ती
अगदी पाचवीत की सहावीत असताना तिने एकदा मला सांगितलं होतं की मुलींनी स्वयंपाकघरात लक्ष द्यावं. पुस्तकं वाचण्यात गुंगून जाऊ नये. जास्त पुस्तकं वाचल्याने मुली वेड्या होतात बरं का. मग पुढे कधीतरी तिने मला अन्यायाविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करू नको असं पण शिकवलं. मग कधीतरी मुलींनी मोठे धाटे कपडे घालावेत, उलट उत्तर देऊ नये, मुलींनी जास्त लांब लांब फिरू नये, जास्त बोलूच नये, मोठ्याने हसू नये, खरं तर मान खाली घालून जगावं, मुलग्यांची बरोबरी करायला जाऊ नये, मुलांशी जास्त बोलूच नये, मुलांविरुद्ध तर कधीच बोलू नये, कुणी छेड काढत असेल तर दुर्लक्ष कराव, सरळ पळूनच यावं न असं सगळं शिकवलं.
- Read more about ती
- 6 comments
- Log in or register to post comments
- 38 views
बनारस - काही नोंदी. - काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरीडोर वगैरे.
- Read more about बनारस - काही नोंदी. - काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरीडोर वगैरे.
- 3 comments
- Log in or register to post comments
- 29 views
प्रयागराज , ७,८,९ फेब्रुवारी २०२५.
आयुष्यात कधी मी कुंभ मेळ्याला जाईन असं वाटलं नव्हतं.
- Read more about प्रयागराज , ७,८,९ फेब्रुवारी २०२५.
- 2 comments
- Log in or register to post comments
- 25 views
"कोलाहल"विषयी
निखिल घाणेकर माझा मित्र आणि फार मस्त मुलगा.
चांगला लिहिणारा-वाचणारा, मराठी साहित्याविषयी चांगल्या अर्थाने कन्व्हिक्शन असणारा तरीही भाबड्या कल्पना ना बाळगणारा.
त्याचं हेच कन्व्हिक्शन कोलाहल ह्या त्याच्या कादंबरीतून मिळतं.
- Read more about "कोलाहल"विषयी
- Log in or register to post comments
- 7 views
'छावा'च्या निमित्ताने...
छावा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरी एकूणच सिनेमाबद्दल परीक्षण, समीक्षण, समर्थन आणि विरोध वगैरे सोशल मीडियावर अविरतपणे चालू आहे. चित्रपट का बघावा?, की नको?, बघायला कसा आहे सिनेमा?, चांगला आहे का वाईट आहे? याच्याबद्दल बोलणं, लिहिणं हे होतच राहील. कारण सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रमोशन, मार्केटिंगमध्ये जोर आला. मूळ मुद्दा येतो इतिहासाकडे बघण्यासाठी आपल्याकडे ती दृष्टी आहे का? आत्ताच्या काळात सहाशे सातशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं किंवा तीनशे चारशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं? वगैरे वर आपण किती काथ्याकूट करायचा याचा विचार केला पाहिजे.
- Read more about 'छावा'च्या निमित्ताने...
- 1 comment
- Log in or register to post comments
- 30 views
कस्त्वम् आणि कोऽहम् या प्रश्नांची काही (पडल्यापडल्या स्वतःच्या बेंबीला न्याहाळत) सापडलेली उत्तरं.
( कस्त्वम् आणि कोऽहम् हे प्रश्न - म्हणजे हे शब्द - संस्कृत आणि पर्यायाने भटबामणी कॉन्स्पिरसीचा एक भाग आहेत. त्यामुळे, त्याचं भाषांतर अनुक्रमे "ऐला, कोण रे तू?" आणि "तेजायला, तोच मी ए!" असं वाचावं)
तर असं मानलं जातं की "तू कोण" नि "मी नक्की कोण" ह्या प्रश्नांचा शोध घेणं हा माणसांनी चालवलेला प्रकार हजारो वर्षं चाललेला आहे. किमान "आपण तो प्रकार चालवतोय" असं सांगण्यादाखवण्याची फॅशन गेली काही हजार वर्षं आहे ती अजून व्होगमधे आहेच्चए.
तर अशा, कधी न संपणार्या प्रश्नांची विशिष्ट संदर्भातली *आपल्यापुरती* उत्तरं नवनीत गायडासारखी आयती मिळाली की कधीकधी मज्जा येते. तसं माझ्याबाबतीत न्यूयॉर्कर नियतकालिकातल्या एका लेखावर सहज नजर गेली असतां झालं. म्हण्टलं सोशलमिडियावरच्या आपल्यासारख्याच फॅशनेबल मित्रमैत्रिणींना ते दाखवावं. मूळ लिखाण इंग्रजीसारख्या साम्राज्यवाद फैलावणार्या भाषेत आणि अमेरिकेसारख्या भांडवलशाहीवादी वैट्ट देशातलं आहे. शिवाय हा लेख Nicole Rose Whitaker नावाच्या एका यःकश्चित स्रीने लिहिला आहे - या सर्व घटकांचं निवारण म्हणून मीच त्याचं भाषांतर येथे देत आहे.
शिक्षण आणि विटाळ पाळणे
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. काळानुसार समाज आणि परिस्थिति बदलत रहाते. कोणतेही विधान करण्यापूर्वी त्याकाळच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितींचा विचार करणे ही गरजेचे असते. मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते. पण चिंतन आणि मनन करण्याची क्षमता नसलेले अर्ध-शिक्षित सर्व जुन्या सामाजिक परंपरांबाबत निरर्थक विधान करतात त्यासाठी हा लेख.
- Read more about शिक्षण आणि विटाळ पाळणे
- 26 comments
- Log in or register to post comments
- 118 views
नॉर्मल पीपल: सॅली रूनी
एखाद्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित झाले याचा अर्थ त्यांच्यावर आपलं प्रेम असायलाच पाहिजे असा नाही. केवळ एखाद्याबरोबर आपण झोपतो आहोत याचा अर्थ त्याच्याकडून आपण प्रेमाची अपेक्षा करावी असा अजिबात होत नाही - या गृहीतकातूनच आम्ही प्रेमं केली. ती प्रेमं होती किंवा नाही याचंही उत्तर नेहमी मिळालं नाही.
- Read more about नॉर्मल पीपल: सॅली रूनी
- 15 comments
- Log in or register to post comments
- 299 views
२०२५ साली नुक्ताच आलेल्या "छावा" सिनेमा पहातानाचे टिपण
...साऊथच्या सिनेमाच्या शोच्यावेळी हैद्राबादेत का कुठेतरी थेटरातच फटाके लावणे किंवा चेंगराचेंगरी करणे वगैरे धोके - इतका उन्माद करूनही - जाणवलेले नाहीत. अजून मराठी इंधन कमी पडते असे दिसते.
- Read more about २०२५ साली नुक्ताच आलेल्या "छावा" सिनेमा पहातानाचे टिपण
- 5 comments
- Log in or register to post comments
- 48 views
नविन प्रतिसाद प्रथम
कृपया नविन प्रतिसाद पहिल्यांदा दिसतील असं करा.
- Read more about नविन प्रतिसाद प्रथम
- 1 comment
- Log in or register to post comments
- 17 views