Skip to main content

बलात्कारः (गैर)समज आणि तथ्ये

आपल्याकडे एकूणच बलात्कार आणि त्यासंबंधीचा विदा यावर जाहीर वाच्यता होत नव्हती. दिल्लीच्या नृशंस घटनेनंतर यावर समाजात विविध मतांतरांची मुक्तपणे घुसळण चालू आहे ती स्वागतार्ह वाटते. जालावर किंवा प्रत्यक्षात कित्येक सामान्यांकडूनच नव्हे तर काही प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, आमदार/खासदार/नगरसेवक वगैरेंकडून कधी प्रत्यक्षपणे किंवा कधी अप्रत्यक्षरीत्या स्त्रियांनी 'आव्हानात्मक' कपडे घालू नयेत, 'ओळखीच्या' व्यक्तीसोबत स्त्री अधिक सुरक्षित असते, बलात्कार हे 'अचानक'- त्या वेळच्या मन:स्थितीमुळे होतात वगैरे प्रकारची विधाने करताना आपण ऐकतो.

सहा शब्दांच्या कथा

सहा शब्दांच्या कथा :

-------
१.

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

२.

हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.

३.

भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

४.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

५

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.

--------

लेखक : अनंत ढवळे

-----

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखज हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

अवसान, हिंमत, धाडस

फार फार मागे, कोणे एके काळी घडलेली; पंचतंत्रात असते तशीच, त्याच काळातली ही एक गोष्ट.
जंगलातले ससे चपळ झाले की सिंह सुस्तावले सांगता येणार नाही. पण येनकेन प्रकारे सिंहांना सशांची शिकार करता येणे अवघड होउ लागले; दुरापास्त होउ लागले.
नव्या सावजांना कसे शोधता येइल ह्याबद्दल विचार करत हळूहळू खंगत जाणारे ते सिंह चिंतित बसले होते.ते फारच अश्क्त दिसू लागले होते. इतक्यात आलेल्या मानभावी सेवकाने, कोल्ह्याने त्यांचे लक्ष विचलित केले. "तू का आलास रे बाबा आता" असं एक वयोवृद्ध सिंह आयाळाला बाजूला सारत गुरगुरत बोलता झाला.

तुम्ही कोण होणार ?

शाळेत असताना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ असे कुठेतरी वाचले होते. हे वाचून मी (माझ्या)लहानपणी कोणत्याही बारशाला गेले किंवा नवीन बाळ झाले आहे, अशा घरी गेले, की पाळण्यातल्या बाळाचे पाय पाहण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते बेटे दुपट्यात लपेटून इतक्या बंदोबस्तात ठेवलेले असत की त्यांचे नखही पाहायला मिळत नसे. एकवेळ शनिवारी संध्याकाळी देवळातल्या मारुतीच्या पायाचे दर्शन होणे सोपे, पण पाळण्यातल्या बाळाचे पाय ? नाव नको !
पुढे पुढे, ती एक म्हण आहे अन त्याचा अर्थ, बाळ मोठेपणी कोण होणार ते समजते, हे समजले.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १४ : युगांतर

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : युगांतर.

आठवड्याची सुरुवात रविवारी (का सोमवारी), वर्षाची सुरुवात जानेवारीमध्ये (का पडव्याला), शकाची सुरुवात राजाचा अभिषेकाने (शालिवाहनाच्या का विक्रमाच्या)... सर्व कालमापनांची, युगांची सुरुवात निव्वळ सामाजिक ठरावाने होते. त्याला निसर्गातला पाया वगैरे पुष्कळदा नसतोच. पण तरी समाजाने ठरवले, आणि सर्वांनी मानले, तर ते तथ्य होते. काहीतरी नवे चैतन्य अशा प्रसंगी खरेच सळसळते. जुने काहीतरी संपल्याची हळहळ खरीच वाटते.

स्पर्धा का इतर?

क्षुल्लक

दिल्लीत परतल्यापासून जंतर-मंतर, इंडिया गेट इथल्या निदर्शनात सामील व्हायची संधी मिळत नव्हती. म्हणजे रोज काही ना काही घडत होतं तिथं; पण संचारबंदी लागू असल्याने आणि त्याहीपेक्षा दहा मेट्रो स्थानकं बंद असल्याने मी तिथवर पोचू शकले नव्हते.

केमिकल कॅस्ट्रेशन..

Taxonomy upgrade extras

दिल्लीमधे झालेला धावत्या बसमधला बलात्कार आणि त्यामधे त्या निरपराध मुलीच्या शरीराशी केल्या गेलेल्या विकृत मारहाणीने घेतलेला तिचा बळी हे सर्व अगदी ताजं आहे आणि त्याविषयी आधीच खूप चर्चा आणि आंदोलनं झाली आहेत, चालूही आहेत.

या प्रसंगाची धग, बोच , अपराधीपणा कुठेतरी सर्वांनाच जाणवतो आहे. प्रत्येक व्यक्तीने, जास्त करुन पुरुषाने स्वतःलाच यासाठी अंशतः जबाबदार धरावं की नाही हा मुद्दा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. सध्या कोणीही त्या दिशेने विचार करण्याच्या मनःस्थितीत नाही. आय अ‍ॅम सॉरी टू बी अ मॅन अशा आशयाची भावनापूर्ण निवेदनं दिली जात आहेत.

ऍनालॉग मुक्ती

Taxonomy upgrade extras

मुक्ती ही एक काळीपांढरी संकल्पना असल्याप्रमाणे कधीकधी तिचा विचार होतो. म्हणजे आपण कुठच्यातरी भिंतींच्या आड आहोत, आणि त्या मोडून पडल्या की अनंत विश्व उघडं. बंधनं किंवा मुक्ती अशा बायनरी विचार करण्याच्या पद्धतीमुळे या विषयावरची चर्चा योग्य दिशेला जात नाही. त्यातही 'मुक्ती' या शब्दाचा 'मोक्ष'शी असलेल्या अर्थसाधर्म्यामुळे आणखीनच गोंधळ होतो. मोक्ष हे एक ध्येय आहे. तो मिळतो किंवा मिळत नाही. मात्र मुक्ती ही एखाद्या व्यक्तीची किंवा समाजाची स्थिती आहे. ते एक गाठायचं ठिकाण नाही.