Skip to main content

कॉमन सेन्स’च्या दुःखद निधनाच्या निमित्ताने..

‘आज आपण एका वेगळ्या दुखवट्याच्या निमित्ताने येथे जमलेलो आहोत.
आज आपल्यातील व आपल्या बरोबर अनेक वर्षे साथ दिलेल्या ‘कॉमन सेन्स’ या अगदी जवळच्या मित्राच्या अकाली मृत्युमुळे झालेले दुःख जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. तो किती वयाचा होता याची आपल्याला कल्पना नाही. कारण त्याचा जन्म दाखला सरकारी फायलीतून केव्हाच गायब झाला आहे.

त्यानी वेळोवेळी आपल्याला दिलेल्या सूचना व सल्ला यांच्यामुळे तो कायमचाच आपल्या स्मरणात राहील. कारण त्याच्या सूचना व सल्ले फारच बहुमूल्य व अफलातल्या असत. कठिण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी त्याच्या सूचना फार उपयोगी पडत होत्या.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

राज्य परिवहन सेवा - एक गम्मत.

वैयक्तिक फायद्यासाठी मोठ्या समुदायाच्या लाभांवर कुऱ्हाड चालवणे.

राज्य परिवहन मंडळातर्फे राज्यात बस सेवा दिली जाते. एका राज्यातले परिवहन कर्मचारी आणि त्यांचे पाठीराखे तिकिटे फाडत नाहीत, अर्धे पैसे खिशात घालतात. मग आजारी सेवा डबघाईला येते आणि खासगी बसेस कुणा दादांच्या पाठिब्याने सुरू होतात. मग परिवहन मंडळाच्या आगारातूनच (डेपोतूनच) खासगी बसेस सुरू आणि परिवहन सेवा ठप्प. डेपो म्हणजे कचरापट्टी. डायवर कन्डक्टर कंगाल. स्टॉप सिस्टम बाद. कुठेही थांबणार बस. वेळापत्रक असे नाहीच.

जागतिक अन्न दिवस

आज (१६ ऑक्टोबर)जागतिक अन्न दिन आहे. प्रत्येक व्यक्तीचा अन्न हा मूलभूत अधिकार आहे. पोषक आहार, ताजी हवा आणि शुद्ध पाणी हे जगण्यासाठीचे मूलभूत घटक आहेत. परंतु भारतासारख्या देशात मोठे भेदभाव असणारे चित्र दिसते, जेथे काही लोक संस्कृती आणि प्रतिष्ठेच्या नावावर जेवणाचा आनंद घेतात. तर काहीजण पोटाची खळगी भरण्यासाठी पुरेसा पोषक आहार घेऊ शकत नाहीत. एस.डी.जी.चे एक महत्त्वपूर्ण लक्ष्य आहे अर्थात जगात 2030 पर्यंत “कोणीही भुकेला राहणार नाही”. स्त्रिया, मुले, आजारी लोक, आदिवासी, गरीब असा समुदाय अन्नाच्या बाबतीत असुरक्षित दिसतो.

विसरुनी गेलो होतो

विसरुनी गेलो होतो
ना कधी स्मरले
तू उल्लेख करुनी
भान तयाचे आणिले
तू सतत खत पाणी घातले
अन भिन्नतेचे झाड वाढविले
जाणीव करूनी दिली
की मी वेगळा तू वेगळी
पण तत्पूर्वी मज मनी
होते समभाव आपुलकीचे
ना कधी जाणली जात तुझी
धर्म तुझा, वा लिंग तुझे वेगळे
तू सतत बिंबवूनी मनी
वेगळेपण ते हेरले
लावूनी चुरस श्रेष्ठ कनिष्ठतेची
तू विष मनी पेरले
एकाच आईची लेकरे
वैरी कट्टर बनविले
विसरुनी गेलो होतो
तू भान तयाचे आणिले
आता कसे एक करशील
भिन्न झाल्या सर्व दिशा
एकच सूर्य प्रकाश देतो
तरीही आकाश विभागले
सर्व जनासी या देशा

आज.उद्या.रोज.

तुमच्या आमच्या
आजच्या चुकांचे
पातक आपणा
उद्या भोगायचे
रोज बघायचे
भेसूर रुपडे
भकास पृथ्वीचे
वाढत्या कार्बनी
पाऊल ठशांचे
पिचल्या फाटल्या
ओझोन थराचे
गटारगंगांचे
विखारी धुराचे
अवकाळी वृष्टीचे
प्रलयी वणव्यांचे
भेगाळ नापीक
नि:सत्व भूमीचे
मरणपंथाच्या
चिमणचोचींचे
पुस्तकी उरल्या
कांदळवनांचे
पाताळी पोचल्या
भूजल स्रोतांचे

आवाज कसला?
चीत्कार कुणाचे?
अंधार्‍या रात्रीच्या
बेबंद गतीच्या
कर्वतीखालच्या
शेकडो झाडांचे!