Skip to main content

पोतराजाचं पोर

पोतराजाचं पोर

रणरणती दुपार,
भूक अपार.
डोळ्यात अंधारी ,
झाकीनं बेजार.

पोतराजाचं पोर,
भूकेतंच गिरकी.
आसूडाच्या दाबात,
नशिबाची फिरकी.

निषेधाचे डोळे,
दुबळे हात.
पुण्याच्या वाढीला,
भिकेची साथ.

सुखे मरीआई,
टोपल्यात बसून.
सोहळा पाहते,
निर्लज्ज हसून.

पोतराजाचं पोर,
चराचरा वाकलं.
भूकेच्या डोँबानं ,
पुन्हा ऊभं ठाकलं.

-----------------------------------------------------------------------
सतीश वाघमारे. पुणे

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १३ : विसंगती

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : विसंगती.

.......विसंगती आपल्या भोवती सगळीकडे भरून राहिली आहे. विचारांतून आलेली विसंगती, जरासुद्धा डोकं न खाजवता जाणवलेली विसंगती, निसर्गातली, नात्यातली, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलेतली, साहित्यातली, अगदी 'कबाब में हड्डी' पासून 'कींचड़ में खिला कमल' पर्यंतची सगळी विसंगती.

स्पर्धा का इतर?

खगोलशास्त्राविषयी

परवाच ऐसी अक्षरेवर खगोलशास्त्रज्ञ पॅट्रिक मूर यांचे निधन झाल्याची बातमी वाचली.पॅट्रिक मूर हे नक्की कोण होते हे मला ही माहिती वाचेपर्यंत माहित नव्हते आणि अजूनही नक्की त्यांनी काय कार्य केले याची मला माहिती नाही.त्यांना श्रध्दांजली. ती बातमी वाचून काही प्रश्न उभे राहिले आणि ते प्रश्न त्यांना श्रध्दांजली द्यायच्या धाग्यात उभे करणे मला प्रशस्त वाटले नाही म्हणून नवा धागा काढत आहे.

चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग १

(ही अपूर्ण लेखमाला उपक्रम वर पूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्याच्या पुढचे भाग लिहायची इच्छा असल्याने ऐसी च्या वाचकांसाठी पहिले काही भाग इथे पुन्हा प्रसिद्ध करत आहे. तसंच त्यावेळी लिहिताना माझ्या डोळ्यासमोर जी चित्रं निर्माण झालेली होती त्यात थोडा बदल झाला असल्यामुळे तेही या लेखांत परावर्तित होतील असे बदल काही ठिकाणी करतो आहे.)

मराठी संकेतस्थळांसाठी यंदाही स्पर्धेचे आयोजन २०१३

राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई- राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सरकारी संकेतस्थळ व इतर संकेतस्थळ अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे.

दिवाळी अंक २०१२ : काही दृष्टीक्षेप

गेल्या वर्षी लिहिलेल्या http://www.aisiakshare.com/node/229 या धाग्यासारखा धागा यंदा काढायचा विचार होताच. मात्र एक गोष्ट लगेच लक्षांत आली की, यंदा हा धागा काढायला जवळजवळ एक महिना उशीर झालाय्. पण थोडा विचार केल्यावर हेही लक्षांत आलं की यंदा दिवाळी एक महिना उशीरा आली. पर्यायाने आमच्यापर्यंत अंक पोचणे आणि ते हळुहळू वाचून त्यावर काहीतरी खरडणे यालाही उशीर होणे क्रमप्राप्तच होते.

''ओलसर''

शमवू बघती चटक्याचे आघात खोलवर झालेले
डोळ्यांमधल्या दंवात भिजुनी शब्द ओलसर झालेले

लोकतंत्र ? की विडंबना? लोकांसाठी ,लोकांकडुनी
तेच निवडले मंत्री जे बदनाम गावभर झालेले

कुपोषीत्,दुष्काळग्रस्त्,अन्यायग्रस्त गपगार असे
ओरडती नेते ज्यांचे जेवून पोटभर झालेले

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले

भडकावे ''कैलास'' लागले विना आग दुनियेमध्ये
सहन जगाचे वार-टोमणे करु कोठवर झालेले?

--डॉ.कैलास गायकवाड

पंडीत रवीशंकर यांचे निधन : श्रद्धांजलि

ख्यातनाम सतारवादक भारतरत्न पंडीत रवीशंकर यांचे आज सॅन डीएगो येथे ९२व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

ब्रिटीश खगोलाभ्यासक पॅट्रीक मूर यांचे निधन

जगभरातल्या खगोलप्रेमींना आपल्या पुस्तकांमुळे माहित असणारा पॅट्रिक मूर याचे काल निधन झाले. पॅट्रिकने सौरमाला, आकाशनिरीक्षण आणि दुर्बिणींवर अनेक पुस्तकं लिहीली आहेत. या पुस्तकांमधून मला त्याची ओळख समजली तरी पॅट्रिकची ख्याती बीबीसीवरच्या 'The Sky at Night’ या कार्यक्रमामुळे होती. पन्नास वर्षांहून अधिक काळ हा कार्यक्रम टीव्हीवर सुरू आहे आणि याचा एक भाग वगळता बाकी सर्व भागांचं सूत्रसंचलन पॅट्रिकने केलं होतं.