डॉ.अशोक रानडे यांचे स्मरण
महाराष्ट्राला विचारवंताचे वरदान लाभले आहे. संगीत क्ष्रेत्रात ही परंपरा पं.भातखंडेनी सुरु केली. पुढे दि.ब. देवधर , कुमारजी , पु.ल. असे अश्या अनेकांनी संगीता बरोबर संगीताचे विचार पुढे नेले. डॉ. अशोक रानडे त्याच परंपरेचा विचारवंत होता. हया जुलै महिन्यात त्यांच्या निधनाला एक वर्ष होते आहे. त्यानिमित्त त्यांचे स्मरण.
आपल्या जवळजवळ पाउणशे वर्षाच्या आयुष्यात डॉ.६० वर्षे संगीता क्षेत्राशी निगडीत होते. स्वतः गजाननबुवा जोश्यांचे शिष्य होतेच पण त्याही पेक्षा ते संगीतावरचे अधिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांचा व्यासंग “संगीताचा” होता आणि तो भारतीय शास्त्रीय संगीता इतकाच लोकसंगीताचा ही होता.
- Read more about डॉ.अशोक रानडे यांचे स्मरण
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6096 views
नर्गीसी कबाब
काय मंडळी कशी झाली आषाढी एकादशी? साबुदाण्याची खिचडी/वडे, भगर , उपवासाची भाजी, हाणलीत की नाही?
या तर मग कालच्या उपवासावर उतारा घेऊया. आजचा पदार्थ थोडा वेळ काढु आहे. पण जीभेचे चोचले पुरवायचे तर पेशंस हवेतच नाही का? :)
चला तर लागुया तयारीला.
साहित्य :
ग्रेव्हीसाठी :
- Read more about नर्गीसी कबाब
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7621 views
"प्रयास" वरून आठवलं....
Taxonomy upgrade extras
आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853)
विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार.
- Read more about "प्रयास" वरून आठवलं....
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5002 views
नव्या शेरलॉकच्या चाहत्यांसाठी खूष खबर
नव्या शेरलॉकच्या भारतातील चाहत्यांसाठी एक खूषखबर - १ जुलै २०१२ पासून बीबीसी एंटरटेन्मेंट च्यॅनलवर रात्री ८:०० वाजता शेरलॉक सीझन २ भारतात दिसणार आहे.
टाटा स्कायवर त्याची जाहिरात येत आहे. या विषयावर या पूर्वी येथे लेखन आलेले आहेच.
- Read more about नव्या शेरलॉकच्या चाहत्यांसाठी खूष खबर
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4934 views
" हे माझे पंढरपूर ! "
हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर,
घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर |
वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर
नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर |
सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर
सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर |
कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर
सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर |
घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर
नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||
- Read more about " हे माझे पंढरपूर ! "
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3431 views
संवत्सर
चैत्रात पालवे
सुजाण हळवी
मोहोर आरास
सौभाग्य मिरवी
देखणा उंबरा
तोरण दारास
ग्रीष्मात दूरस्थ
घामेजले काही
दीर्घ उच्छ्वास
संपन्न चुलीला
हुरहूर थोडी
गारव्याचा ध्यास
वीज उन्मादली
सरींचा कोसळ
आषाढात मग्न
मोरपीस गाते
श्रावणाची धून
हिरवी कृतज्ञ
शारद-चांदणे
दैवी संकेतांचे
सौहार्द-स्निग्ध
चेतली आकांक्षा
कापराच्या देही
अर्पण-सिद्ध
अनाकलनीय
शिशिराचे दान
शब्द मौनाचे
सखी प्रज्ञावती
निष्पर्ण खोडाची
कुंडली वाचे
0 >>>
- Read more about संवत्सर
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3838 views
नवीन आंतरराष्ट्रीय समीकरणे
२६/११च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अबू जिंदालला ताब्यात घेतल्यानंतर कसाबला फाशी दिल्यासारखा किंवा पाकने आपल्या कृत्यांची कबुली दिल्यासारखा आनंद सर्वजण व्यक्त करीत आहेत. हल्ल्याच्या दिवशीच कसाबला जिवंत पकडूनही आपण त्याला बिर्याणी खायला घालण्याखेरीज काहीही करू शकलो नाही तर मग जिंदालाला पकडल्याने काय दिवे लावणार आहोत?
असो..पण अबू जिंदाल नक्की कसा हाती लागला, भारतीय गुप्तहेर संघटनेची कार्यक्षमता खरोखरच वाढली आहे का, भारतीय दवाबामुळे त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले का या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
- Read more about नवीन आंतरराष्ट्रीय समीकरणे
- 16 comments
- Log in or register to post comments
- 6908 views
बुद्धिमान असण्याचे तोटे?
हुशार माणसं अनेकदा आपल्या हुशारीविषयी अभिमान (किंवा दुराभिमान) बाळगून असतात. पण एका पुस्तकानं हुशार माणसांविषयी काही रोचक मतं मांडलेली आहेत. सातोशी कानाझावा हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवतात. त्यांचं 'इंटेलिजन्स पॅराडॉक्स' हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालं आहे. सर्वसाधारण अर्थानं आपण ज्याला बुद्धिमत्ता म्हणतो तिचा रोजच्या जगण्यात फारसा फायदा होत नाही, उलट तोटाच होतो असं कानाझावा यात म्हणतात.
- Read more about बुद्धिमान असण्याचे तोटे?
- 20 comments
- Log in or register to post comments
- 12112 views
.
Taxonomy upgrade extras
.
- Read more about .
- 18 comments
- Log in or register to post comments
- 14262 views
खादाडीच्या जागा सुचवा
Taxonomy upgrade extras
नमस्कार मंडळी,
मला सध्या मुंबईतील काही विशिष्ट प्रकारच्या खानावळींची/भोजनालयांची माहिती हवी आहे, जेथे नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ मिळतील. तुम्हाला जर अशा काही खानावळी वा भोजनालये माहीत असतील, जेथे भारतातील विविध प्रातांतील पाकसंस्कृतींतील अस्सल पदार्थ मिळू शकतील, उदा. बंगाली, काश्मिरी इ. तर कृपया अशा भोजनालयांची नावे सुचवा. भारताबाहेरील आणि अनवट अशा पाकसंस्कृतींना वाहिलेल्या भोजनालयांचीही नावे चालतील.
आगाऊ धन्यवाद.
राधिका
- Read more about खादाडीच्या जागा सुचवा
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8197 views