Skip to main content

कोर्टाची पायरी (भाग-१)

दुपारचं जेवण बिवण शिस्तीत झालेलं. पोटातल्या अन्नाला सद्गती लाभत असल्याने डोळ्यांच्या पापण्या वारंवार अधोगतीस जाऊ पाहत होत्या. त्यांची गती रोखण्यासाठी हपिसातले कागद खालचे वर अन वरचे खाली करायचा उद्योग सुरु करावा काय या विचारात असताना एकदम भ्रमणध्वनी भुणभुणू लागला. बघितले तर खुद्द बॉस नं. १.
‘मॅडम ?’
‘यस सर् !’
‘अहो उद्या त्या अपीझ इंजीन्सची तारीख आहे बघा कोर्टात. जरा पाटील वकिलांना फोन करा.’
‘यस सर् !’ ...मी.

'उरा'तली सर

नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांच्या पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर! (अर्थात, यातल्या बोरकरांच्या ओळी ओळखालच.)

पाहुन जळता धरेस ग्रीष्मानलदाहें निष्ठूर
दाटुन येई मनी नभाच्या कृष्णमेघकाहूर

जुनी गोष्ट...

.
चिमणे चिमणे दार उघड, म्हणत कावळा थांबत होता
बाळाला तीट लावत लावत.. चिमणीचा वेळ जात होता

शेणा-मेणाच्या त्यांच्या घरात पाऊस दंगा करत होता
बाळ मजेत आईच्या कुशीत, रंगीत स्वप्नात शिरत होता !

...पावसाची वाट पहात पहात, चिमणी खूपच थकली आहे
दाराबाहेरच्या कावळ्याने, मान बाजूला टाकली आहे

जुनी गोष्ट..नव्या पिढीतली आई बाळाला सांगत आहे
बाबाचा जीव सिमेंटच्या घरांत वरखाली टांगत आहे !
.

गुरु...

गुरु रे गुरु तो कसा रे असावा...?
न चिडता ओरडता,डबलसीट बसावा
पुढुन वहान येता,मागुन बोंब मारावा
असा गुरु कमी,मित्र जास्ती असावा

धरो कान त्यानी जसा मी चुके रे
रडो तो ही जर कान माझा दुखे रे
उभयता असे प्रेम नसतो दुरावा
डोळे झाकुनी तेथे,प्लस वन भरावा

कसे ओळखावे,गुरु श्रेष्ठ आहे
जरा मी घसरता,करी तो ही - ह्हे...! ह्हे...!
असा दुष्टबुद्धी, गुरुही त्यजावा
मनी त्यासी नेहेमी,मायनस वन मोजावा

गुरु आत्म ज्ञानी,असो मित्र कोणी
जसा आमचा तेंडल्या,किंवा कॅप्टन धोणी
बघोनी शिकावा,शिकोनी बघावा
असा गुरू नेहेमी,हातचा एक धरावा

कधी तो ही मारे,किती ऊंच शॉटं
कधी शिष्य घेई,तयाचाच कॉटं

हुच्चभ्रु इतरांना व्यसनी बनवतात का ?

Taxonomy upgrade extras

नुकतेच एका संस्थळावरती असे वाचनात आले, की हुच्चभ्रु लोक्स सामान्य लेखकांना / सामान्य लोकांना आपल्या घरी जेवायला बोलावतात आणि दारू ढोसण्याचा आग्रह करतात. अशाने आंतरजालावरील एक सामान्य लेखकांची अथवा सामान्य लोकांची पिढीच ते वाम मार्गाला लावत आहेत हे त्यांना जाणवत नाही का ? 'ऐसी अक्षरे हे हुच्चभ्रु लोकांचे हुच्चभ्रु संस्थळ आहे' अशी वार्ता मध्ये एका विहिरीच्या काठावरती बेडूक पकडत असताना कानावरती पडली. त्यामुळे हा चर्चा प्रस्ताव इथे मांडण्याचे धाडस करीत आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न :-

हुच्चभ्रु म्हणजे नक्की कोण ? त्यांची व्याख्या काय ?

उपप्रश्न :-

तिळा तिळा दार उघड....

तारा वनारसे, शिक्षण-व्यवसायाने डॉक्टर असणार्‍या ह्या लेखिकेचे कथासंग्रह, कादंबरी, नाटक, काव्य असे सगळे साहित्य दर्जेदार आणि मोजके आहे.

तिळा तिळा दार उघड.... ह्या पुस्तकातील प्रवासवर्णने, साहित्याच्या माध्यमातून केलेल्या प्रवासाची क्षणचित्रे आहेत. ज्यातून लेखिका करत असलेला प्रवास आणि तिच्या आवडत्या साहित्यिकाचा परिचय वाचकाला खूप जवळून होतो.

सुरूवातीचा हा वेचा....

झेनोच्या कासवाची रेस

Taxonomy upgrade extras

ग्रीक साम्राज्यातील अथेन्स शहरात त्या दिवशी जल्लोश होता. अथेन्स शहरातील एकूण एक श्रीमंत (व त्यांच्या fashionable बायका!) रेसच्या मैदानावर गर्दी करत होते; गप्पा मारत होते; हसत खिदळत होते. कारण आजची रेस अत्यंत वेगळ्या प्रकारची होती. यापूर्वी याच मैदानावर कित्येक प्रकारचे चित्तथरारक खेळ त्यांनी पाहिले होते. भुकेले वाघ - सिंह बघता बघता गुलामांना खाल्लेले दृश्य, गुलामांच्या आपापसातील जीवघेण्या कुस्त्या, घोड्यांच्या पायाला कोवळ्या मुलांना बांधून त्यांच्या रक्तांची चिळकांडी उडेपर्यंत पळवलेल्या घोड्यांची शर्यत, जिवंत माणसाला उभे करून केलेला भालाफेक, थाळीफेक, रथांची शर्यत....

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २ : घर

धागाकर्त्याने पहिल्या पंधरवड्याच्या स्पर्धेत मी काढलेले एक छायाचित्र सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले याचा आनंद वाटला. ते छायाचित्र सुखावह नाही. त्यात एक अस्वस्थता आहे.
त्यामानाने इतरांनी काढलेली अनेक छायाचित्रे नयनरम्य आणि मनाला शांती देणारी आहेत. तरीही त्या छायाचित्राची निवड झाली हे पाहून थोडे आश्चर्य वाटले.

तर, येत्या पंधरवड्याच्या स्पर्धेचा विषय आहे: घर

स्पर्धा का इतर?

ज्येष्ठ विचारवंत प्रा. राम बापट यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत व राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. राम बापट यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. पुणे विद्यापिठात १९६५पासून १९९१पर्यंत राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात प्रथम व्याख्याता व नंतर प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले. काही काळ त्या विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला. दलित, आदिवासी, मागास व स्त्रिया आणि पर्यावरण याविषयीच्या चळवळीत त्यांना रस होता. त्यांची रसाळ व्याख्यानं आणि त्यातून गुंतागुंतीचे तत्त्वविचार मांडण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढे नेणारी होती. प्रा.