संवाद
माणसं एकमेकांशी कशासाठी बोलतात?
मन मोकळं करण्यासाठी?
वेळ घालवण्यासाठी?
ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी?
की सवय म्हणून?
अनेकदा मला हे प्रश्न पडतात, विशेषत: मी स्वत: आवश्यकतेपेक्षा जास्त बोलत असते तेंव्हा तर मला हमखास हे प्रश्न पडतात.
आणि गंमत म्हणजे दरवेळी या प्रश्नांची वेगळीच उत्तरे मला मिळतात.
व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार आणि खरे सांगायचे तर माझ्या मनस्थितीनुसार या प्रश्नांची उत्तरे बदलतात असे मला आढळले.
मजा वाटली मला. पण मनातला गोंधळ अधिकच वाढला.
- Read more about संवाद
- 18 comments
- Log in or register to post comments
- 16266 views
कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग १)
हजारों वर्षांपूर्वीची एक दुपार, इथियोपियाच्या वाळवंटी प्रदेशातील एका झुडपाळ भागात एक मेंढपाळ त्याच्या शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन गेला होता. त्या दुपारी त्याच्या असे लक्षात आले की १-२ शेळ्या नेहमीपेक्षा जरा जास्तच 'लाडात' येऊन उड्या मारत आहेत. त्याने सुरुवातीला तिकडे दुर्लक्ष केले. पण काही वेळाने त्याच्या असे लक्षात आले की आणखीन बर्याच शेळ्या लाडात येऊन उड्या मारू लागल्या आहेत. तो जरा चकितच झाला आणि त्या ज्या झुडुपांमध्ये चरत होत्या तिकडे गेला. त्या शेळ्या त्या झुडुपाची लाल बोरं किंवा बोरांसारखी छोटी छोटी फळे खात आहेत असे त्याला दिसले.
- Read more about कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग १)
- 56 comments
- Log in or register to post comments
- 25659 views
‘अंतरीचे धावे’ - भानू काळे
हा लेख गेल्या वर्षी लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकाचे पान ह्या सदरात प्रसिध्द झाला होता. त्याची लिंक सापडत नसल्याने तोच लेख इथे जसाच्या तसा देत आहे.
हे वाचून तुमच्या मनात येईल (साहजिकच आहे म्हणा!) की ‘काय हे! तेच ते आणि तेच ते’.... पण, वाचक-मित्रहो, सध्या नवीन वाचन-लिखाणावर बर्याच मर्यादा आल्या आहेत. कारण? अर्थातच, कार्यालयीन काम! त्यामुळे येणारी अस्वस्थता घालवण्याचा हा एक उपाय!
ह्याची लिंक सापडवून देण्यात माहीतगार मदत करतील (मागच्याप्रमाणे) अशी आशा आहे.
- Read more about ‘अंतरीचे धावे’ - भानू काळे
- 4 comments
- Log in or register to post comments
- 7162 views
महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा
" वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो ”
सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा!
माझी स्वत:ची अगोदरच वेबसाईट/संकेत स्थळ असल्यामुळे, पुन्हा तिथे लिहिलेले इथे नक्कल करून चिकटवणे, माझ्या तत्त्वात बसत नाही. शेवटी कॉपी बहाद्दर होण्यासाठीहि, ’तेथे पाहिजे जातीचे’
मात्र, अधून मधून, ’ऐसी अक्षरे’ ... संकेतस्थळावर वाचक म्हणून जरूर भेटीन !
- Read more about महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा
- 12 comments
- Log in or register to post comments
- 5440 views
"हा भारत माझा" - परीक्षण
हा चित्रपट मी काही दिवसांपूर्वी आशियाई चित्रपट महोत्सवात पाहिला होता. आता दि. ४ मे ला प्रदर्शित होत आहे. म्हणून हे परीक्षण मुद्दाम देत आहे.
"हा भारत माझा" हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असा आहे. अण्णा हजारेंच्या लढ्याला पाठिंबा देणारे लोक स्वतः जेथे तेथे नियम तोडण्यात पुढे असतात अशी टीका कायम केली जाते. या चित्रपटाचा विषय हाच आहे.
