जेन ऑस्टीन वाचण्याच्या निमित्ताने
Posted by Rajendra Bapat on Sunday, March 17, 2019
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जेन ऑस्टीन वाचण्याच्या निमित्ताने
- 10 comments
- Log in or register to post comments
- 12102 views
एकटेपणा
शशांक जाउन ८ महीने उलटले होते. सविता अजुनही त्याच्या जाण्याला सरावलेली नव्हती. अजुनही सकाळी डोळे उघडले की पहीली आठवण होइ ते त्याच्या नसण्याची आणि एक अतिशय जड, उदास भावनेचा ढग तिचे मन झाकोळून टाके. मग उठण्याचे ना त्राण राही, ना झोपून राहून बरे वाटे. हे खरे तर रोजचेच झालेल होते. सकाळी कसे बसे अंथरुणातून स्वत:ला फरफटवत काढुन, ती ऑफिसमध्ये जायच्या तयारीस लागे. घरातील प्रत्येक वस्तू, शशांकची आठवण करुन देण्यास समर्थ होती. इलेक्ट्रिक ब्रश - तिचा व त्याचा ब्रश आलटुन पालटुन चार्जिंगला ठेवणे, हे शशांकने आपण होउन स्वीकारलेले लहानसे काम होते. आता तिने जर चार्ज केला नाही तर तो ब्रश तसाच अनचार्जड राही.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about एकटेपणा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 11652 views
गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी
मी बरेचदा बरेच ठिकाणी सायन्स फिक्शन, साय-फाय ह्या प्रकाराबद्दल बोलतो. बहुतांशी संवाद ठराविक वळणावर जातात.
ते - काय वाचतोस/बघतोस तू?
मी - सायन्स फिक्शन.
ते - अरे वा! स्टार वॉर्स की स्टार ट्रेक?
मी - मला .. दोन्ही फारसे नाही आवडत. ॲक्चुअली मी ..
ते - हॅ हॅ हॅ .. अच्छा! म्हणून कलटी मारतात.
फ्रेंड्स न आवडणारा माणूस असूच शकत नाही असा जो एक लोकप्रिय समज आहे त्याचंच हे एक जुळं भावंड. सायन्सफिक्शन आवडतं आणि स्टार वॉर्स नाही?
हॅट.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी
- 22 comments
- Log in or register to post comments
- 23722 views
हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
ते म्यां चक्षुर्वै पाहिले
कृष्णविवरासी भेदिले
आरपार म्यां आजची
कृष्णविवराचा चव्हाटा
तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा
चारी मितींचा उफराटा
कोलाहल माजला
कार्यकारणाची तर्कटे
उलटी पालटी पडती येथे
आधी कळस मग पायथे
हाची लोच्या येथला
कवाडे विभिन्न विश्वांची
ठोठाविता उघडती साची
अनवट रूपे तयांची
जाणे केवळ हाॅकिंग
- Read more about हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3085 views
गंमत
गंमत
-----------------------------------------------------------------------------------------
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गंमत
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4109 views
ललित...
आयुष्यभर आपण दोन स्वतंत्र दिशांनी सुरु होणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी उभं असतो. सुरुवात कोणत्याही स्वतंत्र दिशेने सुरु होणाऱ्या एका रस्त्यानं करा, चुकार मन सारखं त्या दुसऱ्या रस्त्यावर हुंदडतं. त्या रस्त्यानं गेलो असतो तर, खरं तर पाठ फिरवलेला रस्ताही ऱ्हासाचा नसतो. ज्या रस्त्यावरून ऊर फुटेतो धावलो त्यानंही काही छप्पर फाडके दिलेलं नसतं. गंडलो. कळतं कधी. माध्यांनीच्या उन्हानं पोळल्यावर. आता मागं जाता येत नाही. आयुष्य हे असंच असतं. बघायचं तेव्हाचं मागं वळून बघावं. ते टाळलं. स्वतःच्या मस्तीत पुढं निघून आल्यावर मागं वळून बघितलं तर फार फार काय दिसतं. कोपऱ्यावरलं करकरीत काळं कुलंगी कुत्रं.
- Read more about ललित...
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5860 views
उजेड
भरपूर उजेड आहे इथे.
इतका उजेड मला झेपेल का?
इतका उजेड मला पुरेल का?
हा उजेड माझा व्हायला हवा.
करू अशी आशा?
आहे मला परवानगी?
की नकोच?
जराशी तिरीप आणि
कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो.
कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो
बरेचसे चोची मारतात
तरीही उजेड हवाय मला.
माझा माझा.
तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय.
हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो.
माझा वाटा हवाय.
- नी
- Read more about उजेड
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3742 views
ज्योतिष चर्चा २०१९
ज्योतिष ही मौजमजाच आहे हे जोपर्यंत कठीण प्रसंग आपल्यावरच शेकत नाहीत तोपर्यंत कुणीही मान्य करेल. एखादी व्यक्ती कशी वागेल हे त्याच्या राशीवरून ( born under star) थोडीफार कल्पना येते. तर अशा गमतीजमतींसाठी हा धागा वेगळा काढतोय.
ज्योतिष न कळणारे, त्यावर विश्वास नसणारेही अनुभव लिहितीलच. आता या धाग्यातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा अजिबात हेतू नाही. झालेल्या घटना, व्यक्तींच्या कुंडल्या पाहून त्यातून स्टॅटिस्टिकल डेटा वापरून अमुकएक टक्के शक्यता असते/नसते अनुमान काढण्याचे बरेच प्रयत्न झाले आहेत. हे सर्व जमेस धरून थोडा टैमपासअन टवाळकीला भरपूर वाव आहेच.
- Read more about ज्योतिष चर्चा २०१९
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8706 views
खरडफळा फुलबाज्या - ज्योतिष
डिस्क्लेमर-
ज्योतिष शास्त्र आहे की नाही? .......................... माहीत नाही.
कुंडली मांडता येते, गणिती द्न्यान आहे? ......................नाही अर्धवट माहीती आहे. व मुख्य थोडाफार पडताळा आहे.
ज्योतिषविषयी प्रश्न विचारला तर उत्तर देता येइल? ...................... डिपेन्डस!
मला ज्योतिषविषयक माझे काही अनुभव सांगायचे आहेत - जरुर! स्वागत आहे. त्याकरताच हा धागा आहे.
ज्योतिषविरोधी एकाही प्रश्नावर मी गिल्ट ट्रिप वर जाणार नाही आणि प्रश्नाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करणार आहे. तरी चालू द्या.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about खरडफळा फुलबाज्या - ज्योतिष
- 47 comments
- Log in or register to post comments
- 40413 views
शोध
शोधत होतास जिवाच्या आकांतानी मला, तेव्हा होते मी तुझ्याच पाठीशी उभी
काल आजची गोष्ट नाही, मी आहे अनादि, अविचल, अन कालातीत।
पहाते आहे तुझी धडपड माझ्यापर्यंत पोहोचण्याची, निरंतन आणि निष्प्रेम
तुला पार करावी लागतील युगे आणि शिकावे लागतील करुणा आणि त्यागाचे धडे।
जमलंच करायला हे सगळं, तर दिसेन मी तुझी वाट पहात तुझ्याच पाठीशी उभी
पण वळून मात्र पहावं लागेल, जाणिवेचा हात धरून आणि प्रेमानी डोळे भरून।
- Read more about शोध
- Log in or register to post comments
- 1957 views