माहिती हवी आहे - व्यक्तिचित्र किंवा शिल्पाबद्दल कविता
एखाद्या व्यक्तीच्या चित्राचं किंवा शिल्पाचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :
- कविता छापील स्वरूपात (पुस्तक/मासिक) पूर्वप्रकाशित असावी.
- कविता मराठीत असावी.
- कवी किमान नावाजलेला असावा. (म्हणजे इथल्या कवींनी स्वतःची कविता देऊ नये) ;-)
- कवितेत एखाद्या व्यक्तीच्या चित्राचं किंवा शिल्पाचं वर्णन किंवा उल्लेख असावा. म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो...' बाद आहे.
- Read more about माहिती हवी आहे - व्यक्तिचित्र किंवा शिल्पाबद्दल कविता
- 11 comments
- Log in or register to post comments
- 7563 views
जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची (डॉ. श्री बालाजी तांबे)
हिग्ज बोसॉनचा शोध साजरा करायला रविवारच्या 'सकाळ'मध्ये अनेक लेख आले आहेत. त्यातला डॉ. श्री. बालाजी तांबे यांचा 'जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची (डॉ. श्री बालाजी तांबे)' या शीर्षकाचा लेख मनोरंजक आहे. नमुन्यादाखल त्यातील काही उद्धृते :
- Read more about जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची (डॉ. श्री बालाजी तांबे)
- 22 comments
- Log in or register to post comments
- 16861 views
फुल टिल्ट - एक अद्भुतरम्य सायकल सफर
प्रवासवर्णन असे आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे स्थलवर्णनच जास्त असते. कारण त्यातील प्रवास हा पारंपरिक वाहनांतून (मोटार, बोट, विमान, रेल्वे आदी) झालेला असतो. प्रत्यक्ष प्रवासाचे वर्णन त्यात जवळपास नसतेच.
१९६३ साली एक बत्तीस वर्षांची आयरिश युवती सायकलवरून भारतात यायला निघाली, आणि आली. त्या 'प्रवासा'चे वर्णन म्हणजे फुल टिल्ट (Full Tilt) हे पुस्तक. त्या युवतीचे नाव Dervla (काय उच्चार करायचा तो करा! ) Murphy.
- Read more about फुल टिल्ट - एक अद्भुतरम्य सायकल सफर
- 10 comments
- Log in or register to post comments
- 9638 views
अजि म्या ब्रह्म पाहिले
Taxonomy upgrade extras
शीर्षकाचा श्रेयाव्हेर - (असे लेखाच्या सुरुवातीसच करण्याची पद्धत नसली तरी श्री. श्रावण मोडक यांच्या अन्य संस्थळावर वाचलेल्या एका प्रतिसादावरून हे शीर्षक सुचले आहे हे मान्य करतो.)
प्रथम काही विस्कळीत विचार आणि मग चर्चा प्रस्ताव -
१.
- Read more about अजि म्या ब्रह्म पाहिले
- 19 comments
- Log in or register to post comments
- 12578 views
माहिती अधिकार आणि खोडसाळपणा
Taxonomy upgrade extras
आज महाराष्ट्र टाईम्समध्ये ही बातमी वाचनात आली.
त्याच बातमीत पहिल्या परिच्छेदात गांधींबद्दलही असाच प्रश्न विचारला गेल्यावर असेच उत्तर मिळाल्याचा उल्लेख आहे.
ज्या गोष्टींचे सरकारी रेकॉर्ड असण्याची जराही शक्यता नाही अशी माहिती माहितीच्या अधिकारात विचारून त्याचे अपेक्षित उत्तर येताच त्यावर "फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने केवळ मतांचा जोगवा मागणाऱ्या एकाही लोकप्रतिनिधीला याबाबत कधी पुढाकार घ्यावासा वाटला नाही," वगैरे छातीपिटू लेखन करण्यासाठीच (कदाचित फेसबुकवर शेअर करण्यासाठी) हे प्रकार केले जात आहेत हे उघड आहे.
- Read more about माहिती अधिकार आणि खोडसाळपणा
- 21 comments
- Log in or register to post comments
- 13113 views
वारीसोबत चार पावलं...
सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली.
त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते.
मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो.
जगण्याचा पाया, चालण्याचे बळ
मझिया मना देइ भगवंता.
तुझिया कृपेने झालो मी अमर
मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर.
तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती
माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा
ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता
आता काय होणे सांगी पांडुरंगा
ठाकलो उभा दारी तुझ्या
वाजवी टाळ सजवी मृदुंगा
- Read more about वारीसोबत चार पावलं...
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6203 views
एक ठुमरी, एक भावना, एक राग : अनेक कलाकार.
लग्नानंतर नववधूला “बिदा” करणे हा भारतीय कुटूंबामधला एक अतिशय नाजूक ,कोवळा , भावोत्कट क्षण ! आयुष्याचा एक अध्याय पूर्ण करून नवा अध्याय सुरु करायला सासरी निघालेली मुलगी. आई –आणि ती मुलगी रडून आपल्या भावना व्यक्त करतात . पण दुर्दैवाने सगळ्यांनाच असे रडून मोकळे होता येत नाही. मग हया भावना व्यक्त करण्यासाठी कविता गाण्यांचा आधार घेण्यात येतो. “दाटून कंठ येतो” हे सिनेमा मधले गाणे किंवा “दमलेल्या बाबाची कहाणी” सांगणारे भावगीत सामान्यांच्या ह्याच अव्यक्त भावना स्पष्ट करतात आणि आपल्याला भावतात.
- Read more about एक ठुमरी, एक भावना, एक राग : अनेक कलाकार.
- 8 comments
- Log in or register to post comments
- 10232 views
पाकिस्तानमधील नवीन राजकीय अस्थिरता
Taxonomy upgrade extras
लेखक: सुधीर काळे, जकार्ता
पाकिस्तानमध्ये एक नवे राजकीय संकट उभे राहिले आहे. त्याच्या मुळाशी आहे पाकिस्तानच्या सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरींनी दिलेला एक वादग्रस्त निर्णय! पाकिस्तानचे सरन्यायाधीश श्री. इफ्तिकार चौधरी हे हुकुमशहा मुशर्रफ यांच्यापुढे छाती काढून उभे राहिलेले सरन्यायाधीश! त्यांनी दाखविलेल्या या असामान्य धैर्यामुळे ते सर्वांच्याच आदरास आणि कौतुकास पात्र झाले होते.
- Read more about पाकिस्तानमधील नवीन राजकीय अस्थिरता
- 20 comments
- Log in or register to post comments
- 9321 views
अठरा लक्ष पावलं - सामाजिक इतिहासाचा एक वेधक दस्तावेज असलेले प्रवासवर्णन
प्रवासवर्णने हा काही नवीन साहित्यप्रकार नाही. किंबहुना गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास'ने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे उत्कट चित्रण करून अर्वाचीन साहित्याला एक वेगळे परिमाण दिले. मात्र त्यानंतर बराच काळ प्रवासवर्णनांमध्ये ललित, विनोदी आणि आत्मनिष्ठ या तीन गोष्टींवर (एकत्रित वा वेगवेगळा) भर देण्यात आला. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' हा एक अपवाद (पण एकच नव्हे; जगदीश गोडबोले, आणि त्यांच्यासारखे इतर कार्यकर्त्यांनी वेळोवेळी सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणारे वृत्तांत लिहिले), पण एकंदर प्रवासवर्णन म्हटले की याप्रकारचे लेखन झाकोळले जाते हे खरे.
- Read more about अठरा लक्ष पावलं - सामाजिक इतिहासाचा एक वेधक दस्तावेज असलेले प्रवासवर्णन
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4377 views
'उत्तरमामायण' - मधुकर तोरडमलांची चौथी घंटा
मधुकर तोरडमलांचे 'तिसरी घंटा' हे आत्मचरित्र प्रसिद्धच आहे. तोरडमल त्यामानाने तरुण आणि कार्यमग्न असतानाच ते लिहिले गेले.
त्याला पार्श्वभूमी अशी की अरुण सरनाईक या त्यांच्या अभिनेत्या मित्राचे अपघाती निधन झाले. ते होण्याअगोदर त्या दोघांचे असे ठरले होते की सरनाईकांनी आत्मचरित्र सांगायचे आणि तोरडमलांनी ते लिहायचे. त्यासाठी पंधरा दिवस पन्हाळ्याला जाऊन रहायचे असा बेतही शिजत होता. आणि अचानक अपघात झाला.
- Read more about 'उत्तरमामायण' - मधुकर तोरडमलांची चौथी घंटा
- 11 comments
- Log in or register to post comments
- 12588 views