- Read more about "हा भारत माझा" - परीक्षण
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6787 views
तू
डोळ्यांमधली रात्र
हा वारा चोरून नेई
तू अशी उभी नि शुभ्र
ही जाई बहरत जाई
जळ इतुकेसे पातळ की
डोळ्यान्त असुनी तू दिसते
प्रतिबिम्ब? नव्हे ही छाया
तू असो वा नसो हसते
तुज स्पर्श करावा इतुका
मी आरस्पानी नाही
काचेच्या वलयापाशी
मी अखेर थाम्बुन राही
हेतू मनातले सारे
धरतात फेर चौफेर
तव पायाञ्च्या क्षितिजाञ्चा
मज भूल पाडितो घेर
गरगर भिरभिरतो वारा
आजू बाजू भवताली
मी शोधीत बसतो चिन्हे
अन् ऐकत एक गजाली
- Read more about तू
- 12 comments
- Log in or register to post comments
- 7878 views
(जळ्ळी मेली) कुटुंबसंस्था उर्फ आमच्या सिनेप्रेमाची चित्तरकथा
भारतीय सिनेमाला शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत म्हणून भारतीय सिनेमाविषयीचं आपलं उतू जाणारं प्रेम जाहीर करणारे उदंड लेख आता ठिकठिकाणी येऊ लागले आहेत.* आमच्या मनात मात्र हे प्रेम कधी निर्माणच होऊ शकलं नाही आणि त्याचं कारण भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्था होती. ते कसं हे सांगणारा हा (हृद्य वगैरे असण्याचा अजिबात दावा न करणारा) लेख.
टीप : प्रस्तुत लेखातल्या घटना किंवा व्यक्ती यांचा वास्तवातल्या घटना किंवा व्यक्ती यांच्याशी दुरान्वयानंही संबंध नाही. तसा तो आढळला तर जळ्ळी मेली कुटुंबव्यवस्था कशी घरोघरी सारखीच आहे याचा परिप्रेक्ष्य मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे एवढंच म्हणता येईल. हा योगायोग असेलही कदाचित, किंवा नसेलही. पण असो.
- Read more about (जळ्ळी मेली) कुटुंबसंस्था उर्फ आमच्या सिनेप्रेमाची चित्तरकथा
- 36 comments
- Log in or register to post comments
- 35126 views
पुस्तक विषयक
"पानिपत असे घडले..."
पानिपतचे युद्ध हा मराठी माणसाच्या अपार कुतुहलाचा विषय आहे. यापुर्वी कै. त्र्यं.शं. शेजवलकरांचे "पानिपत:१७६१" हे पुस्तक सोडले तर पानिपतवर संशोधनपुर्वक असे लेखन गेल्या पन्नास वर्षांत झालेलेच नव्हते. संजय क्षीरसागरांनी अथक परिश्रम घेत पानिपत युद्धाच्या पार्श्वभुमीचा व प्रत्यक्ष युद्ध व युद्धोत्तर घटनांचा चहुअंगाने वेध घेत आजवर अनुत्तरीत असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उपलब्ध सर्वच पुराव्यांच्या प्रकाशात शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत पुर्वाचार्यांच्या या विषयाबाबतच्या लेखनावर कळस चढवला आहे.
- Read more about पुस्तक विषयक
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5762 views
चौकन्हाण
वेळ पहाटे साडे चार वाजता..
स्थळ : महाराष्ट्रातील / विदर्भातील/ मराठवाड्यातील कुठलेही एक घर
- Read more about चौकन्हाण
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8762 views
एका खेळियाने
दिलीप प्रभावळकरांच्या'एका खेळियाने' ची सुधारित आवृत्ती नुकतीच वाचनात आली.'अक्षर प्रकाशन' च्या या आवृत्तीत प्रभावळकरांनी त्यांच्या 'वा गुरु!' या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतचा त्यांच्या रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. 'दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं रान पेटवलं असतं' हे पु.ल. देशपांडेंचं वाक्य या पुस्तकाच्या वेष्टणावर छापलेलं आहे. (का? कुणास ठाऊक!वेष्टणावर प्रभावळकरांची प्रशंसा करणारी इतरही वाक्यं आहेत. पुस्तक नीट निरखून बघून वाचायला सुरवात करणार्यांना हा प्रथमग्रासे मक्षिकापात वाटू शकेल.
- Read more about एका खेळियाने
- 28 comments
- Log in or register to post comments
- 14213 views