Skip to main content

‘द रीडर’... अनुवादः अंबिका सरकार

‘द रीडर’

(मूळ जर्मन कादंबरी: बर्नार्ड श्लिंक, मराठी अनुवाद: अंबिका सरकार, राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती: ऑगस्ट २००९, पृष्ठे: १५४)

गेल्या वर्षी 'लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकाचे पान' येथे हा पुस्तक-परिचय प्रसिध्द झाला आहे. आंतरजालावर तो धागा सापडत नाहीये. त्यामुळे तोच लेख इथे जसाच्या तसा देत आहे. "ऐसी अक्षरे" च्या रसिक वाचकांसाठी खास -----

‘द रीडर’......

लेक टॅपिंग

कोयना धरणात 'लेक टॅपिंग' केल्याची बातमी वाचली आणि उत्सुकतेपायी 'लेक टॅपिंग' थोडा शोध घेतला. http://www.rockmass.net/files/lake_tap_method.pdf येथे ह्याची सोपी माहिती आणि वरील चित्र मिळाले. सर्वांच्या माहितीसाठी ते येथे देत आहे.

======

ही नेटकी माहिती ऐसीअक्षरेच्या वाचकांना मराठीतून मिळावी म्हणून त्यातील महत्त्वाच्या परिच्छेदांचा अनुवाद करून देत आहे. मुळ पीडीएफ् फाईल मधे प्रताधिकाराचा उल्लेख नसल्याने माहिती प्रताधिकारमुक्त आहे असे समजतो. -- संपादक

'टॅपिंग पातळी' च्या खाली तोंडाशी एक लहान दगडी 'प्लग' सोडून बाकी तलावाखालून आणि तलावाच्या दिशेने एक बोगदा खणून ठेवणे हे 'लेक टॅपिंग' या प्रणालीच्या मुळ तत्त्वात समाविष्ट आहे (मुळ दुव्यावरील चित्र१ पहा). हा अंतिम प्लग नंतर फोडला जातो, ज्यामुळे तलावाच्या जमिनीला खालून एक भोक तयार होते. हे तंत्रज्ञान जूने आहे आणि एकट्या नॉर्वेमधेच कित्येकशे तलाव असे टॅप केले आहेत.

हे तंत्रज्ञान जलविद्युतक्षेत्रातील पाणी-पुरवठा, पिण्याचे पाठी, निस्सारणासाठी पाणी पुरवठ्या बरोबरच किनार्‍यापासून दूरच्या क्षेत्रातून तेल व गॅस पोहोचवण्यासठी सुद्धा पावरले जाते. यासाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे जमिनिच्या योग्य स्थितीची - म्हणजे योग्य स्थैर्य आणि जेथे भोक पाडले जाणार आहे तेथील दगडांची पार्यता यांच्या स्थितीची.

(या कार्यासाठी) योजना अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते आणि तिचा सतत पाठपुरावा करावा लागतो. त्याची महत्वाची वैशिष्ट्ये पुढिलप्रमाणे:

  • बांधकाम सुरू करण्यापूर्वी, भुगर्भातील पाषाणांची आणि तलावाची गाळाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवणे
  • शेवटच्या स्फोटासाठी योग्य पद्धतीची संकल्पना (डिजाईन) ठरवणे (म्हणजे 'ओपन' किंवा 'क्लोज' पद्धत वापरायची ते ठरवणे)
  • भोकपाडण्याच्या जागेकडे बोगदा खणताना आणि शेवटच्या दगडी प्लगची संकल्पना ठरवताना पाषाणाचे वजन आणि पार्यता यावर नियंत्रण ठेवणे
  • भोक जेथे पडणार आहे त्या भागातील प्रत्येक घटाकाचे संपूर्ण डिजाईन करून, शेवटच्या स्फोटाच्या वेळी तयार होणार्‍या दाबाने (मूळ ढाच्याला) कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करणे

