Skip to main content

का...का...का....काकस्पर्श!

'एक विलक्षण प्रेमकहाणी' म्हणून बराच गाजावाजा झालेला, जाहिरातींतून उत्सुकता चाळवणारा 'महेश वामन मांजरेकर' दिग्दर्शित 'काकस्पर्श' काल पाहिला. ( हे 'महेश वामन मांजरेकर' म्हणजे 'वास्तव'वादी महेश मांजरेकरच का? बहुदा असावेत.) अडीच-तीन तास कुठेतरी काढायचे होते, बाहेर मनस्वी उकडत होते. चित्रपटगृह चांगले, वातानुकूलित होते. या सबबी वाचकांसाठी नसून मी माझ्या 'मना सज्जना' ला सांगितलेल्या आहेत. मन हे ( 'काकस्पर्श' सारखे ) विलक्षण असते. ते हा चित्रपट बघून झाल्यावर पुन्हापुन्हा म्हणत होते, नुसताच मॉलमध्ये फिरला असतास, 'तेज' बघीतला असतास, 'विकी डोनर' बघीतला असतास...

प्राक्तन

कुणी रेखिली रेघ माथी कुणाच्या ?
कुणी भेदिले गूढ सारे ? कशाला?
दिले घेउनी मी कुणाचे कुणाला ?
कशासाठी हे प्रश्न पुसणे मनाला?

भले सर्व-सारे, बुरे सर्व-सारे
स्वतःच्याच पाशात गुन्तीत जावे
दुजाला कशाला विचारून र्‍हावे
मना फक्त स्वार्थात लिम्पून घ्यावे

पुन्हा षण्ढतेला पुन्हा तीच उकळी
चर्या निरोगी पोटास पाळी
मुक्याने वरी बोट दावी कपाळी
पुन्हा ती दिठी अन् पुन्हा तीच झोळी...

मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?

Taxonomy upgrade extras

ऐसी अक्षरे चे वाचक मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.

मिसळपाववरील शंकराचार्यावरचा धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. त्या धाग्यात म्हटले आहे की आपल्या सर्वोच्च धर्मगुरूंविषयी किंवा धर्माविषयी हिंदूंइतके औदासिन्य दाखविणारा दुसरा समाज नसेल!! खरे तर मला "मानवी जीवनात धर्माचे स्थान काय" हा मुद्दा त्याच चर्चेत मांडायचा होता.पण चर्चा अजून भरकटायला नको म्हणून नवा धागा काढत आहे.

धार्मिक संकेतस्थळे अश्लील संकेतस्थळांहून अधिक असुरक्षित

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार आंतरजालावरच्या धार्मिक संकेतस्थळांवर फेरफटका मारला तर तुमच्या संगणकात विषाणूसंसर्ग होण्याची शक्यता ही अश्लील संकेतस्थळांवरच्या फेरफटक्यापेक्षा अधिक असते. संकेतस्थळ चालवण्यामागची आर्थिक कारणं हा एक घटक यामागे असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिकाधिक ग्राहक आपली सेवा वापरण्यासाठी पैसे देतील अशी आशा अश्लील संकेतस्थळांना असते. अशा ग्राहकांना आपल्या संकेतस्थळावर असुरक्षित वाटू नये याची काळजी त्यामुळे तिथे घेतली जात असावी. त्या मानानं निव्वळ विचारप्रणालींचा प्रसार करण्यासाठी आंतरजालावर आपलं संकेतस्थळ स्थापन करणारे लोक तितकी काळजी घेत नसावेत.

आमचं खूप बरं आहे !

रामायण अन महाभारत हे दोन ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जीवनरेखा समजल्या जातात. प्राचीन काळापासून हिंदू धर्मातील स्त्रियांसमोर सीता अन द्रौपदी यांचे विशेष आदर्श आहेत.

पुन्हा राग मानायचा!

गेल्या बुधवारची गोष्ट. आम्ही एका हॉटेलात बसलो होतो. आम्ही म्हणजे प्रथमपुरुषी आदरार्थ एकवचनी या स्टाइलमध्ये नव्हे! संस्थानं कधीच खालसा झाली. त्यामुळे ‘परधानजी, आम्ही राज्याचा फेरफटका मारणार आहोत’ या टाइपचा डायलॉग आता रद्दबातल झालाय. नाही म्हणायला हल्लीच्या मराठी मालिकांमध्ये भरजरी वस्त्र परिधान केलेलं किमान एक स्त्रीपात्र आत्याबाई किंवा माँसाहेब या भूमिकेत शिरून ‘आम्ही हे कृत्य खपवून घेणार नाही’ असा मोबाईल फोनवरून कोणाला तरी दम भरत असलेलं दिसतं. पण हॉटेलात आम्ही म्हणजे मी सहकुटुंब बसलो होतो. टेबलाच्या एका बाजूला मी. समोरच्या बाजूला एका आसनात कुटुंब. दुस-या आसनात आमचं कन्यारत्न.

भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)

Taxonomy upgrade extras

भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)
मूळ लेखक: रॉबर्ट काप्लान
स्वैर अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)

परवा यशस्वी चांचणी केलेले प्रक्षेपणास्त्राला अग्नि-५ या नावाने ओळखले जाते! या आधी आग्नि-१ ते अग्नि-४ अशा संज्ञांच्या चार प्रक्षेपणास्त्रांची चांचणी करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची थोडक्यात माहिती या लेखाच्या दुसर्‍या भागात तक्ता-१ मध्ये दिलेली असून विस्तृत माहितीसाठीचे दुवे तक्ता-२ खाली दिलेले आहेत.