनू लपवले

मन गहन गूढ हुरहुरले
जळ गडद डोहतळी साकळले

मन वेदनेत ठसठसले
आणि प्रपाती कोसळले

मन शांत निमग्न विसावले
ओंजळीतून अर्घ्य वाहिले.

कांचन

कामक्रोधे केले घर रीते

रोज चालायला जाताना जाणवतं की, आपण फक्त व्यायाम म्हणून ते करत नाही. तर त्या एकटेपणात जिवाला एक शांतता लाभते. चालायला जाण्याची ओढ असते. कारण स्वतःच स्वतःची सोबत होण्याची अनुभूती हवीशी वाटते. एकटेपणाची धास्ती वाटण्यापासून एकटेपणात मजा वाटण्यापर्यंतचा प्रवास मस्त असतो.

थ्री डिग्रीज ऑफ सेपरेशन

शाळा सुटली आणि आम्ही घरी न जाता सरळ शरयूआज्जींकडे गेलो. एकतर त्यांच्याकडे पौष्टिक लाडू असतात, आणि दुसरं म्हणजे त्या मस्त गोष्टी सांगतात.

"विजू, मोना, अरे आईला सांगून आलायेत का? नसेलच. थांबा, मीच सांगते तिला," म्हणत शरयूआज्जी आरामखुर्चीतून उठल्या आणि हळूहळू चालत इंटरकाॅमकडे गेल्या. "तुझी बाळं इथे आहेत गं," एवढंच बोलून त्यांनी फोन ठेवला.

"आज्जी, आज्जी, आमच्या शाळेत ना आज एक इतिहासतज्ञ आले होते," मोना एक्साईट होऊन सांगू लागली. "१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल ते सांगत होते. आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाबद्दलसुद्धा!"

ललित लेखनाचा प्रकार

(देह-फुलं: ६) बोटं

एक टाईम होता जेव्हा मला स्पर्श नको-नकोसा वाटायचा... कोणाचाच... कसलाही.
शाळेत तर मला नावच पडलं होतं, "अंगचोर" म्हणून.
सातवी आठवीतली मुलं त्यातही मुली प्रचंड क्रूर असतात, त्यांना चिडवायला खूप आवडतं...

माझ्या पाठच्या बाकांवरूनही खुसफुसते आवाज यायचे,
ए अंगचोर, ए टच मी नॉट, ए विअर्डो...
आणि माझे डोळे पाण्याने डबडबायचे.
पण आधी मी अशी अजिबातच नव्हते खरं तर.
आई म्हणायची भारी खेळकर पिल्लू होते मी.
कोणालाही धावत जाऊन बिलगायची मी आणि खुदुखुदू हसायची.