ते कुटुंब

त्या कुटुंबाची ओळख थोडीशी योगायोगाने -अपघातानेच झाली. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा पहिली-दुसरीत होता आणि त्याला त्याच्या शाळेनंतर काही तास रहाता येईल अशा पाळणाघराचा आम्ही शोध घेत होतो. पाळणाघर घराच्या जवळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे, (आणि स्वस्तही पाहिजे!), मुलांना थोडीशी शिस्त लावणारेही असावे, पण शिस्तीचा फार मोठा बडगा उगारणारेही नको, जागा मोकळी, मुलांना खेळता येईल अशी असावी, मुलाच्या बरोबरीची चार मुले असावीत... कोणत्याही पालकांच्या ज्या सर्वसाधारण अपेक्षा असतील, त्या अपेक्षा घेऊनच हा शोध चालला होता.

अखेर

मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढण खर तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते. माझ्या सभोवतालच्या अनेक स्त्रिया रोज अशा ओझ्यासह जगतात याची मला आठवण रहावी म्हणून मी हा फोटो काढते आहे.

गुगल ड्राइव्ह

गुगल ही कंपनी एक अद्भुत कंपनी आहे. फक्त एका सर्चइंजीन वरून मल्टी बिलीयन डॉलर कंपनी होणे व आत्ताच्या घडीला इंटरनेट वर अधिराज्य गाजवणारी सेवा कंपनी होणे तेही मायक्रोसॉफ्ट आणि याहु सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून हे खरच अद्भुत आहे. सर्जी ब्रिनच्या एका व्हाईट पेपर प्रमाणे 'इंटरनेट तुमच्या खिशात' असे स्वप्न असलेली गुगल ही सेवा कंपनी अत्तुच्य अभियांतत्रिकी सेवा देऊन आपले सर्व दैनंदिन जीवन व्यापणार अशी लक्षणे दिसत आहेत.

वाचनसंस्कृती बद्द्ल श्री. राम जगताप यांचा लेख

Taxonomy upgrade extras

श्री. राम जगताप यांच्या ब्लॉगचा (http://ramjagtap.blogspot.in/) उल्लेख मी आधीही एका लेखात केलेला आहे. लेखन/वाचन संदर्भातले, मराठीतली नवनवीन चांगली पुस्तकं , या संदर्भातली जगतापांची मतं, त्यांचे विचार या सार्‍याचं प्रतिबिंब त्यात पडत असतं.

प्रस्तुत लेखाचं कारण म्हणजे जगतापांचा वाचनसंस्कृतीबद्दलचा अलिकडचा लेख. लेखाचा दुवा : http://ramjagtap.blogspot.in/2012/04/blog-post_22.html.

याबाबत आपले मत व्यक्त करू शकता...

Taxonomy upgrade extras

जशी एखादी छोटीशी वेल एका विशाल वृक्षावर अतीव विश्वासाने नि:संकोचपणे वेटोळे घालते अगदी तसेच जर एखाद्या मानवाच्या अंगा-खांद्यावर त्याच्या नातेवाईकांचे बाळ आपलेपणाच्या प्रेमाने बागडत असताना त्याला त्याबद्दल स्वत:च्या बाळाइतकेच प्रेम, ममता वाटून हे आपलेच मूल आहे हीच भावना सदैव मनी वावरत असेल आणि आपत्य प्रेम मिळून, माया ममता पुरेपूर देता येत असेल तरीही मग त्या बाळाला दत्तक घ्यायचे म्हणजे नेमके अजून काय साधायचे?
(माझ्या येणा-या पुस्तकातील संदर्भा वरून)

पुस्तक परिचय - द बॉय इन द स्ट्राइपड़ पायजमाज

गेल्या वर्षी वाचलेलं, आवडलेलं, व्याकुळ करणारं आणि माणसाच्या अगम्य इच्छापूर्तीविषयी विचार करायला लावणारं हे पुस्तक ---

द बॉय इन द स्ट्राइपड़ पायजमाज
अनुवादक : मुक्ता देशपांडे - मूळ लेखक : जॉन बायेन