Skip to main content

पहीली भेट

परदेशी नागरिकत्व मिळूनही, भारताबद्दल अतूट प्रेम वाटते, किंबहुना या भूमीवरती पाऊल ठेवले की भरून येते. इथे ना कधी उपरेपणा जाणवला ना जाणवेल. किती का पाश्चात्य संस्कृती अंगवळणी पडलेली असू देत, पण या जागेबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल जो जिव्हाळा वाटतो तो अवीट आहे व तसाच राहील .
मुलगी ३ वर्षांची असताना आम्ही अमेरिकेत गेलो त्यापश्चात, यावेळेला मुलीबरोबर पहिली भारतवारी केलेली. म्हणजे तिच्याकरता पहिली. खूप anxiety होती की तिला हि भूमी कशी वाटेल , तिला आवडेल का, ममत्व वाटेल का? अर्थात आवडेल ना आवडेल त्यात मला काहीच say नव्हता, तो सर्वस्वी तिचा वैयक्तिक अनुभव होता. पण तरीही!

ललित लेखनाचा प्रकार

डॉ. श्रीराम लागू

Dr. Shriram Lagoo

डॉ लागू

आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो. डॉ श्रीराम लागू यांच्या जाण्याने माझ्यासाठी या भावनेची एक वरची, मोठी पायरी ओलांडली गेली.

बातमीचा प्रकार निवडा

अभंग

अज्ञाताच्या काठावर
शब्द धूसर होतात
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून होते शांत

अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या येतो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्‍याशी थबकतो

अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वरशा ओठावर
चिरंतनाचा अभंग

तत्वमसि

सृष्टी से पहले सत्य नहीं था,

असत्य भी नहीं

अंतरिक्ष भी नहीं,

आकाश भीं नहीं था

छिपा था क्या कहाँ,

किसने देखा था

उस पल तो अगम,

अटल जल भी कहाँ था

सृष्टी का कौन हैं कर्ता

कर्ता हैं यह वा अकर्ता

ऊंचे आसमान में रहता

सदा अध्यक्ष बना रहता

वोहीं सच मुच में जानता.

या नहीं भी जानता

हैं किसी को नहीं पता

नहीं पता

कधीतरी लहानपणी ऐकलेले हे शब्द लक्षात राहिले कारण they talked about something deeper. या शब्दांचा अर्थ कळायच ते वय नव्हत पण हे नक्की होत कि कधीतरी कुठे तरी अर्थ उमजेल.

समीक्षेचा विषय निवडा

अंगारमाळ्याच्या गोष्टी

रणरणत्या उन्हात या शेतातले मोठमोठे दगड-धोंडे उचलून दूर करत असताना शरद जोशींना कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या , " एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" आणि मग या जागेचं नाव ठेवलं गेलं , "अंगारमळा".
अंगारमाळ्याच्या आवारातल्या बोराच्या झाडाखाली बसून विनय हर्डीकर जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.
चाकण जवळच्या आंबेठाण गावात शरद जोशींनी अक्षरशः शून्यातून उभा केलेला हा पसारा. आज त्या वास्तूत ते नाहीत पण त्यांचं व्यक्तिमत्व समजेल अशा पुष्कळ गोष्टी आहेत. सोबत हर्डीकर सर असतात. ते काही आठवणी सांगतात. सध्या त्या पसार्याची काळजी घेणारे सुरेशचंद्र म्हात्रे सर असतात.

प्राचीन मराठीतील 'पसारा'.

काय तो पसारा ! पसारा आवरून जीव अगदी मेटाकुटीला आला ! ही वाक्ये आपण रोजच्या व्यस्त जीवनामध्ये कित्येकदा ऐकत असतो. पसारा हा शब्द आज लौकिकार्थाने जरी अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू, फैलाव, विस्तार, व्याप यांसाठी वापरला जात असला तरी प्राचीन मराठी भाषेत या शब्दाचे प्रयोजन फार वेगळे आहे.

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०५

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

मलानाच्या गोष्टी - भाग १

त्याच्या खांद्याला भलीमोठी ट्रेकर्सची सॅक होती. ती त्याने गाडीच्या डिकीत ठेवली. ATM मधून पैसे काढले. समोरच्या दुकानातून चार चॉकोलेट चिप कूकीस विथ एक्सट्रा चॉकोलेट सॉस उचलल्या आणि गाडीत पुढच्या सीट वर येऊन बसला. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. तो स्थिरावला. कूकीजचा डब्बा त्याने डॅशबोर्डवर ठेवला. लेदर जॅकेटच्या डाव्या खिशातून सिगारेटचं पाकीट काढलं. त्यात रोलिंग पेपर होते. हलक्या हाताने त्यातला एक त्याने वेगळा केला. त्याच पाकिटाचा एक जाडसर तुकडा घेऊन त्याचा रोच तयार केला. सिगरेटच्या पाकिटातली एक अर्धी सिगरेट होती त्यातला तंबाखू त्या रोलिंग पेपर वर पसरवला.