Skip to main content

स्त्री जन्माची (जैविक) कहाणी

पुरूषी नजरेतून सुशिक्षित स्त्री
* अती विद्येने स्त्रिया व्यभिचारी होतील
* स्त्रियांस सोङचिठ्ठी द्यावयाची असेल तरच स्त्री शिक्षणाविषयी अनुमोदन करावे.
* अनेक स्त्रिया करण्याची पुरूषांना आज मोकऴीक आहे. आपल्या हातून कदाचित परद्वारी गमन होते. स्त्रिया शिकल्या की त्या प्रश्न करतील “आम्हांला मोकळीक का नसावी ”
* स्त्रियांस शिकवून भाक-या भाजाव्या काय ?
* स्त्रिया विद्वान झाल्यातर भ्रतार, आप्तपुरूष, वङील माणसे त्यांचा वचक बाळगणार नाहीत.
* स्वंयवर, पुर्नविवाह, पुरषासारखे अधिकार मागणे याकरिता स्त्री बंड करेल.
* बायका शिकू लागल्या तर त्यांचे नवरे मरतात.

द लास्ट अ‍ॅक्ट

१२.१२.१२. ला साहेबांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींनी पेपरची पाने भरलेलली होती त्या टाळुन पुढे जात असताना एका चित्रपटाच्या जाहीरातीने नजर खेचुन घेतली होती. चित्रपटाचे नाव होते "The Last Act". चित्रपटाच्या प्रिमियर साठी निवडलेला दिवस होता १२.१२.१२ त्याचे कारण म्हणजे चित्रपटाच्या डायरेक्टर्स ची संख्या आहे १२ आणि चित्रपटाचे कथानक घडतेही १२ शहरात. द लास्ट अ‍ॅक्ट ही भारतातली पहिली कॉलॅबरेटीव्ह फिचर फिल्म आहे.

चित्रपट बघणे : एक कला

चित्रपट पाहणे आणि त्यांची परीक्षणे लिहिणे हा आमचा एक आवडता छंद. काही लोक त्याला 'फुकटचा धंदा' असेदेखील म्हणतात. अर्थात ते, 'जे मित्र असले की शत्रूची गरज नाही' ह्या कॅटेगरीत मोडणारे असल्याने मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करत आलो आहे. हां, तर परवा असाच एक मित्र कम शत्रू आम्हाला रस्त्यात भेटला. (दारूखान्यात, शिणिमाला, तमाशाला आणि रस्त्यात मित्र भेटणे हा दुर्मीळ योग आमच्या आयुष्यात कायमच येत आला आहे.) अत्यंत उपहासाने त्याने मला 'मग, अटेंड करणार आहे का नाही सेमिनार? ' असे विचारले. दुपार असल्याने आणि मित्र बायकोबरोबर असल्याने प्यायलेला नसावा ह्याची खात्री होती.

युवराज

वस्तीतला युवराज बाळा बगाडे. उच्चारीनाव ईवराज म्हणजे एक नंबर ईदरकल्याणी कार्टा ! वस्ती त्याला कडू इंद्रावण म्हणते.
मुले ही देवाघरची फुले ह्याला टोटल छेद देणारा छोटा महावीर . वय वर्ष ७ च्या दरम्यान चालू. काळाकुळा गिड्ड्या अंगाचा. थोडं फेंदर नाक. वस्ती ह्याच्या नानाविध, सतत चालू असणार्या उपक्रमांमुळे त्रस्त होऊन, ह्याच्या आई बापाला शिव्या घालत नाही तर ह्याच्या वेळेस त्यांनी नवस केलेल्या देवदेवतांना शिव्या हासडते. युवराजला शिव्या देण्याच्या प्रश्नच येत नाही. वस्ती ते धाडस कटाक्षाने टाळते. हा

खाला

जनाजा

दिदार को टैम हे अभी
बच्ची को लि जाव
अंदर...
खर्जातला आवाज गर्जुन गेला
निपचित जनाजा हादरुन गेला
सबर करो खाला
सबर करो खाला
सबर करो..
दाढीधारी प्रेषीतांची आळवणी वाढली;
पान खाऊन खाला सबर करु लागली.
खाला तशी जहांबाज, भले भले टरकतात
आज दुःख तिच्या घरी, दाढीधारी हरकतात.
गर्दीमधली कुजबूज
रुक्सार कुठे ऎकत होती ?
जनाजात निपचित ती
पुरेपूर अलिप्त होती.
न्हाऊन धुवून स्वच्छ झाली , तरी फेस तोँडी कसला ?
कस काय विचारता राजेही , प्रश्न तुम्ही असला तसला ?
चिल्लम चिल्ली बंद करो,अल्ला की मर्जी मानो ;
तुम्हाराच गया नही हमारा भी गया जानो.
रुक्सारची बच्ची हळूच आता सांगते ;

जयभिम माहात्म्य

मला कुणी जयभिम म्हटलं कि मी ही त्याच्या आवाजानुसार कधी खणखणीत, कधी हळुवार, कधी पुटपुटता जयभिम म्हणतो. जयभिमला प्रतिसाद देत नाही ते फक्त विद्यापीठात एकत्र शिकलेल्या एका मित्राला. २००० ते २००२ मध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात आम्ही शिकत होतो.
हा मित्र जयभिमबंधुच मुळचा मराठवाड्यातला. तो आता कोकणात एका सहकारी बँकेत नोकरी करतोय. एका चळवळीतही काम करतोय. हा आज स्थळा संदर्भात काँलेजमधे मला भेटायला आला.
जवळ जवळ पाच वर्षाने भेट होत होती.

हक्क

वस्त्तीतल्या दोघा भावांची भांडणं लैच गाजली. जोसेफ अंकल वारले.
ब्याऎंशी वर्षाचे होऊन.
आयुष्यातल्या एका नाजुक क्षणी चिल्या पिल्यांची भुक
पाहुन येशूबाप्पाला शरण गेले. आयुष्यभर बाप्पाशी प्रमाणिक राहिले.
बाहत्तरच्या दुष्काळात शहरात जगायला आलेलं हे कुटुंब . खेड्यातलं ठीक होतं.
पण पुण्यात येऊन मुलं वैतागली. थोरला जास्तच ! त्याच्या मुलांना अडचणी येऊ लागल्या ओपन म्हणुन. थोरला जोसेफ अंकलला शिव्या घालु लागला धर्म बदलला म्हणुन. अंकल हताश झाले. पोरांना लहानपणच्या भुकेची आठवण करुन देणं त्यांना काही जमेना एक दिवस थोरला कागदपत्राची भेंडोळी घेऊन माझ्याकडे आला.

पोतराजाचं पोर

पोतराजाचं पोर

रणरणती दुपार,
भूक अपार.
डोळ्यात अंधारी ,
झाकीनं बेजार.

पोतराजाचं पोर,
भूकेतंच गिरकी.
आसूडाच्या दाबात,
नशिबाची फिरकी.

निषेधाचे डोळे,
दुबळे हात.
पुण्याच्या वाढीला,
भिकेची साथ.

सुखे मरीआई,
टोपल्यात बसून.
सोहळा पाहते,
निर्लज्ज हसून.

पोतराजाचं पोर,
चराचरा वाकलं.
भूकेच्या डोँबानं ,
पुन्हा ऊभं ठाकलं.

-----------------------------------------------------------------------
सतीश वाघमारे. पुणे